(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कपिल मोरेश्वर पाटील

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी-बदलापूर या मतदार संघातून कपिल मोरेश्वर पाटील खासदार म्हणुन विजयी झाले आहेत;

    सुरुवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांनी १८ मार्च २०१४ या दिवशी ऐन लोकसभा प्रचाराच्यावेळी गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदीं यांच्या विकासकामांच्या दुरदृष्टीचा आपल्या मतदारसंघाला फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी भा.ज.प प्रवेश केल्याचे जाहिर केले होते.

    जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेचे अध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक, अशीही त्यांची ओळख आहे. ग्रामविकास या संकल्पनेला मध्यभागी ठेवून आरोग्य, शिक्षण प्रसार, जलसंधारण या ग्रामविकासासाठी अत्यावश्यक असणार्‍या घटकांना प्राधान्य देणार्‍या कित्येक दुरदर्शी व सर्वस्पर्शी योजनांचे ते जनक आहेत. आजपर्यंत कपिल पाटील यांनी अनेक जिल्हा अधिकारी व नगरसेवकांना बरोबर घेवून स्वयंपुर्ण प्रभावी योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      January 14, 2015


  • रॉल्स-रॉईसचा सहनिर्माता हेन्री रॉईस

    मोटारीच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक कार कंपन्या जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात विलुप्तदेखील झाल्या. मात्र यातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा कंपन्या आहेत ज्यांची प्रतिष्ठा आणि रुबाब हा अद्याप अबाधित आहे. आणि त्यांपैकी एक कंपनी म्हणजे रोल्स रॉयस.

      April 25, 2021


  • प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार भालचंद्र नेमाडे

    भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला. १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.

    'कोसला' हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते... ' भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्यार लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली. कादंबर्यां्शिवाय त्यांचे 'देखणी' आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरच्या पुस्तकासाठी नेमाडे यांना १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच २०१३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला. नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली.

    रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्याल नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. "साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.

    नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ विकिपीडिया.

      May 27, 2017


  • निर्माता, दिग्दर्शक,कथा व पटकथा लेखक एन. चंद्रा

    एन. चंद्रा हे मुळचे गोव्याचे, एन.चंद्रा यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर नार्वेकर, रोजगारासाठी एन.चंद्रा यांचे वडील मुंबईत गेले व तिथेच स्थायिक झाले.

    एन चंद्रा हे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९५२ रोजी झाला.एन चंद्रा यांची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्लार्क तर वडील फिल्म सेंटर लॅबमधील ब्लॅक अँड व्हाइट डिपार्टमेंटचे प्रमुख. आईला प्रवासाची अत्यंत आवड. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सायन्स साइडला कॉलेजात प्रवेश घेतला व नंतर वडिलांच्या मदतीने फिल्म सेंटर लॅबमध्ये त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट संकलक वामन भोसले व गुरुदत्त यांचा सहाय्यक म्हणून संकलन डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. त्यादरम्यान वामन भोसले ‘मेरे अपने’ या गुलजार दिग्दर्शित चित्रपटाचं संकलन करीत होते व एन चंद्रा त्यांना सहाय्य करीत होते.

    एडिटिंगच्या काळात बऱ्याचदा गुलजार साहेब लॅबमध्ये येत असत. ‘मेरे अपने’चं एक शेडय़ुल सुरू होतं तेव्हाचा हा प्रसंग. शॉटची सर्व तयारी झाली. गुलजारनी ‘स्टार्ट साऊण्ड’ असं म्हटलं परंतु शॉट सुरू होण्यापूर्वी क्लॅप द्यावा लागतो तो क्लॅपर बॉयने दिलाच नाही. ‘अरे, क्लॅपर बॉय कुठे आहे?’ अशी सेटवर शोधा शोध सुरू झाली. तर क्लॅपर बॉय सेटवर नव्हता व क्लॅपही नव्हता. काही क्षणांतच कळलं की क्लॅपर बॉय स्टुडिओच्या कँटीनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट मुलीशी गप्पा मारत बसला आहे. बस्स्, हे कळल्यावर गुलजार यांच्या रागाचा पारा इतका चढला की त्यांनी त्याच क्षणी क्लॅपर बॉयची हकालपट्टी केली. ही गोष्ट ‘फिल्म सेंटर’मध्ये एन चंद्रा यांच्या कानावर आल्यावर त्यांनी गुलजार यांना क्लॅपर बॉय म्हणून काम करण्याबाबत विचारायचं ठरवलं. व ते गुलजार यांना क्लॅपर बॉयचे काम करू लागले.

    ‘मेरे अपने’नंतर गुलजार यांनी ‘परिचय’ हा चित्रपट सुरू केला. त्यात एन चंद्रा यांनी गुलजार यांचे असिस्टंट म्हणून काम केले. नंतर एन चंद्रा यांनी १०-११ वर्षे गुलजार यांच्या बरोबर ‘आंधी’, ‘कोशिश’, ‘खुशबू’, ‘मौसम’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘नमकीन’, आदी चित्रपट केले.

    एन. चंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा व पटकथा लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय निरीक्षण सूक्ष्म असून ते परिणामकारकरित्या कथा, पटकथेत गुंफतात. त्यामुळे त्यांचे सुरवातीचे प्रतिघात, अंकुश, तेजाब हे चित्रपट आजही अपील होतात.

    एन चंद्रांची खरी ओळख म्हणजे ‘अंकुश’ हा चित्रपट. वर्तमानकालिन सामाजिक परिस्थितीचा योग्य वापर करून त्याचा कुशल उपयोग चंद्रांनी चित्रपटात केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    एन. चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
    प्रतिघात, अंकुश, तेजाब, नरसिंहा, तेजस्विनी, युगांधर, हमला, बेकाबू, वजूद, स्टाईल, एक्सक्यूज मी, शिकारी, कगार-लाईफ ऑन द एज

    Chandrashekhar Narvekar, N. Chandra

      April 15, 2017


  • प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब

    प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. मा.गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही.

    मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.

    गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मा.मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता.

    पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
    काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
    दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
    नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
    ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
    हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
    हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और

      December 27, 2018


  • विनायक पांडुरंग करमरकर

    (१८९१ - १९६६)

    भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फुट उंचीचा भव्य पुतळा घडवून असा एकसंघ पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पातील विशेष वैशिष्टयं मानली जातात.

    करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळालं. गावातील देवळाच्या भिंतींवर त्यांनी काढलेलं शिवाजी महाराजांचं चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकार्याने पुढाकार घेऊन त्यांना मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये दाखल केलं. तिथे चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कोलकता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, महात्मा गांधी, पी.सी. रे प्रभृतींची व्यक्तिशिल्पं घडवली. त्यानंतर ‘लंडन रॉयल अॅकेडमी‘ मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना इटली, फ्रान्स, स्वित्झरलँड मधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, ‘स्टोन क्रशिंग‘ ही तंत्रंही आत्मसात करुन १९२३ साली ते कोलकत्यात परतले.

    इ.स. १९२४ साली कोलकतातील इडन गार्डन मध्ये ‘सोसायटी ऑफ आर्टिस्ट‘च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात त्यांची ‘शंखध्वनी‘ ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकीर्दीला सुरुवात झाली. याच काळात पुण्यातील ‘मिलिटरी स्कूल‘ मधील छत्रपती महाराजांचा अश्वारुढ एकसंध ‘पुतळा‘ ब्राँझमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचं वास्तव्य कायम राहिलं. ‘एका पुतळयाची आत्मकथा‘ या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या ओतकामाचं कार्य मुंबईतील माझगाव डॉकमध्ये झालं. आपलं सगळं तांत्रिक कौशल्य. अध्ययन शीलता, आत्मविश्वास पणास लावून आणि सहकार्यांसमवेत अथक परिश्रम करुन त्यांनी ही शिल्फती साकार केली आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्राँझमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्यांची स्थापना झाली. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.

    या संस्मरणीय कामगिरीनंतर अनेक उत्तमोत्तम कलाकृती घडवल्या. ‘मत्सगंधा‘, विठ्ठलभाई पटेलांचा पूर्णाकृती पुतळा‘ आचार्य कृपलानी‘, ऑटो रॉथफिल्ड‘ यांच्या पुतळयांचा त्यांची ‘मोरु‘ ,‘प्रवासी‘, नमस्ते‘ आदी शिल्पही लक्षणीय ठरली. या व्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पं घडवली.

    ‘नानासाहेब‘ या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या करमरकरांचं कौशल्य लक्षात घेऊन १९४९ साली त्यांना अमेरिकेच्या विस्कान्सिन विश्वविद्यालयात प्रात्यक्षिकाकरिता निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या शिल्पकलेतील योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारने १९६२ साली त्यांना ‘पद्मश्री‘ किताबाने सन्मानित केलं. तसेच १९६४ साली ‘ललित कला‘ अकादमी ने त्यांना फेलोशिप देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. या थोर शिल्पकाराचं १९६६ साली म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं.

      March 11, 2015


  • संजय लक्ष्मण बोरकर

    अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली.

      May 23, 2014


  • विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे

    पुण्यात वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली.

      July 12, 2017


  • विठ्ठल गंगाराम चापके

    विठ्ठल गंगाराम चापके हे भारत सरकारच्या खत कारखान्यात संशोधनात्मक काम पाहतात.

      December 15, 2010


  • शंतनू भडकमकर

    ब्रोकरेज फर्म्स' राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आजकालच्या बिझनेस युगात सर्वांनाच त्यांची गरज असते. 'ब्रोकरेज बिझनेस' हा सचोटीने, कायद्याच्या चौकटीत राहून चोखपणे करता येतो हे जाणणार्‍या लोकांची संख्या मात्र कमीच असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारातील एक आघाडीचा मालवाहतूक व्यावसायिक कंपनीसमूह म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मुंबईच्या आणि मराठी मालक असलेल्या 'एटीसी ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक शंतनू भडकमकर यांची 'इंन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम्स ब्रोकर्स असोसिएशन' ('आयएफसीबीए') या संघटनेच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सर्व मराठी माणसांना अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही.

    मुंबई विद्यापीठाची 'बी.एस्सी.' पदवी मिळविल्यानंतर भडकमकरांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'ची (बोस्टन) 'ओनर्स प्रेसिडेन्ट्स मॅनेजमेन्ट', 'रूल नाइन' (कस्टम्स एक्झॅमिशन क्वॉलिफाइड), 'फेडरेशन ऑफ इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन' या परीक्षा उतीर्ण केल्या. वडील श्रीराम मोरश्वर भडकमकर यांनी १९५७ साली मुंबईत स्थापन केलेल्या 'इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग' व्यवसायाची सूत्रे शंतनू यांनी १९८१ साली हाती घेतली.

    आजमितीला १० कंपन्यांचा विस्तार असलेला 'एटीसी ग्रुप' देशातील एक प्रमुख 'फुल सर्व्हिस इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर' म्हणून ओळखला जातो. 'डोअर टू डोअर इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स'मध्ये 'एटीसी'चे स्पेशलायझेशन आहे. शंतनू भडकमकर यांनी 'इन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर्स असोसिएशन'चे मॅनेजिंग डायरेक्टर, 'काऊन्सिल ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेन्ट प्रोफेशनल्स'च्या भारतीय शाखेचे अध्यक्षपद, 'फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया'चे अध्यक्षपद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे उपाध्यक्षपद, 'असोसिएशन ऑफ मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स इन इंडिया'चे उपाध्यक्षपद आणि 'चायना इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स प्रोफेशनल नेटवर्क'चे उपाध्यक्षपद अशा विविध जबाबदार्‍या चोखपणे पार पाडल्या आहेत व पाडत आहेत.

    'एटीसी ग्रुप'च्या व्यवसायाचा व्याप देशभरातील १५ शहरांतील २० कार्यालयांद्वारे सांभाळला जात असून, युनायटेड स्टेट्समध्ये एक 'ओव्हरसीज ऑफिस' कार्यरत आहे. 'मराठी माणूस व्यवसाय, उद्योगात मागे असतो, त्याला बिझनेस कळत नाही' असे म्हणणे आता इतिहासजमा झाले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017