(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चित्रकार विश्वनाथ नागेशकर

    गोमंतक भूमीचे जग प्रसिद्ध चित्रकार.त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१० रोजी झाला.विश्वनाथ नागेशकर, हे कोल्हापूरचे चित्रकार. त्यांच्या चित्रांमधून भारतीय आणि पाश्चीमात्य चित्र परंपरेचा सुरेख संगम दिसत असे. विश्वनाथ नागेशकर यांचे फोंडा, गोवा नजीकच्या नागेशी या निसर्गरम्य व श्री नागेशाचे वरदहस्त लाभलेल्या गावात बालपण गेले. त्यांनी कोल्हापूरचे कलाप्रेमी छत्रपती मा.शाहू महाराजांच्या मदतीने मुंबईच्या प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. तेथे डिप्लोमा घेतल्यानंतर १९३५ साली उच्चशिक्षणासाठी ते जर्मनीला गेले. पॅरिसच्या एकोल नॅशनल स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जर्मनीतील म्युनिच आर्ट स्कूलमध्ये २ वर्षाचा चित्रकलेचा कोर्स पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करताना सन्माननीय अलेक्झांडर वॉन, हॅम्बोल्टची स्कॉलरशीप मिळवली. त्यानंतर बर्लिन अकादमीच्या भव्य आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. सतत कलासाधनेत मग्न असा भारतीय हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळख. प्रो. स्टुब यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. जर्मन कलाजगतात चांगली ओळख निर्माण झाली. प्रो. स्टुब आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात त्यांची चित्रे पाठवत. म्यूरल्स हा खास आवडीचा विषय त्यामुळे युरोपात बदलत गेलेल्या शिल्पकलेचाही अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धात स्वतःचे घर, स्टुडिओ, पेटिंग्ज बेचिराख होताना पाहिले. नाझींच्या त्रासातून लंडनला जावे लागले. एडना नावाच्या जर्मनीशी त्यांनी विवाह केला. एकना यांनी मा.विश्वनाथ नागेशकर यांना आणि त्यांच्या चित्रकलेला आयुष्यभर जपले. या दोघांच्या जीवनप्रवासाची, कलाप्रवासाची ही कहाणी आहे. आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने निर्माण केलेल्या चित्रकृतींमुळे नागेशकरांनी परदेशात अभूतपूर्व यश व किर्ती मिळवली. भारत सोडून जर्मनीत स्थायिक होणारे नागेशकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताच्या कलाक्षेत्रातील खरे धाडसी चित्रकार. लंडनचा निरोप घेतल्यावर संपूर्ण युरोपचा प्रवास, म्युझियम, कलादालन पटात राहिले. १९५५ नंतर पुन्हा जर्मनीला स्थायिक. एडना व त्यानंतर विश्वनाथ नागेशकरांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व उपलब्ध चित्रे व त्यांच्या वापरातील वस्तू कोल्हापूरला मा.जयसिंग नागेशकर यांच्याकडे पाठवल्या. त्यांनी पुढाकार घेवून या पुस्तकाची लेखनाची जबाबदारी माधवीताई देसाई व प्रकाशनाची जबाबदारी मुक्ता पब्लिशिंग हाऊसवर सोपविली. तसेच मुंबई, पुणे, गोवा, सांगली येथे चित्र प्रदर्शने भरविली. अशा प्रकारे देशी व परदेशी चित्रकलेतील विविध प्रकारांचे ज्ञान आत्मसात करुन आपल्या कलेच्या सामर्थ्यावर तेथेच स्थायिक झालेल्या दुसऱ्या महायुद्धात सर्वस्व गमाहूनही त्याचा परिणाम आपल्या चित्रकृतींवर न होवू देता आपल्या असंख्य कलाकृतींनी जागतिक कीर्ती संपादन केली. मा.विश्वनाथ नागेशकर यांचे १८ मार्च २००१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    आपल्या मातृभूमीशी परिवाराशी जीवनभर नाते जपणाऱ्या या जगविख्यात चित्रकाराचे जीवन, कार्य, कर्तृत्व यावर विश्वरंग नावाचे पुस्तक आहे. पुस्तकात त्यांची १६ रंगीत चित्रे दिली आहेत.
    http://www.discountpandit.com/products/Rohtak/books/Vishwarang-Paperback-Marathi-price-in-
    india-NzUxNzI=.html

