(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ.अमोल कोल्हे

    आज १८ आक्टोबर
    आज डॉ.अमोल कोल्हे यांचा वाढदिवस.
    जन्म.१८ आक्टोबर १९८०

    शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की, अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांची छबी डोळ्यासमोर उभी राहते. ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील शिवरायांच्या अप्रतिम भूमिकेमुळे अमोल कोल्हे यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
    डॉ.अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आण १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी जी.एस. महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉ. अमोल कोल्हे हे मराठीतील प्रसिध्द अभिनेते. स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'राजा शिव छत्रपती' या ऐतिहासिक मालिकेपासून ते प्रसिद्धीस आले.
    डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी डॉक्टर अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
    डॉ. अमोल कोल्हे हे एक प्रभावशाली वक्ते आहेत आणि ते सध्या शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      October 18, 2016


  • रघुनाथराव ऊर्फ भाऊसाहेब चितळे

    दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.

      July 20, 2022


  • दिनकर रायकर

    ज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत.

      July 19, 2011


  • हिंदी अभिनेत्री-गायिका सुरैय्या

    पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रिय संगिताचे धडे घेतले नव्हते तरिही तिच्या कारकिर्दित तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती. त्यांचा जन्म १५ जुन १९२९ रोजी झाला. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओ मध्ये 'ताजमहल' चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला. गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.. अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी तिचं गाणं ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं आणि तिच्याकडून आपल्या 'शारदा' या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी "पंछी जा, पीछे रहा है बचपन मेरा उसको जा के ला.....'' हे गाणं गाऊन घेतलं ... सुरैय्या त्यावेळी अवघी १३ वर्षांची होती, पण तिचा परिपक्व आवाज तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या मेहताबला मात्रं तंतोतंत सूट झाला. असं म्हणतात की हे गाणं रेकॉर्ड करताना सुरैय्याला माईकपर्यंत पोहोचता यावं यासाठी तिच्याकडून हे गाणं खुर्चित उभं करून गाऊन घेतलं गेलं. १९४३ ते १९४६ च्या दरम्यान सुरैय्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले. त्यातले विशेष उल्लेखनिय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द इ. पण अभिनेत्री म्हणून पहीली संधी तिला मिळाली ती 'तदबिर' या सिनेमात. सुरैय्याने अनेक गाणी सुद्धा गायली, परंतू के. एल. सहगल यांच्या बरोबरच्या 'परवाना' या चित्रपटातल्या ४ सोलो गाण्यांनी तिची खरी ओळख "गायिका-अभिनेत्री" अशी नव्याने करून दिली. मा.देव आनंदबरोबरची सुरैय्याची जोडी त्याकाळी भरपूर गाजली. एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बोट उलटण्याच्या दृश्यात देव आनंदने तिचे प्राण वाचवले, एकिकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी सुरैय्याशी लग्नं करण्यास उत्सुक असूनही, दुसरीकडे देव आनंद बरोबरच्या प्रेमभंगानंतर सुरैय्याने कधीही विवाह न करण्याचा निर्णय घेतला. १९४९- ५० च्या दरम्यान सुरैय्याचे चित्रपट भरपूर गाजले आणि ती सर्वात जास्त मानधन घेणारी नायिका बनली. प्यार की जीत, बडी बहन, दिल्लगी हे ते चित्रपट.. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये तरूण्-तरूणिंच्या हृदयाचा ठेका सर्वात जास्त चुकवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना, पण त्याच्या तोडीचंच वेड नव रूणाईमध्ये त्याकाळी सुरैय्यानेही निर्माण केलं होतं. तिच्या 'शमा' या चित्रपटातील गाणी गाजली.. सुरैय्याचा शेवटचा चित्रपट म्हणजे रूस्तम सोहराब. मा.सुरैय्या यांचे ३१ जानेवारी २००४ यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सुरैय्याची काही गाणी
    * धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम..... (शमा)
    * जब तुम ही नहीं अपने, दुनिया ही बेगानी है ......(परवाना)
    * ओ दूर जाने वाले वादा न भूल जाना.... (प्यार की जीत)
    * तेरे नैनों ने चोरी किया, मोरा छोटा सा जिया, परदेसिया.... (प्यार की जीत)

      January 31, 2017


  • चंद्रकांत खोत

    चंद्रकांत खोत

    चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला “मर्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित “उभयान्वयी अन्वय” ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.

      December 15, 2010


  • लॅम्बोर्गिनीचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी

    १९६५ च्या दरम्यान जिआन पाओलो डालारा, पाओलो स्टान्झानि आणि बॉब वॉलेस या लॅम्बोर्गिनीच्या तरुण इंजिनीअर्सना एक रेसिंग कार निर्माण करण्याची इच्छा होती. लॅम्बोर्गिनीने एक रेस कार तयार करावी यासाठी ते फेरुचिओ यांचा पिच्छा पुरवीत होते. मात्र फेरुचिओ यांचा रेस कार तयार करण्यासाठी सक्त विरोध होता.

      April 28, 2022


  • अमेरिका खंड शोधणारा ख्रिस्तोफर कोलंबस

    कोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले.

      October 31, 2021


  • विमल मुंदडा

    महाराष्ट्राच्या विधानसभेत पाचव्यांदा निवडून जातानाच केज मतदारसंघातील आमदार विमल मुंदडा जगण्याशी लढाई देत होत्या. आजारपणामुळे केवळ उमेदवारी अर्ज भरण्यापुरतेच त्यांचे दर्शन झाले. त्यानंतर त्या जवळजवळ दुप्पट मतांनी निवडून आल्या, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पत्र घेण्यासही त्या जाऊ शकल्या नाहीत.

    सतत पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या मुंदडा यांच्या निधनाने त्यांच्या मतदारसंघातीलच नव्हे, तर त्यांच्या मोठय़ा सामाजिक परिवारातील सर्वानाच दु:ख होणे स्वाभाविक आहे. मतदारसंघाशी नाळ जुळणे याचा अर्थ विमल मुंदडा यांना समजला होता. सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली, तेव्हा त्या भाजपचे मुंडे यांच्या गटात होत्या. दोन वेळा भाजपकडून त्यांना विजय मिळाला, परंतु मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर तीन वेळा त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्या. या काळात १९९९ पासून २००९ पर्यंत त्या मंत्रिमंडळात राहिल्या.

    मतदारसंघातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असत. परंतु त्याहीपलीकडे आपल्या मतदारांचा जो विश्वास त्यांनी कमावला होता, तो कोणत्याही राजकीय व्यक्तीला हेवा वाटण्यासारखा होता. वसुंधरा महिला सहकारी बँक आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान या संस्थांची त्यांनी उभारणी केली. मंत्रिपदाच्या काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

    व्यक्तिगत जीवनातील अनेक धक्के सहन करता करता त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य मात्र जोमाने सुरू ठेवले होते. राजकीय जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा मोठय़ा वादळांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी खंबीरता त्यांच्यापाशी होती. सतत कार्यमग्न राहून मतदारांना आपलेसे करण्याची त्यांची हातोटी कौतुकास्पद होती. अनुसूचित जातीतून डॉक्टर झालेल्या त्या काळातील अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी राजकीय क्षेत्रात काम करायचे ठरवले आणि त्यात काम करता आले, याबद्दल त्या नेहमीच समाधान व्यक्त करीत. त्यांच्या निधनाने एका उमद्या राजकीय व्यक्तीचा अंत झाला आहे.

      August 5, 2017


  • लेखिका, निवेदिका, गायिका शुभांगी मुळे

    शुभांगी यांनी रेडिओ स्टेशन वर तसेच टेलिव्हिजन वाहिन्यांसाठीही काम केले आहे. गेल्या त्या काही वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अशोक पत्कीची संगीत कार्यशाळा घेत असतात. शिवाय शुभांगी यांनी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली काही नवीन गाणीही गायली आहेत.

      June 16, 2022


  • विरेंद्र तिखे

    विरेंद्र तिखे हा संगणक क्षेत्रातील कल्पनाशक्तीशी निगडीत असलेला एक उत्साही तरूण आहे. कोणत्याही गैरप्रकारांनी व उचला उचली न करता, स्वछ हातांनी कोडींग केलेली संकेतस्थळे लोकांना बनवून देणे, आकर्षक आय कॉन्स तयार करणे, कमीत कमी गिचमिडीमधूनही ग्राहकांना खुप काही सांगून जाणारे लोगोस डिझाइन करणे, प्रेसेन्टेशन्स तयार करणे, यंत्र व त्याला वापरणार्‍यांमध्ये ॠणानुबंध तयार करणारे, साधे, सोपे परंतु सुबक इंटरफेसेस निर्माण करणे हा त्याचा व्यवसाय असला तरी व्यवसायापेक्षाही, आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा अविष्कार ग्राहकांना कसा लाभ देईल याचाच विचार तो जास्त करत असतो.

      August 16, 2011