स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुणे इथे झाला. रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.
स्मिता पाटील ह्यांचा झाला. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील 'बातमीदार' या नात्याने केली. छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला 'निशांत' आणि 'चरणदास चोर' या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन' आणि 'भूमिका' या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.
'मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित 'भूमिका ' मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्यात स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या.
स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्याय अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. पण मृत्यूनंतरही मास्को, न्यूर्यॉक, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं 'सिंहावलोकन ' झालं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय व मराठी अभिनेत्री ठरली. फ्रान्स मध्ये ला रॉशेला शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये त्यांच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव (रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला होता. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिता यांना मिळाला होता. मराठी रंगभूमीवर काम करणारे मा.नाना पाटेकर बॉलीवूडमध्ये आपल्या येण्याचे श्रेय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिला देतात. मा.नाना पाटेकर म्हणतात हिंदी चित्रपटातील प्रवेश स्मिता पाटील हिच्यामुळेच झाला.
मी मराठी रंगभूमीवर काम करत होतो. तेथे मी खूश होतो. पण स्मिताने मी हिंदीत प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले. मला हिंदीत काम करण्यासाठी प्रवृत्त केले. तिनेच माझे नाव रवी चोप्रा यांना सुचविले आणि मला ‘आज की आवाज’ हा चित्रपट मिळाल्याचे नाना पाटेकर यांनी नुकतेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. स्मिताने केलेल्या ‘फोर्स’मुळे मी इंडस्ट्रीत आलो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्याबरोबर मी ‘अवाम’ आणि ‘गीद्ध’ या चित्रपटात काम केले होते. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
स्मिता पाटील यांचे काही चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=7_IAjinodPo
https://www.youtube.com/watch?v=TxRk-jbUrrk
https://www.youtube.com/watch?v=GC6XmwlNwhE
https://www.youtube.com/watch?v=tuo6F5qUu00
https://www.youtube.com/watch?v=8L4oq6VKA2U
https://www.youtube.com/watch?v=gskP5p2Oknc
विवृत्तीय समाकल, रीमान श्रेढी, झीटा फलनाची समीकरणे व त्यांचा स्वतःचा अपसारी श्रेढींसंबंधीचा सिद्धांत हे त्यांनी स्वतः संशोधन करून शोधून काढले.
वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या रम्य ही स्वर्गाहून लंका या गाण्याचा इतिहास
चित्रपट : स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)
संगीतकार : वसंत देसाई
पार्श्वरगायक : पं. भीमसेन जोशी
गीत : ग. दि. माडगूळकर
संगीतकार सुधीर फडके यांनी गीत रामायणातील सर्वच्या सर्व ५६ गीतांना अतिशय समर्पक चाली लावल्या होत्या. व त्यांनी गीत रामायणाचे असंख्य कार्यक्रम केले, पुण्यातील त्यांचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने बघणारा एक तरुण विद्यार्थी- अरुण पाटणकर! अरुण हा संगीतप्रेमी तर होताच, पण त्याचा "रामायणा'चा चांगला अभ्यासही होता. एका कार्यक्रमाच्या वेळी त्याने सुधीर फडके यांची भेट घेतली. म्हणाला, "गीत रामायणात अनेकांच्या तोंडी गाणी आहेत आणि ती योग्यही आहेत, पण संगीताविषयी प्रेम असणारा व संगीताचा जाणकार "रावण', याच्या तोंडी एखादे गीत का नाही?' यावर बाबूजी (सुधीर फडके) चतुराईने म्हणाले, "अहो, मी फक्त गीतांना स्वरबद्ध केलंय आणि ती गातोय एवढंच! हा प्रश्नय तुम्ही गीत रामायण लिहिणाऱ्या ग. दि. माडगूळकरांना विचारा.
लवकरच तोही योग आला. गीत रामायणाच्या २५० व्या कार्यक्रमाला ग. दि. माडगूळकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्या ठिकाणी हजर असलेल्या अरुणने पुन्हा तोच प्रश्नम गदिमांना विचारला. ते काही बोलले नाहीत. कदाचित भोवती असलेल्या चाहत्यांच्या गराड्यामुळे त्यांनी उत्तर दिले नसेल!
मात्र अरुणच्या त्या प्रश्ना ने गदिमांना नक्कीच विचार करायला लावलं होतं. कारण त्याच सुमारास होमी वाडिया या हिंदीतील प्रसिद्ध निर्मात्याने "स्वयंवर झाले सीतेचे' नावाचा चित्रपट काढायचं ठरवून त्याची कथा- पटकथा- संवाद व गीतांची जबाबदारी ग. दि. माडगूळकरांवर सोपवली. त्यांनी या चित्रपटात रावणाला गाणे गायला लावले. रावण हा दुष्ट खरा, पण तो कलाशौकिन होता. यासाठी चित्रपटाच्या सुरवातीला रावण वीणा घेऊन एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे त्यांनी दाखवले होते.
पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हिंडोल बहार रागातील "रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गाणे ऐकताना श्रोते तल्लीन होत. या गाण्यातील "या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का?' अशा उन्मत्त सवालातून रावणाचा गर्विष्ठ स्वभाव दिसून येतो, तर त्यातील ताना- मुरक्याा व आलापींमुळे त्याची संगीताची जाण लक्षात येते. या गाण्याचे ध्वनिमुद्रण "बॉम्बे लॅब'मध्ये झाले होते. संगीतकार मा.वसंत देसाई यांनी ध्वनिमुद्रणानंतर पंडितजींची गाण्याची मैफल ठेवली होती. त्या दिवशी टेकमध्ये गाणे ओके व अतिशय छान झाल्यामुळे पंडितजींची तबियत खूष होती आणि मग त्या खुशीतच त्यांनी आपल्या रसिक चाहत्यांसाठी एक तासभर झकास मैफल रंगवली!
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ मधू पोतदार
संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ जी.एम. दुराणी हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. त्यांचा जन्म १९१९रोजी झाला. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते.
मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते.मा.जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. बिमल रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ असे अनेक चित्रपट रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात.
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत... त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.
विशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या.
तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा 'बालगंधर्व पुरस्कार' बहाल केला.
१९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या.
आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात. 'घेता किती घेशील दो करांनी' या न्यायाने माणिक वर्मा, पं. यशवंतबुवा जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शंकरराव अभ्यंकर अशा विविध संगीत घराण्यातील गुरुंकडून गाण्याची तालीम घेतली. केवळ तालीम घेतली नाही, त्यात्या घराण्याची खासीयत आपल्या गळ्यात उतरवली आणि आपली अशी एक स्वतंत्र, काहीशी आक्रमक गायनशैली विकसित केली.
आशाताईंचं गाणं ऐकताना किराणा, ग्वाल्हेर व आग्रा घराण्याची गान वैशिष्ट्यं आढळून येतात, ती त्यामुळेच. त्यांनी गायलेल्या भावगीतांत याची उत्तम झलक पाहायला मिळते. विशेषतः 'घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला' हे गाणं ऐकताना याचं प्रत्यंतर येतं.
आशाताई पारंपरिक मराठी भावगीते, भजने व नाट्यगीतेही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात. देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात. आशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत, तसेच अनेक बंदिशी रचल्या आहेत. 'संगीत आराधना' व 'संगीत कविराज जयदेव' यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला आशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम, जसे, 'होली रंग रंगीले', 'सावन - रंग', 'ऋतु-रंग', 'रचनाकार को प्रणाम', सादर केले आहेत.
१९९४ पासून आपले पती श्री. माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे, मुंबई येथे 'उत्तुंग सांस्कृतिक परिवार' नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत, नृत्य, नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ह्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था 'उत्तुंग पुरस्कार' जाहीर करते.
आजवर आशाताईंना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत माणिक वर्मा पुरस्कार, पं. कुमार गंधर्व पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ म.टा
काही गाणी आशा खाडिलकर यांची
घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला
वद जाऊ कुणाला शरण
जोहर मायबाप जोहर मायबाप
मजवरी तयाचे प्रेम खरे
अनंता तुला कोण पाहू शके
बलसागर तुम्ही
किती किती सांगू तुला
मर्म बंधातली ठेव ही
केरेन मल्होत्रा हे सनी लियोनचे खरे नाव. भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनचा जन्म कॅनडातील सर्निया शहरात झाला. भारतीय-कॅनेडियन अभिनेत्री सनी लियोन यांचा जन्म १३ मे १९८१ रोजी झाला. सनी सुरूवातीला नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनी लियोनही शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. सनीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीचे नाव कॅथलिक शाळेत घातले होते. कारण शीख परिवारात वाढल्यामुळे पब्लिक स्कुलमध्ये सनीला अडचणी येतील असा विचार तिच्या आईवडिलांनी केला होता.
सनी १५ वर्षांची असतांना तिने पहिला जॉब एका जर्मन बेकरीमध्ये केला होता. मात्र, पेंटहाऊस मॅग्झिनचा फोटोग्राफर जे एलेनला भेटण्यापूर्वी सनी लियोनने ऑरेंज काऊंटीमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनीने २००५ मध्ये एमटीव्ही इंडियाच्या रेड कार्पेटवर रिपोर्टरची भूमिका साकारली होती. ती २००३ मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१० मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते.
भारतात २०११ मध्ये सनी पहिल्यांदा बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पाचव्या पर्वात टीव्हीवर झळकली होती. बॉलिवूडमध्ये तिने जिस्म-२ या सिनेमाने पदार्पण केले. त्यानंतर तिने सिनेमांत काम करायला सुरुवात केली. बालपणापासूनच सनीची यशस्वी अभिनेत्री होण्याची इच्छा होती. सनी लियोनचे स्वतःचे एका प्रॉडक्शन आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सनलस्ट पिक्चर्स असे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नमस्ते लंडन, एक था टायगर, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, धूम ३, 'एक था टायगर' असे एकाहून एक सरस व हिट चित्रपट देणारी व बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी सुपरस्टार म्हणजे कतरिना कैफ. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला. तिची आई सामाजिक कार्यकर्ती असल्याने कैफ परिवाला दर दोन वर्षांनी आपला बाडबिस्तरा उचलून नवनव्या ठिकाणी, देशांत प्रवास करावा लागत असे. कतरिना लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या क्षेत्रात आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी झाला.२००३ साली कतरिना भारतात आली. तिचा पहिला चित्रपट 'बूम' दणकून आपटला, मात्र या अपयशाने खचून न जाता अथक मेहनत करत तिने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवले. 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटात ती प्रथमच सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकली. मात्र २००७ साली आलेल्या 'नमस्ते लंडन' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आणि कतरिनाने प्रथमच यशाची चव चाखली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटापासून तिची व अक्षय कुमारची जोडी हिट ठरली. ती दिवसातील १६-१६ तास काम करत असते. न थकता, न कंटाता काम करण्याच्या आपल्या सवयीमुळे आज आपल्याला हे यश, प्रसिद्धी मिळत असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. शीला की जवानी, चिकिनी चमेली ही आयटम साँग खूप गाजली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
मणिरत्नम हे चित्रपट सृष्टीत येण्या आधी कंसल्टंट होते. मणिरत्नम यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट १९८३ साली कानडी चित्रपट ‘पल्लवी अनु पल्लवी’. त्यांचा जन्म २ जून १९५५ रोजी झाला. या चित्रपटाला कर्नाटक सरकार ने मणिरत्नम यांना ‘बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड’ दिले. मा.मणिरत्नम यांना १९८६ साली आलेल्या तमिळ चित्रपट ‘मोउना रागम’ ने तमिळ चित्रपट सृष्टीत ओळख दिली. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाले. मणिरत्नम यांनी १९९२ मध्ये ‘रोजा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी ए आर रहमान यांना संगीतकार बनण्याची संधी दिली. हा चित्रपट सुपरहिट झाला. मणिरत्नम यांनी ‘दिल से’ या चित्रपटाद्वारे बॉलीवुड मध्ये आले. या नंतर २००२ मध्ये ‘साथिया’ चित्रपट निर्माण केला. याची कथा मणिरत्नम यांचीच होती. ‘साथिया’ हा मणिरत्नम यांच्या ‘अलायपयुथे’चा अधिकृत रिमेक होता. मणि रत्नम २००४ मध्ये फिल्म ‘युवा’ चे दिग्दर्शन केले. मा.मणिरत्नम यांना बॉलीवूडमध्ये ‘मणी’ सर म्हणून आदराने संबोधले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti