(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • युगांतर – भाग ३

    सुमंत जयंत परचुरे. 

    दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.

      October 24, 2021


  • सतर्क ग्राहक

    मी मुंबईत वांद्रे येथे एक सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट आहे. या शाखेचे बहुतांश ग्राहक अनिवासी भारतीय असल्याने ते लाखात कमी आणि कोटींमध्ये जास्त व्यवहार करायचे. त्यामुळे या शाखेत फसवणुकीचे (फ्रॉड) प्रकार नेहमी होत असत.

      April 3, 2023


  • गोमुचे-प्रेम-सेवा-शरण (गोमुच्या गोष्टी – भाग ४)

    परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते.

      February 4, 2026


  • प्रेमरंगी रंगताना

    त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी .

    तिनं इकडे तिकडे पाहिलं .
    ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती .
    बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या .
    आणि सगळे चवीनं खात होते .

    ” उपमा विकणारा गेला का पुढच्या डब्यात ? ”
    तिनं कुणाला तरी विचारलं . ज्याला विचारलं त्यानं पुढच्या डब्याकडे बोट दाखवलं . आणि तो खाण्यात मग्न झाला . ती गर्दीतून वाट काढत पुढच्या निघाली . पण तिला फार पुढं जावं लागलं नाही . दाराजवळच्या छोट्याशा जागेत तो उभा होता . पायाजवळ स्टीलच्या मोठ्या डब्यांच्या दोन पिशव्या ठेवल्या होत्या .
    ” संपला का उपमा ? “

      January 20, 2026


  • ती पण एक सावित्री (कथा)

    दहा वर्षे झाली, हरीष अंथरुणाला खिळला होता. जिवंत असून नसल्यासारखा. अर्धांगवायूच्या झटक्याने त्याच्या शरीराचा गोळा झाला होता. सर्व गरजांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्याला त्याच्या बायकोकडे रागिणीकडे बघून अतिशय दु:ख होत होते. मनात सारखे विचार यायचे माझ्याशी लग्न करून हिला कोणते सुख मिळाले.

      April 30, 2022


  • पळवलेले पत्र (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३२)

    ही कथा ही इंग्रजीत रहस्यकथांची सुरूवात करणारी पहिली कथा मानली जाते.

      July 6, 2022


  • बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ३

    आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडला आप्तस्वकीयांची, आई- वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा.

      January 7, 2025


  • आधारियेचा परिसाचा दृष्टांत

    (महानुभाव ग्रंथातील गोष्ट)

    कव्हणा एका महात्माचिये आधारिये परिसू होता तो कव्हणी एका ब्राह्मणाचे
    घरा वसतीसी जाये. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते तेणे तयाचे वस्त्र
    आंबट-ओले ऐसे जाले होते.

      November 15, 2025


  • खिडकीपलीकडे

    दोन्ही टेकड्या हिरवीगार शाल पांघरुन बसतात. काळपट वाटणारा पर्वत माथाही हिरवागार होतो. कुठल्याही छान चित्रात शोभावं असं हे दृश्य आणि तेही भरवस्तीच्या बकाल मुंबई शहरात. अशी हिरवळ आणि शांत वृक्षराजी आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिल्लक आहे. पण ती शोधून सापडावी लागते.

      May 27, 2022


  • लेखणी (कथा)

    आता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण  हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला  शोभतही नाही.

      February 17, 2021