भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते.
February 4, 2010
अजित पवार हे एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे विद्यमान उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री असून , ते बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.
October 31, 2020
कथा-कादंबरीकार प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा २५ डिसेंबर १९४० रोजी जन्म झाला. 'पेरणी, मळणी, राखण, खोळंबा' मिळून १५ कथासंग्रह. तसेच 'पाचोळा, सावट, चारापाणी, आमदार सौभाग्यवती' या कादंबर्या. 'पिकलं पान, विहीर' ही नाटके आणि काही बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.
December 28, 2018
मूळचे नागपूरचे असलेले संजय सुरकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५९ रोजी झाला. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या अनेक एकांकिका गाजल्या. संजय सुरकर यांना अभिनेता व्हायचं होत कारण स्पर्धांमधील अनेक एकांकिकांमध्ये दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयही केला होता. ‘वंश’ ही सुरकर आणि मंगेश कदम यांनी एकत्रित दिग्दर्शित केलेली एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत पहिली आली होती.
March 13, 2014
ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात वावरत असताना, मनोज लासे यांनी ठाणे शहर अत्याधुनिक, अतिक्रमणरहित व हरित कसे राहील या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. त्याचप्रमाणे शहरात रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पाणी, नियमित वीज पुरवठा यासारख्या मुलभूत सुविधा त्यांनी गतिमानरित्या पुरविलेल्या आहेत. ठाणे शहराला हरित बनवण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवून जनतेला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले व स्वतःही कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण ठाणे शहराची काळजी घेताना त्यांनी गटारे, पदपथांचे काँक्रिटिकरण, पाणीगळती, व प्रत्येक चौकातील सुशोभिकरणाला त्यांनी प्राधान्य दिले.
विद्यार्थ्यांपासून वयोवृध्दांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील लोकांच्या समस्यांना प्रत्यक्षात मदत करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. खारीगाव कळव्यातील राजपार्क सोसायटीजवळ वृध्दांसाठी अद्ययावत नाना नानी पार्क उभारले. शहरातील दळणवळण सुधारण्यासाठी सुसज्ज रस्त्यांना प्राधान्य देण्यासोबतच, खारेगांव येथील स्मशानभूमीचच्या दुरावस्थेमुळे उद्भवणार्या अनेक अडचणींची लक्षात घेत या स्मशानभूमीसाठी ५५ लाखांचा निधी उपललब्ध करून नुतनीकरणास सुरूवात केली.
त्याचप्रमाणे घोलाई भागातील पाणी, रस्ते, शौचालये आदी मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून, त्यांनी काही महिन्यांमध्येच या विभागाचा चेहरामोहरा पालटून दाखविला. सध्या या विभागामध्ये सुसज्ज रस्ते, पदपथावर दिवे, व घाणीचा निचरा करणार्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली आहे. या ठिकाणी विजेची समस्या असल्याने लासे यांच्या हस्तक्षेपामूळे येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळा क्रमांक ६८ चे नुतनीकरणही त्यांनी केले. वास्तू आनंद सोसायटी येथे सधीकरणासाठी धबधबा उभारल्याने हा भाग अधिक रमणीय झाला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
भावगीताच्या विश्वातील तळपता तारा म्हणून ज्या मोजक्या संगीतकारांची नावे घ्यावी लागतील, त्यामध्ये यशवंत देव यांचे नाव फार वरचे आहे. त्यांची कितीतरी गाणी आजही ऐकताना मन आनंदाने भरून जाते. स्वत: उत्तम कवी असल्याने त्यांनी संगीतकार म्हणून केलेली कामगिरी अधिक उठावदार आहे.
February 12, 2019
निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची अनोखी शैली होती. पण त्यांची आणखीन एक ओळख महाराष्ट्राला होती ती म्हणजे प्रतिभावान साहित्यिक म्हणून; कविता, गीतकार, ललितकार, पटकथा -संवाद लेखक,गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, या क्षेत्रात संचार होता.
May 7, 2014
कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला भावलेले व्यक्तिमत्त्व. ८ एप्रिल १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली.
