कितीतरी पारितोषिके मिळालेली स्मिता मला भावून गेली. अतिशय बोलक्या डोळ्याची, मनस्वी कलावंत ! ” उंबरठा ” हा सर्वार्थाने तिचा चित्रपट होता. आणि हे गाणेही केवळ तिचेच होते. जब्बारला तिच्यापेक्षा समर्थ पर्याय त्यावेळी तरी मिळाला नसता.
July 22, 2021
१६ एप्रिल १८५३ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली ट्रेन धावली. तीन इंजीनं आणि वीस डब्यांच्या या गाडीनं हे अंतर ५८ मिनिटांत पूर्ण केलं..हे त्या काळचं एक मोठ्ठ आश्चर्य होतं.
April 22, 2016
आठवतो का काळ ही भावनो? काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची ,
December 5, 2022
मुंबईहून नागपूर मार्गे कलकत्त्याला जाणारी ही एक महत्त्वाची व तितकीच मानाची गाडी. त्यामुळे तिला नंबर सुध्दा होता वन डाऊन टु अप. काळाप्रमाणे आता हे नंबर बदललेले आहेत.
February 5, 2019
डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील.
August 24, 2023
चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग-
May 6, 2021
खेड्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यानंतर भिंतीलाच आयताकृती काळा रंग देऊन फळा केला जात असे. काही ठिकाणी तिकाटण्यावर काळा फळा ठेवून गुरूजी शिकवत असत. शहरातील शाळेमध्ये भिंतीवर लाकडी चौकट असलेले फळे असत. पहिली ते चौथीपर्यंत मी फळ्याच्या जवळ जाऊ शकलो नव्हतो. लांबूनच फळा निरखत होतो.
June 1, 2021
‘बाबला ऑर्केस्ट्रा’ने लाईव्ह परफॉर्मन्स, फ्युजन म्युझिक, पारंपरिक संगीताला आधुनिक रूप देण्याच्या आणि स्वतंत्र संगीताच्या (Non-film music) क्षेत्रात निर्माण केलेले स्थान आजही अढळ आणि मार्गदर्शक मानले जाते. आजचे अनेक गरबा किंग, रिदम अरेंजर्स आणि लाईव्ह बँड्स हे बाबला यांनाच आपले आदर्श मानतात. भारतीय चित्रपट संगीताच्या पलीकडे जाऊन जगाला आपल्या तालावर नाचवणारा एक ‘रिदम किंग’ म्हणून बाबला यांचे नाव संगीताच्या इतिहासात नेहमीच सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.
August 4, 2026
पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं..
March 11, 2023
आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ या सॉफ्टवेअरचं अनावरण झालं आणि बघता बघता ते सॉफ्टवेअर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की आजमितीला जगातील किमान ४ लाखांहून जास्त संगणकांवर ते इन्स्टॉल झालंय.
October 8, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti