व्यक्ती-परिचय

ऋषितुल्य भाई गायतोंडे

Category:

 

भाई गायतोंडे हे नाव संगीत क्षेत्रात संगीत ऋषी म्हणून जगप्रसिद्ध असलेलं. याच ऋषितुल्य भाईंची तुला त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या एका वाढदिवसानिमित्त केली होती. भाईंच्या वजनाचे तबले यावेळी भाईंना भेट म्हणून मिळाले होते. हे तबले भाईंच्या घरी एका काचेच्या कपाटात दिमाखात सजले होते. याच तबल्याच्या पार्श्वभूमीवर मी भाईंचा आणखी एक फोटो टिपला. भाईंची सांगीतिक श्रीमंती या फोटोकडे नजर टाकल्याच क्षणी दिसते. मी टिपलेला हा फोटो भाईंनादेखील खूप भावला आणि म्हणून माझ्यासाठी तो विशेष ठरला. पुढे हाच फोटो स्वरदायिनी ट्रस्टच्या दिनदर्शिकेसाठी वापरला गेला होता.

  March 30, 2019


व्यक्ती-परिचय

ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे

Category:

 

वर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो.

  March 25, 2019


व्यक्ती-परिचय

लक्षवेधी – स्वप्नाली पाटील

Category:

 

साधारणपणे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ – २००८ साली ठाण्यातल्या घंटाळी मंदिरात मी आणि स्वप्नाली पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलो. निमित्त होतं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या एका शूटचं. या मंदिराच्या आवारात असलेल्या डौलदार झाडांच्या बॅकग्राऊंडला आम्ही शूट करत होतो. मराठमोळी संस्कृती उठून दिसावी असाच पेहराव स्वप्नालीचा होता. लाल रंगाची नक्षीदार साडी, नाकात नथ, लाल रंगाची मोठाली टिकली, अंबाडा त्यावर हळुवारपणे सजलेला मोगऱयाचा गजरा आणि या सगळ्यात तिचा खुललेला चेहरा. हे सारं काही कॅमेऱयात बंदिस्त करण्याची माझी धडपड सुरू होती. अत्यंत प्रसन्न वातावरणात आमचं शूट तासाभरात पार पडलं.

  March 23, 2019


व्यक्ती-परिचय

मेहनती… डॅशिंग – संतोष जुवेकर

Category:

 

मराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल.

  February 28, 2019