(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भूपेन हजारिका

    आज ५ नोव्हेंबर..आज आसामी संगीताचे पितामह भूपेन हजारिका यांची पुण्यतिथी.
    भूपेन हजारिका यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला.
    मा. हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पीएचडी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. यात सिनेमाच्या माध्यमातून विकास हा विषय त्यांनी निवड होता. अमेरिकेतील नामवंत गायक पॉल रॉबेसन यांच्या ‘ओल्ड मॅन रिव्हर’चे त्यांनी हिंदीत ‘गंगा बेहती हो’ असे रुपांतरण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखालील ‘एरा बतार सूर’ हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला व तेव्हापासून त्यांची कारकीर्द यशोशिखराच्या दिशेने सुरू झाली. ईशान्य भारतातील एक नामांकित गायक, दिग्दर्शक म्हणून त्यांना आगळे स्थान होते. अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनीच ‘मेरा धरम, मेरी मॉं’ हा पहिला रंगीत चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एक पल’ या हिंदी चित्रपटात हजारिकांना संधी मिळाली व त्या संधीचे सोने करीत असंख्य पुरस्कार त्यांनी पटकावले. ‘लोहित किनारे’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधूनही ते रसिकांपर्यंत पोहोचले होते. कल्पना लाजमी यांनी सदर मालिका दिग्दर्शित केली होती. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाची गाणी व संगीत त्यांनी स्वत: लिहिले होते. महात्मा गांधीजींचे प्रख्यात ‘वैष्णव जन’ हे भजनही मा.भूपेन हजारिका यांनी म्हटले आहे. कवी, पत्रकार, गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट निर्माते आणि लेखक आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. मा.हजारिका यांनी लोकसंगीताचा वापर करून त्यावरील रचनांनी देशात आपला चाहता वर्ग निर्माण केला. डॉ. हजारिका केवळ संगीत व साहित्यातील तज्ज्ञ नव्हते तर ते मोठे नट व दिग्दर्शक होते. ब्रम्हपुत्रेचा कवी अशी त्यांना उपमा दिलेली होती. ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा बेहती हो’ या त्यांच्या गाण्यांनी कोट्यवधी भारतीयांना मोहीत केले. ‘जाजोबार’ म्हणजे (आश्च‘र्यचकित करणार) असे स्वत: संबोधत असत. शब्दाचे सौंदर्य ते आपल्या गाण्यातून मांडत होते. लहानपणापासून मी आदिवासींचे संगीत ऐकत होतो. त्यातील तालाने मला विकसित केले. मात्र संगीताची शिकवण मी आईकडून घेतली. ती माझ्यासाठी गाणी म्हणत असे. तिच्या रचना मी ‘रुदाली’ चित्रपटात वापरल्या. वयाच्या १२ व्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’ मध्ये बिश्वर नियोज नोजोवान’ हे गीत गायले होते, असे हजारिका यांनी एका आपल्या मुलाखतीत सांगितले होते. १९९२ साली मा.भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भूपेन हजारिका यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.भूपेन हजारिका यांचे ५ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. मा.भूपेन हजारिका यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 5, 2016


  • श्रीराम अभ्यंकर

    श्रीराम अभ्यंकर

    डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रख्यात गणितज्ञ होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते.

      December 15, 2010


  • वेदनेचा सुरेल अविष्कार – मदनमोहन

    आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव.

    मदनमोहन यांच्या सर्वंकष संगीताचा विचार करायचा झाल्यास, काही बाबी ठळकपणे नोंदवाव्या लागतील. मदनमोहन यांची प्रतिभा ‘गीतधर्मी’ होती. याचाच वेगळा अर्थ असा लावता येईल की शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची ताकद, त्यांच्या संगीत रचनेतून प्रतीत होत होती. यामध्ये, कवितेतील आशयाबरोबर सांगीतिक रचनादेखील समांतर अस्तित्व दाखवत असते. तरीही दोन्ही घटकांचा अत्यंत सुनियोजित मेळ घातलेला असतो. यावरूनच, मदनमोहन यांच्या संगीतात गझलेला का महत्त्व आले, हे अधोरेखित व्हावे. गीतधर्मी संगीतकार हे नेहमीच लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि त्याच्या प्रवाही चलनाकडे अधिक झुकतात. लयबंधाच्या किंवा तालांच्या ठळक वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वररंगातील सूक्ष्म भेद दाखवून आकारास येणारी गतिमानता, असे संगीतकार नेहमी पसंत करतात.

    उदाहरणादाखल ‘नैना बरसे’ हे गाणे घेऊया. एक प्रणयगीत म्हणून ऐकताना, नेहमीच्या गझल रचनेचा वापर न करता संगीतकाराने गीताची पारंपरिक धाटणी अंगीकारली आहे; पण तरीही ‘मुखडा’ समोर ठेवत असल्याचा भास निर्माण करून एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, तसेच एकामागोमाग येणार्‍या कडव्यांची पट्टी बदलून केलेले गायन पण तरीही नकळत मूळ पट्टीकडे येणे! पट्टीच्या कानसेनांचे लक्ष वेधून घेणारे आहे.’
    दुसरा विशेष असा सांगता येईल, अशा संगीतकारांच्या गाण्याचे मुखडे गुणगुणत राहावे, असे असतात. तसेच द्रुतगती किंवा गुंतागुंतीच्या पण उत्स्फूर्त वाटणार्‍या संगीतात वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येते. मुळात मदनमोहन यांच्यावर उत्तर भारतीय पण लखनवी परंपरेचा प्रभाव असल्याने उपशास्त्रीय संगीताकडे ओढ असणे स्वाभाविक ठरते. गझलेचे वर्णन करताना, ‘भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार’ या शब्दात केले जाते, आणि याचाच अप्रतिम आविष्कार मदनमोहन यांच्या संगीतात दिसून येतो. कुठलीही समृद्ध गझल काव्य म्हणून ध्यानात घेतली तर त्यात उत्कटता, अभावित सौंदर्यवादी धक्का देण्याची प्रवृत्ती आणि कुठल्याही भावनेचा ‘अर्क’ शोषून घेण्याची शोधक वृत्ती आढळते. त्यामुळे जेव्हा आपण मदनमोहन यांच्या रचना ऐकतो, तेव्हा यावरील गुणवैशिष्ट्यांचा आपल्याला नेहमीच प्रत्यय येतो.
    जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देऊनही ज्या थोड्या संगीतकारांना अजिबात व्यावसायिक यश प्राप्त झाले नाही, अशा अत्यंत दुर्दैवी संगीतकारांत मदनमोहन यांचा समावेश करावा लागतो. जरा बारकाईने बघितले तर कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारा संगीतकार, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकला. हा माणूस किती प्रतिभावंत होता, याची ही चार गाणी साक्ष द्यायला पुरेशी आहेत. वास्तविक बघता, सांगीतिक रचनेच्या दृष्टिकोनातून वर निर्देशिलेल्या पहिल्या दोन गाण्यांच्या रचना आणि नंतरच्या दोन गाण्यांच्या रचना, यात तसा फारसा फरक नाही!! वेगळ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, रचनेचा मूलभूत ‘ढाचा’ बराचसा मिळताजुळता आहे; पण फरक आहे तो वाद्यसंगीताचा आणि गायकीचा!
    गझल गायकीत जो भोगवादाचा अर्क असतो, त्याचे नितांत रमणीय दर्शन मदनमोहन यांच्या रचनेतून दिसून येते. हाताशी आलेल्या काव्यातील दडलेला आशय तितक्याच समर्पक सुरांतून व्यक्त करण्याची अद्भुत ताकद, या संगीतकाराच्या रचनेतून वारंवार दिसून येते. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे गाण्याची रचना करताना ‘धून’ अशी तयार करावी, की त्यातून प्रत्येक वेळी नवीन सांगीतिक वाक्यांश प्रत्ययाला यावेत आणि त्यामुळे, मूळ चालीचे सौंदर्य अधिक विस्तीर्ण व्हावे. मदनमोहन यांची गाणी नेहमी इथे इतरांपेक्षा वेगळी होतात. चित्रपटात जेव्हा केव्हा उठवळ प्रसंगाला साजेसे गाणे करायची वेळ आली, तेव्हा मदनमोहन यांनी केलेल्या रचना केवळ कर्तव्यभावनेने केलेल्या आणि बर्‍याच रुक्ष वाटतात!! आपली प्रवृत्ती अशा गाण्यांना साजेशी नाही, याची पुरती जाणीव मदनमोहन यांना होती आणि त्यामुळे अशी गाणी बांधताना, त्यातील जो उत्स्फूर्तपणा असतो, त्याचा मदनमोहन यांच्या ठायी लवलेश नसतो. कदाचित म्हणूनही या संगीतकाराच्या वाट्याला व्यावसायिक या संज्ञेत बसणारे फारसे चित्रपट आले नसावेत!!
    अर्थात, प्रत्येक संगीतकाराची जशी बलस्थाने असतात, तसे तोकडेपणदेखील असते. तद्वत हॉटेलमधील नृत्यगीतांत वा त्या सदृश गाण्यांत, मदनमोहन अजिबात रमलेले दिसत नाहीत. त्याचबरोबर बलस्थाने विचारात घेता, गझलसदृश गाण्यांत मात्र मदनमोहन एकमेवाद्वितीय! अशा गाण्यांत त्यांच्या प्रतिभेच्या उत्तुंग आविष्काराचे दर्शन घडते. वास्तविक संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतादेखील, ‘यमन’सारख्या चित्रपट संगीतात वारंवार वापरल्या जाणार्‍या रागात, ‘जारे बदरा बैरी जा’, ‘जिया ले गयो जी मोरा सांवरिया’सारख्या अवीट गोडीची ‘तर्ज’ तयार करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे! मदनमोहन यांच्या गाण्यात दुसरे खास वैशिष्ट्य दिसून येते, ते गाण्याच्या चालीसोबत रुणझुणणारा वाद्यमेळ. गायक/गायिकेने जिथे स्वर सोपवला आहे, तिथून वाद्यसंगीताच्या मदतीने तीच लय अधिक विस्तारित करत जायचे, हा या संगीतकाराचा अत्यंत मनोहारी खेळ!! बर्‍याच गाण्यांत हा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो. जसे, रस्मे उल्फत को निभाये, तुम जो मिल गये हो... इत्यादी अनेक गाण्यांतून माझ्या म्हणण्याचे वाचकांस प्रत्यंतर येऊ शकेल.
    सुरुवातीला मी जे म्हटले, आपल्याकडे एखाद्या कलाकाराची बूज तो जिवंत असताना फारशी राखली जात नाही, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे गोडवे गाण्याची मात्र अहमहमिका लागते!! मदनमोहन यांच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. म्हणूनच कदाचित, आजही या संगीतकाराचे नाव रसिक गौरवाने घेत असावेत!!
    - अनिल गोविलकर

      September 2, 2018


  • प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे

    अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन या नाटकात काम केले होते. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ रोजी झाला. पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एम.ए केले होते.

    उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्या अभिनय आणि नृत्यक्षेत्राकडे वळल्या. अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्य ही शिकल्या होत्या. त्या पुण्यातील कलावर्धिनी नृत्यसंस्थेच्या कोथरूड शाखेच्या प्रमुख होत्या. देबू, महागुरू, बावरे प्रेम हे, तप्तपदी, डंक्यावर डंका, आरंभ, क्षण हा मोहाचा, कॉफी आणि बरंच काही अशा मराठी चित्रपटांसह ‘एक पल प्यार का’ या हिंदी सिनेमातूनही त्यांनी भूमिका केली होती. नुकतेच गाजलेले त्या तिघांची गोष्ट, एका क्षणात, नांदी ही गाजलेली नाटके त्यांनी रंगमंचावर साकारली.

    दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.

    अश्विनी एकबोटे यांनी झी २४ तासच्या अनन्य सन्मान या कार्यक्रमात खास अँकरिंग केले होते. अश्विनी एकबोटे यांचे २२ आक्टोबर २०१६ रोजी नाट्यत्रिविधा हा कार्यक्रम करत असताना भरत नाट्यमंदिराच्या रंगमंचावरच आकस्मिक निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 22, 2017


  • मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा नट रमेश देव

    भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.

      February 3, 2022


  • बॉलिवूड खलनायक अभिनेते अजीत

    अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. ‘जंजीर’नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली.

      October 22, 2021


  • हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा

    विजय अरोरा हे पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट चे १९७१ सालचे अभिनयाचे गोल्ड मेडलीस्ट. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९४४ रोजी गांधीधाम येथे झाला. बी.आर.इशारा यांनी आपल्या 'जरूरत' या चित्रपटा द्वारे विजय अरोरा यांना पहिला ब्रेक दिला. त्याच वर्षी आशा पारेख यांच्या बरोबर 'राखी और हथकड़ी' मध्ये काम केले, पण विजय अरोरा यांना लोकप्रियता १९७३ साली आलेल्या 'यादों की बारात' चित्रपटाने मिळाली. त्यांनी 'रामायण' टीव्ही सिरीयल मध्ये 'मेघनाद इंद्रजीत' ची भूमिका केली होती. विजय अरोरा यांनी 'भारत एक खोज' मध्ये 'बादशाह जहांगीर' ची भूमिका केली होती. माधुरी दीक्षितच्या बरोबर त्यांनी गुजराती चित्रपट 'राजा हरीशचंद्र' मध्ये काम केले होते. त्यांनी काही गुजराती नाटकात पण काम केले होते. त्यांचे इतर चित्रपट '36 घंटे', 'कादम्बरी', 'इंसाफ, रोटी', 'जीवन ज्योति', बड़े दिलवाला, 'जान तेरे नाम', 'इंडियन बाबू'. विजय अरोरा मॉडल व मिस इंडिया दिलबर देबारा यांच्या बरोबर लग्न केले होते. ११० सिनेमे आणि ५०० हून अधिक भाग टीव्ही सिरीयल मध्ये अभिनेता म्हणून यशस्वीरित्या केल्यानंतर विजय अरोरा यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरु करत अनेक जाहिराती तयार केल्या. या क्षेत्रातील भारतातील पहिली आय एस ओ ९००० कंपनी असण्याचा मान याच्या कंपनीने मिळवला होता. त्याने जेम एन्ड ज्वेलरी कौन्सिल इंडिया या संस्थेचे असंख्य कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन तर केलेच पण त्या सोबत असंख्य कंपन्याची प्लेईंग कार्ड्स बनवत ती अमेरिकेतील वार्नर ब्रदर्स कंपनीच्या सुपर मॅन चित्रपटासाठी उपलब्ध करून दिली . विजय अरोरा यांचे २ फेब्रुवारी २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 2, 2019


  • अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल

    मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.

      January 21, 2022


  • दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिता

    दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला.

    ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क स्मिता अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून त्याही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होत्या.

    सिल्क स्मिता यांना १९७८ मध्ये 'बेदी' या कानडी सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तिला मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात त्यांनी स्मिताचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच, त्यांनी मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने त्यांना सिल्क स्मिता हे नाव मिळाले. १९८३ मध्ये त्यांनी 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये त्यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले. सिल्क यांची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती.तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी ३ शिफ्टमध्ये काम करत होत्या. दक्षिणेचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून त्यांनी १० वर्षांमध्ये जवळपास ५०० सिनेमांमध्ये काम केले.

    सिल्क यांच्या यशाची जादू बॉलिवूड मध्ये सुध्दा चालली होती. त्यांनी 'जीत हमारी' सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही',विजय पथ' सारख्या सिनेमांमध्ये काम केले.

    सिनेमां मधून काम केल्यानंतर स्मिता यांनी निर्मितीत हात आजमावला. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये त्यांना दोन कोटींचा तोटा झाला. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.ती मानसिकरित्या खचून गेली होती. २०११ मध्ये आलेला 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. सिल्क स्मिता यांचे २३ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 15, 2019


  • गायक रवींद्र साठे

    स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.

    रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु झाली.पदवीनंतर त्यांनी पुण्याच्या एफ.टी.आय मध्ये '' साऊंड रेकॉर्डडिस्ट ''चा कोर्स पूर्ण केला.त्यानंतर दूरदर्शनवर म्हणून नोकरी केली.तेव्हा दूरदर्शनवर आरोही,शब्दांच्या पलीकडले,अमृताची फळे असे दर्जेदार कार्यक्रम सादर होत असत.येथेच स्वरांचे संस्कार त्यांच्यावर घडले.सुधीर फडके आणि गजानन वाटवे यांना ते ''शब्दोच्चरतिल आदर्श'' मानतात.

    रवींद्र साठे हे नाव सुपरिचित झाले ते ''घाशीराम कोतवाल''या नाटकातील त्यांच्या गायक नटाच्या भूमिकेमुळे .त्यांच्या या भूमिकेबद्दल सी.रामचंद्र,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे अश्या मान्यवरांकडून त्यांना दाद मिळाली. मधुकर गोळवलकर,सी.रामचंद्र,राम कदम,आनंद मोडक,हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके अशा नामवंत संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे.''ओंजळीत स्वर तुझेच''हा त्याचा आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेला अल्बम रसिकांनी खूप नावाजला आहे.

    सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.''पिक करपल'' हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ मानसी पटवर्धन

      February 9, 2017