    विश्वनाथ नागेशकर यांची वेबसाईट.
    http://www.nageshkarart.com/

      March 21, 2017


  • भाऊसाहेब झंवर

    क्रीडापटू या नात्याने जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, हे तर ते सांगायचेच पण काय टाळायला हवे याविषयी त्यांच्याइतकी माहिती देणारे दुसरे कुणीही सापडले नसते. त्यांनी या गोष्टीचा जणू ध्यास घेतला होता. उत्तमोत्तम क्रीडापटू तयार करून त्यांना स्पर्धेत उतरवण्याच्या एकमेव उद्देशाने ते मैदानामध्ये उतरायचे. एखादा खेळाडू चांगला दिसतो आहे, पण मार्गदर्शनाअभावी तो वा ती मागे पडण्याची शक्यता आहे असे दिसले तर ते त्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्याशिवाय राहणार नाहीत.

    पुण्याच्या स. प. महाविद्यालयामध्ये अनेक वर्षे क्रीडाप्रशिक्षक या नात्याने काम पाहणारे बाबुलाल प्रेमराज झंवर आता आपल्यात नाहीत. ९४ व्या वर्षांपर्यंत आयुष्य लाभलेले बाबुलाल झंवर हे दोन वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या स्वयंचलित दुचाकीवरून हिंडायचे आणि सायंकाळच्या सुमारास मैदानावर उभे राहायचे. या वयातही ते खेळ पाहून चुका दाखवून देत असत. त्यांनी सांगितलेले शास्त्रशुद्ध व्यायाम प्रकार अनेक वर्षे अनेकांना उपयुक्त ठरले आहेत. तुम्ही शारीरिकदृष्टय़ा त्या त्या क्रीडाप्रकारांसाठी तंदुरुस्त आहात की नाही हे तपासायचे त्यांचे मार्ग निराळे होते. ते म्हणायचे की, पाच मिनिटांमध्ये शंभर जोर, तीन मिनिटांमध्ये शंभर बैठका, १४ सेकंदांमध्ये शंभर मीटर धावणे, सहा मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावणे, हे सगळे तुम्ही न दमता करू शकणार असाल तर तुम्ही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धाना पात्र आहात, असे मानायला हरकत नाही. सर्व प्रकारच्या खेळात महत्त्व कशाला असेल तर ते तुमच्या पूर्ण तंदुरुस्त असण्याला.

    नृत्य असो की गायनकला, त्यासाठीही तुम्हाला शारीरिकदृष्टय़ा सक्षमच असावे लागते. त्यासाठी त्यांनी ‘प्रोग्रेसिव्ह रेझिस्टन्स प्रोग्राम’ या नावाची संकल्पना अस्तित्वात आणली. त्याला त्यांनी ‘आयसोमेट्रिक’ प्रशिक्षणाची जोड दिली. त्यांच्या या प्रशिक्षणाचा अनेक पातळ्यांवर उपयोग करून घेतला गेला. शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि त्याबरोबरच स्वास्थ्य यांना त्यांच्या लेखी अधिक महत्त्व होते. स्वास्थ्य म्हणजे केवळ काहीही न करता बसून राहणे नव्हे तर त्यात त्यांना निसर्गोपचार पद्धती अपेक्षित होती. तुम्ही जो काही खेळ खेळाल तो उत्तम खेळा आणि त्यात प्रावीण्य मिळवा, एवढेच त्यांचे सांगणे असे. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धापर्यंत असंख्य स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतील असे खेळाडू घडवले. त्यांच्या प्रशिक्षणात शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शिक्षणशास्त्र, क्रीडामानसशास्त्र, अशा वेगवेगळ्या शास्त्रप्रकारांचा समन्वय असे. आपले मनगट मजबूत तर सर्व काही तुम्ही त्या जोरावर करू शकता हा त्यांचा विश्वास होता. ते कडवे गांधीवादी होते. साधी राहणी आणि स्वावलंबन यांना आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये स्थान दिले होते. त्यामुळेही ते विद्यार्थीप्रिय होते. भारतात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर क्रीडाक्षेत्रावर पैसे खर्च होऊनही चांगले ‘स्टॅमिना’बाज खेळाडू तयार होत नाहीत, ही त्यांची खंत होती.

    कुस्ती, खो-खो, वेटलिफ्टिंग, फुटबॉल, बास्केटबॉल, मुष्टियुद्ध, अ‍ॅथलेटिक्स, सायकलिंग, शरीरसौष्ठव, पोहणे, क्रिकेट अशा कितीतरी क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी घडवलेले खेळाडू केवळ महाराष्ट्रभरच नव्हे तर सगळ्या जगात पसरलेले आहेत. त्यांच्या नावामधली ‘बा. प्रे.’ अशी आद्याक्षरे त्यांच्या शरीरसंपदेचे दर्शन घडवण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यांच्याकडे पाहून कुणीही एकदम चकीत होऊन ‘बापरे’ असे म्हणत असे आणि तीच त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांच्या कारकिर्दीची पावती म्हणावी लागेल.

    कुस्ती खेळायची असेल तर त्यासाठी मांसाहारच हवा हे थोतांड आहे, असे ते सांगायचे आणि त्यांच्या प्रचाराचाही तोच महत्त्वाचा मुद्दा ठरला. सामाजिक दृष्टय़ा अत्यंत प्रगत विचार आणि केव्हाही कुणालाही मदतीसाठी पुढे हे तर त्यांचे ब्रीद होते. ते १९३० च्या जंगल सत्याग्रहामध्ये होते आणि ते १९४२ च्या चळवळीत भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करण्यात अग्रभागी होते. एका निरलस अशा क्रीडा प्रशिक्षकाला जो मानसन्मान मिळायला हवा होता तो मात्र त्यांना कधीच मिळाला नाही.

      August 4, 2017


  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, व्ही शांताराम

    शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. शांताराम बापू या नावानं सुद्धा ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या `महाराष्ट्र फिल्म कंपनी'पासून. कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या `सुरेखा हरण' या मूकपटात छोटीशी भूमिका केली. १९२५ साली निर्माण झालेल्या `सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकर्याीची भूमिका केली आणि १९२७ साली त्यांनी `नेताजी पालकर' हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.बाबुराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी दामले, फत्तेलाल, धायबर आणि कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात `प्रभात फिल्म्स'ची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं.

    `गोपाळ कृष्ण', `राणी साहेबा', `खुनी खंजर', `उदयकाल' असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले.`प्रभात'चा पहिला मराठी बोलपट `अयोध्येचा राजा' १९३२ साली प्रदर्शित झाला. १९३३ साली त्यांनी `सैरंध्री' हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचं धाडस केलं. पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. `प्रभात'ला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी `अमृतमंथन'ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा १९३७ साली निर्मिलेला `संत तुकाराम' हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. भारतात-विशेषत: महाराष्ट्रात-हा चित्रपट धो धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हेनीस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. जरठ विवाहावर टीका करणारा `कुंकू' (दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा `माणूस'(आदमी) आणि हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.

    शांताराम बापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन `राजकमल कला मंदिर' या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली. `राजकमल'च्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. `राजकमल'ने १९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारीत `डॉ. कोटणीस की अमर कहानी', १९५१ सालचा होनाजी बाळांचा `अमर भूपाळी', १९५५ सालचा रंगीत `झनक झनक पायल बाजे', १९५७चा १९५९चा `नवरंग' हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. `डॉ. कोटणीस' आणि `दो आँखे' या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली होती. १९७२चा `पिंजरा' या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. `पिंजरा' मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लीन यांनी शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं होतं. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.

    महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम बापूंना `चित्रपती' ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्य पुरस्कार `दादासाहेब फाळके पुरस्कार' १९८५ साली शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर १९९२ साली भारत सरकारने त्यांना `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत केले.चित्रपटासाठीच्या विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेर्याचचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत. चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते. शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकार आणि तंत्रज्ञांवर त्यांचा वचक असे.

    भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ऍनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनी (जंबूकाका). `बॅक लिट' प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक (अमर ज्योती). शांताराम बापूंनी तीन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. `शांताराम' हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये १९८६ साली प्रकाशित झालं आहे. आहे. व्ही.शांताराम यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 14, 2017


  • चिंतनशील दिग्दर्शक श्याम बेनेगल

    बेनेगल यांचे चित्रपट देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती, प्रश्न, समस्या, रूढी परंपरा या विषयांभोवती गुंफलेले असतात.

      August 26, 2019


  • नाना फडणवीस

    स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’’ नाना फडणीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला.

      April 20, 2016


  • भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील

    भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव येथे झाला. प्रतिभा पाटील यांचे वडिल सरकारी वकिल होते. एम.ए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा चव्हाणांनी केले होते. ते ऐकून प्रभावित झालेल्या प्रतिभाताई राजकारणात उतरल्या.

    पण राजकारणा उतरायचे तर काही लक्ष्य समोर हवे, असे नव्हते. योगायोगाने त्यांच्या तोपर्यंतच्या कामाची पावती आणि धडाडी पाहून त्यांन जळगाव मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळाले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंचवीस. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषवली. आमदार असतानाच त्या वकील झाल्या. याच काळात त्यांचा विवाह झाला देवीसिंह शेखावत यांच्याशी. जळगावनंतर प्रतिभाताईंनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.

    विधानसभेत प्रतिभाताईंनी अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. १९६७ ते १९७७ या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर १९७८ ते १९८० या कालावधीत शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले.

    कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन १९८० मध्ये प्रतिभाताईंना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. पण पक्षानेही त्यांच्या योग्यतेचा विचार करून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली.

    तेथे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन उपसभापती म्हणून निवड झाली. १९८६ ते ८८ या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत १९९१ साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या.

    प्रतिभाताई २००७ ते २०१२ या काळात राष्ट्रपती राहिल्या. राष्ट्रपतिपदाची कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी वायुसेनेच्या सुखोई, टी-10 या रणगाड्यावर स्वार होऊन, सुदर्शन शक्ती सैन्य अभ्यास दौ-यात सहभागी होऊन महिला शक्तीची प्रचिती आणून दिली होती. राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनातील ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाविषयी रोशनी प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 4, 2019


  • प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक इलाई राजा

    इलाई राजा यांचे पूर्ण नाव डॅनिअल राजैय्या. त्यांचा जन्म २ जून १९४३ रोजी झाला. इलाई राजा यांनी १९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे, आपल्या आगळ्यावेगळ्या आणि कर्णमधुर संगीताने रसिकांना वेड लावणार्याअ इलाई राजा यांनी ५ हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत.) विविध भाषांतील गाण्यांना त्यांनी कर्णमधुर चाली दिल्या असून दाक्षिणात्य सिनेमासृष्टीप्रमाणेच हिदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले आहे.

    इलाई राजा यांना "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडन चे सुवर्ण पदक मिळाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      June 3, 2017


  • प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी

    सितारादेवी यांची गेल्या सहा दशकांहून अधिक काळ प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले.

      May 10, 2019


  • अनिकेत विश्वासराव

    अनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी माध्यमांतील अभिनेता आहे.

      April 20, 2016


  • कवी शांताराम नांदगावकर

    "हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी मा.शांताराम नांदगावकर यांची ओळख होती.

    सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर हे मूळचे कोकणातील नांदगावचे. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला. शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले.

    'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याीला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

    चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.

    क्रिकेटपटू मा.सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. चित्रपटसृष्टीत 'डॅडी' या नावाने परिचित असलेले शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते.

    शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै, २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      July 14, 2017