(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे

    मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी भा. रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ रोजी मध्य प्रदेशातील मुगावली येथे झाला.

    भा.रा.तांबे हे मराठीतील श्रेष्ठ दर्जाचे गीतकार व भावकवी म्हणून प्रसिद्ध होते. केशवसुत यांच्यानंतरचे मराठीतील महत्वाचे कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. भा.रा.तांबे यांचे संपूर्ण नाव भास्कर रामचंद्र तांबे असे होते. ते ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी होते. म्हणून राजकवी तांबे या नावानेही ते ओळखले जातात. भा.रा. तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येतो. त्यांनी आपल्या कवितांमधून जीवनाचे निर्दोष व आनंदी असे वर्णन केले आहे. म्हणून त्याच्या कवितेस संतुष्ट कविता असे यथार्थतेने संबोधता येईल.
    बालगीत व नाटयगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.

    त्यांच्या ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ‘मधु मागशी माझ्या सख्या परी’ ‘कळा ज्या लागल्या जीवा’ ‘रुद्रास आवाहन’ ‘रुणझुणू ये’ यांसारख्या कविता स्मरणात राहतील अशाच आहेत. भा.रा.तांबे यांचे निधन ७ डिसेंबर १९४१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 28, 2019


  • संगीत हाच ध्यास बाळगणारे शब्दसुरांचे जादूगार सुधीर फडके

    संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीतरामायण १९५५ साली रेडियोवर सुरू झाले.

    बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते. दरम्यान, त्यांनी सुमारे ५६ गाणी असलेल्या गीतरामायणाचे १,८०० प्रयोग देश व विदेशात केले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते.

    गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात.

    कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता.

    बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे.

    पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

    सुमारे ५० वर्षे संगीतसृष्टी गाजवणारे बाबूजी माणूस म्हणून श्रेष्ठच होते ते त्यांच्या अभिजात संगीतप्रेमामुळेच! सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 29, 2017


  • भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य

    चिंतामण विनायक वैद्य हे इतिहासाचे व्यासंगी व साक्षेपी संशोधक म्हणून ओळखले जात. ते ज्ञानमार्गी प्रज्ञावंत, ललित लेखकही होते. त्यांनी केलेले महाभारताचे भाषांतर हे त्यांचे प्रचंड वाङ्मयीन कर्तृत्व म्हणून ओळखले जाते. म्हणूनच त्यांना भारताचार्य अशी पदवी मिळाली. लोकमान्य टिळक यांनी त्यांना भारताचार्य या मानाच्या पदवीने गौरवले. वैद्य हे ‘दुर्दैवी रंगू’ ह्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबरीमुळे गाजले.

      April 20, 2022


  • सिंहासन’कार अरुण साधू

    अरुण साधू यांनी पत्रकारिता केलीच परंतु त्यांनी स्तंभलेखक ते कथाकार , कादंबरीकार , विज्ञानलेखक , इतिहास लेखक म्हणून भरपूर लेखन केले. १९९५ पासून २००१ पर्यंत ते पुणे विद्यापीठमध्ये वृत्तपत्रविद्या आणि संपादन विभाग येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.

      June 17, 2020


  • दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

    शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेऱ्या्समोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणाऱ्या अनंत माने यांनी केलं.

      December 30, 2021


  • पॉप क्वीन उषा उत्थुप

    मुळात पॉप, जॅझ या पाश्चात्य गाण्याला, त्यातही नाईटक्लबमध्ये गाणी म्हणण्याला त्या काळी अजीबातच प्रतिष्ठा नव्हती. उषाजींच्या ‘सादगी’ मुळे या क्षेत्राला भारतात मानाचं स्थान मिळवता आलं. साडी, गजरा, दागीने ही त्यांची वेषभुषा त्यांचं भारतीयत्त्व जपत गेली, आणि पाश्चात्य संगीत सादर करणारी ही तरूणी देखील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करणा-या कोणत्याही घराण्याच्या गायिकेपेक्षा वेगळी नाही, हे लोकांना लक्षात येऊ लागलं.

      April 1, 2019


  • ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे

    पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३० रोजी पंढरपूर येथे झाला. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. पंढरीनाथ कोल्हापुरे मा.कुमार गंधर्वांना गुरुस्थानी मानत. कुमार गंधर्वांचे शिष्यत्व स्वीकारण्यासाठी, पंढरीनाथांनी 'गुजराथी सनरिच सिनेमा कंपनी'तील १९४७च्या काळातील दोनशे रुपयांची नोकरी सोडली होती. इतकेच काय, प्रसंगी मो. ग. रांगणेकरांच्या 'नाटय़निकेतन'चे बोलावणेही पंढरीनाथांनी विनम्रपणे नाकारले आणि पंढरीनाथांनी आपले सर्व जीवन 'कुमार संगीता'ला वाहून घेण्याचे ठाम ठरविले. पंडित कुमार गंधर्वांनी देवासला वास्तव्य केल्यानंतरही, पंढरीनाथ कोल्हापुरे हे त्यांचे एकलव्य शिष्य राहिले. मा.पंढरीनाथ कोल्हापुरे ह्यांनी त्यांची "मैफलीगवई" असल्याची क्षमता सिद्ध केली. नंतर त्यांनी संगीताचे अध्यापन करण्याचे ठरवल्याने, ते याच क्षेत्रात "गुरू" होऊन राहिले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला. शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती. पंढरीनाथ कोल्हापुरे हे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा. गायनातली कारकीर्द चालू असतानाच मुलगी पद्मिनीला बॉलीवुडमधून मोठ्या ऑफर्स आल्याने पंढरीनाथांनी मग बराच काळ मुलींच्या करिअरकडे लक्ष दिले. त्या स्थिरस्थावर झाल्यावर पंढरीनाथांनी लेखन, गायन, रुदवीणावादन आणि अध्यापन अशा चारही अंगांनी पुन्हा जोमाने संगीतसेवा सुरू केली.

    पं. पंढरीनाथ यांनी तीन पुस्तकेही लिहिली असून पं.कुमार गंधर्व यांना समर्पित ‘गानयोगी शिव पुत्रा’, पत्नी निरुपमा कोल्हापुरे यांना समर्पित ‘शब्द सुरांचे बोल रुद्र वीणाचे’ आणि तिसरे पुस्तक १८ व्या शतकातील ख्याल गायकीचे निर्माते नियामत खान यांच्यावर आधारित ‘नियामत खान - सदारंग’ यामध्ये नियामत यांच्या बंदिशींचा समावेश आहे. पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी १०० वर्षा पेक्षा जुनी आपल्या वडिलाची आठवण म्हणून वीणा जपून ठेवली होती. पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती. दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार पंढरीनाथ कोल्हापुरे ह्यांना मिळाला होता, मुंबई महानगर पालिकेने अंधेरीतील के-पश्चिम विभागात गुलमोहर क्रॉस रोड नं. १२ या मार्गास पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे नाव दिले आहे. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे १५ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    पंढरीनाथ कोल्हापुरे यांची वेबसाईट. www.pandharinathkolhapure.com/

      February 20, 2017


  • गीतकार शांताराम नांदगावकर

    "हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला.सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर.

    मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. 'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.

    शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत-संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळे अनेकदा ‘बिनडोक’ सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिण्याचं ‘व्यावसायिक काम’ त्यांना करावं लागलं; तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून दिला. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला, तेव्हा चित्रपटसृष्टीत ग.दि.मा., सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणे ऐन भरात होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत सर्व काही बदलले. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीतांच्या प्रांतात मुशाफिरी केली. ‘रामप्रहरी राम गाथा’सारखे त्यांचे गाणे पूर्वसूरींशी आणि मराठी भक्तीगीतांच्या सुरेल परंपरेशी नाते सांगणारे होते. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती.

    अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिले जात होते. हा पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारला तसा मराठीतील गीत, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्यांचाच बाज बदलला. १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाहेर जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ, ‘सजल नयन नितधार बरसती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ तशी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली.

    एक आठवण नांदगावकरांची.
    १९९५-९६ च्या सुमारास ‘तू सुखकर्ता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सूनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात बहुधा तिने एक गाणे गायले होते. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारले, ‘तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो. असं का?’ नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, ‘कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ गमती गमतीत ते एक मोठे सत्य सांगून गेले होते.

    ‘अष्टविनायक’नंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण सोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली, परंतु ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ नंतर सचिन- महेश- अशोक- लक्ष्या यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटांत त्यांना बरी गाणी देता आली. ‘गंमत जंमत’साठी किशोरकुमार यांना मराठी गाणे द्यायचे ठरले, तेव्हा मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो, असे कारण सांगून ते गाण्यासाठी राजी होईनात. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. मात्र बऱ्याचदा ‘दोन रुपये दे मला, खर्चाला पानसुपारीला.’ असे शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी शांताराम नांदगावकर यांना स्वीकारावी लागली. १९९६ नंतर ते हळूहळू यापासून दूर गेले. अनेकदा प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत- संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वत:ला कधी अशा चौकटींमध्ये बंदिस्त केले नाही. त्यामुळे एका बाजूला ‘दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली’ अशी गाणी लिहिताना दुसरीकडे सुनील गावस्करच्या खासगी अल्बमसाठी शब्द पुरवत तितक्याच उत्साहाने ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला’ असे खेळाचे तत्त्वज्ञान सांगून गेले.

    क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. मा.शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते. शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपीडीया

    शांताराम नांदगावकर यांची काही गाणी
    पहिले ना मी तुला
    रजनीगंधा
    रुपेळी वाळूत
    हरी नाम मुखी रंगते
    श्रीरंग सावळा तु

      November 1, 2017


  • पंचम उर्फ आर.डी.बर्मन म्हणजेच राहुलदेव बर्मन

    पंचम ऊर्फ आर. डी. बर्मन यांचे संगीत म्हणजे... एकीकडे तरल.. भावूक... संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू... चैतन्याचा झंझावात... उल्हास... जोश आणि जल्लोष...! नवसंगीताचा प्रवाह पन्नास वर्षापूर्वी सुरु करणार्याव आर.डी.बर्मन यानं खर्यात अर्थानं अभिजात नवसंगीत निर्माण केलं. त्यांचा जन्म २२ जून १९३९ रोजी झाला. वडील सचिनदेव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून त्यानं आपली कारकीर्द सुरु केली. वडिलांच्या अखेरच्या वर्षापर्यंत तेच सहाय्यक होते. १९६१ मध्ये आर.डी.बर्मन यांचे खास दोस्त मेहमुद यानी निर्माण केलेल्या छोटे नवाब या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम स्वतंत्रपणे संगीत दिले. त्यानी संगीत दिलेला पहिला हिट चित्रपट तिसरी मंजिल हा होता. हरे राम हरे कृष्ण या गीतात त्यानी मादल नावाचे वाद्य वापरले. शोले मध्ये गाजलेलं मेहबूबा मेहबूबा हे गाणं त्यानं अरबी धर्तीची स्वररचना करून रसिकांना खूष केले. मा.राहुलदेव आणि मा.किशोर कुमार यानी ही उडत्या चालीतील गीतची शैली गाजवली. सत्तरीच्या दशकात या गायनशैलीनं उधम मचवला. मा.आर. डी. बर्मन हे त्या काळात आपली वेगळी शेली तयार करणारा एक आगळा संगीतकार होते. त्यांनी जगभरातील संगीताचा अभ्यास केला. जे संगीतीक आवाज नाहीत त्यांना देखील त्यानी संगीतात स्थान देऊन अत्यंत आगळ्या रचना तयार केल्या. एवढेच नव्हे तर मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ही गुलजार यांची गद्यप्राय रचना त्यानं संगीतबद्ध करून आशा भोसले यांच्या कडून अशी काही हळव्या सुरांची कलाबूत लावून गाऊन घेतली की त्या गीताला फिल्मफेअर पारितोषिक लाभले. अमर प्रेममधील रैना बीत जाये या गाण्याची ठुमरीच्या अंगानं जाणारी रचना, छोटे नबाबमधील घर आ जा घिर आये बदरवाँ, पडोसनमधील शर्म आती है मगर आज ये कहना होगा, परिचय मधील बिती ना बिताई रैना, किनारा मधील नाम गुम जायेगा, अशी अनेक साधी, गुणगुणण्यासारखी मधुर गीते मा.आर. डी. बर्मन यांनी दिली आहेत. पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. बेस गिटार हे असंच त्यांनी भारतात आणलेले वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, "गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन). नेपाळी "मादल‘ हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे "ज्वेलथीफ‘मधल्या "होटों पे ऐसी बात‘ या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचमचं.....बहारों के सपने, प्यार का मौसम, कटी पतंग, अमर प्रेम, हरे राम हरे कृष्ण, शोले, आंधी, यादों की बारात, बुढ्ढा मिल गया, अशा तब्बल ३०० हून अधिक सिनेमांना पंचमदांनी संगीताचा साज चढवला. राहुलदेव बर्मन यांनी १९४२ -ए लव्ह स्टोरी हा चित्रपट संगीत दिलेला शेवटचा आर. डी. बर्मन यांचे४ जानेवारी १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 4, 2017


  • क्रिकेटपटू सुभाष गुप्ते

    सुभाष गुप्ते हे लेगस्पिनचे बादशहा. ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे.

      December 11, 2021