जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज ५ डिसेंबर
आज अभिनेत्री सारिका यांचा वाढदिवस.
जन्म. ५ डिसेंबर १९६०
माहेरचे नाव सारिका ठाकूर. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले. यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत. लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 12, 2016
काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला. कवी सुधांशु यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. १९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. कवी सुधांशु यांच्या गीत दत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले.
भारत गायन समाजात आणि नंतर अन्यत्र पुण्यात झालेल्या कार्यक्रमांना मास्टर कृष्णराव, श्री (ना.र.)मारुलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा.द. खेर, सरदार आबासाहेब मुजुमदार यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती. कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी तंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. १९६० मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५ पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला. कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत.
औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९ पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात, व आजही अध्यक्ष आणि फाजिल मानपानांविना हे संमेलन पार पडते. १९७४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला होता. कवी सुधांशु यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. आर. एन. पराडकर आणि माणिक वर्मा यांनी गायलेली त्यांची गाणी अजून लोकांच्या मनात आहेत. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘देव माझा विठू सावळा’ या गीतांचे कवी कवी सुधांशुच. कवी सुधांशु यांचे १८ नोव्हेंबर २००६ ला निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
November 18, 2018
चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला.
April 20, 2022
व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली.
March 5, 2018
आजमितीला संतूर आणि शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणार्या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो.
March 1, 2018
धनंजय कुलकर्णी हे सकाळ, लोकसत्ता, पुढारी, लोकमत सोबतच प्रीमियर, तारांगण या अंकातून चित्रपट विषयी स्तंभ लेखन करीत असतात. त्यांनी पुण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन केले आहे. तसेच खाजगी रेडिओ एफ. एम. वर अनेक चित्रपट विषयक कार्य क्रमाचे सादरीकरण केले आहे.चित्रपट विषयक अनेक वेब पोर्टल वर ते लिखाण करीत असतात.
June 15, 2022
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. “कायद्याच बोला” या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
June 4, 2022
गेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण देशपांडे छाछायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत आहेत.
May 24, 2014
गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रे लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्हासाबद्दल फिर्याद) ही त्यांची पुस्तके आहेत.
१९ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.
Pandurang Shridhar Apte
November 7, 2017
मनोज कुमार यांच्या "उपकार‘ चित्रपटातलं आजही दर स्वातंत्रदिनी अन् प्रजासत्ताकदिनी आवर्जून कानांवर पडणारं गाणं "मेरे देश की धरती‘... हे गाणं कल्याणजी-आनंदजी या जोडगोळीच्या संगीताने जेवढं लोकप्रिय केलं, त्याहीपेक्षा ते देशभर नेलं ते महेंद्र कपूर यांच्या आवाजाने. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९३४ रोजी झाला. महेंद्र कपूर यांचा जन्म व्यापारी घरात झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार शालेय स्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मा.मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.
गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांनी गायन केले. मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. महेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, सारखे अनेक पुरस्कार मिळाले. मा.महेंद्र कपूर यांचे निधन २७ सप्टेंबर २००८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- वेब दुनिया
काही गाणी महेंद्र कपूर यांची
तुम अगर साथ देने का वादा करो
लाखो हे यहाँ दिल वाले पर प्यार नहीं मिलता
चलो एक बार फिर से अजनबी बन जाएँ
तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
मेरे देश की धरती सोना उगले
मेरा रंग दे बसंती चोला
है प्रीत जहाँ की रीत सदा
नीले गगन के तले
किसी पत्थर की मूरत से
भारत का रहने वाला हूँ
January 11, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti