मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात.
माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ दादरमध्ये. मात्र त्यानंतर संपूर्ण बालपणापासून मी ठाण्यातच वाढलो. अजुनही पक्का ठाणेकर आहे. मात्र मी Born and Brought Up in Thane असं म्हणू शकत नाही, पण ठाणं तर माझ्या रक्तातच भिनलंय. अजूनही साठ आणि सत्तरच्या दशकातल्या ठाण्याच्या आठवणी ताज्या असल्यासारख्या डोळ्यासमोर आहेत.
मी माझे गाव ठाणेच मानतो. ठाण्यावर माझे विलक्षण प्रेम आहे, हे ठाण्याबाहेर मी अगदी चार दिवसांसाठी गेलो तरी मला जाणवतं. बाहेरगावाहून आल्यावर ठाणे स्टेशनात पाऊल टाकताच मला अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं.
माझं बालपण ठाण्याच्या आंबेडकर रोडजवळच्या मनोरपाडा भागात गेलं. पहिली शाळा दिघेबाईंची शिशु-ज्ञान मंदिर. त्यावेळी मित्रमंडळी सगळी मनोरपाडा आणि उथळसर भागातली. चवथीनंतर मो. ह विद्यालयात शिक्षण झालं. आमच्या दहावीच्या एसएससी बॅचची आम्ही मित्रमंडळी अजुनही चार-सहा महिन्यातून एकदा भेटतोच.
खरंतर हा विषय निघायला कारण एवढंच की गेले काही दिवस ठाण्यात एक मोठं स्थित्यंतर होताना दिसतंय. आमच्या ठाण्यातल्या जुन्या स्टेशन रोडचा चेहरामोहराच बदलून टाकला जातोय. सगळी अतिक्रमणं तोडून टाकत हा रस्ता मोठा केला जातोय. अर्थात हा बदल आवश्यकच आहे. जुन्या स्टेशन रोडवरुन अक्षरश: चालायला जागा मिळत नव्हती. हा रस्ता गर्दीत गुदमरुन जात होता. दोन-तीन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावरुन एक फेरफटका मारला आणि लक्षात आलं की या रस्त्यावरच्या काही पाऊलखूणा आता लुप्त व्हायच्या मार्गावर आहेत. काही वर्षापूर्वी टी.चंद्रशेखर या धडाडीच्या महापालिका आयुक्तांनी ठाण्याचा चेहरामोहरा बदलून टाकला होता, त्यांची आठवण आली.
मनात विचार आला की हे बदलत असलेलं ठाणं निदान आपण जेवढं जुन्या स्वरुपात बघितलंय तेवढं तरी लिहून ठेवावं. जुन्या आठवणींना उजाळा देताना कधीतरी ही पानं वाचली जातील. मराठीसृष्टीच्या “नोस्टाल्जिया” या भागात अशाच जुन्या आठवणींचा खजिना भरुन ठेवलाय. त्यात या ठाण्याच्या जुन्या आठवणींची भर घालावी.
एक लक्षात आलं की या सगळ्याच गोष्टी काही एकाच लेखात लिहिणं शक्य नाही त्यामुळे मग एक लेखमाला लिहावी असा विचार केला. आत्तातरी पंधराएक विषय डोक्यात आहेत. यामध्ये ठाण्याचे टांगे, आता हरवलेली आईस फॅक्टरी, कल्पना केंद्र, मोहवी मधली नाटकं आणि रांगोळिची प्रदर्शनं, बी.जे. हायस्कूल या आणि अशाच बर्याच ठिकाणांच्या आठवणी येणार आहेत.
आपल्याही आठवणीतल्या ठाण्यातल्या जागा, वास्तू वगैरेंची महिती लिहायची असेल तर नि:संकोचपणे पाठवा, तुमच्या नाव, पत्ता आणि फोटोसहित.
तेव्हा पुढच्या भागात बघूया बदललेल्या ठाण्याच्या आठवणी.
-- निनाद अरविंद प्रधान
April 14, 2016
हातातून निसटणारे क्षण जिवाच्या आकांताने, किमान छायाचित्रांच्या मदतीने धरून ठेवणारे आपण सारेजण ! मग अशा “युनिक” स्मृती येणारच ना मनात !
November 22, 2022
मी शाळेत असताना परभणीत ८०%प्रतिशत मध्यमवर्गीयांकडे दळणवळणासाठी सायकल हेच एकमेव वाहन वापरले जात होते. परभणीत त्यावेळी रस्त्यावर प्रदुषण नव्हते मोकळा श्वास घेता येत असे.
June 6, 2023
मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं.
July 18, 2018
पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी मॅजेस्टिक श्रेणीची ब्रिटीश बनावटीची विमानवाहक युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' म्हणजे भारतीय नौदलाच्या अभिमानाचा विषय.
आयएनएस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९)) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते.
२२ सप्टेंबर १९४५ रोजी त्याचे जलावतरण करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. ४ मार्च १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डममधील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले.
या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. ३१ जानेवारी १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले.
या जहाजाची बांधणी उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू करण्यात आली. महायुद्ध संपल्यावर बांधणीचे काम स्थगित करण्यात आले व याचा ध्वजक्रमांक R49 बदलून R11 करण्यात आला.
भारताने विकत घेतल्यावर उरलेले बांधकाम हार्लांड अँड वूल्फ या कंपनीने पूर्ण केले. अनेक आधुनिक उपकरणांसह नौकेच्या डेकवर वाफेवर चालणारे विमानफेकी यंत्र (कॅटेपुल्ट) बसवण्यात आले तसेच नियंत्रणकक्षातही आमूळ बदल करण्यात आले.
या नौकेचा प्रथम कमांडिंग ऑफिसर कॅप्टन प्रीतम सिंगच्या नेतृत्त्वाखाली विक्रांत ३ नोव्हेंबर १९६१ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पियर येथे भारतीय आरमारात दाखल झाले.
विक्रांतवर सुरुवातीला युनायटेड किंग्डमकडून विकत घेतलेली हॉकर सी हॉक प्रकारची लढाऊ-बॉम्बफेकी विमाने तसेच फ्रांसकडून विकत घेतलेली ब्रेग्वे अलिझ प्रकारची पाणबुडीविरोधी विमाने होती.
लेफ्टनंट आर.एच. ताहिलियानी यांनी १८ मे १९६१ रोजी पहिले विमान विक्रांतवर उतरवले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांनंतर नौदलाने 'आयएनएस विक्रांत'चे संग्रहालयात रुपांतर केले होते. भारताच्या नौदल सामर्थ्याची झलक दाखवणारे प्रदर्शन 'विक्रांत'वर तयार करण्यात आले होते. दरवर्षी नौदल सप्ताह तसेच शाळांना सुट्या पडल्यावर हे प्रदर्शन खुले केले जात होते.
समुद्रातल्या या प्रदर्शनाचा तसेच 'विक्रांत'ची देखभाल करण्यावर होणारा खर्च वाढू लागला होता. या खर्चाला राज्य सरकारने कायमस्वरुपी मोठा हातभार लावावा, अशी विनंती नौदलामार्फत वारंवार केली जात होती. मात्र आर्थिक अडचणींचे कारण देत सरकारकडून मदत देण्यास टाळाटाळ होऊ लागली. दीर्घकाळ समुद्रात एकाच ठिकाणी असल्यामुळे 'विक्रांत'ची मोठी दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली असताना आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे नौदलापुढील आव्हान आणखी बिकट झाली.
नव्या मोठ्या युद्धनौका समावून घेण्यासाठी मुंबई बंदरात जागेची कमतरता हा आणखी एक चिंतेचा विषय झाला. अशा परिस्थितीतही सरकारने जबाबदारी घेतल्यास 'विक्रांत' गोदीतून बाहेर काढून अन्यत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी नौदलाने दाखवली होती. मात्र तत्कालिन राज्य सरकारने यासंदर्भात ठोस निर्णय घेणे टाळले. अखेर नौदलाने नियमानुसार निवृत्त केलेले जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेतला.
- मराठीसृष्टी व्यवस्थापन
July 4, 2016
दादर’ नामजन्माचा शोध घेतला असता बऱ्याच ठिकाणी ‘दादर’ हे नांव जिना किंवा शिडी यावरून आलं असा उल्लेख सापडला..
March 9, 2016
भारतातले ‘सिनेमावेडे’ लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडका आणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल ‘एक छछोर नाद!’ असे मत होते. असो. (मी महाराष्ट्रातला तेव्हा ‘सिनेमा ‘ म्हणजे ‘हिंदी सिनेमा’ असाच घ्यावा.)
June 12, 2019
सगळं काही “साथी हाथ बढाना ” टाईप. १०-१२ जणी मिळून तितक्याच घरांसाठी वाळवण आणि साठवण निगुतीने करायच्या. मेहनताना वर लिहिलाय तसा – किंचित चव. तुलना वगैरे नसायची. २-३ महिन्यात वर्षभराची बेगमी ! त्याकाळी हे सगळंच सर्रास दुकानांमध्ये मिळत नसे. त्यामुळे गृहिणी जिंदाबाद !
September 2, 2021
हा पत्ता रोज या ठिकाणाहून जा-ये करणार्यालाही लक्षात येणार नाही. पण ‘ र्हिदम हाऊस’ म्हटलं की चटकन, ‘च्यायला हा ऱ्हिदम हाऊसचा पत्ताय होय’ असे उद्गार ऐकू येतील..!
November 11, 2016
कशावरुन कधी काय आठवेल त्याचा नेम नाही. तसंच झालं. ‘लोकसत्ते’त एक बातमी पाहिली. महिन्द्र कंपनी ‘जावा’ मोटरसायकल ‘पुन्हा’ बाजारात आणणार, ही ती बातमी. ही बातमी वाचली आणि मन एकदम मागे गेलं. मोटरसायकल शिकण्यासाठी केलेली धडपड, माझ्या आयुष्यात आलेल्या मित्रांच्याच जावा/येझदी व इतर मोटरसायकल्स-स्कुटर्स, त्यांनी मला दिलेला आणि अजुनही मनात भरून राहिलेला अवर्णणीय आनंद इत्यादींच्या मनातल्या त्या सर्व आठवणी जिवंत झाल्या
November 29, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti