(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा

    हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिती झिंटा.

    प्रिती झिंटाचा जन्म ३१ जानेवारी १९७५ रोजी झाला.‘डिंपल गर्ल’ आणि ‘बबली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिती झिंटा हिने दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या आधारावर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या गालावरच्या खळीचे तर लाखो दिवाने आहेत. १९९८ मध्ये मनी रत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून अभिनेत्री प्रिती झिंटा हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. शेखर कपूर यांनी तिचे नाव सुचवले होते. तिची या चित्रपटातील भूमिका अत्यंत लहान होती. मात्र, मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनिषा कोईरालापेक्षा प्रितीचीच भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडली. २००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये सर्वांत जास्त कमाई करणारा ठरला. या चित्रपटातील निशाच्या भूमिकेसाठी प्रितीला ‘फिल्मफेयर अॅसवॉर्ड’ चा बेस्ट अॅाक्ट्रेस अॅनवॉर्ड साठी नॉमिनेट करण्यात आले होते.

    ‘वीर-झारा’, ‘सलाम-नमस्ते’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असली तरीही तिच्या चाहत्यांचा आकडा कमी झालेला नाही. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासूनच कोणत्याही बड्या व्यक्तिमत्त्वाच्या पाठिंब्याशिवाय प्रितीने स्वबळावर स्वत:ची अशी एक ओळख प्रस्थापित केली. प्रिती झिंटाच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये तिने ‘वीर-झारा’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेला अनेकांनी पसंती दिली. त्या चित्रपटामध्ये प्रितीने साकारलेली पाकिस्तानी मुलीची भूमिका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेली. त्यामुळे तिच्या अभिनय कारकीर्दीतील हा एक लोकप्रिय चित्रपट आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रिती झिंटाच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी आणखी एक चित्रपट म्हणजे ‘सलाम-नमस्ते’. एका वेगळ्याच विषयाला हात घालणाऱ्या या चित्रपटातील प्रितीच्या भूमिकेने अनेकांचेच लक्ष वेधले होते. सैन्यदलाची पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबातून आलेल्या प्रिती झिंटाने नेहमीच तिचे राष्ट्रप्रेमही जाहिरपणे व्यक्त केले आहे. प्रीती झिंटाने गेल्या चवर्षी तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान अमेरिकन सिटिझन जीन गुडइनफसोबत लग्न थाटले. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी या जोडीने लॉस एंजिलिसमध्ये लग्न थाटले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जेष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे

    पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी बेळगाव येथे झाला. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी "राष्ट्रगीत' वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले. त्याच दरम्यान पुणे आकाशवाणीवर त्यांची निवड झाली होती. दरम्यानच्या काळात अरविंद गजेंद्रगडकर आणि अन्य पाच-सहा मिळून त्यांनी बासरी वादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला. त्या काळात बासरीवादनाला स्वतंत्र व्यासपीठ नव्हते.

    पं.पन्नालाल घोष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पं. केशव गिंडे यांनी ‘अमूल्यज्योती’ संस्थेची स्थापना केली, व उदयोन्मुख कलावंत, नवीन शिष्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू केले. सर्व शिष्यांना संधी मिळावी, यासाठी काही राग एकत्र करून त्यांनी "वेणू वाद्यवृंदां'ची रचना केली. त्यातून "मल्हार-सागर', ऋतुरंगमध्ये सहा ऋतूंचे बारा राग, "कल्याण-नवरंग' (कल्याणचे नऊ प्रकार), "वेणू-नाट्यरंग', "वेणू-अभंगरंग', "वेणू-सारंग', "वेणू- लंकादहन- सारंग'असे वेगवेगळे राग निर्माण केले. चुलत बंधूपासून प्रेरणा घेऊन १९७० साली घोष घराण्यानुसार खर्ज "सा' वाजणारी बासरी तयार केली.

    पंडित केशव गिंडे यावर म्हणतात अर्थात ते मी माझ्या समाधानासाठी केले. मी बासरी टाळ्यांसाठी कधीच वाजवत नाही, ती आत्मिक समाधानाचे साधन आहे. बासरी या वाद्याच्या प्रचार आणि प्रसाराबरोबरच वादनासाठी बासरीमध्ये वेगवेगळे संशोधनात्मक प्रयोग पं. केशव गिंडे यांनी केले आहेत. १९८४ साली त्यांनी ११ छिद्रांची "केशव वेणू' बनविली. बांबू आणि पीव्हीसी पाइपच्या जोडातून बासरी तयार करण्याचे त्यांचे संशोधन सुरू आहे.

    वेगवेगळ्या रागांप्रमाणेच "अतिखर्ज', "अनाहत वेणू', "चैतन्य वेणू' अशा बासऱ्यांची निर्मिती केली. त्यांनी निर्मिलेल्या ‘केशव वेणू’ची लिम्का आणि गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. बासरी या वाद्याची शास्त्रीय माहिती देणारा पंडित केशव गिंडे यांनी ‘वेणू विज्ञान’ हा ग्रंथ लिहिला आहे. ‘वेणू विज्ञान’ हा पहिलाच ग्रंथ असून त्यामुळे बासरीवादकांची आणि रसिकांचीही मोठी सोय झाली.

    आपल्या आयुष्यात आठवणीत राहील असा प्रसंग सांगताना पंडित केशव गिंडे म्हणतात.

    दिल्ली येथे १९९१ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात मला बासरी वाजवायची होती. माझ्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम होता. समोर प्रेक्षकांत पं. रघुनाथ प्रसन्न (पं. हरिप्रसाद चौरसियांच्या गुरुंचे गुरू) बसले होते. मला खूप दडपण आले होते. या कार्यक्रमात खर्ज, ऋषभ ते अतितार मध्यम अशी ताण घेतली. माझे वादन झाल्यावर मी बाहेर पडलो. समोर पं. भीमसेनजी होते. त्यांना अभिवादन करून जात असताना पं. रघुनाथजींची हाक आली. ते माझी वाट पाहत होते. त्यांनी मी घेतलेल्या तानेबद्दल विशेष कौतुक केले आणि माझ्याकडून पुन्हा मेघमल्हार वाजवून घेतला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा

    अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

  • ज्येष्ठ कवी, व गीतकार सुधीर मोघे

    काच वाटेवर न रमणारे अन्‌ नवनव्या वाटा सतत शोधत राहणारे मनस्वी कलाकार अशी त्यांची ओळख होती.

  • बॉलीवुडचा आयर्न मॅन, अभिनेता मिलिंद सोमण

    मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकिर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.

    'टफ' या ब्रँडच्या पादत्राणासाठी मॉडेल मधू सप्रेसोबत त्याने केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.

    'प्यार का सुपरहिट फॉर्म्युला' या चित्रपटाची मिलींद सोमण यांनी केली आहे.गेल्या वर्षी जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या मिलिंद सोमणने बाजी मारली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकीपिडीया.

  • मराठी लेखिका आणि कवयित्री लक्ष्मीबाई टिळक

    मराठी लेखिका आणि कवयित्री. कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांच्या पत्नी व ‘स्मृतिचित्रकार’ लक्ष्मीबाई टिळक यांचा जन्म १ जून १८६६ रोजी झाला.

    लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतिचित्रे' या अभिजात, अजरामर आणि श्रेष्ठ आत्मचरित्रातील एक अतिशय वेगळ्या प्रकारचे, विरोधाभासाने गुंफलेले लक्ष्मीबाईंचे आयुष्य त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातून समाजासमोर आले आणि ‘युद्धस्थ कथा रम्या’ पद्धतीने लिहिलेले त्यांच्या स्मृतिचित्रातील एक एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिऱ्या रंगाने रंगलेले साऱ्यास महाराष्ट्राच्या मनावर विराजमान झाले. पूर्वाश्रमीचे त्यांचे नाव मनकर्णिका नारायण गोखले असे होते. वयाच्या ६ व्या वर्षी १८७९ मध्ये त्यांचे लग्न नारायण वामन टिळक यांच्याशी झाले, आणि मनकर्णिका गोखले झाली लक्ष्मी टिळक. १८९५ मध्ये टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. प्रथम ह्या घटनेने लक्ष्मीबाईंना धक्का बसला, तरी त्यानंतर ५ वर्षांनी त्यांनीही पतीप्रमाणेच, ख्रिस्ती धर्मावर खरीखुरी श्रद्धा बसल्यानंतर, डोळसपणे तो धर्म स्वीकारला.

    लक्ष्मीबाईंचे शिक्षण केवळ लिहिण्यावाचण्यापुरतेच झालेले होते. तथापि जीवनातील दुःखांना आणि ताणतणावांना तोंड देत असताना त्यांच्यातील सुप्त कवित्वशक्ती प्रथम उत्स्फूर्तपणे प्रकट झाली. त्यांची पहिली कविता टिळक धर्मांतर करणार, असे समजल्यानंतरच्या वेदनेतून लिहिली गेली आहे. पुढे काव्यरचनेसाठी टिळकांचे उत्तेजनही त्यांना मिळत गेले. रेव्हरंड टिळकांनी ओवीवृत्तात लिहावयास घेतलेले ख्रिस्तायन हे प्रदीर्घ काव्य पूर्ण करण्याचे काम लक्ष्मीबाईंनी रेव्हरंड टिळकांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी हाती घेऊन तडीस नेले. एकूण ७६ अध्यायांच्या ह्या काव्यातील पहिले सु. १०।।• अध्याय रेव्हरंड टिळकांचे असून सु. ६४।। अध्याय लक्ष्मीबाईंचे आहेत. त्यामुळे ह्या काव्याचे बहुतांश कर्तृत्व लक्ष्मीबाईंकडेच जाते. एवढी दीर्घ आख्यानक रचना करणाऱ्या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत.

    त्यांची स्फुट काव्यरचना भावगीतात्मक असून भरली घागर (१९५१) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. संसारातील सुखदुःखांचा, उत्कट ईश्वरनिष्ठेचा सहजाविष्कार तीत आढळून येतो. बालगीते, देशभक्तिपर गीते अशीही काही रचना त्यांनी केलेली असून तीही ह्या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहे. तथापि ज्या ग्रंथामुळे लक्ष्मीबाईंचे नाव मराठी साहित्यसृष्टीत अजरामर झाले, तो त्यांचा ग्रंथ म्हणजे स्मृतिचित्रे. हा चार भागांत असून त्याचा पहिला भाग १९३४ साली, दुसरा १९३५ साली आणि तिसरा व चौथा १९३६ साली प्रसिद्ध झाले.

    लक्ष्मीबाईंचे पुत्र देवदत्त ह्यांनी लिहावयास घेतलेल्या रेव्हरंड टिळकांच्या चरित्रासाठी केवळ सामग्री पुरविण्याच्या हेतूने लक्ष्मीबाईंनी आपल्या आठवणी लिहून काढावयास प्रारंभ केला. पुढे श्रीपाद कृष्णांना त्यांचे जमात आणि देवदत्तांचे स्नेही भा. ल. पाटणकर ह्यांच्याकडून लक्ष्मीबाईंच्या ह्या लेखनाची वार्ता समजली. पाटणकारांकडून ह्या आठवणी वाचून घेतल्यानंतर त्या प्रकाशात आल्याच पाहिजेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली. श्रीपाद कृष्णांचे पुत्र प्रभाकर कोल्हटकर ह्यांच्या संजीवनी ह्या पाक्षिकातून स्मृतिचित्रे प्रथम प्रसिद्ध झाली.

    लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांची निर्मिती आत्मप्रेमातून झालेली नाही. जाणीवपूर्वक एखादी साहित्यकृती निर्माण करण्याची इच्छाही ह्या लेखनामागे नव्हती. तथापि लक्ष्मीबाईंच्या जीवनातील नानाविध अनुभवांचे कडूगोड सौंदर्य त्यातून सहजगत्या व्यक्त झाले. स्मृतिचित्रांची अकृत्रिम भाषाशैली, त्यांतून प्रत्ययास येणारी वृत्तीची निरागसता, मानवतेवरील नितांत प्रेम आणि श्रद्धा, स्वतःलाच हसणारी आणि स्वतःबरोबरच सभोवतालच्यांना सदैव प्रसन्न ठेवणारी लोकविलक्षण, मिस्किल विनोदबुद्धी ह्या सर्वच गोष्टींची मोहकता कधीही न कोमेजणारी अशी आहे. व्यक्ती, प्रसंग एवढेच नव्हे तर एक संपूर्ण कालखंड जिवंतपणे वाचकांसमोर उभा करण्याचे सामर्थ्य स्मृतिचित्रांच्या पानापानांत आहे.

    शालेय शिक्षणाचा संस्कार न झालेल्या लक्ष्मीबाई यांनी एका अत्यंत सुसंस्कृत मनाने आपल्या विवाहपूर्व व विवाहोत्तर आठवणी लिहावयास घेतल्या खऱ्या्; परंतु प्रत्यक्षात त्या आठवणींचे स्वरूप असे झाले आहे, की त्यांची व्याप्ती ह्या सीमित जीवनापुरती मर्यादित न राहता त्यांतून अगदी स्वाभाविकपणे प्रकट होत गेले आहे, ते विविधरंगी, विविधढंगी मानवतेचे चित्र. आत्मचरित्रात्मक लेखन आपली मूळ प्रकृती न सोडता श्रेष्ठ कालकृतीच्या पातळीवर कसे पोहोचू शकते, ह्याचे मराठीतील एकमेव उदाहरण म्हणजे लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे.

    १९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याच वर्षी नाशिकच्या कविसंमेलनाचे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले. १९३५ मध्ये आचार्य अत्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली नासिक शहरात त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. त्यांचे पुत्र देवदत्त टिळक ह्यांनी मराठीत दर्जेदार बालसाहित्यनिर्मिती केली आहे.

    लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर ख्रिस्तायनाचा अखेरचा – ७६ वा–अध्याय त्यांनी लिहिला तसेच स्मृतिचित्रांच्या चौथ्या भागातील १२ ते २० ही नऊ प्रकरणे लिहून लक्ष्मीबाईंच्या निधनापर्यंतचा वृत्तांत दिला, टिळक दांपत्याच्या पुस्तकांचे साक्षेपी संपादनही केले. ज्ञानोदयाचेही ते अनेक वर्षे संपादक होते.

    लक्ष्मीबाई टिळक यांचे २४ फेब्रुवारी १९३६ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर

    त्यानंतर त्यांनी कारदार फिल्म्स मध्ये एक चित्रपट साईन केला . त्या चित्रपटाचे नांव होते ‘ जीवन ज्योती ‘ आणि माझी सहकलाकार होती चांद उस्मानी . त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते महेश कौल . त्यानंतर फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ तुमसा नही देखा ‘ मध्ये काम केले. हा चित्रपट १९५७ साली आला. त्याच्याबरोबर त्या चित्रपटात नायिका होती अमिता. १९५९ साली आलेल्या ‘ दिल देके देखो ‘ या चित्रपटात त्यांची नायिका होती आशा पारेख. ह्या चित्रपटापासून त्यांची स्टायलिश प्ले-बॉय आणि प्रेमी हृदयाचा म्ह्णून इमेज निर्माण झाली.

  • उस्ताद अमीर खॉं

    अमीर खॉं यांचा महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी अकोला येथे झाला. आपल्या साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“.

    अमीर अली यांचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे वडील लहानग्या अमीरला घेऊन अकोल्याहून इंदोरला गेले. इंदोरला त्याकाळी कलाकारांना राजाश्रय होता आणि शहा अमीर हे चांगले बीन व सारंगी वाजवायचे. अमीर अली नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली आणि शामीरखाँना त्यांच्या दोन्ही मुलांची आई ही व्हायला लागले. अर्थात तीही जबाबदारी त्यांनी चांगली पेलली. त्या काळच्या कलाकारांच्या घरी जसे वातावरण असायचे तसे यांच्याही घरी होते.

    शामीरखाँ यांनी अमीर अली आणि त्यांचा भाऊ बशीर या दोघांनाही संगीताचे धडे द्यायला सुरवात केली होती. तसेच त्यांच्या बिरादरीतील इतर श्रेष्ठ कलाकारांकडेही ते त्यांना नियमितपणे गाणे ऐकायला घेऊन जात होते. असेच एकदा ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले असता एक प्रसंग घडला. लहानग्या अमीरला आणि बशीरला घेऊन ते त्या घरापाशी आले तेव्हा घरातून संगीताचे स्वर ऐकू येते होते. “आत्ता तालीम चालू असणार” ते मनाशी म्हणाले आणि त्यांनी त्या घरात प्रवेश केला. त्याच क्षणी तेथे एकदम शांतता पसरली आणि सगळ्या शिष्यांनी ताबडतोब आपापल्या वह्या मिटल्या. शामीरसाहेबांनी बळेबळेच एका वहीचे पान उघडले त्यात मेरूखंड गायकीची बरीच नोटेशन्स लिहिलेली त्यांना दिसली. तेवढ्यात एका नातेवाईकाने त्यांच्या हातातील ती वही हिसकावून घेतली.

    “हे सारंगियांसाठी नाही. मग वाचून काय उपयोग ?”

    हे ऐकून अपमानित होऊन शामीरखाँ त्या घराबाहेर पडले ते ठरवूनच की मी माझ्या एका मुलाला मेरूखंड गायकीत तयार करेन. हे बोलण्याइतके सोपे नव्हते कारण ही गायकी फार म्हणजे फार अवघड आहे. काय आहे ही गायकी आणि ती एवढी अवघड का आहे ?. लहानपणीच चीजा व गाणी गाऊन ते ऐकणा-यांना चकित करीत असत. कल्पक बुद्धिमत्तेचे कलावंत असल्याने उस्ताद अमीर खॉं यांनी डोळसपणे सखोल अभ्यास व रियाज़ करून स्वत:ची स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.

    उस्ताद अब्दुल वहिद खॉं यांच्या विलंबित लयीतील गायनाचा प्रभाव त्यांच्या गायनात होता, तसेच, इंदौर घराण्याचे रजाब अलि खॉं यांची तान गायकी आणि अमान अलि खॉं यांचे मेरुखंड पद्धतीचे रागविस्तार यांच्या प्रभावामुळे अमीर खॉं यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण गायकी विकसित केली होती. अमान अलि खॉं यांचे शिष्यत्व पत्करून ते चांगले तयारीचे गायक झाले. अभिजात शास्त्रीय संगीतातील ख्यालगायकीतच त्यांनी विशेष मेहनतीने सौंदर्यप्रधान अशी शैली अमीर खॉं यांनी विकसित केली. अधिकतर गंभीर प्रकृतीच्या रागगायनात ते स्वत: अंतर्मुख होऊन रसिकांनाही अंतर्मुख करीत असत.

    अमीर खॉं यांची गायकी म्हणजे स्वरप्रधान व आलापप्रधान. 'झूमरा' किंवा 'एकताला'च्या अतिविलंबित लयीतील ख्यालासाठी ठेका अगदी साधा असे. ख्यालाची बढ़त, मेरुखंड पद्धतीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, बोलआलाप, आलंकारिक सरगमयुक्त ताना आणि क्लिष्ट व अवघड ताना सहजतेने गाण्याची क्षमता यांनी त्यांच्या गायनाला सौंदर्यपूर्णता आणि सूक्ष्मता लाभली होती. क्वचित मुर्की व कणस्वराचा वापर करून ते गाण्यात सौंदर्य आणत असत. मंद्र व मध्य सप्तकांतील रागविस्तारात न्यास स्वरांनी गायनाला उठाव आणून ते रसिकांना मंत्रमुग्ध करीत. कधी कधी ते अंतरा घेतही नसत.

    त्यांच्या मते, ख्यालरचनेत शब्द महत्त्वाचे; तर स्वरांच्या रंगांना विशेष अर्थ त्यांनी दिला. त्यांनी स्वत:च्या अनेक रचना लोकप्रिय केल्या. अनेक रुबाईदार तराणे, ख्यालनुमा आणि बंदिशी अमीर खॉं यांनी रचल्या. "हृदयातून निर्माण झालेले, आणि आत्म्याला स्पर्श करणारे ते खरे संगीत" असे ते नेहमी म्हणत. अमीर खॉ यांनी चित्रपटांसाठीसुध्दा काही गाणी म्हटली. पहिला सिनेमा होता क्षुधित पाषाण. हा एक बंगाली सिनेमा होता. बैजू बावरामधील शेवटच्या जुगलबंदीसाठी तानसेनसाठी अमीर खॉं यांचा आवाज तर ठरला पण बैजूसाठी कोणाचा हे काही ठरेना. कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे

    ’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले. या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीर खॉ यांनीच म्हटले होते. अजून दोन चित्रपटातील गाणी अमीर खॉं यांनी गायली. एक म्हणजे झनक झनक पायल बाजे आणि दुसरा गुंज उठी शहनाई. ग़ालिबच्या माहितीपटासाठी त्यांनी ग़ज़लही गायली. अमीरखॉसाहेब हे एक कलकत्यातील बडे प्रस्थ होते. एक काळ असा होता की त्या शहरातील एकही मेहफिल त्यांच्याशिवाय व्हायची नाही. एवढेच काय त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, राष्ट्रपती पारितोषिक, स्वरविलास असे अनेक मानसन्मान मिळाले पण या अत्यंत साध्या माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. कोणीही कधीही त्यांच्याकडे जाऊ शकत असे. खऱ्या अर्थाने ते सुशिक्षित व सुफी संत होते. त्यांनी अमेरीकेत न्युयॉर्क विद्यापिठातही काही काळ संगीत शिकवले.

    सरोदवादक अमज़द अली खॉ यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे ती त्याच्याच शब्दात.
    ते साल होते १९७१. कलकत्यात तानसेन समारोह नावाचा एक संगीत समारोह भरायचा. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या समारोहात मला आमंत्रण होते. एक बुजुर्ग गायक श्री. शैलेनबाबू याचे आयोजन करायचे. हा समारोह संध्याकाळी चालू होऊन रात्रभर चालायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपायचा, परंपरेने बुजुर्ग कलाकराच्या गायनाने याचा समारोप व्हायचा. त्या दिवशी माझी फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मी त्या हॉलमधे पोहोचेपर्यंत उस्ताद अमीरखॉसाहेबांचे गाणे सुरू झाले होते.

    शैलेनबाबू या प्रकाराने अतिशय अस्वस्थ झाले होते. मी जेव्हा त्यांना सांगितले की मी खॉसाहेबांनंतर गाऊ शकणार नाही तेव्हा ते थोडेसे चिडलेच. बरोबर आहे. प्रेक्षकांनी तिकिटे अगोदरच काढलेली होती. त्यांनी माझी बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकारच दिल्यामुळे त्यांचे काही चालेना. हे सगळे चालले असतानाच खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले होते. शैलेनबाबूंनी त्यांना गाठले आणि त्यांना माझ्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे बघून मला जवळ जवळ आज्ञाच केली. म्हणाले “ माझ्यानंतर तू नाही वाजवणार तर कोण वाजवणार? जा. वाजव !”

    पहाटेचे पाच वाजले होते. मी तसाच स्टेजवर गेलो आणि सुरवात करणार तर काय पुढच्याच रांगेत खॉसाहेब बसले होते. मी नम्रपणे त्यांना म्हटले “ खॉसाहेब आपण गायल्यानंतर आता मला काय वाजवायचे हेच सुचत नाही आहे. कृपया आपण शांतपणे घरी जा आणि आराम करा.”

    त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.”

    पं. हृदयनाथ मंगेशकर, कंकणा बॅनर्जी, कमल बोस, अमरजीत कौर, ए. कानन, भीमसेन शर्मा हे सर्व उस्ताद अमीर खॉं यांचे शिष्य आहेत. अमीर खॉं यांना 'संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॉर्ड', 'पद्मभूषण', 'राष्ट्रपति अॅवॉर्ड', सूरसिंगार, 'स्वरविलास' पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. अमीरखाँसाहेबांचे आपल्या वडिलांवर इतके आदरयुक्त प्रेम होते की त्यांनी पुढील आयुष्यात मुंबईला एक इमारत बांधली आणि त्याला नाव दिले होते “शामीर मंझील”. उस्ताद अमीर खॉं यांचे १३ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
    https://www.youtube.com/watch?v=8sKNPYSPjPg
    https://www.youtube.com/watch?v=DW_-CsgcK_s
    https://www.youtube.com/watch?v=wtX2AbX2s_4

  • प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

    आज ७ नोव्हेंबर... प्रतिभावान संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांची पुण्यतिथी. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाले.

    त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

    ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांचे मित्र मात्र समाजाच्या सर्व थरांतले होते. नाव जितेंद्र पण मंगेशीतले सर्वजण त्यांना ‘गंपू’ म्हणून हाक मारायचे. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते.संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. सुस्पष्ट उच्चार,लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे.विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवित झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील सुरूवातीची नांदी ही पंडितजींची शब्दरचना व चाल होय. एकाच गाण्यात अनेक राग व ताल हा एक वेगळा प्रयोग त्यांनी ‘कटयार’ मधील ‘सुरत पियाकी’ या रागमालेत केलेला दिसतो. ‘घेई छंद मकरंद’ या पदासाठी दोन घराण्यातील गायन शैली तर दिग्दर्शन ही एक ईश्वरी देणगीच आहे हे ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या पदावरून प्रत्ययास येते. हे पद म्हणजे नाटयसंगीतातील पसायदान होय. ‘काटा रूते कुणाला’ ‘रती रंगी’ ‘कैवल्याच्या’ ‘हे सुरांनो’ ‘हे बंध रेशमाचे’ ‘साद देती हिमशिखरे’ इ.अनेक प्रासादिक रचना त्यांनी केल्या. पंडितजींनी ‘मत्स्यगंधा’ ते ‘महानंदा’ मराठी संगीत नाटकांचे ‘अभिषेकी युग’ त्यांनी तयार केले व गाजवले आणि मोठी क्रांती घडवून आणली. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्य प्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं. अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्यां च्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती.

    आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. पंडीतजी कोकणी नाटकात कामे केली होती. पं. अभिषेकी बोरकर संपादित ‘पोरजेचो आवज’ या नियतकालिकात लेखन करीत असत. ‘वैशाख वणवा’ या चित्रपटासाठी चित्रपटाचे लेखन पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या सांगण्यावरून केले होते. पंडीतजीनी ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ हे कोकणी नाखवा गीत गायले होते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेले हे त्यांचे एकमेव चित्रपट गीत.

    नाटयसंगीत भक्तीगीत अभंग भावगीत हिन्दी भजन यांना लावलेल्या चालींची संख्या १०० ते १५०च्या दरम्यान जाते. जवळजवळ १७ नाटकांचे दिग्दर्शन केले.

    पं. अभिषेकी १९७० साली पं.रविशंकर यांचे बरोबर प्रथम अमेरिकेस गेले. तेथे विद्यादानाचे काम केले. त्यामध्ये संगीत देवनागरी लीपी भारतीय भाषा हेही शिकवीले. दोन वर्षांनी स्वतंत्रपणे अमेरिकेत कार्यक्रम केले. भारतात व परदेशात पंडितजींनी अनेक संगीत मैफिली गाजविल्या. पंडीतजी गवैये तसे खवैयेही होते. एखादी गोष्ट आवडली की ते त्याचा मनमुराद आनंद लुटत. एकदा तर त्यांनी ४० ते ५० पाणीपुर्‍या खाल्या होत्या असे सांगतात, त्यांच्यात पहेलवानी मस्ती सुद्धा होती.

    १९९५ मध्ये पंडितजींनी नाटय संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. ‘गोवा कला अकादमी’च्या व ‘संगीत नाटक अकादमी’च्या जनरल कौन्सिलचे ते मेंबर होते.

    जितेंद्र अभिषेकी यांचे निधन ७ नोव्हेंबर १९९८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जनसंघाचे प्रथम महामंत्री दीनदयाळ उपाध्याय

    पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.