(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुधीर वैद्य

    सुधीर वैद्य हे भारतामधील अत्यंत प्रथितयश व सर्वपरिचीत असे व्यावसायिक संख्यातज्ञ, संकलक, व क्रिकेटविषयक चतुरस्त्र लेखन करणारे प्रतिभावंत लेखक आहेत.

    गेली ५० वर्षे भारतामध्ये व भारताबाहेर खेळवल्या गेलेल्या प्रत्येक कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा संपूर्ण लेखाजोगा, त्या सामन्यातील प्रत्येक रंगतदार क्षणांसह त्यानी आपल्या संग्रही जतन केला गेल्या असल्याने, साहजिकच क्रिकेटमधील जाणकारांचा व चाह्त्यांचा त्यांच्याकडे कायम राबता असतो.

    क्रिकेट डोळसपणे पाहण्याची व त्यातील सर्व बारीक घडामोडी, तांत्रिक आकडेमोड, गोलंदाजांनी टिपलेले बळी, फलंदाजांनी ठोकलेल्या धावा, पकडले गेलेले झेल, दोन्ही संघांच्या व्यूहरचना व धावसंख्या एवढेच काय, तर त्या सामन्याचे ठिकाण व ऐतिहासिक महत्व अशा 'अ पासून ते ज्ञ' पर्यंतच्या सगळ्या तांत्रिक व अतांत्रिक माहितीचे संकलन करणे, ही त्यांची, लहानपणापासून जाणीवपुर्वक वृध्दिंगत केली गेलेली आवड होती. या आवडीला व्यावसायिक साचा देण्यात ते पुर्णतः यशस्वी ठरले आहेत.

    गेली पंधरा वर्षे भारतीय क्रिकेट बोर्ड त्यांच्या अचूक विश्लेषणांचा व काळजीपुर्वक केल्या गेलेल्या सांख्यिक निरीक्षणांचा लाभ अव्याहतपणे घेत आहे. असामान्य विश्वासार्हता, ही त्यांनी आजवर या क्रीडा पटलावरती निरंतर काम व प्रामाणिक मेहेनत करून केलेली कमाई आहे.

    भारतीय क्रिकेट बोर्डाकडून दर वर्षी संपादित व प्रकाशित केल्या जाणार्‍या विविध सांख्यिक वार्षिक अंकांचे लेखन गेली अनेक वर्षे ते नियमीतपणे करत आले आहेत. क्रिकेट या खेळाचा जेव्हा व्यावसायिक दृष्टीने पुनर्जन्म झाला, तेव्हापासून आतापर्यंत झालेले जवळजवळ २००० कसोटी सामने, ३,१०० एकदिवसीय सामने, व ५००० प्रथम श्रेणी क्रिकेट सामने, या सगळ्या सामन्यांचा विस्तृतपणे घेतलेला आढावा, तसेच सांखिक व असांख्यिक माहितीचा दुर्मिळ खजिना त्यांच्याकडे, विविध आकाराच्या फाईली व रजिस्टर पुस्तकांमध्ये सुरक्षित आहे. यासाठी नुकतीच त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्येही झाली आहे.

    गेली अनेक वर्षे सुधीर वैद्य यांचा मुक्काम ठाणे शहरात आहे. मध्यंतरी दाभोळ येथील एन्रॉन वीज प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी म्हणुनही त्यांनी काम पाहिले होते.

      January 12, 2015


  • रामचंद्र ठाकुर

    रामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते.

      August 2, 2022


  • दिग्दर्शक राज खोसला

    मुळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेला गायक म्हणून मुंबईत आले होते ते गायक बनायला. त्यांचा जन्म ३१ मे १९२५ रोजी झाला. काही काळ आकाशवाणीवर म्युझिक विभागात काम ही केले पण बॉलीवूड हीच त्याची खरी कर्मभूमी ठरली. या राज खोसालावर नजर पडली देव आनंद यांची आणि त्यांनी राज खोसला यांना गुरु दत्तचा असीस्टंट बनवले.

    १९५४ मध्ये देव आनंद यांच्या बरोबर राज खोसालांनी "मिलाप" बनवला पण हा चित्रपट तिकीटबारीवर सपाटून आपटला. पण मग सीआयडी आला आणि राज खोसलांच्या विमानानी टेक ऑफ घेतला. काला पानी, सोलवा साल, बंबई का बाबू, एक मुसाफीर एक हसीना, वोह कौन थी, मेरा साया, दो बदन, अनिता, चिराग, दो रास्ते, शरीफ बदमाश, कच्चे धागे आणि अनेक असे अप्रतीम चित्रपट राज खोसला यांनी बनवले.

    अमिताभ बच्चन यांना घेऊन त्यांनी एक चित्रपट केला तो म्हणजे दोस्ताना. मेरा साया हा राज खोसला यांचा सर्वात गाजलेला चित्रपट.

    राज खोसला यांचे निधन ९ जुन १९९१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 31, 2018


  • बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. शिल्पाने १९८८ साली 'भ्रष्टाचार' चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती अभिनेते होते. १९९० मध्ये आलेल्या चित्रपट किशन कन्हैयामध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. शिल्पाने अभिनेत्री म्हणून मिथून चक्रवर्तीसोबत ९ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. यात भ्रष्टाचार, हिटलर, रंगबाज, अपने दम पर, जीवन की शतरंज, स्वर्ग यहां नर्क यहां, त्रिनेत्र आणि पाप की कमाई या चित्रपटांचा समावेश आहे. शिल्पाने बारुद या चित्रपटात शेवटचे काम केले होते. २००० साली शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले.
    शिल्पाने टीव्ही शो एक मुठ्ठी आसमानमध्ये मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर तिने स्टार प्लसचा शो 'सिलसिला प्यार का' मध्येही काम केले होते.

    शिल्पा शिरोडकरने ऑरेंज ट्री या नावाने प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे. या बॅनरखाली शिल्पाने 'सौ. शशी देवधर' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

    शिल्पा शिरोडकर चे चित्रपट हम, दिल ही तो है, आंखें, 'खुदा गवाह', 'गोपी-किशन', हम हैं बेमिसल, बेवफा सनम, 'मृत्युदंड', दंडनायक आणि गजगामिनी या चित्रपटात काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 20, 2018


  • माझी माणसं – जिवलग

    या ‘कंगाल ‘ वाटणाऱ्या माणसांनी माझ्या झोळीत काही ना काही टाकलय , मला ‘श्रीमंत ‘ केलाय ! ती आहेत तशी स्वीकारलीत तर ‘माझी माणसं ‘ ‘आपली माणसं ‘ होतील ! आज पासून त्यातील काहींची ओळख करून देणार आहे . आज माझ्या काही मित्रांचे ‘नमुने ‘ एन्जॉय करा .

      December 7, 2017


  • भारतीय सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी

    मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लीम परिवारात झाला. आधीच खुर्शीद नावाची मुलगी असल्याने मुलगा व्हावा, अशी तिच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. पण मुलगी जन्माला आल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यावेळी तर त्यांच्याकडे डॉक्टरांचे बिल देण्यासाठीही पुरसे पैसे नव्हते. म्हणून जन्मल्यानंतर लहानग्या महजबीनला मुस्लीम समाजाच्या अनाथालयात सोडण्याचे तिच्या जन्मदात्यांनी ठरवले. मात्र अनाथालयाच्या पायरीवर तिला सोडून जात असताना ऐनवेळी तिच्या वडिलांचे हृदयपरिवर्तन झाले आणि माघारी परतून महजबीनला छातीशी घट्ट कवटाळले. तसेच जमेल तसे तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला.

    मीना कुमारी यांना कलेचा वारसा तिच्या आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी त्यांचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारीला यांच्या परिवारात त्यांना ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून त्यांना लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकली. नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा पहिला चित्रपट. त्यावेळी मा.मीना कुमारी अवघी चौदा वर्षाची होती. सुरुवातीला त्यांनी पौराणिक चित्रपटांतून अभिनय केला. नर्गिस, निम्मी, सुचित्रा सेन, नूतनसारख्या नव्या दमाच्या अभिनेत्रींचा तो काळ होता. ‘महल’ या चित्रपटाच्या यशानंतर एका चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कमाल अमरोही यांना तिने अभिवादन केले असता त्यांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मा.मीना कुमारी नायिका म्हणून यशस्वी ठरल्यानंतर कमाल अमरोही यांच्याकडूनच तिला त्यांच्या ‘अनारकली’ चित्रपटात काम करण्याबाबतचा प्रस्ताव आला. मागील अनुभव चांगलाच लक्षात असल्याने मा.मीना कुमारीने प्रस्ताव नाकारला. त्यामागचे कारण समजल्यानंतर कमाल अमरोही यांनी समक्ष भेटून तिचा गैरसमज दूर केला. त्यानंतर मीना कुमारीने सदर चित्रपट करण्यासाठी होकार दिला. दरम्यानच्या काळात मीना कुमारी यांना अपघात झाला. तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्या कालावधीत कमाल अमरोही तिला ससून हॉस्पिटलला नियमित भेटावयास येत असत. ‘अनारकली’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेबाबत तिने अमरोही यांना विचारले असता तिच्या हातावर ‘मेरी अनारकली’ असे लिहीत. त्या भूमिकेसाठी अन्य कुणाच्या नावाचा विचारही करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अपघातात हाताला इजा झाल्यामुळे मीना कुमारीला कायमस्वरूपी बँडेड लावावे लागले. साडी अथवा ओढणीत तो हात तिला लपवावा लागत असे. पुढे ‘अनारकली’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होऊनही आर्थिक बाबींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. मात्र त्या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अमरोही यांना मा.मीना कुमारी ‘चंदन’ तर अमरोही तिला ‘मंजू’ या नावाने संबोधत असत. वडिलांच्या संमतीशिवाय निकाह करण्यास मीना कुमारी तयार नव्हती. आधी लग्न करू आणि मग घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांची संमती मिळवू, असे अमरोही यांनी पटवून दिल्याने मा.मीना कुमारी राजी झाली. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी मीना कुमारीला वडिलांनी तिची लहान बहीण महलिकासह फिजिओथेरपी उपचारासाठी एका दवाखान्यात सोडलेले असताना रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान प्रथम शिया आणि सुन्नी पद्धतीने मोजक्या साक्षीदारांसह दोघांचा निकाह झाला. पुढे वडिलांना समजल्यावर ते संतापले. तलाक व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दोघांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणले. मीना कुमारी यांना पती, कमाल अमरोहीच्या ‘डेरा’ चित्रपटात अभिनय करायची इच्छा होती. मात्र अली बक्ष यांनी मेहबूब खान यांच्या ‘अमर’ या चित्रपटात अभिनय करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. त्या चित्रपटाचे चार-पाच दिवसांचे चित्रीकरण झालेले असताना मेहबूब खान यांच्याशी मतभेद झाल्याने मीना कुमारी ‘अमर’ चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट सोडून पती कमाल अमरोही यांच्या ‘डेरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेली. या कारणामुळे वडिलांनी रात्री घरात न घेतल्याने पयार्याने मा.मीना कुमारी यांना कमाल अमरोही यांच्या घरी जावे लागले. मा.अमरोही यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्ये होती. त्यामुळेच खूप इच्छा असूनही मीना कुमारीला मूल होऊ न देण्याचा निर्णय त्यांचेकडून तिच्यावर लादला गेला.

    परिणिता, दिल अपना और प्रीत पराई, दायरा, एक ही रास्ता, शारदा, दिल एक मंदिर, साहिब बिवी और गुलाम, काजल, फूल और पत्थर हे मा.मीना कुमारी यांनी अभिनय केलेले काही उल्लेखनीय चित्रपट. ‘परिणिता’ या चित्रपटापासून तिला भारतीय नारीच्या भावुक भूमिकाच मिळत गेल्या. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली मा,मीना कुमारी ह्या पहिली अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सवरेत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने तिलाच मिळालेली होती. मा.मीनाकुमारी ही अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. मा.मधुबाला ह्या मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते. मा.मीना कुमारी यशाचे शिखर काबीज करत होती. मात्र कमाल अमरोही यांना तिच्या यशाचा हेवा वाटू लागला होता. सोहराब मोदी यांनी एका चित्रपटाच्या प्रीमियरवेळी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल यांना कमाल अमरोही यांचा परिचय लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारी यांचे पती असा करून दिला होता. तेव्हा ‘मी कमाल अमरोही व ही माझी पत्नी मीना कुमारी’ असे नमूद करत अमरोही त्या कार्यक्रमातून निघून गेले. मीना कुमारीने अभिनय करणे सोडून द्यावे, असे त्यांना वाटत असे. मात्र मीना कुमारीने नकार दिल्याने त्यांनी काही अटींवर तिला अभिनय कारकीर्द सुरूठेवण्यास अनुमती दिली. चित्रीकरण आटोपून साडेसहा वाजण्याच्या आत घरी परतणे. मेकअपरूममध्ये मेकअपमनशिवाय अन्य कुणाशी संवाद न साधणे. स्वत:च्याच वाहनाने प्रवास करणे, अशा त्या अटी होत्या. मात्र मीना कुमारीने त्या निमूटपणे स्वीकारल्या. तरी त्यांच्या वैवाहिक संबंधात दुरावा येत होता. पुढे ते विभक्त राहू लागले. मीना कुमारी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अभिनेता धमेंद्र हा चित्रपटांत जम बसवण्यासाठी धडपडत होता. मीना कुमारीच्या यशाचा धमेंद्रला मोठया प्रमाणावर फायदा झाला. दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मीना कुमारीची विमानतळावर भेट झाली असता त्यांनी तिच्याकडे धमेंद्रबाबत विचारणादेखील केली होती. पुढे मात्र ‘फूल और पत्थर’ चित्रपटानंतर धमेंद्रने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती अत्यंत व्यथित झाली. तिची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत होती. डॉक्टरांनी झोप येण्यासाठी तिला एक पेग ब्रँडी घेण्याची सूचना केली. पण एक पेगचे दोन, दोनचे चार असे पेग वाढतच गेले आणि मीना कुमारी पुरती नशेच्या आहारी गेल्या. चित्रीकरणावेळी, प्रवासात सगळीकडे तिच्यासोबत पर्समधे मदिरेची छोटी कुपी असायची. ‘साहिब बिवी और गुलाम’मधील ‘छोटी बहू’ हे पात्र आपल्या वास्तव जीवनाशी साधम्र्य असल्याचे मीना कुमारी सांगत असत. त्यानंतरच्या काळात कमाल अमरोही त्यांच्या महात्त्वाकांक्षी ‘पाकिजा’ चित्रपटाची निर्मिती करत असताना आर्थिक संकटांना तोंड देत होते. त्या चित्रपटात मा.मीना कुमारी केवळ अभिनयच करत होती, असे नाही तर तिने तिची सर्व मालमत्ता अमरोही यांच्या चित्रपटासाठी पणाला लावली होती. तरीही ‘पाकिजा’चे चित्रीकरण अनेक वर्षे रखडले गेले. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी पुढाकार घेऊन पुन्हा चित्रीकरण केले. ३ फेब्रुवारी १९७२ रोजी ‘पाकिजा’ प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतरच मा.मीना कुमारीचे निधन झाले. मीना कुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे

    मीनाकुमारी यांची काही गाणी, पाकिजा चित्रपट, बायोग्राफी
    https://youtu.be/0R04XbzDNjU

    https://youtu.be/qkD39k9xaVQ

    https://youtu.be/XtdGZd7vR-U

    https://youtu.be/jNdVm0W7Vtc

    https://youtu.be/TnM5g4eTYUI

    https://youtu.be/Q2X6u0Zg8P8

      March 31, 2017


  • नामांकित संगीतकार व गायक अच्युत ठाकूर

    अच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. १९८३ साली ‘श्री रामायण’हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती.

      May 18, 2021


  • अशोक नायगावकर

    नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर नायगावकर हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली.

      June 21, 2022


  • आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर

    व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली.

      April 26, 2021


  • भारतातील बलवान राजकारणी इंदिरा गांधी

    आपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले. वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषणा दिल्या, या सर्व गोष्टीबरोबर शिक्षणही चालूच ठेवले.

      October 31, 2021