(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नलिनी जयवंत

    नलिनी जयवंत यांचे शिक्षण प्रार्थना समाजाच्या राममोहन शाळेत झाले. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२६ रोजी झाला. लहान पणी नलिनी जयवंत यांचा डान्स हे राममोहन शाळेच्या वार्षकि स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे आकर्षण असे. नामांकित लोक तो पाहायला येत. तिच्या या डान्सला भाळूनच वीरेन्द्र देसाईंनी केवळ चौदा वर्षांच्या नलिनीला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. नलिनी आणि विजया जयवंत (मेहता) विद्यार्थी भवनमध्ये राहात होत्या. "राधिका' या १९४१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून आपल्या कारकीर्दिला सुरुवात करणाऱ्या नलिनी यांनी त्यांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत काही वर्षांतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. कसदार अभिनयामुळे त्यांना अशोक कुमार, देवानंद आणि दिलीपकुमारसारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करता आले. दिलीपकुमार, नर्गीस यांच्यासोबत "अनोखा प्यार'मध्ये त्यांनी केलेल्या अभिनयाने चित्रपट रसिकांची वाहवा मिळविली होती.

    नलिनी यांनी निर्देशक वीरेन्द्र देसाई यांच्या बरोबर १९४० मध्ये विवाह केला. हिंदी चित्रपटसृष्टीत मोजक्याच पण विविधांगी भूमिकांनी आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविलेल्या नलिनी जयवंत यांनी १९४१ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या नंतर नलिनी जयवंत यांच्या कारकिर्दीला ‘अनोखा प्यार’ (१९४८) चित्रपटापासून वेग आला. १९६५ सालचा ‘बॉम्बे रेस’ हा प्रमुख भूमिका असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. मा.अशोककुमार यांच्या सोबत केलेले "समाधी', "सरगम", "मिस्टर एक्सल', "काफिला', "मुकद्दर' हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले. देवानंदसोबत केलेल्या "कालापानी' या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. बहन ,जलपरी, शिकस्त, जादू, महबूबा, राजकन्या, रेल्वे प्लॅटफॉर्म, सलोनी, बॉम्बे रेसकोर्स या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यावेळच्या हिंदी चित्रसृष्टीतील आघाडीच्या नायिकामध्ये त्यांची गणना होत होती. फिल्मफेअरनेच १९५० मध्ये घेतलेल्या एका सर्वेक्षणात त्याकाळात हिंदी सिनेसृष्टीत असलेल्या सर्वात सुंदर नायिकेचा मान दिला होता. १९८३ मध्ये ‘नास्तिक’ चित्रपटात अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत त्यांचे रूपेरी पडद्यावर अखेरचे दर्शन झाले.

    नलिनी जयवंत यांचे निधन २० डिसेंबर २०१० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक व खलनायिका, अभिनेत्री नादिरा

    भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी मा.नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला. त्याकाळी अभिनेत्री सोज्वळ भूमिका साकारायला प्राधान्य देत होत्या,मात्र नादिरा यांनी बोल्ड आणि नकारात्मक भूमिका साकारणे पसंत केले. ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. नादिरा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, भारत भूषण, राज कपूर, प्रदीप कुमार या सर्व दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले. 'आन' या सिनेमात नादिरा दिलीप कुमार यांच्याबरोबर झळकल्या. तर 'पॉकेटमार'मध्ये त्यांचे हीरो होते देव आनंद. राज कपूर यांच्या 'श्री 420' मध्ये नादिरा यांनी माया हे वेगळ्या धाटणीचे पात्र साकारले होते. अशोक कुमार यांच्यासह नगमा, शम्मी कपूर यांच्यासह सिपहसालर, प्रदीप कुमार यांच्यासह 'पुलिस' आणि भारत भूषणसह 'ग्यारह हजार लडकियां' या सिनेमांत नादिरा यांनी काम केले. 1954 साली नादिरा यांनी गायक-अभिनेता तलत महमूदसह 'डाक बाबू' आणि 'वारिस' या दोन सिनेमांत काम केले. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमांत नादिरा यांनी तलत महमूदसह गाणीसुद्धा गायली. तब्बल तीस वर्षे नादिरा यांनी सिनेसृष्टीत काम केले. नादिरा यांनी इस्माइल मर्चंट यांच्या 'काटन मॅरी' (1999) या हॉलिवूड सिनेमातसुद्धा अभिनय केला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गीतकार शैलेंद्र

    शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. आवारा हूँ, रमैया वस्ता वैया, दिल के झरोखे में तुझको बिठा कर,मुड मुड के ना देख मुड मुड के,पिया तोसे नैना लागे रे,दिल की नज़र से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहा खतम, अशी अनेक संस्मरणीय गाणी मा.शैलेंद्र यांनी आपल्याला दिली. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी गीतलेखनाचा प्रस्ताव त्याने शैलेंद्र यांच्या समोर ठेवला; शैलेंद्र यांनी तो नाकारला. नंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. शैलेंद्रचे दोनाचे चार हात झाले. संसाराचा गाडा नीट हाकण्यासाठी पैशांची वानवा जाणवू लागली. एकेदिवशी त्याने सरळ आरके स्टुडिओ गाठला. आरके कॅम्पमध्ये तेव्हा ‘बरसात’चे काम सुरू होते. राज कपूरने या अनोख्या शैलीच्या गीतकाराला ‘बरसात’च्या गीतलेखनाची संधी दिली. शैलेंद्रने ‘बरसात मे हमसे मिले तुम...’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली. तेव्हा पासून राज कपूर यांच्या सर्व चित्रपटात मा.शैलेंद्र यांनी गाणी लिहिली. शैलेंद्रच्या गाण्याने ‘आरके’ला एक नवी ओळख दिली.

    केवळ राज कपूरचा गीतकार ही ओळख पुसणारा म्हणून ‘गाइड’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गाइड’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माइलस्टोन. यात शैलेंद्र यांच्या गाण्यांचा वाटा निश्चितच सर्वात मोठा. ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’, ‘गाता रहे मेरा दिल’, ‘मोसे छल किये जा’, ‘वहाँ कौन है तेरा’ असे गानमोती या ‘गाइड’च्या माळेत शैलेंद्रने गुंफले आहेत. ‘काँटो से खीच के ए आँचल’ हा त्यातील मुकुटमणी ठरावा. १९५८ मध्ये 'ये मेरा दीवानापन है...' (फ़िल्म- यहूदी) च्या साठी १९५९ मध्ये 'सब कुछ सीखा हमने...' (फ़िल्म- अनाडी) १९६८ साली 'मै गाऊं तुम सो जाओ...' (फ़िल्म- ब्रह्मचारी) सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून मा.शैलेंद्र फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला होता. खूप कमी लोकानां माहित असेल की राज कपूर यांनी अभिनय केलेला 'तीसरी कसम' हा चित्रपट या शैलेंद्र निर्मित होता. पण हा चित्रपट चालला नाही. मा.शैलेंद्र यांचे १४ डिसेंबर १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच

    ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी झाला.

    जीन डेच यांचे संपूर्ण नाव युजीन मेरील डेच असं होतं. त्यांनी सुरुवातीला त्यांनी नॉर्थ अमेरिकन एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांनी लष्करासाठी काम केलं आणि नंतर त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतलं. १९४४ साली आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते पुन्हा कमर्शियल आर्टकडे वळले. तिथून त्यांच्या अॅचनिमेशन क्षेत्रातील प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

    १९५८ साली जीन डेच यांना त्यांच्या सिडनीज फॅमेली ट्री या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्कारांचे (ऑस्कर्स) नामांकन मिळालं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९६० साली त्यांना मुनरो या त्यांच्या अॅ निमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अॅननिमेशनपट म्हणून नामांकन मिळालं. त्यानंतर १९६४ साली हियर्स नूडनीक आणि हाऊ टू अवॉइड फ्रेण्डशीप या दोन चित्रपटांसाठी जीन यांना सर्वोत्तम अॅयनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. जीन डेच यांनी ट्विटीयथ सेंच्यूरी फॉक्स या कंपनीसाठी टेरीटून्सचे दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी तेथे सिडनी द एलिफंट, गॅस्टॉन ली क्रेऑन, क्लिट कॉब्लर आणि टेरीबल थॉम्पसन सारखी कार्टून कॅरेक्टर स्वत: निर्माण केली.

    १९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम अॅकण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या अगदी नव्या सिरीजची निर्मिती केली होती. जीन डेच यांचे निधन १६ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • प्रतिभाताई पवार

    शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’

  • बॉलीवुड कलाकार, फरान अख्तर

    सुप्रसिद्ध पटकथालेखक, गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा अशी फरहान अख्तर ची ओळख करून देणे म्हणजे त्याच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९७४ रोजी झाला. दिल चाहता है या पहिल्याच चित्रपटाने त्याने आपल्या आगमनाची द्वाही फिरवली. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाने अवघ्या तरूणाईला वेड लावले.त्यातील गाणी, तरूणांची जगण्याची पद्धत, त्यांच्या फॅशन यांचे मोठ्या प्रमाणात अनुकरण झाले. आणि फरहान अख्तरचे नाव देशभरातील तरूणाईला तोंडपाठ झाले. वेग व वेळेला त्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आले. तरूणांची मानसिकता, त्यांच्या अंतर्मनात चालणारी वादळे, आधुनिकतेच्या रेट्यात होणारी संस्कृतीची गोची, त्यातून होणारी घुसमट, या सगळ्यांमुळे निर्माण झालेली जनरेशन गॅप. हे सगळं टिपून ते फरहानने दिल चाहता है मध्ये दाखवलं.तोपर्यंतचे चित्रपट केवळ वरवरचा बदल दाखवत होते. फरहानने याच्या आत घुसून ते विश्व लोकांपुढे आणले. चाळीशीतील विधवेच्या प्रेमात पडणारा तरूण ही एरवी अशक्यप्राय वाटणारी कल्पना त्याने त्यात दाखवली. विशेष म्हणजे ती पाहणाऱ्यांनाही खटकली नाही. अन्यथा चित्रपट एवढा चाललाच नसता.पहिलाच चित्रपट असूनही फरहानने दाखवलेली समज त्याच्यातील विचारी दिग्दर्शकाची ओळख करून देणारी आहे. त्याच्या 'लक्ष्य' या चित्रपटात त्याने आयुष्यात ध्येयाची जाणीव नसल्याने आळशीपणाने व्यर्थ जीवन घालणाऱ्या तरूणास ध्येयाची जाणीव झाल्यानंतर ते साध्य करतानापर्यंतचा प्रवास दाखविला आहे.त्यानंतर शाहरूख खानला घेऊन केलेला 'डॉन' या चित्रपटाचा रिमेकही त्याच्या वेगळेपणाने गाजला. एकूणात फरहान अख्तर हा वेगळ्या वाटेचा प्रवासी आहे. त्याने आपल्या वेगळ्या हाताळणीने ठसा उमटविला आहे. त्यामुळे भविष्यात या सर्जनशील दिग्दर्शकाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    फरहान अख्तरने दिग्दर्शित केलेले चित्रपट.
    दिल चाहता है, लक्ष्य, डॉन
    पुरस्कार-उत्कृष्ट पटकथा - फिल्मफेअर- चित्रपट (दिल चाहता है)

  • धीरूभाई हिराचंद अंबानी

    धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका रिफायनरीत मोलमजुरी केली. पेट्रोल पंपावर इंधन भरण्याचे काम केले.

    यमनहून मायदेशी परतल्यावर १९५९ साली धीरूभाई यांनी मशीदबंदर मुंबई येथे नात्याने दूरचे मामा असलेल्या त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले आणि कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते.

    मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह भुलेश्वर येथे जिच्यात सुमारे ५०० कुटुंबे रहात होती अशा एका चाळीत राहू लागले. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले.

    १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरूवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरूवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चधू लागले. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली.

    १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायत पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी १९७७ ते १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली.

    १९८१ साली मुकेश अंबानी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर १९८३ साली अनिल अंबानी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले.

    १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरूष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. १९७७ मध्ये साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जावून २००७ साली अंबानी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर होती. धीरूभाई यांनी बिझनेस सुरु केला तेव्हा त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.

    तसेच त्यांच्या कुठलाही बॅंक बॅलेन्स नव्हता. एकदा धिरुभाईंना एका मुलाखतीत ‘तुमच्या यशाचे रहस्य काय आहे’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असुन त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडमधील दहा वर्षांच्या नोकरीत सेल्समन म्हणुन जो अनुभव मिळाला त्याला दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजाऊन सांगणे.

    थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणुस, तो सुध्धा ग्रामीण भागातुन आलेला व कमी शीकलेला, काय चमत्कार करु शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवुन देऊन भारताच्या कार्पोरेट सेक्टरमधे आपले नांव सुवर्णाअक्षरांनी लिहुन ठेवले आहे. धीरूभाई अंबानी यांचे निधन ६ जुलै २००२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सुगंध त्याचा लपेल कां ?

    उपेंद्र चिंचोरे यांनी ज्येष्ठ गायिका मालती पांडे – बर्वे यांची सांगितलेली आठवण.

    'सुगंध त्याचा लपेल कां "? … ज्येष्ठ गायिका मालती पांडे - बर्वे ह्यांच्या सहवासातील सुगंधित आठवणी :आज १९ एप्रिल त्यांची जयंती

    माझ्या लहानपणी रेडिओ हे मनोरंजनाचे मोठे आकर्षण होते ! त्याकाळी आम्ही रहात असलेल्या वाड्यामध्ये सर्वात आधी म्हणजे आमच्या घरी मर्फी कंपनीचा रेडिओ आला. माझ्या आईमुळे मलाही गाण्याची आवड लागली !

    मालती पांडे ह्यांची पहिली ओळख झाली, ती त्यांनी गायिलेल्या सुमधुर गाण्यातून, कवी श्रीनिवास खारकर ह्यांची रचना, गजानन वाटावे ह्यांच्या संगीतामध्ये मालती पांडे ह्यांनी गायिलेले गाणे - उठ जानकी मंगल घटिका, आली आनंदाची, ग. दि. माडगूळकरांचे - सुधीर फडके ह्यांची सुरावट असलेले - त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे, मधुकर पाठक ह्यांनी स्वरबद्ध केलेलं, अनिल भारतींच गाणं - खेड्यामधले घर कौलारू, मधुकर पाठक आणि अनिल भारती ह्या द्वयींच - पाहिजेस तू जवळी, राजा बढे ह्यांच्या काव्याला, श्रीनिवास खळे ह्यांचं संगीत लाभलेलं - कशी रे तुला भेटू ? गीतरामायणातील आज मी शापमुक्त झाले, कोण तू कुठला राजकुमार ? ह्या आणि अश्या अनेक गाण्यांनी मालती पांडे हे नांव खूप मोठ्ठ झालं होतं !

    गाणं एकदा ऐकलं ,की ते चालीसकट माझं तोंडपाठ होत असे. वहीमध्ये गाणं उतरवून ठेवायची मला सवय लागली, ती तेव्हांपासून, गाणही लगेच पाठ व्हायचं ! माझ्या आईचं ऐकून मी ही गाणं म्हणायचो. तो आनंद काही वेगळाच होता !

    मालती पांडे - बर्वे ह्यांची नि माझी पहिली भेट झाली, तो प्रसंग मोठा गमतीचा आहे, ऐका, अकरा जून १९८२ चा तो दिवस होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मालतीबाईंची आणि माझी ओळख कॉलेजमध्ये होईल ! होय, पण झालं अगदी तसंच ! पुण्याच्या कर्वे रोडवरील एम ई एस गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये मी नोकरी करीत होतो. दहावीचा बोर्डाचा निकाल लागला होता आणि अकरावीच्या प्रवेशाचे काम चालू होते. अकरा जूनला सकाळी ऑफिसमध्ये प्रवेशाचे काम सुरु असतांना, माझं लक्ष कार्यालयाच्या दारावर खिळले, अन् मी बघतच राहिलो, माझ्या शेजारीच बसलेल्या सहक-याला - श्री शाळीग्राम ह्याना म्हणालो, "अरे ते बघ, कॉलेजमध्ये मालती पांडे आल्यात". ते म्हणाले, "कसं शक्यय, त्या कशाला इथं येतील, तुला सगळीकडे गाण्यातली लोकं दिसतात".

    "अरे हो, नक्की मालती पांडेच आहेत त्या, थांब मी बोलून येतो" , असं म्हणून मी दाराजवळ उभ्या असलेल्या मालती पांडे ह्यांचे जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, "नमस्कार, अहो आपण इथं कश्या आलात ? कुणाच्या प्रवेशाला ?" मालती पांडे माझ्या प्रश्नाला उत्तरल्या, "अहो माझ्या मुलाच्या - राजूच्या प्रवेशासाठी आलेय" !
    "अहो मालतीबाई मी आपल्याला एका झटक्यात ओळखले, अन् त्यांना म्हणालो, आपण आत या, बसा इथं ! राजू जवळची कागदपत्रं मी तपासली, प्रवेशाची बाकीची प्रक्रिया सुरु होती, त्या पटकन मला म्हणाल्या, "तुम्ही कसं काय मला ओळखलं ?" "अहो, मला गाण्याची खूप आवड आहे, आपण गायिलेली गाणीसुद्धा मला आवडतात, इतकंच नाही तर आपलीही गाणी माझी तोंडपाठ आहेत"! त्यावर त्या म्हणाल्या, "कसं शक्यय, आता खूप काळ लोटलाय, हा लता आशाचा जामानाय …. " त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच, मी पटकन माझ्या आवडीचं त्यांचं गाणं तिथेच तोंडपाठ म्हणलो - गद्यात …।

    लपविलास तू हिरवा चाफा,
    सुगंध त्याचा छपेल का ?
    प्रीत लपवुनी लपेल का ?
    जवळ मने पण दूर शरीरे । नयन लाजरे, चेहरे हसरे
    लपविलेस तू जाणून सारे । रंग गालिचा छपेल का ?
    क्षणात हसणे, क्षणात रुसणे । उन्हात पाउस, पुढे चांदणे
    हे प्रणयाचे देणे-घेणे । घडल्यावाचुन चुकेल का ?

    पुरे बहाणे गंभिर होणे । चोरा, तुझिया मनी चांदणे
    चोरहि जाणे, चंद्रहि जाणे । केली चोरी छपेल का ?

    माझं गद्य संपलं तेव्हां मालतीबाई माझ्याकडे बघतच राहिल्या, "वा छान वाटलं, आजही माझे रसिक मला लक्षात ठेवतात", त्यांच्या चेहे-यावरचा आनंद लपत नव्हता. राजूच्या प्रवेशाचे काम तर केव्हांच झालं होतं, त्या घरी जायला निघाल्या तेव्हांच त्यांनी मला घरी यायचं आमंत्रण दिलं !

    ऑगस्ट १९८२ मधील अशीच एक हृद्य आठवण ! माझी आई वैदेही भजनी मंडळात जायची ! ते मंडळ दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करायचे. कालिंदी केसकर, भार्गवराम आचरेकर, जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार असे मातब्बर कलावंत त्या मंडळाला अध्यक्ष म्हणून लाभले होते. मी आईला म्हणालो, "अगं मालती पांडे ह्यांना विचारू कां?" मी फोन करून मालतीबाईंच्या घरी गेलो, त्यांनी त्यांचे पती - शास्त्रीय गायक, मा. पं पद्माकर बर्वे ह्यांचीही ओळख करून दिली. मी भीत भीत मालतीबाईंना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकाराल कां, असं विचारलं आणि काय आनंद झाला म्हणून सांगू, त्यांनी मला तत्काळ होकार भरला. "फक्त एकच करा, मला तिथं गायचा आग्रह करू नका, बाकी माझी मी वेळेवर येते, तुमचं काम चालू ठेवा "! इति मालती पांडे - बर्वे …

    पुण्यातील नारायण पेठेतील कन्याशाळेच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम २७ ऑगस्ट रोजी झाला होता ! कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची होती, मालतीबाई साडेतीन वाजताच हजर ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचपदीने सुरुवात झाली, थोडा वेळ होताच, मालतीबाई मला म्हणाल्या, "चिंचोरे, मी तुम्हाला आधी नाही म्हणले खरं, पण काळी पाचचा तंबोरा मिळेल कां ? मीही म्हणीन काही…। "

    मी पटकन उठलो आणि कन्याशाळे समोरच्याच वाड्यात दुस-या मजल्यावरील एका घरात गेलो, तिथं पिता-पुत्रीचा गाण्याचा रियाज सुरु होता. मला बघून, गात असलेली ती सुकन्या आणि तिचे गुरु म्हणाले, "या, या चिंचोरे सर". मी त्यांना सांगितले, "अहो, समोर कन्याशाळेच्या हॉलमध्ये चक्क मालतीबाई पांडे आल्यात, त्या काळी पाचचा तंबोरा मागतायत", … माझं बोलणं संपत न संपत तोच ते गानगुरू म्हणाले, "अरे वा, हा तर खूपच चांगला योग चालून आलाय, चला लगेच, आम्ही दोघंही त्यांच्या साथीला बसतो", असं म्हणून दोन तंबो-यांसह ते दोघेही माझ्याबरोबर कार्यक्रमस्थळी आले. मालतीबाई त्यांना बघताच म्हणाल्या, "कर्वे साहेब काय छान योग जुळून आलाय"… होय, ते गानगुरु होते, आकाशवाणीचे ए ग्रेड कलावंत पंडित मोहनबुवा कर्वे आणि त्यांची सुकन्या म्हणजे मंजिरी कर्वे होय, आत्ताची मंजिरी कर्वे - आलेगावकर ! झालं, कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगविला तो मालतीबाईंनी, कर्वेबुवा आणि मंजिरीच्या साथीने ! इथं अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो, तो म्हणजे, माझ्या आपुलकीच्या स्वभावामुळे मालतीबाईंनी कार्यक्रमाचे मानधन घेतले नव्हते !

    एरवीही मी त्यांच्याकडे जाऊ लागलो, माझ्या छंदाबद्दल त्या उत्सुकतेने बोलत असत. गप्पांच्या ओघात, एकदा त्या म्हणाल्या, "मालती-माधव" चित्रपटातील रेकॉर्डिंगसाठी लताबाई पुण्यात प्रभात कंपनीत आल्या होत्या, तेव्हां आमची ओळख झाली होती, आतामध्ये खूप गॅप पडली, त्या खूप मोठ्या आहेत, आता ओळखणारही नाहीत"… मालतीबाईंचं बोलणं मध्येच थांबवत मी म्हणालो, " नाही, मालतीबाई, दीदींची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे, त्या अजूनही तुम्ही समोर गेल्यावर तपशीलवार आठवण सांगतील". त्यावर मालतीबाई म्हणाल्या, "अहो चिंचोरे, कसं शक्यय ?"

    चोवीस एप्रिल १९८७ ह्या दिवसाची एक आठवण मुद्दाम सांगतो, ऐका, मास्टर दीनानांथांची पुण्यतिथी त्या दिवशी, पुण्यातील सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर संपन्न झाली होती. प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा पहिल्या सत्रात झाला तर दुस-यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम होता. पहिलं सत्र संपलं आणि पुढच्याची तयारी सुरु होती, त्या मधल्या वेळात, मी चटकन, श्रोतृवृंदामध्ये मालतीबाई जिथं बसल्या होत्या तिथं गेलो अन् त्यांना म्हणालो, "चला मालतीबाई, दीदींना भेटा", त्या म्हणाल्या "अहो नको, त्या ओळखणार नाहीत, खूप वर्ष झाली," चला, चला लवकर, पुढचा कार्यक्रम सुरु होण्याआधी भेटा". झालं मालतीबाईंना घेऊन, मी लतादीदी जिथं बसल्या होत्या, तिथं आलो, मी दीदींना म्हणालो, "दीदी, बघा तुम्हांला भेटायला कोण आलंय"? दिदींनी डावीकडे मागे वळून पाहिलं मात्र आणि पटकन म्हणाल्या, " वा वा मालतीबाई या या," असं म्हणून त्यांनी मालतीबाईंना आपल्याशेजारी बसवलं अन् पुढं बोलू लागल्या, "आपण खूप वर्षांनी भेटत आहोत, आपण प्रभात फिल्म कंपनीच्या, मालतीमाधवच्या रेकॉर्डिंगला भेटलो होतो, इतकंच काय, मी मुंबईला जाण्यापूर्वी तुमच्या रूमवर आले होते, आपण कॉफी घेतली होती …।" दीदी जुन्या आठवणीत रमल्या होत्या, बोलत होत्या आणि मालतीबाई आश्चर्यचकित होऊन ऐकत होत्या… "अहो, तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे," मालतीबाई उत्तरल्या…

    दुस-या दिवशी सकाळीच मालतीबाईंचा आनंदाने मला फोन आला, म्हणाल्या, "कालचा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही"।

    मालतीबाईंच्या प्रत्येक जन्मदिवसाला - एकोणीस एप्रिलला शुभेच्छा देणारा फोन मी करायचो ! मात्र, २७ डिसेंबर १९९७ नंतर तसा फोन करण्याची संधी नियतीने हिरावून घेतली होती. नंतर एकोणीस एप्रिलला मालतीबाईंची "जयंती" असं म्हणू लागलो. दिवस गेले, वर्षही गेली, तरीही त्यांच्याच गाण्याच्या ओळीत म्हणावसं वाटतं 'सुगंध त्याचा लपेल कां "? …।

    -- उपेंद्र चिंचोरे

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • प्रज्ञावंत गणिती डॉ. श्रीराम अभ्यंकर

    डॉ. श्रीराम अभ्यंकर हे अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते.

  • अविका गौर

    मला 'मिस युनिव्हर्स' व्हायचे आहे आणि एक दिवस हा किताब मी नक्की पटकाविणार... हा आहे आत्मविश्वास अविका गौरचा. ही अविका कोण, हे आता कुणाला सांगण्याची गरज आहे, असे वाटत नाही. किमान, 'इडियट बॉक्स'ची पूजा करणाऱ्या कोट्यवधी रसिकांना तर नाहीच नाही! दोन वर्षांपूर्वी कलर्स वाहिनीवर 'बालिका वधू' ही मालि . झाली तेव्हा बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त करून दिले जात असल्याची ओरड केली जाऊ लागली. 'बालिका वधू'तील केंद्रभूत व्यक्तिरेखा ठरलेल्या 'आनंदी'ची भूमिका साकारणारी अविका काहीशी भांबावली. थोड्याच | दिवसांमध्ये मालिकेचा एकूण सूर लक्षात आला नि सुतावरून स्वर्ग काढणारे आक्रमण शमले. त्यानंतर मात्र 'आनंदी' केवळ 'बालिका वधू'च नाही, तर | दूरचित्रवाणीवरील संपूर्ण मालिकाविश्वाची लाडकी ठरली! 'आनंदी-जग्या' ही छोट्या पडद्यावरील 'हिट्' जोडी ठरू लागली. मालिकांमधून अभिनय करण्याचा आनंदीला (तिच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव पाहा. अविकाऐवजी आनंदी असाच उल्लेख होतो!) पूर्वानुभव होता. पण, ती घराघरात पोचली 'आनंदी'मुळे. तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसह शिक्षकवर्गही आनंदी, बिंदनी, चुहिया, छोटी मिर्ची अशा टोपणनावांनीच तिला बोलावू लागले. अविकासुद्धा मिळू लागलेल्या प्रसिद्धीचा आनंद लुटू लागली. मात्र, तिने भान सोडले नाही. महत्त्वाचे अविव म्हणजे हे यश अविकाचे नसून 'आनंदी'चे आहे, हे जाणण्याएवढी परिपक्वता तिने लहान वयातच दाखवली. त्यामुळेच 'बालिका वधू'च्या यशामुळे ती हवेत गेली नाही! 'सकाळची शाळा. तेथूनच दुपारी दोन वाजता मालिकेच्या चित्रीकरणस्थळी. तीन वाजल्यापासून ‘शिफ्ट' सुरू. सर्वसाधारणपणे पाच ते सहा तासांचे चित्रीकरण. त्यानंतर घरी... असा दिनक्रम होता. चित्रीकरणाच्या ठिकाणीच गृहपाठ, टेस्ट वगैरे उरकून टाकायचे. प्रसंगी अर्धा-एक तास डुलकीदेखील काढून पुन्हा फ्रेश ! पुढील एक-दोन

    दिवसांच्या चित्रीकरणासाठीचे संवाद वगैरे आदल्या रात्रीच दिले जात होते. त्यामुळे ते पाठ करण्यासाठी वेळ भरपूर मिळत असे आणि चित्रीकरणाचा मुळीच ताण येत नव्हता,' असे अविका स्पष्ट करते. 'माझा स्वभाव खूप बडबडा. अविका नि आनंदी या दोन्हींमध्ये कमालीचे साम्य वाटले. त्यामुळेच 'आनंदी' जगताना फारसा त्रास झाला नाही,' असेही अविका सांगते. एव्हाना अविका स्टार झाली आहे. पोस्टर-वॉलपेपर्स, असंख्य छायाचित्रांच्या माध्यमातून ती इंटरनेटवर झळकते आहे. तसेच, 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळांद्वारे अविका 'चाहत्यां' शी मनमुक्त संवाद साधते. समवयीन चाहत्यांसाठी आविकाचे 'स्लॅम बुक' तयारच असते. स्वभावविशेष - निरागस, गोड आणि मेहनती. आवडते कार्यक्रम -शिनचॅन, टॉम अॅण्ड जेरी. आवडती सहकलावंत -दादीसा, म्हणजेच सुरेखा सिक्री. पण, त्यांची भीतीही खूप वाटते! 'बालिका वधू'तील अविकाचा अखेरचा भाग गेल्या आठवड्यात झाला. यापुढील कथानकात वापरता येतील, अशी ‘फ्लॅशबॅक'ची बरीच दृश्ये चित्रित केली गेली. आनंदी पाच वर्षांनी मोठी होऊन जमशेदपूरच्या प्रत्युषा बॅनर्जीच्या रूपातून ती पडद्यावर दिसेल. अविकाचा खरा अभिनयप्रवास आता सुरू झाला असून मॉर्निंग वॉक, पाठशाला अशा चित्रपटांसाठी ती यापूर्वीच करारबद्ध झाली आहे.

    नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसमवेत काम करण्याची संधी. अविकाला मिळणार आहे. अनेकविध पुरस्कार सोहळ्यांसाठी तिला करारबद्ध केले जाईल नि स्मृती इराणीच्या 'तुलसी'नंतरची छोट्या पडद्यावरील सर्वांत लाडकी सून म्हणून अविकाचा यापुढेही उल्लेख होत राहील. मात्र, या चकाकत्या, मोहमयी दुनियेतच अडकून राहायचे, की खरोखरीच ‘मिस युनिव्हर्स'च्या निमित्ताने व्यक्तिमत्त्व, अनुभवाच्या कक्षा विश्वव्यापी करायच्या, याचे भान अविका आणि तिच्या कुटुंबीयांना नक्कीच आहे, असा विश्वास वाटतो. 'बालिका'चा निरोप घेताना अविका खास संदेशही देते - यापुढेही बालिका वधू पाहा नि बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवा!