जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव
December 7, 2011
वयाच्या ९ व्या वर्षांपासूनच तिनं बुस्टर क्लब इथे सौ. शैलजा गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली टेबलटेनिसचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. २००१ पासून २०११ पर्यंत राज्यस्तरावर ठाण्याचे प्रतिनिधीत्व करुन वैयक्तिक ६ सुवर्णपदकांसह; सांधिक १० सुवर्ण, १ रौप्यपदक तिने पटकावलं आहे.
May 16, 2014
लहानपणापासूनच त्यांच्यावर औदार्य, शौर्य आणि समाजसेवेचे संस्कार झाले. भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात, अगदी तरुण वयाचे असताना त्यांनी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या -येणाऱ्या जखमी जवानांची शुश्रुषा केली होती. १९६७ साली गुजरातमध्ये पुराने थैमान घातले होते.
September 17, 2021
एनडीटीवी या इंग्रजी न्यूज चॅनलवरचे ‘वूई दी पीपल’ आणि ‘द बक स्टॉप्स हिअर’ हे त्यांचे कार्यक्रम खूप गाजले. ‘वूई दी पीपल’ हा त्यांचा शो तर २०१७ मधे त्यांनी एनडीटीवी सोडेपर्यंत तब्बल १६ वर्ष चालला.
December 18, 2021
मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या.
December 27, 2021
नाशिक जिल्ह्यातील कुंभारी गावी जन्मलेल्या रामनाथ मोते यांनी ठाणे जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी येवून नावलौकिक मिळविले. आभ्यासवृत्ती, परिश्रम, व शिक्षण विकासाच्या आंतरिक तळमळीमुळे मोतेंनी दोन वेळा कोकण विभागाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रचंड मतधिक्याने जिंकली. कोकण विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. शिक्षकाची समस्या, व वेदना ती आपली वेदना असे मानून तश्या भावनेने व तीव्रतेने वागण्याचे संस्कार त्यांच्यावर महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केले.
पहिल्या टर्ममध्ये मोतेंनी अनेक शिक्षकहिताचे प्रलंबित प्रश्न अत्यंत कल्पकतेने मार्गी लावले होते. शिक्षण क्षेत्रातील शासन स्तरावर असा एकही प्रश्न राहिलेला नाही, की ज्यांना त्यांचा परिसस्पर्श लागायचा राहिला आहे. कायम विनाअनुदानित धोरणातील कायम शब्द काढण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून तसेच विधी मंडळात त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत; ज्यामध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणात वाढ करणे, अल्पसंख्यांकांसाठीच्या सोयी सवलती मिळवून देणे, शिक्षक-शिक्षकेतरांना ६ वा वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तो तत्काळ लागू करणे, त्रिस्तरीय वेतनश्रेणी, अनुकंपा तत्वावरील नेमणूका करणे, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांना दिली जाणारी सगळी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अंध अपंगांना शाळा, तसेच तंत्रशिक्षण संस्था व त्यातील कर्मचारांच्या समस्यांबाबत, आश्रमशाळा कर्मचार्यांवर होणारे अन्याय, शालेय विद्यार्थ्यांना मिळाणार्या शिष्यवृत्तीधारकांच्या संख्येत वाढ करणे, शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालणे अशा सर्वच विषयांबाबत ते जागृत राहिले असून विधीमंडळामध्ये त्यांनी या समस्यांना वारंवार वाचा फोडून सरकारला त्याबाबतीत काही ठोस योजना व धोरणे आखण्यास प्रवृत्त केले आहे.
त्यांच्या या कामांचे अहवाल सात खंड निवडणूकी दरम्यान शिक्षक परिषदेने प्रकाशित केलेले आहेत. या कामाशिवाय पत्रकारांना सुरक्षितता, पोलिस कर्मचार्यांचे प्रश्न, प्रदुषण, दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणार्या अश्लिल व हिंसाचारी कार्यक्रमांवर बंदी घालणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी अनाधिकृत बांधकामे असे अनेक समाजहिताचे विषयही विधीमंडळामध्ये उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत. राष्ट्रकुल मंडळाने महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळातील उत्कृष्ठ आमदार हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते होते.
December 15, 2010
आज १५ सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो.
याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
जन्म.१५ सप्टेंबर १८६१
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची लागली.
गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात.या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा.स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली.
एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर.दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले.त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला.
म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मा. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले.
अभियंता दिना निमीत्त सर्व अभियंत्यांना अभिवादन व हार्दिक शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
September 15, 2016
मिलिंद फाटक हे मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन मालिकांतील एक आघाडीचे कलाकार आहेत.
January 13, 2016
सूक्ष्मजीव-शास्त्राचा पाया पाश्चरनं घातला.या मूळ कल्पनांमधूनच काही काळानं सजीवांच्या शरीरातल्या पेशी आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या विषाणूंविषयीचं संशोधन पुढे जाणार होतं.
September 28, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti