जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे.
July 6, 2022
जन्म. ३० मे १९१५ बांदे सावंतवाडी संस्थान येथे.
अप्पा गोवेकर यांचे शिक्षण बांदा येथेच झाले. १९३० ते मिडल स्कूल, बांदा येथून प्राथमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९२८ साली सावंतवाडी संस्थानच्या आंतरशालेय क्रीडास्पर्धेत १५ वर्षाखालील गटात पाच मैल धावस्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांनी पटकावले. १९३० साली या गटात सर्वोच्च बहुमान प्राप्त केला.
त्यांचे वडील नारायणराव गोवेकर हे बांदा मिडल स्कूलचे मुख्याध्यापक होते.त्यांचे १नोव्हेबर १९२८ रोजी आकस्मिक निधन झाले आणि गोवेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले. पण मोठ्या जिद्दीने हे कुटुंब सावरले.
१९३० ते १९३३ या काळात ओटवणे, सातोसे, होडावडे या ठिकाणच्या प्राथमिक शाळात रजेवरील शिक्षकांचे जागी अंश- कालिक' शिक्षक म्हणून अप्पा काम करू लागले.
याच काळात पत्रादेवी येथील दारूदुकानांवरील यशस्वी आंदोलन, त्याचप्रमाणे प्रभातफेऱ्या, हरिजन शिक्षण यामध्ये प्रामुख्याने भाग ते घेऊ लागले. १९३४ मध्ये सावंतवाडी मोती तलावात झालेल्या पहिल्याच पोहोण्याच्या शर्यतीत पहिला नंबर मिळवून त्यांनी विक्रम केला. त्यापूर्वी १९३३ मध्ये शिक्षक म्हणून बांदा येथील मिडल स्कूलमध्ये नेमणूकही झाली होती. त्यानंतर १९३५ ते १९४३ या कालखंडात डेगवे, निगुडे, उगाडे, कोनाळ व आरोस या गांवी खात्यातर्फे बदल्या झाल्या, पण अप्पानी शिक्षक म्हणून आपली भूमिका उत्तम प्रकारे निभावली.
१९४० साली एक पोस्टकार्डवर एका बाजूने ६००० शब्द लिहून केलेला सूक्ष्म हस्ताक्षराचा जागतिक विक्रम त्यांनी केला होता.' सुंदर हस्ताक्षर कसे बनवाल ?'
यावर ते अधिक विचार करू लागले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु लागले. एक माहिती पत्रक त्यांनी तयार केले होते आपले व्याख्यान संपले की ते विद्यार्थ्यांना वाटत असत.
हस्ताक्षरमहर्षी अप्पानी पाठवलेली सुंदर सूक्ष्म हस्ताक्षरांतील सुमारे २० पोस्टकार्डे लळीत यांच्या कडे आहेत. विशेष म्हणजे त्यातील एक पोस्ट खात्याला 'चकवा' देऊन छापील समजून 'नाॕटपेड 'झाले. तेव्हा अप्पानी त्यांना सांगितले होते. 'अरे पत्र आले तर दंड भरून लगेचच घे.'
१९४३ साली उजळ माथ्याने सामाजिक व राजकीय आंदोलनांत भाग घेता यावा हेतूने शिक्षण खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन सावंतवाडीला आले. काळात उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पोकळे-विडी कारखान्यात मुनीम म्हणून नोकरी ते करु लागले.१९४५ मध्ये सावंतवाडी शहरातील मलेरियाच्या उपसर्गाने सेवानिवृत्ती स्वीकारून स्वग्रामी बांदे येथे पुन्हा गेले. बांदा येथे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून १९४७ पर्यंत स्वार यांचेकडे मुनीम म्हणून नोकरी सुरू केली.
१९४७ च्या ऑक्टोबरच्या सुमारास आबासाहेब वालावलकर यांच्या निमंत्रणावरून पुन्हा सावंतवाडी येथे ते आले व सावंतवाडी 'प्रजा परिषदे'चे चिटणीस म्हणून सुमारे ६ महिने सवेतन सेवा केली. फेब्रुवारी १९४८ सावंतवाडी संस्थान-विलीनीकरण आंदोलनात सहभागी झाले.
अप्पानी एक निवडणूकही लढवली कारण ती बिनविरोध होणार होती. अर्थात ते निवडणूक हरले, पण त्यांनी सायकलवर फिरून प्रचार केला..'लोकशाही जीवंत ठेवली' म्हणून बॕ. नाथ पै म्हणाले,'पराभवाला प्रतिष्ठा मिळवून दिलीत अप्पा .!
अप्पानी १९४८ ते १९५३ या काळात सुमारे सहा वर्षे साप्ताहिक वैनतेय' कचेरीत व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली. या काळातच व पुढे १९७८ पर्यंत दै.लोकसत्ता, लोकमान्य, सकाळ अशा दैनिक वृत्तपत्रांसाठी वार्ताहर म्हणून काम करू लागले. मध्यंतरी सुमारे २॥ वर्षे सावंतवाडी येथील खादी भांडाराचे कार्यवाह म्हणून विनावेतन सेवा त्यांनी केली.
सा. 'वैनतेय कचेरीतून सेवानिवृत्तीनंतर कुटुंब निर्वाहाचे दृष्टीने वार्ताहर, विविध प्रकारचे लिहिण्याचे काम, रबरीशिक्के, छपाईकामे यांची ते करु लागले.
१९३५ ते १९५१ या काळातच दोन नाटके, १५-२० कथा. ५०-६० शिशुगीते यांची निर्मिती. हौशी कलावंतांच्या सहाय्याने बांदा व सावंतवाडी येथे नाट्यप्रयोगात २५-३० भूमिका व काही प्रयोगांचे दिग्दर्शन, 'मदिरा' या विमल घैसास लिखित नाटकाचे प्रयोग केले.'दारूबंदी प्रचारकार्य 'म्हणून दोडामार्ग ते कणकवलीपर्यंत अनेक प्रयोग त्यांनी सादर केले.
१९७५ मध्ये दापोली कॉलेजचे प्राचार्य माननीय चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याकडून' हस्ताक्षर महर्षी' हा बहुमान त्यांना देण्यात आला. १९७२ मध्ये मुंबई येथे हस्ताक्षर सुधार मोहिमेचा शुभारंभ त्यांनी केला. जी आजही चालू आहे.
१९९०-९१ पर्यत मुंबई, पुणे,कोल्हापूर, सांगली, बेळगांव या शहरांतून, त्याच प्रमाणे गोमंतक ते रत्नागिरीपर्यंत अनेक माध्यमिक विद्यालये व अध्यापक महाविद्यालये यामधून ७००च्या वर हस्ताक्षर सुधार मोहिमेची व्याख्याने त्यांनी दिली.
१९७८ मध्ये सावंतवाडी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सत्कार काही तात्त्विक कारणांमुळे स्वीकारला नाही.
अप्पासाहेब गोवेकर यांनी लिहिलेल्या कथा.. कविता व अन्य लेखन यावर डाॕ. जी. ए. बुबा यांनी एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. चिऊमाऊ, जादुची पेटी-रेडियो अशी गीते त्यांनी लिहिली. त्यांच्या अनेक गीतांचे संकलन झालेले नाही. बालसन्मित्र,आदर्श ,वैनतेय,किरात अशा अनेक साप्ताहिकांतून त्यांच्या पंधराच्या वर कथा प्रकाशित झाल्या आहेत. म्हटले तर सहज उपलब्ध होतील. त्यांचा कथासंग्रह प्रकाशित व्हायला हवा. 'बंड्याचे लग्न 'ही त्यांची कथा वाचली की आजही ताजेतवाने वाटते. 'आसुरी आकांक्षा ' या त्यांच्या नाटकाची संहिता प्रकाशित केली तर कोकणातील हौशी नाट्य मंडळे त्याचे आजही प्रयोग करतील. त्यांचे साहित्य संकलन होऊन प्रसिद्ध व्हायला हवे अशी इच्छा जी.ए. बुवा सरांसारखे साक्षेपी समीक्षक व्यक्त करतात; त्या अर्थी ते लेखन नक्कीच लक्षवेधी असणार यात मला तरी शंका वाटत नाही.
' मनस्वी' व अक्षरप्रपंच' ही पुस्तके विकास गोवेकर यांनी प्रकाशित केली.
अप्पासाहेब गोवेकर यांचे २३ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले. अप्पांनी सुरू केलेली 'हस्ताक्षर सुधार मोहिम' आजही सुरु आहे. त्यांचे चिरंजीव विकास गोवेकर ती चालवतात व दरवर्षी अप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ हस्ताक्षर स्पर्धा व अन्य उपक्रम करतात त्यात प्रकाश,उल्हास व अन्य नातेवाईक (बिले, भिसे ,टोपले,पावसकर इ.) सहभागी होतात.
-- डॉ.बाळकृष्ण लळीत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
May 30, 2022
राजेंद्रकृष्ण यांचे खरे नाव राजिंदर दुग्गल. शालेय वयात आठवीपासून राजेंद्रकृष्ण कविता करत असत.त्यांचा जन्म ६ जुन १९१९ रोजी जलालपूर पाकिस्तान येथे झाला.कवितेच्या वेडाने ते पुढे मुंबईत आला आणि सिनेमासाठी लेखन करू लागले. मुंबईतील त्यांचा प्रारंभीचा संघर्ष कंगवे, रूमाल विक्री करण्याइतपत कष्टाचा होता. त्या काळात अनेक गरीब मित्रांनी त्यांना आसरा दिला; १९४७ साली राजेंद्रकृष्ण पटकथाकार झाले आणि त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला ‘जनता.’ गीतकार म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता १९४७ सालचा ‘जंजिर.’
गीतकार आणि लेखक अशा दुहेरी भूमिकेमुळे त्याचा मान अधिक वाढला. मोतीलाल आणि सुरैया यांची भूमिका असलेल्या १९४८ सालच्या ‘आज की रात’ या चित्रपटामुळे ‘राजेंद्रकृष्ण’ नाव फिल्म इंडस्ट्रीत ओळखले जाऊ लागले. ‘सुनो सुनो ये दुनियावालो बापुजी की अमर कहानी.’ हे महात्मा गांधींच्यावर राजेंद्रकृष्ण यांनी गाणे लिहिले होतं, त्याला हुस्नलाल भगतराम यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि रफी यांनी गायिलेल्या हे गाणे रेडियो सिलोन खूप गाजले. या गाण्याने राजेंद्रकृष्ण गीतकार म्हणून घरोघरी पोहोचले. कथा-पटकथाकार म्हणून राजेंद्रकृष्ण यांचे नाव हिंदी, मद्रासी सिनेमाच्या पडद्यावर झळकत होतं. तमिळ भाषेचं उत्तम ज्ञान अवगत असल्याने त्यांना सर्वत्र दक्षिणेत व दक्षिणेतील निर्मार्त्यांकडून कामं मिळत गेली. तिथे सी. रामचंद्र ऊर्फ राम चितळकर यांचा दबदबा होता. त्यांच्याशी राजेंद्रकृष्ण यांची गट्टी जमली आणि या जोडीने नंतर पुढे उत्तमोत्तम गाणी हिंदी सिनेसंगीताच्या कोषात अजरामर केली. ‘अनारकली’, ‘आझाद’, ‘आशा’ आणि सर्व जगाला वेड लावणार्याा अलबेलाची गाणी होती. सी. रामचंद्र, राजेंद्रकृष्ण या जोडीने ‘यह जिंदगी उसी की है’ (अनारकली), ‘ए दिल मुझे बता दे, तू आ गया है’ (भाई भाई), ‘मन डोले मेरा तन डोले’ (नागीन), ‘कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबिरा रोया), ‘छूप गया कोई रे दूर से पुकार के’ (चंपाकली), ‘चल उड जा रे पंछी’(भाभी), इतना ना मुझसे तू प्यार बढा (छाया) अशी सुरस गाणी दिली. ३०० हून अधिक चित्रपटांचं गीतलेखन करणाऱ्या राजेंद्रकृष्ण यांनी अनेक चित्रपटांचं कथा, पटकथा लेखनही केलं होते.
नया दिन नयी रात, गीता मेरा नाम, बनारसी बाबू , ब्लॅकमेल, बॉम्बे टू गोवा, रखवाला, गोपी, एक श्रीमान एक श्रीमती, सच्चाई, वारीस, पडोसन, साधू और शैतान, नई रोशनी, प्यार किये जा, खानदान, ब्लफ मास्टर, छाया, नजराना, भाई भाई, नागीन, ‘पडोसन’ची पटकथा मा. राजेंद्रकृष्ण यांनीच लिहिली होती. मा.राजेंद्रकृष्ण रेस खेळण्याचा छंद होता, यात त्यांना १९६० च्या दरम्यान त्यांच्या रेस खेळण्याच्या छंदाला यश लाभलं होतं, ४९ लाखांचा ‘जॅकपॉट’ घोड्यांच्या शर्यतीत लागला होता.
काय योगायोग राजेंद्रकृष्ण यांचा जन्म ६ जून व निधन सुद्धा ६ जून. राजेंद्रकृष्ण यांचे ६ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजेंद्रकृष्ण यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=tPvqD3K8jXQ
https://www.youtube.com/watch?v=BylUftxAmvo
June 6, 2017
महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.
रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.
लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.
1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.
दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
१९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.
त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.
मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
June 18, 2022
ग्रँडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपट्टु प्रवीण ठिपसे यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५९रोजी झाला. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला.
प्रवीण ठिपसे यांचे वडील डॉ. महादेव ठिपसे हे महात्मा गांधींचे अंगरक्षक होते. स्वातंत्र्यलढय़ासाठी १० वर्षे दिल्यानंतर ते डॉक्टर झाले आणि त्यांनी मुंबईत प्रॅक्टिस सुरू केली. प्रवीण यांच्या आईनी आपल्या सर्व मुलांना बुद्धिबळाचं वेड लावलं. तेही इतकं की, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ही मुलं खेळायचा आग्रह करत. मोठे बंधू अभय यांना खेळाचं तांत्रिक ज्ञान अवगत होतं आणि शिकवण्याचं कौशल्यही.
बुद्धिबळाचे क्लिष्ट धडे ते अत्यंत सोप्या शब्दात धाकटय़ा दोघा भावांना देत. त्यांची ही हातोटी बघून पुढे अनेक वर्षांनी महाराष्ट्र शासनाने त्यांना बुद्धिबळ प्रशिक्षणासाठीचा मानाचा ‘दादोजी कोंडदेव पुरस्कार’ देऊन गौरवले होते. आईकडून प्राथमिक धडे घेतल्यावर प्रवीण ठिपसे यांनी सहा-सातव्या वर्षीच वेगवेगळ्या शालेय स्पर्धा खेळायला सुरुवात केली.
आईची एक आठवण सांगताना म्हणतात. ‘‘१९७० मध्ये मी आठवी-नववीत असताना आमच्या शाळेने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्याविषयी अनास्था दाखवल्याने आईने शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन दादासाहेब रेगे यांना जाऊन भेटली. परिणामी १९७२-७३ आणि १९७३-७४ या दोन्ही वर्षी बुद्धिबळाचा आंतरशालेय करंडक ‘बालमोहन’कडे आला आणि त्यानंतरही पुढची तीन वर्षे प्रवीण ठिपसे यांचा धाकटा भाऊ सतीश यांनी तो शाळेकडेच राखला.
आंतरशालेय करंडक जिंकल्यामुळे रामचंद्र सप्रे, श्रीकृष्ण साखळकर, अरुण वैद्य, सुरेश शाळिग्राम, अविनाश आपटे.. अशा महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचं लक्ष प्रवीण ठिपसे यांनी वेधून घेतलं. त्यानंतर या दिग्गजांचा खेळ बघत, त्यांच्या चर्चा ऐकत या एकलव्याची साधना सुरू झाली आणि त्याने एक-दोन वर्षांतच प्रथम राज्य व नंतर राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात केली. संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेणारी १९७४ मधली एक घटना प्रवीण ठिपसे यांच्या जीवनात घडली.
बुद्धिबळावर ज्यांनी १०० च्यावर पुस्तकं लिहिली आहेत, असे रशियाचे प्रसिद्ध खेळाडू युरी अवेरबाख भारतात आले असताना, ते एकाच वेळी २५ अव्वल खेळाडूंशी खेळतील असं जाहीर करण्यात आलं. त्यांपैकी २४ खेळाडूंना त्यांनी हरवलं. त्यांची एकच मॅच बरोबरीत सुटली. तो प्रतिस्पर्धी होता प्रवीण ठिपसे, वय वर्ष १५. हा खेळ बघणाऱ्या डॉ. सव्र्हेयर या महान खेळाडूने त्याच वेळी भविष्य वर्तवलं की, एक ना एक दिवस हा मुलगा ग्रॅण्डमास्टर होईल. त्यांचे हे बोल १९९७ साली खरे ठरले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच बुद्धिबळ ऑलम्पियाड, एशियन टीम चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा प्रवीण ठिपसे यांचा सिलसिला सुरू होता. बुद्धिबळातील पराक्रमामुळे १९ व्या वर्षी छत्रपती पुरस्कार, २३व्या वर्षी अर्जुन पुरस्कार आणि पंचविशीच्या आतच ग्रॅण्डमास्टर किताबासाठी पहिला परफॉर्मन्स असा त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. प्रवीण ठिपसे यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे या महिला इंटरनॅशनल मास्टर आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 12, 2017
‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते.
December 16, 2021
मुंबईमधील जेष्ठ कामगार नेते व राष्ट्रिय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस रामचंद्र हुलावळे हे कामगारांच्या आयुष्यातील सदैव तेवणार्या दीपस्तंभासारखे होते. मुंबई मधील गिराणी कामगार व त्यांच्या हजारो कुटुंबियांच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख, व आकांक्षा ते प्रत्यक्ष जगले. १९७५ साली रामचंद्र हुलावळेंनी मुंबईतील घोडपदेव प्रभागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. हुलावळेंचा गेली पन्नास वर्षे कामगार चळवळीला फुलविण्यात व स्वयंपूर्ण बनविण्यात मोलाचा सहभाग होता. १९५५ च्या सुमारास “रिव्हॉल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया” च्या चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांच्या निडर व ताठ कण्याची, तसेच स्पष्टवक्तेपणाची प्रचिती सर्वांना आली होती. नंतर १९६२ साली रामचंद्र हुलावळेंनी ग. द. आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघात प्रवेश केला होता.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
मुंबईची स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपली विद्यार्थिनी ज्योती गवते ही पहिल्या क्रमांकाने विजेती ठरेल हे तिचे प्रशिक्षक रवि रासकटला यांनी सांगितले होते. काही वृत्तपत्रांनी त्यास तशी प्रसिद्धीही दिली होती. तथापि जेव्हा तिचा तिसरा क्रमांक आल्याचे जाहीर करण्यात आले, तेव्हा त्यांना, ज्योतीला धक्काच बसला. ज्या दोघी पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे जाहीर करण्यात आले, त्यांनी जवळच्या मार्गाने अंतर पार केले होते.
यामध्ये त्यांनी केलेली ती फसवणूक नसेलही कदाचित, पण जर त्यांच्या या ‘यशा’वर शिक्कामोर्तब होते, तर जी योग्य मार्गाने यशस्वी झाली तिच्यावर अन्याय झाला असता. गेल्या वर्षी जी मुलगी अनवाणी पळली होती आणि तिला तेव्हा दुसरा क्रमांक मिळाला होता, ती ज्योती गवते या खेपेच्या मॅरॅथॉन स्पर्धेची विजेती ठरली आहे. यंदा तिला तीन तास पाच मिनिटे आणि तीस सेकंद एवढा वेळ लागला. रासकटला यांनी ती हे अंतर तीन तासातच पार करील, असे गृहित धरले होते. गवते ही परभणीची आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. ज्योती खेळामध्ये करिअर करू इच्छित असली, तरी तिला लागणाऱ्या सुविधा पुरवू शकण्याची ऐपत त्या कुटुंबाकडे नाही. अशा स्थितीत तिची जिद्द तिला स्वस्थ बसू देईना. रासकटला यांनी तिला धीर दिला आणि एक पैसाही न घेता तिला प्रशिक्षण दिले. आपल्याला या यशापर्यंत जायचे आहे असे तिने मनाने ठरवले होते आणि ते तिला मिळाले. तिचा आत्मविश्वासच तिला यशाच्या या पायरीपर्यंत घेऊन गेला आहे. गेल्या वर्षी तिला यशाने हुलकावणी दिली होती, पण यंदा तिने मुंबई जिंकली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे ते आपण कधीही पाहात नाही, असे सांगणारी ज्योती हिची वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रवि रासकटला यांची भेट झाली आणि त्यांना तिच्यात असलेल्या ध्येयापर्यंत जाण्यायोग्य तडफ पाहायला मिळाली. चेहऱ्यावर दरिद्री परिस्थितीचे भान बाळगणारी ज्योतीने रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला प्रारंभ केला. ती रासकटला यांना २००३ मध्ये भेटली होती. त्यांनी तिच्या आई-वडिलांना तिच्यामध्ये असलेल्या गुणांची माहिती देऊन म्हटले, की तिला खेळात प्रावीण्य कमवू द्या. ज्योती पुढल्या वर्षी पदवीधर होईलसुद्धा. दोन दिवसांपूर्वी तिने मिळवलेल्या यशाची तयारी तिने गेल्या वर्षभरामध्ये केली होती. नाशिक जिल्ह्य़ातल्या कविता राऊतचा दरम्यान विक्रम तिने अनुभवला. एका आदिवासी समाजातून आलेली एक मुलगी जर राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत आणि आशियाई क्रीडास्पर्धेत पदक मिळवू शकते, तर मग मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन आपल्याला त्या यशापर्यंत का जाता येणार नाही असा विचार तिने केला. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ती रोज सराव करते. तिचे वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बँकेत शिपाई आहेत. घरच्या गरिबीची ज्योतीला चांगलीच जाणीव आहे, पण त्यावर मात करायची तर हे दिव्यही करायला हवे, असे तिने ठरवले आणि त्यानुसार तिने ते मिळवून दाखवले. गेल्या वर्षी तिने जिंकलेले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक २ लाख ३८ हजारांचे होते. त्या वेळचे ते पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. ज्योतीचे दोन्ही भाऊ शिकत आहेत. परभणीत ती ज्या घरात राहते ते घर अगदी छोटेसे आहे. सहजासहजी कुणाच्याही नजरेस न भरणारे आहे. अशा या स्थितीत तिने मिळवलेले यश हे देदीप्यमान आहे आणि आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करत आहे. त्या दृष्टीने तिला अर्थातच अधिक मार्गदर्शनाचीही गरज भासणार आहे.
-----------------------------------
Aniket
ज्योती गवते
ज्योती गवतेचा जन्म परभणीमध्ये अत्यंत गरीब व हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितींमध्ये झाला. लहानपणापासून काटक व चपळ असल्यामूळे पळण्याची व विविध मैदानी खेळ लीलया खेळण्याची सवय तिला होती. धावण्याचे वेड, कसब व जिद्द या तिन्ही गोष्टी तिच्याजवळ मुबलक असल्या तरी आर्थिक चणचणींमूळे या क्रीडाप्रकाराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे तिला शक्य नव्हते. तिचे बाबा महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बँकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परंतु उत्तम शाडूच्या मातीला कलात्मकतेने आकार देवून तिला रेखीव गणरायाचे रूप देणारा शिल्पकार मिळावा, त्याप्रमाणे तिला कुठल्याही धनाची अपेक्षा न बाळगता, अस्सल व्यावसायिक प्रशिक्षण देणारे रवि रासकटला यांच्यासारखे गुरू मिळाले व तिच्या स्वप्नांची गाडी भरधाव सुटली. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर तिने धावण्याचा कसून सराव केला. यावर्षीच्या मुंबईच्या स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवून तिने दैदिप्यमान यशाची नोंद केली. यंदा तिला हे अंतर पार करण्यासाठी केवळ तीन तास पाच मिनीटे एवढा वेळ लागला. गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिने रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी धावण्याची किमया केली होती व तरीदेखील द्वितीय क्रमांक पटकाविला होता. गेल्या वर्षी तिला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली, पण यंदा तिने मुंबई जिंकून दाखवली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे हे ती कधीही पाहात नाही, असे जेव्हा ती पत्रकारांना सांगते, तेव्हा तिच्या चेहर्यावरून ओसंडून वाहणारा आत्मविश्वास तिच्या आजवरच्या कठोर साधनेची व धावण्यावरील एकनिष्ठतेची प्रचिती देत असतो. धावण्याप्रमाणेच आभ्यासातही तिला गती असून पुढील वर्षी पदवीधर बनण्यासाठी तिची धावण्याच्या सरावाची कसरत सांभाळता सांभाळता, आभ्यासाची तयारीही जोरदार सुरू आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमूळे तिच्या कुटुंबियांना भरपूर आर्थिक आधार मिळाला आहे. गेल्या वर्षी तिने जिंकलेले पारितोषिक २ लाख ३८ हजार रूपयांचे होते. त्या वेळचे पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करीत आहे.
August 5, 2017
अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.
July 7, 2021
ठाणे येथे सुरुवात करुन गेली ४५ वर्षे योगप्रसारासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते. २६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली.
August 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti