विख्यात शिल्पकार व अजिंठा लेण्यांचा इतिहास शब्दबध्द करणारे लेखक राम अनंत थत्ते यांचा जन्म २७ जानेवारी १९३४ सालचा. राम थत्ते यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून “जी.डी.आर्ट”ची पदवी संपादन केली होती. थत्ते यांनी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सातत्याने सहा वर्षे पारितोषिके मिळविली.तसंच, मुंबई राज्यकला प्रदर्शनाचे सहा वेळा परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे पुतळा समितीवर त्यांची निरीक्षक म्हणून निवड झाली होती. विविध संस्था, चित्रकला महाविद्यालयांमध्ये अधिव्याख्याता म्हणून देखील थत्ते कार्यरत होते. कलाविषयावर विपूल प्रमाणावर लेखन करण्याचं काम राम थत्ते यांनी केले असून त्यांच्या "अजंठा"या २००४ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाला वाचकांसह समीक्षकांकडून कौतुकाची दाद मिळाली होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात पोटाच्या विकारामुळे राम थत्ते त्रस्त होते. मृत्यूच्या आठ दिवस आधी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचार सुरू असतानाच २९ सप्टेंबर २०१४ या दिवशी राम थत्ते यांचे वयाच्या ८०व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.
June 21, 2022
ऐतिहासिक ग्रंथांचे अनुवादक आणि महाराष्ट्र सरकारच्या “स्वातंत्रसैनिक चरित्रकोशा” च्या दुसर्या खंडाचे संपादक डॉ. भगवान गणेश कुंटे यांचा जन्म ४ जून १९२० रोजी झाला.
“औरंगजेबाच्या कुळकथा” व “औरंगजेबाचा इतिहास” (दोन्ही यदुनाथ सरकारांच्या पुस्तकांवरुन), “पानिपताची मोहिम अथवा काशिराजाचा वृतान्त” (काशिराज पंडिताच्या मूळ फारसी बखरीचा फारसीवरुनच अनुवाद), “अहमदनगरची निजामशाही” व “बहामनी राज्याचा इतिहास” (दोन्ही बुर्हाने मशीरकृत मूळ फारसी) हे अनुवाद त्यांनी केले.
Dr Bhagwan Ganesh Kunte
November 7, 2017
त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात.
July 2, 2022
प्राध्यापकी आणि पीएचडी कडून इंजिनिअरींग उद्योग व नंतर अॅग्रेफूड उद्योग अशी डॉ. ज्योती दशरथी यांनी घेतलेली झेप प्रेरणादायी ठरली आहे.
डॉ. ज्योती दशरथी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला उद्योगाची 'चव' न्यारी ! हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. ज्योती दशरथी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला उद्योगाची 'चव' न्यारी ! हा लेख वाचा.
September 7, 2015
लग्नाच्या आधी आईने प्रेमाने निव्वळ छंद म्हणून शिकवलेल्या कला व कौशल्ये, लग्नानंतर एक कौटुंबिक गरज म्हणून अर्थार्जनासाठी कशा उपयोगी पडू शकतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे विनया गुप्ते यांचा व्यवसाय आहे. १९९१ साली कल्याण मध्ये घरगुती स्वरुपात सुरू झालेला ब्युटी पार्लरच्या व्यवसायाचा विस्तार आजमितीस अतिप्रशस्त “शगुन इन्स्टिटयूट ऑफ ब्यूटी कल्चर आणि फॅशन डिझायनिंग”मध्ये रुपांतर करण्याची किमया उद्योजिका विनया गुप्ते यांनी केली आहे. स्वतःच घर प्रचंड आत्मविश्वासाने व जिद्दीने उभे करत असतानाच हजारो निराधार महिलांना रोजगार व स्वयंसिध्दतेच्या मार्गांनी आपापल्या आयुष्यांना रेखीव आकार देण्यास शिकविणार्या विनया गुप्ते आज महिला सक्षमीकरणाच्या कॉर्पोरेट चेहरा बनल्या आहेत. त्यांच्या या व्यवसायाचं विस्तारीकरण करताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचं नवं पर्व कल्याणमध्ये उभं केलं आहे.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येणार्या सुवर्ण जयंती शहरी योजनांसाठी कल्याण, मिरा-भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, माथेरान, खोपोली या भागांतील नगरपालिका व पालिकांमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबीरे व चर्चासत्रे आयोजित करुन ब्युटी पार्लर, शिवणकाम, ज्वेलरी मेकिंग, डॉल मेकिंग, स्नॅक्स, चॉकलेट मेकिंग, बॅग मेकिंग, एम्ब्रॉडरी, स्टाफ टॉईज मेकिंग अशा अनेक लहान-मोठ्या उद्योगांसाठी महिलांना प्रशिक्षण त्यांनी आजतागायत दिले आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
गाडगीळ, बाळ
मराठी साहित्यातील एक समृद्ध प्रांत म्हणून विनोदाला नेहमीच महत्व मिळाले आहे. विनोदी साहित्याची मराठीतील परंपराही फार मोठी आणि संपन्न. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत, आणि पु. ल. देशपांडय़ांपासून ते श्रीकांत बोजेवारांपर्यंत विनोदाच्या नाना तऱ्हा मराठी साहित्यात उमटल्या. ‘टवाळा आवडे विनोद’ अशी संभावना करणाऱ्या मराठी भाषेतच विनोदी वाङ्मयाला एवढा बहर आला आहे की, कुणाही परभाषेला (त्याबाबतीत तरी!) मराठीचा अक्षरश: हेवा वाटावा.
अशा एका परंपरेत योगदान देणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या निधनाने मराठी विनोदाला काही क्षण तरी गंभीर व्हावे लागले आहे. अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय, आवड अध्यापनाची आणि वेड लेखनाचे अशा वेगळ्याच मुशीत तयार झालेल्या बाळ गाडगीळांनी मराठी साहित्यात आपल्या साहित्याने वेगळेपण जपले. गाडगीळ लिहायला लागले, तेव्हाही मराठी साहित्यात विनोदाचे झाड बहरलेले होते. पण पूर्वसूरींच्या खांद्यावर बसूनही समकालीन लेखकांचा कोणताही प्रभाव पडू न देता आपले वेगळेपण जपणारे गाडगीळ हे आगळे साहित्यिक होते. गॉगलच्या काचांचा चष्मा, नीटनेटके राहणीमान- चेहऱ्यावरून हा माणूस विनोदी लेखक असू शकेल, असे जराही वाटणार नाही. अशी जरब प्राचार्य किंवा उपकुलगुरू म्हणून काम करताना या अशा बाह्य़ व्यक्तिमत्त्वाचा आधार घेणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या स्वभावात मात्र एक प्रकारचा खटय़ाळपणा होता. फग्र्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून सात वर्षे आणि प्राचार्य म्हणून अकरा वर्षे काम करताना अध्यापनाच्या बरोबरीने व्यवस्थापनाचे कामही त्यांनी चोखपणे बजावले. सभोवतालच्या परिस्थितीचे बारीक निरीक्षण करण्याच्या क्षमतेचा वापर लेखनात करण्याची सिद्धहस्तता फार थोडय़ा लेखकांकडे असते. मध्यमवर्गीय जीवनशैलीतील अनेक वैचित्र्यपूर्ण विसंगती तीच जीवनशैली जगत असताना पाहण्याचे कसब गाडगीळांकडे होते. असे कसब आत्मसात केलेल्या आणि समाजाचे असे चित्रण करणाऱ्या लेखकांचीही मराठीमध्ये एक मोठी परंपरा आहे. मराठी विनोद मुख्यत: प्रासंगिक आणि माणसांची स्वभाववैशिष्टय़े टिपणारा असल्याचे सांगितले जाते. मनुष्य स्वभावाच्या अनेक पदरी कथा त्यामुळे विनोदी पद्धतीने साकारलेल्या आपल्याला दिसतात. गुदगुल्या करून हसवणारा विनोद मराठीत फारच कमी. मिश्किल शैली हे तर मराठीचे खास वैशिष्टय़. गाडगीळांचा विनोद पोट धरून हसायला लावणारा नाही, पण वाचताना मन प्रसन्न करणारा आणि गालातल्या गालात हसायला लावणारा असा हा विनोद गाडगीळांनी मनोभावे जपला, त्याची निगराणी केली आणि त्याला स्वाभाविकपणे फुलू दिले. ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्याच विनोदी लेखसंग्रहाला १९६१ मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची मजा अशी की तो पु. ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर विभागून देण्यात आला होता. पहिल्याच फटक्यात बाळ गाडगीळांनी अशी सिक्सर मारल्यामुळे त्यांचा त्यानंतरचा खेळ दिमाखदार होणे क्रमप्राप्त होते. ‘सिगरेट आणि वसंतऋतू’ या प्रवासवर्णनाबरोबरच ‘शिरसलामत’, ‘खिल्ली’, ‘कुणालाही थोडक्यात पाडून घेऊ’, ‘हसो हसो’, ‘दुसरा चिमणराव’ यासारख्या सुमारे तीस पुस्तकांचे धनी होण्याचे भाग्य बाळ गाडगीळांच्या वाटय़ाला आले. व्यक्तिचित्रे, नवनीती कथा, विनोदी कादंबरी, प्रवास वर्णने, बालवाङ्मय यासारख्या साहित्य प्रकारांबरोबरच गाडगीळांनी अन्य विषयांवरही विपुल लेखन केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात आंबेडकर’ हा संपादित ग्रंथ, ‘विनोद तत्त्वज्ञान’ हा टीकाग्रंथ, ‘मिसिसिपीवरील मुशाफिरी’ हा मार्क ट्वेनच्या आत्मवृत्ताचा अनुवाद, ‘अर्थशास्त्राचे शिल्पकार’ हा अनुवादित ग्रंथ हे त्यातील काही निवडक. बाळ गाडगीळांचे मराठी भाषेबरोबरच इंग्रजीवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी गंगाधर गाडगीळांच्या बरोबर आधुनिक मराठी कथांचे भाषांतरही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. राजेंद्र बनहट्टी यांच्या ‘अखेरचे आत्मचरित्र’ या लघुकादंबरीचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. अध्यापन आणि लेखन हाच शेवटपर्यंत ध्यास असलेल्या बाळ गाडगीळ यांनी सिम्बायोसिससारख्या संस्थेत राहून आपल्या शैक्षणिक अनुभवाचा उपयोगही केला. बाळ गाडगीळांच्या निधनाने एक चांगला साहित्यिक, अध्यापक आणि प्रशासक निवर्तला आहे.
August 5, 2017
पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे.
July 6, 2022
स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’’ नाना फडणीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला.
April 20, 2016
श्री.निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव या अलौकिक भावंडांची मुक्ताबाई ही तितकीच अलौकिक बहीण. इ.स. १२७७ मध्ये हिचा जन्म झाला.
चौदाशे वर्षे जगलेले चांगदेव जेव्हा ज्ञानदेवांना कोरे पत्र पाठवतात तेव्हा इतकी वर्षे जगून हा कोराच असे मुक्ताबाई म्हणते.
May 25, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti