जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कामगारांबाबत व्ही. व्ही. गिरी यांना कमालीची आस्था होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. कामगारांसंबंधीचे विचार इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री, जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले.
October 19, 2023
बाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते.
January 4, 2021
डग इन्सोल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २० जुलै १९५० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यांनी शेवटचा कसोटी सामना ३० मे १९५७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर ते ते इंग्लंडच्या क्रिकेट सिलेक्टर्स कमिटीचे चेअरमन होते तसेच १ ऑक्टोबर २००६ मध्ये एक वर्षासाठी एम. सी .सी. चे प्रसिडेंटही होते. ते एम.सी.सी. कमिटीवर २० वर्षाहून अधिक काळ होते.
April 18, 2021
१८३९ मध्ये सिंगर यांनी पहिल्यांदा खडकात छिद्र पाडण्यासाठी मशीन बनवली.नंतर लाकूड आणि धातू कापण्यासाठी मशीन बनवली.दरम्यान १८५१ मध्ये त्यांना शिलाई मशीन बनवायची संधी मिळाली. त्यांनी ते मशीन फक्त दुरुस्तच केले नाही, तर आणखी चांगले मशीन बनवण्याचा संकल्प केला आणि केवळ ११ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ते बनवले आणि जगासमोर सादर केले.हे यंत्र सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले.
August 18, 2024
भूगर्भातील घडामोडींचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास मेडिकल जिऑलॉजी या आगळ्यावेगळ्या शास्त्रात केला जातो. जगभरात नव्याने अभ्यासल्या जाणार्या या विषयावरील पहिले पुस्तक लिहिण्याचा मान नागपुरातील तरुण प्राध्यापक डॉ. कीर्तिकुमार रणदिवे यांच्याकडे जातो. मेडिकल जिऑलॉजी, जीओकेमेस्ट्री (भूगर्भरसायनशास्त्र) आणि जिओएक्सप्लोरेशन (भूगर्भसंशोधन) या विषयांवरील एकत्रित पुस्तक लिहिण्याची कामगिरीही त्यांच्याच नावावर आहे.
डॉ. कीर्तिकुमार रणदिवे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'मेडिकल जिऑलॉजी' चा 'गुरु' हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. कीर्तिकुमार रणदिवे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'मेडिकल जिऑलॉजी' चा 'गुरु' हा लेख वाचा.
September 9, 2015
स्त्रियांच्या विशेषतः पतिता व विधवांच्या सर्वांगीण उध्दाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी.
लक्ष्मीबाई ऊर्फ अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता पिता तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील मंगलोर जवळ माहेरंजी येथे राहणार्या हया चित्तपावन ब्राम्हण दांपत्याच्या पोटी माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत रमाबाईच्या जन्म झाला. अनंत शास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाई व रमाबाईस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करुन दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले.
बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रुढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा‘ची स्थापना केली. स्त्रीधर्मनिती हे पुस्तक त्यांनी याच साली लिहिले. १८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उध्दाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवास खर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टीकोनामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरीक श्रमाचे महत्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या साहयाने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ साली रमाबाईना त्यांच्या हया कार्याबद्दल कैसर ई हिंद हे सुवर्ण पदक मिळाले.
जन्म : २३ एप्रिल १८५८
मृत्यू : ५ एप्रिल १९२२
बाह्य दुवे :
November 30, 2015
मराठी बालसाहित्यात अत्यंत गाजलेल्या फास्टर फेणे या कथानायकाचे शिल्पकार म्हणजेच भास्कर भागवत.
January 3, 2015
१९८६ साली ‘नाम’ या चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून पंकज उधास नावारूपाला आले. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी झाला. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात. त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले आहे. पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं काही विसरायला लावणा-या गझल आजही रसिकांच्या गुणगुणताना दिसतात. त्यांच्या या प्रयत्नांनी भारतातील गझल क्षेत्राला व गझल गायनालाच एक नवीन उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. भारतातील गझल गायनातील एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. गझल गायन आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरविले आहे. पंकज उधास हे १९८६ साली लीला मुळगावकर यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या ‘पीएटीयूटी’चे अध्यक्ष आहेत. संस्थेची स्थापना सेंट जॉर्ज रुग्णालय प्रादेशिक रक्तपेढीतील थॅलेसेमिया रोगापासून पीडित अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने झाली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=UUOn3IIy7G0
https://www.youtube.com/watch?v=5aJgC8eyCNI
May 17, 2017
आज ३० नोव्हेंबर.. आज मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे यांची पुण्यतिथी.
बापूसाहेब चोरघडे यांचा जन्म १६ जुलै १९१४ रोजी झाला. बापूसाहेब चोरघडे यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले. ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, त्यात चोरघडेही होते. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा सहवास घडला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारांत बदल घडला. तेव्हापासून घेतलेलें खादीचें व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलें. वामन चोरघडे हे नेहमी खादीचा कुडता, पायजमा अशा स्वत: धुतलेल्या स्वच्छ पांढर्याव-शुभ्र वेषातच असत. वामनरावांना व्यायामाची आवड होती. एखाद्या पहेलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. स्पष्ट व शुद्ध उच्चार, वाचनामुळे समृद्ध झालेली भाषा, अभ्यासामुळे आलेली विचारांची श्रीमंती आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे चोरघडे एक वक्ते म्हणूनही त्यांच्या काळी गाजले. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलें त्यावेळी त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली आणि गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सकसेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले. त्याकाळी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात रामकृष्ण पाटील होते. वामन चोरघड्यांवर त्यांनी मानद अन्नपुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. मा.वामन चोरघडे यांचे ३० नोव्हेंबर १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
December 1, 2016
त्यांनी सरोद व इलेक्ट्रॉनिक गिटारचे फ्युजन केले आहे. त्यासंबंधी वाद्य निर्माण केले आहे. झीरॉड असे नामकरण तौफीक कुरेशी यांनी या वाद्यासंबंधी केले आहे. फ्युजन म्हणजेच शास्त्रीय संगीतातला पुढला भाग किंवा आवृत्ती. युवकांना फ्युजन अधिक आवडते. त्याचा प्रसार करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.
July 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti