संजय जगदाळे

जगदाळे, संजय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर एन. श्रीनिवासन यांची वर्णी लागल्याने सचिवपदाच्या शर्यतीसाठी बरीच नावे चर्चेत आली होती. त्यामध्ये रणजिब बिस्वाल हे बाजी मारतील असे वाटत असले तरी अमिताभ चौधरी यांनी त्यांच्याविरोधात अर्ज दाखल करण्याचे ठरविले होते.तथापि, बीसीसीआयमधील वरिष्ठ पदांवरील व्यक्ती निवडणूक होऊ नये, यासाठी आग्रही होते. त्यामुळे बिस्वाल आणि चौधरी यांचा पत्ता कट झाला.

बीसीसीआयच्या धुरीणांना यावेळी अनुभवी, पण वाद-विवादात न पडणारी आणि आपले सारे काही ऐकणारी व्यक्ती हवी होती. त्यावेळी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींपुढे एकच नाव आले आणि त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले, ते नाव म्हणजे संजय जगदाळे. बीसीसीआयच्या कारभाराचा असलेला अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे जगदाळे यांच्या नावाला कोणीही विरोध केला नाही आणि बिनविरोधपणे जगदाळे बीसीसीआयच्या सचिव पदावर विराजमान झाले. १९६८-८३ या दरम्यान स्थानिक क्रिकेटमध्ये जगदाळे हे एक गुणी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जायचे. या दरम्यान त्यांनी ५५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,०७७ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांसह नऊ अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये त्यांनी ८५ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामध्ये १३२ धावांत ६ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. १९८३ नंतर क्रिकेट खेळायचे सोडल्यावर त्यांनी प्रशासकाची भूमिका वठवली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांची ज्युनिअर निवड समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, ऋषीकेश कानिटकर, मुरली कार्तिक, एस. श्रीराम आणि नमन ओझासारखे गुणवान खेळाडू शोधून काढले. त्यांनी हेरून काढलेले खेळाडू आणि त्यांचे काम पाहून २००० साली त्यांना मध्य विभागातून राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले. चंदू बोर्डे यांच्या निवड समितीमध्ये त्यांची २०००-२००१ साली पहिल्यांदा निवड झाली, त्यानंतर ब्रिजेश पटेल, सय्यद किरमाणी यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीचे काम पाहिले. २००० ते २००३ पर्यंत ते भारतीय निवड समितीमध्ये होते. त्यानंतर पुन्हा एकदा किरण मोरे आणि दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीमध्ये काम केले. २००७ साली त्यांच्यावर संघव्यवस्थापकाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. २००७ च्या विश्वचषकासाठी गेलेल्या भारतीय संघाचे जगदाळे हे व्यवस्थापक होते. २००७ नंतर मात्र त्यांची बीसीसीआयला आठवण झाली ती थेट २०११ साली. कारण बिस्वाल आणि चौधरी यांच्यामधील भांडणामुळे बीसीसीआयची प्रतिमा डागाळण्याची शक्यता होती. जगदाळेंचा स्वभाव मितभाषी असला तरी त्यांच्याकडे असलेला राष्ट्रीय निवड समितीचा दांडगा अनुभव, त्याचबरोबर प्रशासकीय कामांचा अनुभव, शांतपणे सुसंवाद साधण्याची शैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ प्रतिमा या साऱ्या गोष्टींमुळे जगदाळे यांची सचिवपदी निवड करताना बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना जास्त वेळ घ्यावा लागला नाही. आता नुकताच मी या पदावर विराजमान झालो आहे. आव्हाने बरीच आहेत, याची मला पूर्णपणे कल्पना आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे, याचीही मला पूर्णपणे जाणीव आहे, असे जगदाळे यांनी सचिवपदी नियुक्त झाल्यावर सांगितले होते. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी ते कसे पार पाडतात, यावरच साऱ्यांचे लक्ष असेल.

Author