हॉलिवूड मधील पहिले भारतीय अभिनेता साबू दस्तगीर

हॉलिवूड मधील पहिले भारतीय अभिनेता साबू दस्तगीर यांचा जन्म २७ जानेवारी १९२४ रोजी म्हैसूर जवळ कारापूर येथे झाला.

साबू दस्तगीर यांचा हे हॉलिवूड मधील पहिले भारतीय अभिनेता होते. साबू दस्तगीर हे मैसूरच्या महाराजाच्या महावताचा मुलगा होता. हत्तीशाळा स्वच्छ करीत असताना पाश्चिमात्य चित्रपट निर्देशक रॉबर्ट जे. फ्लॅहर्टीच्या नजरेस पडला व त्याने साबूला आपल्या एलिफंट बॉय या चित्रपटात भूमिका दिली.साबू दस्तगीर यांनी वयाच्या १३व्या वर्षी प्रथम सिनेमात काम केले होते. यानंतर अंदाजे २०-२५ चित्रपटांत विविध भूमिका केल्या. द थीफ ऑफ बगदाद या चित्रपटातील अबुची भूमिका सगळ्यात स्मरणीय ठरली. याशिवाय जंगलबुक, मॅन ईटर्स ऑफ कुमाउं वगैरे अनेक चित्रपटांतील भूमिका समीक्षकांची दाद घेउन गेल्या.

१९४४ मध्ये साबू दस्तगीर हे अमेरिकेचा नागरिक झाले व अमेरिकेच्या हवाई दलात टेल गनर (विमानाच्या शेपटात बसून मोठी बंदूक चालवणारा) म्हणून रुजू झाले. अनेक वेळा लढाईत भाग घेउन त्याने डिस्टींग्विश्ड फ्लाईंग क्रॉस हे पदक मिळवले.

साबूच्या नावाबद्दल मतभेद आहेत. पत्रकार फिलिप लीबफ्रीडच्या मते याचे खरे नाव सेलार शेख साबू असे होते. साबू यांनी १९४८ मध्ये मेरिलिन कूपर नावाच्या अभिनेत्रीशी लग्न केले. त्यांना दोन अपत्ये झाली. साबू यांच्या मित्रमंडळीत जेम्स स्टुअर्ट, रोनाल्ड रेगन वगैरे हॉलिवुडातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे होती. साबू दस्तगीर यांचे २ डिसेंबर १९६३ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=VqeR_A8eMJ8
https://www.youtube.com/watch?v=fM14Gfpfdrc

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

Author