February 4, 2010
अमेरिकास्थित एमआयटी संस्थेतील प्राध्यापक व एमआयटी मीडिया लॅबमधील कॅमेरा कल्चर रिसर्च लॅबचे संचालक डॉ. रमेश रासकर यांनी मोबाईल कॅमेराचा खुबीने वापर करुन त्यापासून आयनेत्र, आयमित्र ही डोळे तसेव डायबेटिसच्या आजारांचे निदान करणारी यंत्रे बनविली. नाशिकमधून लहानाचे मोठे झालेल्या रमेश यांच्या संशोधनाचे भिंग यापेक्षा कितीतरी मोठे आहे. आज त्यांच्या नावावर अमेरिकेतील ५० पेटन्ट्सची नोंद आहे.
कॅमेरा कल्चरची किमया
July 24, 2015
गेल्या पाच-सहा वर्षांत धम्मपाल रत्नाकर हे नाव मराठी साहित्यात जोरकसपणे पुढे येऊ लागले होते. त्यांच्या ' हॉटेल माझा देश ' या पहिल्याच काव्यसंग्रहाने भल्याभल्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले होते. ' जिथे नसते जात, जिथे नसतो धर्म। जिथं नसतो पंथ, फक्त असतात माणसं। त्या माणसांचा देश! हॉटेल माझा देश!! ' अशा सोप्या ओळींतून त्यांनी हॉटेलचे विश्व उभे केले आणि मराठी साहित्यात अनुभवांचे एक वेगळेच दालन उघडले.
धम्मपाल यांना पोटासाठी हॉटेलात नोकरी करावी लागत होती. वेटर म्हणून तिथे काम करताना अठरापगड जातीच्या माणसांना सामावून घेणारी, अडल्या-नडल्यांना, उपेक्षितांना काम मिळवून देणारी हॉटेल नावाची व्यवस्था त्यांनी अंतर्बाह्य अनुभवली होती. तिथले हर्ष-विमर्ष, यातना, उपेक्षा, आपुलकी या सार्याचे अधिक तपशिलातले चित्रण त्यांच्या ' विसकट ' या कादंबरीत उमटले. हॉटेल माझा देश आणि विसकट या दोन्ही पुस्तकांना अनुक्रमे महाराष्ट्र फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळाले. परंतु केवळ लेखक-कवी एवढीच त्यांची ओळख नव्हती. ते आंबेडकरी चळवळीतील हाडाचे कार्यकर्ते होते.
कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील येडगुळ गावी अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आईवडिल शेतमजूर. धम्मपालनीही लहानपणी पडतील ती कामे केली. परंतु शिकण्याची उर्मी मोठी होती. पुढे ते शिकण्यासाठी कोल्हापुरात आले. तेथे त्यांनी हॉटेलात नोकरी केली. तिथे त्यांची जीवनदृष्टी आमूलाग्र बदलून गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा त्यांच्यापाशी होता. आपण शिकावे आणि समाजाला पुढे न्यावे, जन्मदात्यांचे उतराई व्हावे याचे जागते भान त्यांच्या ठायी शेवटपर्यंत होते. ते एम.ए. झाले व पुढे नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर पीएच.डी. करून डॉक्टरही झाले.
कोल्हापूरच्या शहाजी महाविद्यालयात ते मराठी शिकवत. त्यांचे कार्यकर्तेपण साहित्य चळवळीतही डोकावे. कोल्हापुरात त्यांनी ' आम्ही ' नावाची साहित्य चळवळ सुरू केली. नंतर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचेही ते काही काळ कार्यवाह होते. त्यांची कारकीर्द अशी आकार घेत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घेतली. कावीळ आणि न्यूमोनियाचे निमित्त होऊन वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले. गेल्या काही काळात अरूण काळे, भुजंग मेश्र्राम, ऋत्विज काळसेकर, भारत सातपुते अशा तरुण लेखक-कवींनी आकस्मिकपणे जगाचा निरोप घेऊन साऱ्यांना चटका लावला. धम्मपाल रत्नाकर यांचे जाणेही असेच धक्कादायक आणि मराठी साहित्याचे नुकसान करणारे ठरले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti