(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वसंत आबाजी डहाके

    कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असलेले वसंत आबाजी डहाके हे सर्व महाराष्ट्राला साहित्यिक म्हणून परिचयाचे असले तरी एक वेगळा छंद त्यांनी आयुष्यभर जपला आणि तो म्हणजे चित्रकलेचा ! वसंत आबाजी डहाके यांचा जन्म विदर्भातला. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला.

      February 4, 2010


  • आनंद माडगूळकर

    ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत.

      June 21, 2022


  • अमेय जोग

    अमेय जोग हे मराठी संगीतपटलावर चमचमणार्‍या युवा तार्‍यांपैकी एक आघाडीच नाव असून तो प्रसिध्द व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचा सुपुत्र आहे. सारेगम या झी मराठी वरील कार्यक्रमातून असंख्य रसिकांच्या मनावर मोहिनी घालण्यात यशस्वी ठरलेल्या अमेयने आजगायत मराठी शास्त्रीय रागांपासून ते नवीन युगाचे व तरूणाईचे प्रतिनिधीत्व करणार्‍या भावगीतं व रॉक गाण्यांपर्यन्त सर्वच गायनप्रकारांना सारख्याच तन्मयतेने व सचोटीने न्याय दिला आहे व पुण्या मुंबईमध्ये चाललेल्या बहुतांशी सांस्कृतिक संवर्धक गायन कार्यक्रमांमध्ये आपल्या सुरेल व गोड गळ्याचे प्रतिबिंब, उपस्थितांवर पाडणारी गाणी म्हणायला त्याला आवर्जुन आमंत्रित केले जाते.

      August 16, 2011


  • काशिनाथ त्र्यंबक तेलंग

    प्राच्यविद्यासंशोधक आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांनी मराठी भाषा व मराठी वाङ्‌मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता.

      June 4, 2022


  • रमेश शंकर गडकरी

    ठाणे शहरामधील अनेकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचा सहभाग होता. स्वातंत्र्यसैनिकांची संख्याही लक्षणीय होती. अशांपैकीच एक स्वातंत्र्यसैनिक म्हणजे ठाण्याच्या उथळसर विभागातील एक नागरिक कै. रमेश शंकर गडकरी होते.

      June 1, 2010


  • यतीन वाघ

    वाघ, यतीन

    गोदावरीला महापूर आल्यानंतर जिवाची पर्वा न करता पाण्यात उतरून नागरिकांना मदत करण्याची हिंमत दाखविण्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते.. असा प्रसंग २००८ सालच्या पुरात खरोखरच आला होता आणि यतीन वाघ ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. नाशिक नगरीचे मनसेचे पहिलेच महापौर म्हणून जबाबदारी आलेले अ‍ॅड. यतीन वाघ यांनी यांसारख्या अनेक प्रसंगातून आपल्यातील या समाजसेवी गुणांचे दर्शन घडविले आहे.

    समाजकारण आणि राजकारण यांची गुंफण जर व्यवस्थितरीत्या घातली तर जनता अशा कुटुंबावर कसे प्रेम करते, याचे उदाहरण म्हणून मनसेचे नाशिक येथील महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या कुटुंबाकडे पाहावे लागेल. राज्यातील मनसेचे प्रथम महापौर हा मान अ‍ॅड. यतीन यांनी मिळविण्याआधी या कुटुंबाकडे आलेल्या पदांचा विचार केला तर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य कळू शकेल. त्यांचे आजोबा यादवराव वाघ तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, वडील अ‍ॅड. रघुनाथ वाघ उपनगराध्यक्ष, आत्या सुमनताई बागले नाशिकच्या पहिल्या उपमहापौर, अशी अनेक पदे या कुटुंबाकडे मिळालेली आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता अ‍ॅड. यतीन यांना महापालिकेचा गाडा हाकताना कुटुंबाच्या या वारशाचा नक्कीच फायदा होऊ शकेल. वयाची पंचेचाळिशी गाठलेले यतीन यांच्या कुटुंबात आई गंगाबाई यांचा अपवाद वगळता वडील, पत्नी, भाऊ, दोन्ही बहिणी, इतकेच काय वहिनी असे सर्वच कायद्याचे पदवीधर. गंगापूर हे वाघ यांचे मूळ गाव. पेठे विद्यालयातून माध्यमिक, भि. य. क्ष. महाविद्यालयातून उच्च माध्यमिक आणि न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयातून बी.एस.एल., एलएल.बी. पूर्ण करणाऱ्या अ‍ॅड. वाघ यांना महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांचा कौल मिळाला. मागील पंचवार्षिकात महापालिकेच्या खर्चातून नगरसेवकांना मोबाइल देण्याच्या ठरावाला कडाडून विरोध करणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख झाली. पक्षकार्यात त्यांनी आपल्या वकिली कौशल्याचाही परिचय वेळोवेळी दिला आहे. मितभाषी असलेल्या अ‍ॅड. यतीन यांच्यातील हे सर्व गुणच त्यांना महापौरपदापर्यंत घेऊन गेले.

      August 5, 2017


  • दिव्या देशमुख

    पॉंडेचरीमधील स्पर्धेत दिव्या देशमुख या नागपूरच्या चिमुरडीने सात वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय जेतेपद पटकावले आणि तिची विजयी घोडदौड सुरु झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत जगातील सर्वांत कमी वयाची वुमन फिडे मास्टर हा किताब तिच्या नावावर नोंदला गेला आहे. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या नऊ वर्षांखालील मुलींच्या २७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने विजेतेपद पटकावले.

    दिव्या देशमुख यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'दिव्य' त्वाची जेथ प्रचीती हा लेख पुढील पानावर वाचा.

    दिव्या देशमुख यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'दिव्य' त्वाची जेथ प्रचीती हा लेख वाचा.

    deshmukh-divya-modified

      September 8, 2015


  • महेश कोठारे

    महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

    महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.

    कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.

    महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

    महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वार्‍याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.

    अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही अव्वल कामगिरी करुन मराठी रसिकांना खिळवून ठेवणारे चित्रपट निर्माण करणारे महेश कोठारे हे एक प्रमुख मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अभिनितदिग्दर्शीत केलेले धूमधडाका, दे दणादण, धडाकेबाज इ. चित्रपट अजूनही रसिकांच्या मनात रुंची घालतात.

      March 11, 2015


  • राजू बाविस्कर

    जळगावातील कलाशिक्षक आणि चित्रकार राजू बाविस्कर.

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्यावरचं लासूर हे त्यांचं गाव. घरची गरिबी सतत चिंतेत पाडणारी. पण हातात पडलेले कलेचे दान त्यांना लहानपणीच उमगले आणि शाळेत असतानाच त्यांनी आधी गंजलेल्या काळ्या पत्र्यावर, तर नंतर गावातील लग्नघरांच्या भिंतींवर चित्रं काढायला सुरुवात केली. लग्नघरातील या कामाचे त्यांना पाच-दहा रुपये मिळू लागले. हेच पैसे त्यांच्या शिक्षणाच्या आणि घरच्याही उपयोगी पडू लागले. इथूनच सुरू झाला त्यांचा खरा कलाप्रवास. यातून त्यांना त्यांच्या कलेचे 'मोल'ही कळले. मग हळूहळू ते गावात-पंचक्रोशीत कलेची कामे घेऊ लागले. त्यातूनच त्यांनी कलाशिक्षण पूर्ण केले.

    औरंगाबादमधून बॅचलर ऑफ फाइन आर्टचे शिक्षण घेतल्यावर बाविस्कर जळगावात ड्रॉइंगमास्तर म्हणून रुजू झाले. एके दिवशी शाळेतले शिक्षक व कवी नीळकंठ महाजन यांनी त्यांची रेखाटनं पाहिली आणि ती 'हंस' मासिकाकडे पाठवायला सांगितली. बाविस्करांनी ती पाठवली. त्यानंतर प्रकाशन व्यवसायात त्यांचा मुक्त वावर सुरू झाला. पॉप्युलर, पद्मगंधा, शब्दालयसारख्या नामांकित प्रकाशकांकडून त्यांच्या रेखाटनांना, मुखपृष्ठांना मागणी येऊ लागली. त्यांची रेखाटनं आणि मुखपृष्ठं पाहून त्यांना भालचंद्र नेमाडेंपासून ना. धों. महानोरांपर्यंत आणि रंगनाथ पठारेंपासून राजन गवस यांच्यापर्यंत अनेकांची दाद मिळाली. हा प्रवास सुरू असतानाच बाविस्करांना अचानक जाणवलं की रेखाटनांत रेषांची खूप गर्दी होतेय. मग त्यांनी जाणीवपूर्वक रेषा कमी केल्या. चित्रांतील आकार कमी करत गेले आणि त्यांना आपल्याच चित्रांत निराकारातून आकार साकारत असल्याचे लक्षात आले. आता त्यांच्या रेखाटनांचा-चित्रांचा प्रवास अमूर्ताच्या दिशेने सुरू आहे.

    राजू बाविस्कर यांना सांगलीचा प्रतिष्ठेचा 'चित्रकार पंत जांभळीकर स्मृती पुरस्कार' देण्यात आला. या पुरस्काराने एकप्रकारे बाविस्कर यांच्या प्रयोगशीलतेवरच शिक्कामोर्तब केले. कारण देवदेवतांच्या चित्रां-पासून सुरू झालेला बाविस्कर यांचा कलाप्रवास आता अमूर्ताकडे सुरू झाला आहे. आकार, रेषा यांच्यात न अडकता त्यांचा कुंचला आता निराकारात आकार शोधू लागला आहे. अलीकडेच मुंबईच्या जहांगीर कलादालनात भरलेल्या त्यांच्या अमूर्त शैलीतील चित्रप्रदर्शनाला मिळालेला जाणकारांचा प्रतिसाद, ते योग्य वाटेवर असल्याचेच दर्शविणारा आहे. मात्र बाविस्कर यांचा इथवरचा प्रवास हा एकप्रकारे कोणत्याही यशस्वी व्यक्तीसारखाच संघर्षाचा आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • प्रकाश सावंत (बाळा सावंत)

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते तसंच ठाकरे कुटुंबियांचे जवळचे स्नेही अशी प्रकाश सावंत उर्फ बाळा सावंत यांची ओळख होती.

      February 9, 2015