जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अनुताई वाघ ह्या आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ अशी ख्याती असलेल्या समाजसेविका.
त्या पुण्यातील हुजूरपागा शाळेत १३ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. महात्मा गांधीजींच्या “खेडयाकडे चला” या आदेशाने प्रेरित होऊन १९४५ साली ग्रामसेविकांच्या शिबिरात दाखल झाल्या. तेथे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. बोर्डी येथे बालवाडीत शिक्षिका म्हणून अनुताईंनी काम केले. त्याकाळात बालवाडीत मुले येत नसल्यामुळे अनुताईंनीच मुलांच्या अंगणात जायचे ठरवले. त्यातूनच आंगणवाडी या संकल्पनेचा जन्म झाला.
१९५६ पासून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर “कोसबाडच्या टेकडीवरून” , “कुरणशाळा” , “टिल्लूची करामत”, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले.
अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र, आदर्श माता, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार, रमाबाई केशव ठाकरे या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या “पद्मश्री” या किताबाने देखील सनमानित करण्यात आले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
कोलगेट-पामोलिव्ह कंपनीचे बिझनेस अॅनालिस्ट महेश आरस यांनी चेस मॅनहॅटन कंपनीत इंटरव्ह्यू दिला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले... “तुमचे नक्की असेल, तर पुढचे इंटरव्हयू थांबवतो”. बॅडमिंटन, क्रिकेटपासून नाट्य कलाक्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रात रस असलेले महेश आरस यांनी गेल्या २३ वर्षांत जे.पी. मॉर्गन बॅंकेचा आलेख उंचावत नेला आहे.
महेश आरस यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला नॉलेज सेन्टर हा लेख पुढील पानावर वाचा.
महेश आरस यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला नॉलेज सेन्टर हा लेख वाचा.
September 9, 2015
December 15, 2010
शिवाजी मंदिरच्या सांस्कृतिक कार्य परंपरेत त्यांचे मोलाचं योगदान होते. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.श्री शिवाजी मंदिरचे अध्यक्ष आणि कलर वाहिनीवरील कॉमेडी एक्स्प्रेस चे निर्माते, दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर आणि गीतसुगंध या संगीताच्या कार्यक्रमाची सर्वेसर्वा अक्षदा विचारे यांचे ते वडिल होत.
May 31, 2022
आज १६ आक्टोबर
आज ड्रीमगर्ल हेमामालिनी यांचा वाढदिवस
जन्म. १६ आक्टोबर १९४८
हेमामालिनी यांचे पूर्ण नाव हेमामालिनी चक्रवर्ती. मा.हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्ती ह्या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या, त्यामुळे घरी आधीपासूनच चित्रनगरीशी जुळवून घेणारे वातावरण होते. आपल्या चार दशकाहूनही अधिक काळापासून सिनेसृष्टीत यशस्वी कलाकार म्हणून आणि कित्येक सुपरह हिट चित्रपट देणाऱ्या हेमामालिनी यांना सुद्धा सुरवातीच्या काळात निर्माते आणि निर्देशक यांनी म्हंटले होते कि त्यांच्यात स्टार अपील नाही. तमिळ दिग्दर्शक श्रीधर यांनी तिला चित्रपटात घेण्यासाठी नकार दिला होता. हेमामालीनी यांना पहिला ब्रेंक मिळाला तो राजकपूर सोबतच चित्रपट ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटात त्यांना ‘ड्रीमगर्ल’ म्हणून प्रचारित करण्यात आले होते, फिल्म बॉक्स ऑफिस वर फारशी यशस्वी ठरली नाही पण हेमा मालिनी यांचे कौतुक झाले आणि दर्शकांनी त्यांना पसंद केले होते. त्यानंतरच्या काही चित्रपटांनमध्ये सुद्धा त्यांना ड्रीमगर्ल म्हणून समोर आणल्या गेले होते आणि आश्चर्य बघा कि नंतर १९७७ मध्ये त्यांना घेऊन प्रमोद चक्रवर्ती यांनी ड्रीमगर्ल नावाचा सिनेमाच पडद्यावर आणला आणि तो गाजला सुद्धा होता. त्यांचा पहिला हिट सिनेमा होता ‘जॉनी मेरा नाम’, देव आनंद सोबतच्या त्या चित्रपटाने त्यांचे करियर उचलून धरले. आणि लोकांनी त्या जोडीची खूप प्रशंसा केली होती. त्यानंतर आलेल्या रमेश सिप्पी यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटातल्या अभिनयाने हेमा मालिनी यांनी दर्शकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. रमेश सिप्पी यांचाच चित्रपट ‘सीता और गीता’ मध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि ती फिल्म त्यांच्या करियर मध्ये निर्णायक ठरली होती. या चित्रपटानंतर त्या प्रसिध्यीचा शिखरावर पोहचल्या होत्या. या चित्रपटातील अतिशय सुंदर अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा एकमेव फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुरवातीला ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटासाठी वैजयंतीमाला यांची निवड झाली होती पण त्यांनी वेळेवर त्यांच्या विवाहामुळे त्या चित्रपटात काम करायला आपली असमर्थता दाखवली आणि त्याऐवजी हेमामालिनी यांना संधी मिळाली होती. तसेच ज्या चित्रपटाने त्यांना प्रसिद्ध्यीच्या शिखरावर पोहचवले होते त्या ‘सीता और गीता’ मध्ये रमेश सिप्पी यांना मुमताज यांना घ्यायचे होते. पण काही कारणास्तव त्या या चित्रपटात काम करू शकल्या नाही आणि पर्यायाने तो चित्रपट हेमा मालिनी यांना मिळाला आणि मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले होते. वैजयंतीमाला यांच्या निवृती नंतर शास्त्रीय नृत्यांगना असलेली अभिनेत्री ची जागा हेमा मालिनी यांनी भरून काढली. १९७० साली आलेल्या ‘शरारत’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा धर्मेंद्र सोबत काम केले होते आणि १९७९ मध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या सोबतच लग्न केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र सोबत एकूण २८ चित्रपटांमध्ये काम केले होते. सहसा विवाहानंतर अभिनेत्रीची कारकीर्द संपुष्टात येते, पण हेमा मालिनी यांनी जिद्दीने आणि आपल्या परिश्रमाने विवाहानंतर सुद्धा बरेच यशस्वी चित्रपट दिलेत. जसे ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘रजिया सुलतान’, एक नई पहेली’, ‘अंधा कानून’ आणि ‘अलिबाबा और चालीस चोर’ आणखी बरेच. उतरार्धात सुद्धा त्यांनी आपला चित्रपटाचा प्रवास सुरूच ठेवला ‘बागबान’ या भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. ‘वीरजारा’ मधील भूमिकेबद्दल पण त्यांची बरीच प्रशंसा झाली होती. त्यांनी आतापर्यंत सीता औऱ गीता, शोले, संन्यासी, धर्मात्मा, प्रतिज्ञा, सत्ते पे सत्ता, बागबान यांसारखे १५० चित्रपट केले आहेत. ड्रीम गर्ल अशी हेमामालिनी यांची ओळख आहे. भरतनाट्यम मध्ये निपुण असलेल्या मा.हेमामालिनी जगभर अनेक ठिकाणी आपल्या नृत्यांचे कार्यक्रम पण केले आहेत. सोबतच त्यांनी ‘दिल आशना है’ या शाहरुख खान आणि दिव्या भारती अभिनित चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले होते. राजकारणात पण त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या भारतीय जनता पार्टी च्या जनरल सेक्रेटरी होत्या आणि सध्या मथुरा येथील भा.ज.पच्या खासदार आहेत. भरतनाट्यममध्ये विशारद असलेल्या हेमामालिनी यांनी १९६८ मध्ये ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मा.हेमामालिनी यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /विकीपीडीया
October 16, 2016
सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले.
लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो. गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली.
सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत.
पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे करून दाखवले होते. पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. 'अबोल का होता धरिता सखया मजवरी`, 'झाले तुम्हावरी दंग सखया`, 'तुम्ही माझे सावकार` 'बांगडी पिचल बाई`, 'शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` 'पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
September 9, 2017
ठाण्यातील शहरास “सांस्कृतिक शहर” हे नावलौकिक प्राप्त करुन देणार्या कलाकारांपैकी एक होतकरु अभिनेता पराग मधुकर बडेकर. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली.
May 23, 2014
मोहंमद जहूर खय्याम हाश्मी... त्यांना सारे जग प्रख्यात संगीतकार खय्याम या नावाने ओळखते.त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी जालंधरनजीकच्या राहों शहरात झाला.खय्यामम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. ते दहा वर्षांचे असतानाच आपले गावातील घर सोडून दिल्लीयत राहणार्या काकांच्याेकडे आले. तेथेच राहून त्यांपनी आपल्या करिअर घडवण्याघची स्वयप्नेा बघितली. मुंबईत आल्याेनंतर त्यां च्याा करिअरला खर्याक अर्थाने सुरु झाली. मुंबईला आल्यावर ‘यह है जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. १९४७ मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतरच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी ‘शर्माजी’ या टोपणनावाने चार चित्रपटांना संगीतही दिले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या मा. खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान चांगले बसवले. त्यांनी चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्नाहसच्या वर हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कविता क्षेत्रात समकालीन आणि दिग्दज मंडळींसोबत काम केले आहे. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग, वालीसाहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर सुधियानवी यांचा विलक्षणीय प्रभाव जाणवतो. एकाहून एक श्रेष्ठ अश्या गीतकारांबरोबर खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. त्यामध्ये मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जां निसार अख्तर, शहरयार, गुलजार, नक्श लायलपुरी, हसन कमाल आदींचा समावेश आहे. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रितरीत्या केलेल्या कामाला प्रचंड यशही लाभले व लोकप्रियताही मिळाली. मा.खय्याम हे गेली ७० वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मा.खय्यायम यांनी ७० आणि ८०च्या दशकातील अतिशय श्रवणीय संगीत दिले. त्यांनी 'त्रिशूल', 'थोडी सी बेवफाई', 'बाझार', 'कभी कभी', 'उमराव जान', आणि 'नूरी'सारख्या सिनेमांना संगीत दिले. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना तृप्त करणारे संगीतकार खय्याम. व्यावसायिक यशासाठी झगडत असलेल्या मा.ख्ययाम यांच्या 'फिर सुबह होगी' या चित्रपटाची गाणी ऐकल्यावर राज कपूर यांनी 'खय्यामसाहब अब आपकी सुबह हो गयी' असे प्रेमाने म्हटले होते.प्यारका दर्द ही मीठा मिठा, कभी कभी मेरे दिल मे’ और दिल चीज क्या है या गाण्यांनी तरुण आणि वृद्ध लोकानाही वेड लावले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरश: सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. चार दशकाहून आपल्या आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांना मोहून मा. खय्याम टाकले होते. ’कभी कभी’, ‘बाजार’, ‘त्रिशूल’, ‘ नुरी’ ,‘आखरी खत’ अशा अनेक चित्रपटाना त्यांचा परीस स्पर्श लाभला होता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी २००७ साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार व भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.खय्यायम यांचा गौरव केला आहे. मा.खय्याम यांना उमराव जान व कभी कभी या चित्रपटासाठी तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळाली होती. मा. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या पण गायिका होत्या. मा.जगजीत कौर यांनी नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी मा.खय्याम यांनी गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाला १२ कोटी रुपये देणगी दिली. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणार्यांाना आर्थिक मदत केली जाणार आहे. या ट्रस्टमध्ये काही मान्यवरांना ट्रस्टीच्या रूपात जोडले जाईल. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं कौतुक करू तेवढे कमी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
February 20, 2017
केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक, बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र होते. आज प्रबोधनकार (केशव सीताराम ठाकरे) यांची जयंती ..
October 10, 2017
श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते.
December 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti