भाग 1 - इराणी खाद्यसंस्कृती :
information about irani food culture in mumbai.
इराणी कॅफे म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे हक्काचे ठिकाण.. ऑम्लेट पाव, खिमा पाव, भेजा फ्राय वगैरे खायचे असेल तर इराणी कॅफेला पर्याय नाही. पण म्हणून इराणी कॅफेची ओळख एवढ्यावरच थांबते का? मुळीच नाही. इराणी चाय आणि ब्रून मस्का व्यतिरिक्त या इराणी खादयसंस्कृतीची बरीच इतर वैशिष्ट्ये आहेत.
मुंबई, पुणे, आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये इराणी रेस्टॉरंट्सनी केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक ठेवा तयार केला आहे.
मुंबईतील इराणी खाद्यसंस्कृती ही या शहराच्या सांस्कृतिक आणि खाद्यपरंपरेचा अविभाज्य भाग आहे. इराणी कॅफे हे मुंबईच्या खाद्यविश्वात एक महत्त्वाचा घटक मानले जातात. ही कॅफे पारशी आणि झोरोस्ट्रियन इराणी स्थलांतरितांनी १९व्या आणि २०व्या शतकात सुरु केले.
इराणी कॅफे हे केवळ खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध नाहीत, तर हे ठिकाण सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संवादासाठीही महत्त्वाचे मानले जातात. जुने मित्र, कुटुंबीय किंवा व्यावसायिक भेटींसाठी हे कॅफे आदर्श ठिकाणे होती.
कालांतराने, आधुनिक खाद्यसंस्कृतीच्या आगमनामुळे इराणी कॅफेंची संख्या घटली आहे. मात्र, काही कॅफे अजूनही त्यांच्या मूळ स्वरूपात टिकून आहेत आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचा भाग बनले आहेत.
भारतात, मुंबईव्यतिरिक्त पुणे आणि हैदराबादमध्ये अनेक इराणी कॅफे आहेत. इराणी कॅफे हे इराणी चाय (चहा) साठी खूप लोकप्रिय आहेत. १९५० च्या दशकात मुंबईत ३५० इराणी कॅफे होते; २००५ पर्यंत शहरात फक्त २५ राहिले. आणि आता तर त्यांची संख्या केवळ हfunction at() { [native code] }ाच्या बोटावर मोजण्याइतकी राहिती एल. [ 1 ] दरम्यान, हैदराबादमध्ये, असा अंदाज आहे की इराणी कॅफेची संख्या 2000 च्या दशकातील 450 वरून 2024 मध्ये 125 पर्यंत कमी झाली आहे. [ 6 ] कराची , पाकिस्तान , हे देखील घर होते. अनेक इराणी कॅफे. [ 7 ] [ 8 ]
इराणी रेस्टॉरंट्स मुंबई, पुणे, आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थापन होण्यामागे ऐतिहासिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक कारणे आहेत. ही ठिकाणे इराणी स्थलांतरितांसाठी सोयीची ठरली आणि त्यांच्या खाद्यसंस्कृतीच्या प्रसाराला पोषक ठरली. खाली याची सविस्तर कारणे दिली आहेत:
--------------------------
इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना इराणी हॉटेल हे ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असेच वाटते. पण खरंच तसं आहे का? मुळीच नाही. इराणी चाय आणि ब्रून मस्का व्यतिरिक्त या इराणी खादयसंस्कृतीची बरीच इतर वैशिष्ट्ये आहेत.
इराणी कॅफे हे केवळ खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध नाहीत, तर हे ठिकाण सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संवादासाठीही महत्त्वाचे मानले जातात. जुने मित्र, कुटुंबीय किंवा व्यावसायिक भेटींसाठी हे कॅफे आदर्श ठिकाणे होती.
कालांतराने, आधुनिक खाद्यसंस्कृतीच्या आगमनामुळे इराणी कॅफेंची संख्या घटली आहे. मात्र, काही कॅफे अजूनही त्यांच्या मूळ स्वरूपात टिकून आहेत आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचा भाग बनले आहेत.
भारतात, मुंबईव्यतिरिक्त पुणे आणि हैदराबादमध्ये अनेक इराणी कॅफे आहेत. इराणी कॅफे हे इराणी चाय (चहा) साठी खूप लोकप्रिय आहेत. १९५० च्या दशकात मुंबईत ३५० इराणी कॅफे होते; २००५ पर्यंत शहरात फक्त २५ राहिले. आणि आता तर त्यांची संख्या केवळ हfunction at() { [native code] }ाच्या बोटावर मोजण्याइतकी राहिती एल. [ 1 ] दरम्यान, हैदराबादमध्ये, असा अंदाज आहे की इराणी कॅफेची संख्या 2000 च्या दशकातील 450 वरून 2024 मध्ये 125 पर्यंत कमी झाली आहे. [ 6 ] कराची , पाकिस्तान , हे देखील घर होते. अनेक इराणी कॅफे. [ 7 ] [ 8 ]
इराणी कॅफे हे केवळ खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध नाहीत, तर हे ठिकाण सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संवादासाठीही महत्त्वाचे मानले जातात. जुने मित्र, कुटुंबीय किंवा व्यावसायिक भेटींसाठी हे कॅफे आदर्श ठिकाणे होती.
कालांतराने, आधुनिक खाद्यसंस्कृतीच्या आगमनामुळे इराणी कॅफेंची संख्या घटली आहे. मात्र, काही कॅफे अजूनही त्यांच्या मूळ स्वरूपात टिकून आहेत आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचा भाग बनले आहेत.
जर तुम्हाला मुंबईत इराणी खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल, तर या कॅफेंना भेट देणे हे तुम्हाला इतिहासाच्या एका सुंदर प्रवासावर नेईल.
more information about famous irani restaurants in mumbai
मुंबईतील इराणी रेस्टॉरंट्स हे शहराच्या खाद्यपरंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचा इतिहास आणि खाद्यपदार्थांमुळे आजही ते प्रसिद्ध आहेत. इथे काही सुप्रसिद्ध इराणी रेस्टॉरंट्सविषयी माहिती दिली आहे:
मुंबईतील काही जुन्या इराणी कॅफे बंद पडले असले, तरी काही अजूनही त्यांच्या वैभवाने टिकून आहेत. आधुनिक मुंबईत इराणी रेस्टॉरंट्स अजूनही त्यांच्या अनोख्या स्वाद आणि वातावरणामुळे खवय्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.
भेट देण्यासाठी सल्ला:
जर तुम्ही मुंबईत असाल तर यझदानी बेकरीत मावा केक आणि कयानीमध्ये ब्रून मस्का हा अनुभव घ्या. ब्रिटानिया रेस्टॉरंटमध्ये बेरी पुलाव हा खास पदार्थ चाखण्यास विसरू नका.
irani restaurants which are closed in last few years
मुंबईतील इराणी रेस्टॉरंट्सचा इतिहास समृद्ध असूनही, गेल्या काही वर्षांत अनेक प्रसिद्ध इराणी कॅफे बंद पडली आहेत. बदलत्या वेळेसोबत आधुनिक ट्रेंड्स, वाढती स्पर्धा आणि बदलती ग्राहकांची अपेक्षा यामुळे या कॅफेंचा अस्तित्व टिकवणे कठीण झाले. खाली काही बंद पडलेल्या प्रसिद्ध इराणी कॅफेंची माहिती दिली आहे:
काही संस्था आणि खाद्यप्रेमींनी या कॅफेंचा इतिहास जतन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जसे की:
मुंबईतील बंद पडलेल्या इराणी रेस्टॉरंट्सची आठवण नेहमीच या शहराच्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देईल. जरी अनेक कॅफे आज अस्तित्वात नाहीत, तरी उरलेल्या काही ठिकाणी जाऊन हा वारसा अनुभवणे ही मुंबईतील खाद्यप्रेमींना मिळालेली मोठी संधी आहे.
----------------------------------
इराणी
Posted on ऑगस्ट 28, 2010 by महेंद्र
इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना इराणी हॉटेल= ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असे समिकरण वाटते. पण खरंच तसं आहे का? मला वाटतं नाही , अजूनही बरेच चांगले इराणी हॉटेल्स आहेत मुंबईला- अगदी खास इराणी पद्धतीचे खाद्य पदार्थ असलेले.
पुण्याला असतांना नाझ चा मटन समोसा खाण्यासाठी आवर्जून कॅम्पात जायचो.तिथे गेल्यावर मटन समोसा खाऊन नंतर पेस्ट्री आणि खारी चहा सोबत रिचवणं झालं की मग वेस्टएंड मधे सिनेमा पहायचा- असा कार्यक्रम असायचा.
नाझ मधे गेल्यावर खारी ऑर्डर केली की तो खारीची मोठी प्लेट आणि पेस्ट्री ऑर्डर केली की असॉर्टेड पेस्ट्री आणून ठेवायचा समोर . त्यातली हवी तेवढी घ्या, उरलेली तो परत घेऊन जायचा आणि नेमकं तुम्ही घ्याल तेवढंच बिल लावलं जायचं. तिथलं सॅंडविच पण छान असायचं बरं ..
खादाडी आणि सिनेमा झाली की परत येतांना श्रुस्बेरी ( हे काय असतं हो?) बिस्किटं घेउन ( कयानी बेकरी) परत यायचो. तिथली ही बिस्किटे अजूनही आपली स्पेशालिटी टिकवून आहेत.कधी कॅंपात गेलो तर ही बिस्किटे अजूनही मी आणतो.
मुंबईचे इराणी हॉटेल कल्चर हल्ली बरंच कमी झालेलं आहे. एक तर नवीन पिढीतल्या इराणी मुलांना यात काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे बरीच नवीन पिढी ही हॉटेल धंद्यांतून बाहेर पडलेली आहे . पण काही इराणी मात्र अजूनही आपली जुनी परंपरा आणि सांभाळत तुमच्या टेस्ट बडस ला तृप्त करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यातलं आवर्जून नांव घेण्यासारखं माझं आवडीचं हॉटॆल म्हणजे ’मिल्ट्री कॅफे’-पण मला मात्र त्याला मिल्ट्री काफे म्हणायला आवडतं
इराणी हॉटेल मधे जाऊन ब्रुन मस्का आणि चहा ( जर व्हेजेटीरियन असाल तर) किंवा आम्लेट पाव खाल्या शिवाय बाहेर येणं म्हणजे इराण्याचा अपमान करणे आहे असं समजणारा पण एक वर्ग आहे माझ्या सारखा. काही फारशी भुक नसेल तर मस्का पाव आणि चहा, किंवा आम्लेट पाव खाल्ल्याशिवाय इथून पाय बाहेर निघत नाही.
इराण्याकडलं आम्लेट हे एकदम वेगळंच असतं, तसं काही घरी जमत नाही कधीच. मला तर वाटतं की आम्लेट पाव या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली ती इराण्यानेच. बरं या शिवाय मोहम्मद अली रोडवरच्या इराण्या कडला कबाब रोटी चा उल्लेख लेखा मधे केला नाही, तर इराणी शाप देईल याची भिती ही आहेच. विनोदाचा भाग सोडा पण मोहम्मद अली रोडची कबाब रोटी एकदम अफलातून असते. रुहानी माझं आवडतं आहे मोहम्मद अली रोडवरचं.
militry cafe in mumbai
मिलिटरी कॅफे हे मुंबईतील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध इराणी कॅफे असून पारंपरिक पारशी आणि इराणी खाद्यपदार्थांसाठी ओळखले जाते. हे कॅफे जुन्या इराणी रेस्टॉरंट्सच्या यादीतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
जर तुम्ही पारंपरिक पारशी-इराणी पदार्थांची मजा घ्यायची असेल, तर मिलिटरी कॅफेला एकदा नक्की भेट द्या. इथे दिल्या जाणाऱ्या पदार्थांमधून तुम्हाला मुंबईच्या सांस्कृतिक वारशाची चव अनुभवायला मिळेल.
--------------------------
आमचं ऑफिस पुर्वी फोर्ट ला होतं. तिथे असतांना एक इराणी हॉटेल ’ मिल्ट्री कॅफे’ नावाचं -अप्सरा पेन हाऊसच्या गल्लीत. मोठ मो्ठया तिथे जाणं व्हायचं. गेल्या बऱ्याच दिवसात तिकडे गेलो नव्हतो – आज दूपारी कामासाठी म्हणून फोर्ट ला गेलो होतो तेंव्हा तिथे एक मित्र भेटला. जनरल गप्पा मारायला इराण्याच्य हॉटेल सारखी दुसरी जागा नाही. सरळ मिल्ट्री काफे चा रस्ता धरला.
काफे मधे शिरल्यावर समोरचा बोर्ड लक्ष वेधून घेत होता. इथे दररोज एक निराळी पार्शी डिश असते. त्याचा एक फळा लावला होता समोर. इतक्या वर्षानंतर पण फळ्यावर खडूने लिहून ते समोर ठेवण्याची पद्धत सुरु आहे इथे या हॉटेल मधे. तो बोर्ड पाहिला, आणि उगाच एखाद्या जुन्या मित्राला भेटल्या सारखे वाटलं.
मिल्ट्री कॅफे. दरवाजासमोर ठेवलेला तो काळा फळा अजूनही असतो तिथे- रोजचे स्पेशल मेन्यु लिहायला.
समोर एल पी ची जाहीरात असलेला टेबल क्लॉथ असलेले टेबल्स आणि रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्या.. एक कोपरा पकडला. दुपारची वेळ ,मुंबईचा उकाडा, आणि खूप दिवसानंतर लंडन पिल्सनर बिअर दिसली समोर आणि मागवल्या शिवाय रहावलं नाही.जुना मित्र, बिअर, आणि मिल्ट्री काफे !! बस्स! क्या बात है.. गप्पा मारत बसलो होतो जवळपास दिड तास. आमच्या बसण्याचा पण त्या इराण्याला काही त्रास नव्हता.
खिमा पाव स्पेशल. इथे खिमा घोटाला पण छान असतो.
मिल्ट्री काफे फेमस आहे ते तिथे मिळणाऱ्या खिमा पावा साठी. इथे येऊन खिमा पाव तर खायलाच हवा. अप्रतीम खिमा असतो इथे. या हॉटेल मधे मिळणारा पाव पण वेगळाच म्हणजे लादी पाव असतो. तो ताजा लुसलुशीत पाव आणि खिमा – आणि सोबतीला बिअर आणि गप्पा मारायला मित्र – अजून काय हवं??
इथली एक इराणी स्पेशलिटी.. सल्लीचिकन.
कॅफे मिल्ट्री.. फोर्ट
धनसाक चिकन अव्हेलेबल नव्हतं म्हणून खिमा पाव आणि सल्ली चिकन मागवलं. इथल्या चिकनची खासियत म्हणजे मसाला इराणी पद्धतीचा आणि अजिबात स्ट्रॉंग नव्हता . नुसता चिकन चा पिस जरी घेतला तरीही त्या व्यवस्थित मॅरिनेट केलेल्या चिकन च्या अगदी आतपर्यंत मसाल्याची चव उतरलेली असते- आणि बिअर सोबत तर चिकनचा तो पिस एकदम अफलातून कॉंबो. इथे जास्त लिहू शकत नाही त्या बद्दल त्या साठी तिथे भेट द्यायलाच हवी.
इतकं खाणं झाल्यावर शेवटी एक चिकन पुलाव मागवला. तो तसा ठिक होता, पण तितकासा रिमार्केबल वाटला नाही. चिकन पुलाव खायचा तर ब्रिटानियाला पर्याय नाही.गप्पा आणि खाणं होई पर्यंत दिड तास गेला.
कार्मेल कस्टर्ड फक्त इराण्यांनीच बनवावे. इतरांचे काम नाही ते. इथलं कार्मेल कस्टर्ड पण चांगलं असतं ( खूप छान म्हणणार नाही.. कारण तो शब्द फक्त ब्रिटानियाच्या कार्मेल कस्टर्ड साठी राखून ठेवलाय मी)
सकार्मेल कस्टर्ड. अफलातून बॉस.. नक्की ट्राय करा इथे आल्यावर.
बरं इथले रेट्स पण खूप कमी आहेत. खिमा पाव मागवला तर फक्त ४९ रुपये . दोन बिअर चिकन सल्ली, खिमा आणि बिर्याणी आणि शेवटी कार्मेल कस्टर्ड या सगळ्यांच बिल झालं होतं फक्त ३९० रुपये. बिअरचे १८० कमी केले तर जेवणाचे बिल फक्त २१० रुपये. एक विस्मृती मधे गेलेले पण अतिशय सुंदर नॉन व्हेज मिळण्याचे ठिकाण म्हणून या हॉटेल फोर्ट मधे गेलात की नक्की भेट द्या. अगदी काही नाही तर कमीत मुंबईतल्या बेस्ट खिमा पाव साठी तरी नक्कीच!!
इथे दररोज स्पेशल मेन्यु असतो. इथले मेन्यु कार्ड पहायला इथे खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करा म्हणजे तुमच्या आवडीच्या मेन्युच्या दिवशी तिकडे जाता येईल….
August 21, 2026
धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य ‘मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची’ म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित
April 4, 2016
पन्नास वर्षे कालनदीतून वाहून गेली आणि ती सगळी चिमुरडी(?) मुले, आता साठी उलटलेली आजोबा मंडळी झाल्यावर पहिल्यांदाच औपचारिकरीत्या दोन दिवसांसाठी भेटली.
September 1, 2021
आम्ही हुबळीला होतो तेव्हां मी चौथीत होते.,त्यावेळी शाळेत नुकताच गाण्याचा क्लास सुरु झाला होता..पण पाचवीपासून ,त्यामुळे मला सामील होता आलं नाही. एक मोडक नावाचे शिक्षक होते..मी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटले आणि मला पेटी शिकवाल का म्हणून विचारले होते..ते ” हो..हो” म्हणाले , पण जेव्हां मी पिच्छा सोडला नाही तेव्हां त्यांनी मला ” सा रे ग म…” वाजवून कोणतं बोट कुठे ठेवायचं वगैरे सांगितलं.
April 25, 2023
इंदिरा गांधी यांनी २५ जून रोजी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४२ वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड तमोयुग म्हणून ओळखला जातो. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले.
June 27, 2017
१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला.
November 5, 2021
शाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची.
June 8, 2021
सगळीकडे रिक्षा, टेम्पो, छोटा हत्ती, सुमो, मॅजिक, डीआय, इ. वाहने भराभर पळतांना आपण बघतो. सामान्यांची हीच वाहने असतात. आमच्या लहानपणी मात्र प्रवासासाठी बैलगाडीच होती. आज काही लोक कारने आलीशान प्रवास करतात, तसा आमचा बैलगाडीचा प्रवास ही आलीशान होता.
May 27, 2021
मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, परकीय आक्रमणे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागले.
March 8, 2015
जगात बर्याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.
August 12, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti