स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते.
पंडित जसराज यांचा यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. मा.पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. येथील गौलीगुडा चमन आणि नामपल्ली असे मोहल्ले आहेत ज्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. त्यांना शाळेच्या रस्त्यावरच्या त्या हॉटेलची आठवण आहे जेथे थांबून ते बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.
पंडित जसराज म्हणतात की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. पंडित जसराज मानतात की, संघर्षांतून यश मिळते, मात्र त्याच बरोबर ते मानतात की, त्याकडे ‘मी’ च्या नजरेतून पहाता कामा नये. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. पंडीतजी मानतात की या दीर्घ जीवनात जर काही प्रेरणा घेतली जाऊ शकते तर ती हीच की सातत्याने काम करत राहिले पाहिजे. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा.
पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडतं ते, जय हो. मा.पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील आहेत. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल कि मा.जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या.
भारतीय सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन मा.जसराज यांना गौरवले आहे. पं. संजीव अभ्यंकर हे पं. जसराज यांचे शिष्य.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
विको' ब्रँडचे सर्वेसर्वा संजीव पेंढारकर यांचा जन्म ५ जानेवारी १९६५ रोजी झाला.
संजीव पेंढारकरांचे आजोबा केशव पेंढारकर यांचे नागपुरात किराणा दुकान होते. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी आपले दुकान बंद करून मुंबईत येऊन “कॉस्माटिक” ब्रँडला “केमिकलमुक्त” पर्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. असा बिझनेस करण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना केशव विष्णू पेंढारकर यांनी मुंबईत येऊन १९५२ साली 'विको (विष्णू इंडस्ट्रीज केमिकल कंपनी) ग्रुप' ची स्थापना केली. संजीव पेंढारकर यांचे वडील गजानन पेंढारकर यांनी त्या बिझनेसला योग्य दिशा दिली आणि संजीव पेंढारकर यांनी त्या 'विको ग्रुप'ला मोठी उंची गाठून देण्याचे काम करीत आहेत.
'विको ग्रुप'ने रोज वापरातील अनेक प्रोडक्ट्स निर्माण केली आहेत. त्यात वज्रदंती पावडर, वज्रदंती पेस्ट, वज्रदंती (शुगर फ्री), टर्मरिक स्किन क्रिम, टर्मरिक WSO, टर्मरिक स्किन शेव्हीग क्रिम, नारायणी क्रिम यांसारखी अनेक उत्पादने विको लॅब्सने तयार केली आहेत. विको कंपनीचे ‘विको नारायणी क्रीम’ आणि ‘विको हर्बल फेश वॉश’ ही नवीन उत्पादने भारतातच नव्हे तर जगात स्वीकारली गेली आहेत. विकोची सर्व उत्पादने त्या देशातील आरोग्य विभागाच्या आवश्यकतेनुसार विधिवत नोंदणीकृत आहेत.
कंपनीचा टर्नओव्हर ४०० कोटींहून अधिक असून डोंबिवली, नागपूर व गोवा येथे प्रोडक्शन युनिट आहेत. एवढेच नाही अमेरिका, युके, ओमान, कुवैत, बहारिन, सौदी अरेबिया, उत्तर अमेरिका, मॉरिशस, फिजी, सायप्रस, वेस्ट इंडीज आणि आइसलँड या देशांमध्ये विकोचे प्रोडक्ट्स एक्स्पोर्ट होतात. एवढेच नाहीतर 'विको ग्रुप' ने त्याहून मोठी मजल मारत व्यापार, जाहीरात आणि शिक्षण क्षेत्रात मोठे काम करीत आहे. स्पर्धेच्या या युगातही आपला ब्रँन्ड अग्रणिय ठेवाणारे यशस्वी मराठी उद्योजक म्हणूनच ते पाय रोवून आहेत.
२०१७ मध्ये द नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ऑफ इंडिया पुरस्कृत ‘नॅशनल ग्लोरी ऑफ इंडिया’ या पुरस्काराने संजीव पेंढारकर यांना गौरवले आहे.
संजीव पेंढारकर यांनी 'हाऊ टू मेक अ ब्रॅन्ड पॉप्युलर' हे पुस्तक लिहिले आहे. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
कोरोनाचा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून आलंय. या काळात नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागलेत, अनेक संकटांचा सामना करावा लागला. या नवउद्योजकांना आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी आपण हे पुस्तक लिहल्याचं संजीव पेंढारकर यांनी सांगितलं. तसेच या वर्षी लॉकडाऊन काळात अक्षरश: लाखो लोकांचे रोजगार बुडाले आहेत. हे रोजगार पुन्हा सुरू व्हावेत, उद्योगव्यवसायाला उभारी मिळावी, बेरोजगारी कमी व्हावी म्हणूनच संजीव पेंढरकर यांनी एकाचवेळी ऑनलाइन रेकॉर्डेड कोर्सेस सुरू केले होते.
संजीव पेंढारकर यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते.
शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे वडील सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. त्यांना यंत्रकलेची अफाट आवड होती. किर्लोस्कर कंपनीने या वेळी कडबा कापण्याचे यंत्र बनविले होते. त्याची जाहिरात बनविण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण. एक बैल या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो हे सांगताना त्या जाहिरातीत दर्शविले होते. शंकररावांची ही पहिलीच जाहिरात. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना एक बॉक्स कॅमेरा मिळाला व येथून पुढे शंकररावांनी छायाचित्रणाचे धडेही गिरविले. पुढे शंकररावांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला, नंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. तेथेही केवळ दिसते तसे चित्र न काढता, त्यामध्ये कल्पनाशक्तीची भर टाकणे आवश्यक आहे, हे त्यांच्या मनात रुजले व त्यासाठी शंकररावांनी संस्कृत, इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. वाचन वाढविले व आपल्यातील कलावंत परिपूर्ण केला. दर मंगळवारी ‘केसरी’मध्ये किर्लोस्कर नांगराची जाहिरात येत असे.
शंकररावांनी जाहिरातीची सूत्रे हातात घेतली. हळूहळू कंपनीचा बोलबाला वाढला. उत्पादने वाढली व किर्लोस्करला चिन्हाची गरज भासू लागली आणि आज सर्व परीचित झालेले विशिष्ट वळणाचे ‘किर्लोस्कर’ हे नाव हाताने लिहून ते रजिस्टर करण्यात आले. त्या वेळी विदेशातून किर्लोस्करकडे बरेच टपाल येत असे. एकदा त्यात फोर्ड कंपनीची ‘फोर्ड टाइम्स’ ही पुस्तिका आली. ती पाहताच शंकररावांच्या मनात आले, की आपल्या कारखान्याचे असे मासिक का असू नये? त्याचे नावही त्यांनी निश्चित केले. ‘किर्लोस्कर खबर!’ उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडमोडी. गावातील लोकांच्या कथा-कविता असे स्वरूप होते या मासिकाचे व ते छापायला एक जुना हॅण्डप्रेसही विकत घेतला आणि १९२० साली पहिला ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला. अन् मराठी साहित्य जगतात लहानशी खळबळ उठली.
१९२९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किर्लोस्कर कारखान्यास भेट दिली. त्यांच्या पाहण्यात ‘किर्लोस्कर खबर’ आले व त्यातील ‘खबर’ हा फारसी शब्द त्यांना खटकला, त्यानंतर केवळ ‘किर्लोस्कर’ हे वाङ्मय क्षेत्रात गाजलेले नाव मासिकाला राहिले. पुढे शंकररावांनी त्यामध्ये ललित व वैचारिक लेख समाविष्ट केले. १९३० मध्ये स्त्रियांनी सामाजिक बदलांना सामोरे जावे या हेतूने ‘स्त्री’ मासिकाची स्थापना झाली. तसेच तरुण युवकांना उत्तेजन देण्यासाठी १९३४ मध्ये ‘मनोहर’ हे मासिक सुरू करण्यात आले. हळूहळू ‘किर्लोस्कर’ मासिकाचा व छापखान्याचा विस्तार वाढला. ‘किर्लोस्कर’वाडीचे क्षेत्र त्याला अपुरे पडू लागले. तेव्हा ‘किर्लोस्कर’चे स्थलांतर पुणे येथे १९५९ च्या जून महिन्यात झाले. किर्लोस्कर नावाला केवळ उद्योग जगतापुरते मर्यादित न ठेवता त्याला जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय ‘किर्लोस्कर', 'स्त्री' व 'मनोहर' ही मासिके व त्यांचे संपादक शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांनाच द्यावे लागेल.
किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे १ जानेवारी १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कार्यकाळ : १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे ते लोकप्रिय नेते होते. ७ फेब्रुवारी १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. सन १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे शालेय शिक्षण घरीच खासगी शिकवणीद्वारे घेण्यात येत असे. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे शिक्षणानिमित्त गेले. केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान या विषयाची पदवी घेतली. १९१२ साली भारतात परतल्यानंतर त्यांनी सामान्य राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना स्वातंत्र्यसंग्रामाबाबत विशेष रुची होती. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आपसूकच खेचले गेले. सन १९१२ साली बंकीपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात त्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९१९ साली होमरुल चळवळीचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले. सन १९१६ साली त्यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीने प्रभावित झालेल्या जवाहरलाल नेहरु यांनी त्यानंतर १९२० साली उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. याच दरम्यान त्यांना असहकार आंदोलनामुळे दोन वर्षे कारावास भोगावा लागला. अल्मोरा कारागृहात त्यांनी आपले आत्मचरित्र पूर्ण केले. त्यांनी एकूण नऊ वेळा कारावास भोगला.
आज १३ ऑक्टोबर.. आज बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला.
बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते.
निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. १९५१ मध्ये त्यांचा 'हर हर महादेव' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी 'वीर भीमसेन' सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं. निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे.
निरुपा रॉय यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
काही माणसं उपजतच कलेचं लेणं घेऊन आलेली असतात. ती इतकी मोठी असतात पण तरीही प्रसिद्धिपराङमुख असतात. `राष्टपतीपदक’ विजेते.. चित्रकार प्राध्यापक गजानन शेपाळ हे अशांपैकीच एक. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र म्हणजे प्रा. शेपाळ यांचीच देणगी…. याच चित्रासाठी त्यांना राष्टपतीपदकाने गौरवण्यात आले.
हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले.
विजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली.
प्रवीण दवणे यांनी आपल्या बाल वयातच लेखनासाठी प्रारंभ केला. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९५९ रोजी झाला. प्रवीण दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे गेली तीस वर्षे अध्यापन करत आहेत. प्रवीण दवणे यांनी विविध माध्यमांतून वाड्मयच्या विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांच्या प्रकाशित ग्रंथसंपदा सुमारे साठ पुस्तके मा.प्रवीण दवणे यांच्या नावावर आहेत. “सावर रे !”, “स्पर्शगंध”, “रंगमेध”, “गंधखुणा”, “हे शहरा” यांसारखी अनेक रसिकप्रिय काव्यसंग्रह, लेखसंग्रह मा.प्रवीण दवणे यांच्या नावे प्रसिद्ध झाले आहेत. तर "आई परत येते", "स्माईल प्लीज", "श्रीयुत सामान्य माणूस","प्रिय पप्पा" ही नाटके रंगमंचावर आली आहेत. मा.प्रवीण दवणे यांनी सुमारे ठकास-महाठक, झपाटलेला, आम्ही असू लाडके, आम्ही सातपुते,शुभमंगल सावधान, अदला बदली अशा १२५ मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली आहेत. त्यांनी अनेक भावगीते व भक्तिगीते गाणी लिहिली आहेत. मा.प्रवीण दवणे हे त्यांच्या कविता, लेख, लेखमाला या साठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याही पेक्षा ते एक सामजिक जाणीव असलेला माणूस म्हणून ते जास्त प्रसिद्ध आहेत. मा.प्रवीण दवणे यांना सर्वोत्कृष्ट वाडम़याचा राज्यपुरस्काराचा पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, मा.दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या ठाण्याविषयी बोलताना मा.प्रवीण दवणे म्हणतात की, कालचे ठाणे हिरवळीचे, नाते संबंधांचे, घरोब्याचे नाते जपणारे होते. आजचे ठाणे ट्रॅफिक जॅमचे, प्रदूषणाचे आणि माणूसपण तुटलेले वाटते, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यात काही चिकीचं नाही. हा बदल अपरिहार्य आहे. ठाण्यातल्या समस्यांवर आपलं प्रशासन योग्य त्या उपाययोजना करताना दिसत आहे. सध्या ठाणे हे परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. पण असं असलं तरी ठाण्यातली सांस्कृतिक जाणीव ही कधीच कमी होणारी नाहीये आणि त्यामुळेच उद्याचं ठाणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरेल यात कोणतेही दुमत नसावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रवीण दवणे यांची काही गाणी.
कसा प्रकाश पाझरे, घन करुणेचा सूर, चल् झेलूया गाणे, चिंब भिजलेले, ज्यास देव सापडला, तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी, तेजोमय नादब्रह्म हे, दे साद दे हृदया,
दोन रात्रीतील आता संपला, निघालो घेऊन दत्ताची, पाऊस पहिला जणु कान्हुला, माघाची थंडी माघाची, मुक्या हुंदक्याचे गाणे, ही वाट कुणी मंतरली
प्रवीण दवणे यांचे कविता वाचन.
https://youtu.be/NZRFsS729a4
https://youtu.be/oXiXGHtuqwI
Copyright © 2025 | Marathisrushti