(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सिने-अभिनेता व निर्माता अभिषेक बच्चन

    अभिषेकचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अभिषेक परदेशात गेला होता. मुंबई, नवी दिल्ली, स्वित्झर्लंड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अभिषेकने आपले शिक्षण पूर्ण केले. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    अभिषेक बच्चनचे गुरु या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या राय बच्चन सोबत सुत जुळले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. आहे. अभिषेकला एक मोठी बहीण असून तिचे नाव श्वेता नंदा आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 5, 2019


  • बॉलीवूडचा फिट अभिनेता जॉन अब्राहम

    आज बॉलीवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमच्या नावाची गणना होते. जॉन अब्राहम इंडस्ट्रीतील सर्वाधिक शिकलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

      May 27, 2019


  • ज्योती गवते

    मुंबईची स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपली विद्यार्थिनी ज्योती गवते ही पहिल्या क्रमांकाने विजेती ठरेल हे तिचे प्रशिक्षक रवि रासकटला यांनी सांगितले होते. काही वृत्तपत्रांनी त्यास तशी प्रसिद्धीही दिली होती. तथापि जेव्हा तिचा तिसरा क्रमांक आल्याचे जाहीर करण्यात आले, तेव्हा त्यांना, ज्योतीला धक्काच बसला. ज्या दोघी पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे जाहीर करण्यात आले, त्यांनी जवळच्या मार्गाने अंतर पार केले होते.

    यामध्ये त्यांनी केलेली ती फसवणूक नसेलही कदाचित, पण जर त्यांच्या या ‘यशा’वर शिक्कामोर्तब होते, तर जी योग्य मार्गाने यशस्वी झाली तिच्यावर अन्याय झाला असता. गेल्या वर्षी जी मुलगी अनवाणी पळली होती आणि तिला तेव्हा दुसरा क्रमांक मिळाला होता, ती ज्योती गवते या खेपेच्या मॅरॅथॉन स्पर्धेची विजेती ठरली आहे. यंदा तिला तीन तास पाच मिनिटे आणि तीस सेकंद एवढा वेळ लागला. रासकटला यांनी ती हे अंतर तीन तासातच पार करील, असे गृहित धरले होते. गवते ही परभणीची आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. ज्योती खेळामध्ये करिअर करू इच्छित असली, तरी तिला लागणाऱ्या सुविधा पुरवू शकण्याची ऐपत त्या कुटुंबाकडे नाही. अशा स्थितीत तिची जिद्द तिला स्वस्थ बसू देईना. रासकटला यांनी तिला धीर दिला आणि एक पैसाही न घेता तिला प्रशिक्षण दिले. आपल्याला या यशापर्यंत जायचे आहे असे तिने मनाने ठरवले होते आणि ते तिला मिळाले. तिचा आत्मविश्वासच तिला यशाच्या या पायरीपर्यंत घेऊन गेला आहे. गेल्या वर्षी तिला यशाने हुलकावणी दिली होती, पण यंदा तिने मुंबई जिंकली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे ते आपण कधीही पाहात नाही, असे सांगणारी ज्योती हिची वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रवि रासकटला यांची भेट झाली आणि त्यांना तिच्यात असलेल्या ध्येयापर्यंत जाण्यायोग्य तडफ पाहायला मिळाली. चेहऱ्यावर दरिद्री परिस्थितीचे भान बाळगणारी ज्योतीने रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला प्रारंभ केला. ती रासकटला यांना २००३ मध्ये भेटली होती. त्यांनी तिच्या आई-वडिलांना तिच्यामध्ये असलेल्या गुणांची माहिती देऊन म्हटले, की तिला खेळात प्रावीण्य कमवू द्या. ज्योती पुढल्या वर्षी पदवीधर होईलसुद्धा. दोन दिवसांपूर्वी तिने मिळवलेल्या यशाची तयारी तिने गेल्या वर्षभरामध्ये केली होती. नाशिक जिल्ह्य़ातल्या कविता राऊतचा दरम्यान विक्रम तिने अनुभवला. एका आदिवासी समाजातून आलेली एक मुलगी जर राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत आणि आशियाई क्रीडास्पर्धेत पदक मिळवू शकते, तर मग मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन आपल्याला त्या यशापर्यंत का जाता येणार नाही असा विचार तिने केला. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ती रोज सराव करते. तिचे वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बँकेत शिपाई आहेत. घरच्या गरिबीची ज्योतीला चांगलीच जाणीव आहे, पण त्यावर मात करायची तर हे दिव्यही करायला हवे, असे तिने ठरवले आणि त्यानुसार तिने ते मिळवून दाखवले. गेल्या वर्षी तिने जिंकलेले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक २ लाख ३८ हजारांचे होते. त्या वेळचे ते पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. ज्योतीचे दोन्ही भाऊ शिकत आहेत. परभणीत ती ज्या घरात राहते ते घर अगदी छोटेसे आहे. सहजासहजी कुणाच्याही नजरेस न भरणारे आहे. अशा या स्थितीत तिने मिळवलेले यश हे देदीप्यमान आहे आणि आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करत आहे. त्या दृष्टीने तिला अर्थातच अधिक मार्गदर्शनाचीही गरज भासणार आहे.

    -----------------------------------

    Aniket

    ज्योती गवते

    ज्योती गवतेचा जन्म परभणीमध्ये अत्यंत गरीब व हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितींमध्ये झाला. लहानपणापासून काटक व चपळ असल्यामूळे पळण्याची व विविध मैदानी खेळ लीलया खेळण्याची सवय तिला होती. धावण्याचे वेड, कसब व जिद्द या तिन्ही गोष्टी तिच्याजवळ मुबलक असल्या तरी आर्थिक चणचणींमूळे या क्रीडाप्रकाराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे तिला शक्य नव्हते. तिचे बाबा महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बँकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परंतु उत्तम शाडूच्या मातीला कलात्मकतेने आकार देवून तिला रेखीव गणरायाचे रूप देणारा शिल्पकार मिळावा, त्याप्रमाणे तिला कुठल्याही धनाची अपेक्षा न बाळगता, अस्सल व्यावसायिक प्रशिक्षण देणारे रवि रासकटला यांच्यासारखे गुरू मिळाले व तिच्या स्वप्नांची गाडी भरधाव सुटली. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर तिने धावण्याचा कसून सराव केला. यावर्षीच्या मुंबईच्या स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवून तिने दैदिप्यमान यशाची नोंद केली. यंदा तिला हे अंतर पार करण्यासाठी केवळ तीन तास पाच मिनीटे एवढा वेळ लागला. गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिने रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी धावण्याची किमया केली होती व तरीदेखील द्वितीय क्रमांक पटकाविला होता. गेल्या वर्षी तिला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली, पण यंदा तिने मुंबई जिंकून दाखवली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे हे ती कधीही पाहात नाही, असे जेव्हा ती पत्रकारांना सांगते, तेव्हा तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहणारा आत्मविश्वास तिच्या आजवरच्या कठोर साधनेची व धावण्यावरील एकनिष्ठतेची प्रचिती देत असतो. धावण्याप्रमाणेच आभ्यासातही तिला गती असून पुढील वर्षी पदवीधर बनण्यासाठी तिची धावण्याच्या सरावाची कसरत सांभाळता सांभाळता, आभ्यासाची तयारीही जोरदार सुरू आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमूळे तिच्या कुटुंबियांना भरपूर आर्थिक आधार मिळाला आहे. गेल्या वर्षी तिने जिंकलेले पारितोषिक २ लाख ३८ हजार रूपयांचे होते. त्या वेळचे पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करीत आहे.

      August 5, 2017


  • विनायक जनार्दन कीर्तने

    थोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले.

      January 4, 2021


  • मराठमोळी गायिका साधना सरगम

    साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म ७ मार्च १९७४ दाभोळ येथे झाला.बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. नीला यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. तर अनिल संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम यांनी १९७८ मध्ये आलेल्या फिल्म 'तृष्णा'साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते 'पम परम पम बोले जीवन की सरगम'. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. त्यानंतर साधना यांनी वयाच्या सातव्या व्या वर्षीपासून पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. १९८२ मध्ये आलेल्या 'विधाता' या चित्रपटातील 'सात सहेलियां खडी खडी' हे गाणे गाऊन साधना सरगम यांनी बॉलिवूडमध्ये धमाल केली होती. साधना सहा वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. साऊथ इंडियन गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळवणा-या साधना पहिल्या नॉन साऊथ इंडियन सिंगर आहेत. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहेमानपर्यंत प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले आहे. उदित नारायण यांच्यासोबत 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमातील गाजलेले गाणे ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायन सुरु केले होते. वयाच्या चौथ्या वर्षी साधना यांनी सवाई गंधर्व म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गाणे सादर केले होते. साधना घाणेकरच्या साधना सरगम कशा झाल्या, याविषयी एका मुलाखतीत म्हणतात, ''सरगम हेच माझे जीवन आहे. माझ्या पहिल्याच गाण्यावेळी मी सरगम गायले. ते सर्वांना आवडले अन् माझे नाव साधना सरगम असे उच्चारले जाऊ लागले. माझ्या कामाची ही पावती होती. त्या म्हणतात मी आजवर 34 विविध भाषांत गायले आहे. पण मराठीत संस्मरणीय गाणी गाण्याची संधी माझ्या वाट्याला आलीच नाही. मी मराठी मुलगी असूनही मराठीतील गाणे गायले नाही, हे दु:ख मनात आहेच.

    '' सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’, ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ अशी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.

    साधना सरगम यांनी अंदाजे १५०० चित्रपटात २०००च्या वर हिंदीत गाणी गायली आहेत. ५०० हून अधिक तामिळ चित्रपटात १००० च्या वर तामिळ गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. १९९४ ते २०१५ याकाळात साधना सरगम यांनी २५०० हून अधिक बंगाली गीत गायली आहेत. त्यांनी तेलुगु , कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाली आणि अनेक प्रादेशिक भाषेत गाणी गायली आहेत. साधना सरगम यांनी ३४ भाषांत गीते गायली आहेत. साधना सरगम यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९८८ आणि २००४ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. साधना यांना साऊथच्या फिल्मफेअर अवॉर्डसोबतच पाचवेळा महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. शिवाय त्यांना ओडिशा स्टेट फिल्म अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. आपल्या चार दशकाच्या करिअरमध्ये साधना सरगम यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. साधना सरगम या गाण्यांसोबतच खाण्याच्यादेखील शौकीन आहेत. साधना यांना स्पायसी जेवण पसंत आहे. हॉट अँड सॉर सूप त्यांचे ऑलटाइम फेव्हरेट आहे. याशिवाय पुरणपोळी, आणि श्रीखंड त्यांना आवडतं. त्यांना स्वयंपाकाचीही विशेष आवड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    साधना सरगम यांची काही गाणी
    हर किसी को नहीं मिलता (जांबाज),
    हंसते-हंसते कट जाएं रस्ते (खून भरी मांग),
    नजर ने किया है इशारा (त्रिदेव),
    हमने घर छोडा है (दिल),
    राधा बिना है किशन अकेला (किशन कन्हैया),
    जब कोई बात बिगड जाए (जुर्म),
    इमली का बूटा (सौदागर),
    बोल राधा बोल तूने ये क्या किया (बोल राधा बोल),
    तेरी उम्मीद तेरा इंतजार (दीवाना),
    कितना प्यार तुम्हें करते हैं (दिल का क्या कसूर),
    प्यार के कागज पे (जिगर),
    पहला नशा पहला खुमार (जो जीता वही सिकंदर),
    सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे (विश्वात्मा),
    क्या मौसम आया है (अनाड़ी),
    ठहरे हुए पानी में (दलाल),
    वो मेरी नींद मेरा चैन मुझे (हम हैं राही प्यार के),
    तेरे दर पर सनम (फिर तेरी कहानी याद आई),
    सुबह से लेकर शाम तक (मोहरा),
    आइए आपका इंतजार था (विजयपथ),
    नहीं ये हो नहीं सकता (बरसात),
    भंगड़ा पाले आजा आजा (करन-अर्जुन),
    तुम हमपे मरते हो (हीरो नंबर वन),
    दर्द करारा (दम लगाके हइशा)

      March 7, 2017


  • बॉलिवूडचा विनोदी अभिनेता जगदीप

    जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता.

      April 1, 2021


  • किशोर चौघुले

    नाट्य व चित्रपटसृष्टीत स्वत:च्या अभिनयाने एक वेगळी जागा लाभलेले किशोर चौघुले ह्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

      May 23, 2014


  • विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओम प्रकाश सैनी

    राजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी!

      February 12, 2018


  • मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस

    गणपतराव बोडस यांचे संपूर्ण नाव गणेश गोविंद बोडस; पण गणपतराव याच नावाने ते ओळखले जात. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला. संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली.

    गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले.

    रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 26, 2017


  • बाबु घोलप

    बाबु गणपत घोलप यांच्या शैक्षणीक कारकिर्दीवर नुसती धावती नजर जरी टाकली, तरी त्यांच्या प्रखर बुध्दीमत्तेची व सर्वांगिण क्षमतांची पोच, तसेच आभ्यासाप्रती त्यांनी दाखविलेल्या निष्ठेची खोली त्वरीत ध्यानात येते. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या लहानश्या तालुक्यात, 1 मे, 1978 रोजी जन्मलेल्या घोलपांनी विद्येसाठी भरपुर कष्ट उपसले.

      August 22, 2011