(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आय लव्ह यु …

    विजय ! म्हणजे तुझा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही ? यामिनीने विचारलेल्या या प्रश्नात जोर होता. त्यावर विजय म्हणाला, ‘ लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही असं मी म्हणालो तर तू म्हणशील अरे लग्नसंस्था नसती तर तुझा जन्मच झाला नसता हा आता तू जो विचार करतोयस तो वेचार करायला ! पण मी स्पष्टच सांगतो ! कुत्री मांजरे कुठे लग्न करतात तरी त्यांचा वंश वाढतो ना ? आमचा वंश वाढवा म्हणून आम्ही लग्न करतो ! अरे पण वाढलेला वंश पाहायला असतो कोण ? तसही म्हणतात की प्रत्येकाचा वंश दहा पिढ्या झाल्या की संपतो. तुला सांगतो कालच मला माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान असणारा मित्र भेटला होता समाजाच्या नजरेत अंत्यत साधा भोळा भोळसट पण त्याने जे जे उकिरडे फुकले आहेत त्याबद्दल ऐकून मला पेलाभर पाण्यात डुबून मरावस वाटत होत. प्रत्येक आईवडिलांच्या नजरेत आपली मुलं धुतल्या तांदळाची असतात पण ती तशी असतातच असं नाही, आजचे आई- वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवत नसतात तर फक्त नगाला नग जुळवू पहात असतात. त्यातही अज्ञानामुळे चुकीचे नग जुळवितात.

      January 22, 2017


  • वास्तु विशेषांक

    दैनिक रोजची पहाट चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट चे मुख्य वार्ताहर. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा अवलिया. यांच्या मुलाखती घेण्याच्याकौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि रोजची पहाट दाखवणारा रवी यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, पण त्यांच्या एका पूर्वजाने एका दमात 10 हंडे दही न थांबता घुसळले आणि त्या प्रयत्नात शेवटी दमून त्यांच्या हातून रवी सांडली तेव्हापासून त्यांचे घराणे ताकसांड्याचे रवीसांडे झाले ! ( जिज्ञासूंनी ताकसांडे -रवीसांडे घराण्याचा इतिहास, प्रकाशक पहाटप्रेस पहावा ) अर्थात ताकसांड्याचे रवीसांडे कसे झाले याचा आजच्या कथानकाशी तसा काही संबंध नाही. पण सहज ओघात आले म्हणून उल्लेख केला एवढेच ! तर सांगायचा मुद्दा, सूर्याजी रवीसांडे काका सरधोपटांची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. तोच काका प्रवेश करते झाले !

    काय काका ? केवढा हा उशीर ? या रविवारी आपला खास वास्तुविशेषांक काढायचा आहे हे विसरलात ?

    छे ! छे ! कसा विसरेन ? या क्षेत्रातील चार महान वास्तुतज्ञांची नावे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट्स घेऊनच आलोय. म्हणून थोडा वेळ लागला.

    मग ठीक आहे. कोण कोण आहेत हे वास्तुतज्ञ ?

    शंखमणी, शंकर रुद्राक्ष अल्पविराम लहरीनाथ आणि चालू ! मोठे मोठे बिल्डर त्यांच्या सल्ल्यासाठी रांगा लावून तिष्ठत बसलेले असतात !

    अरे वा छान ! पण आधी त्यांच्या बिल्डरांकडून जाहिराती मिळवल्या का ? आणि हे चालू हे काय नाव आहे का ?

    जाहिरातींचे काम पहिले केले. आणि साहेब हे चा लू म्हणजे चालू नाही. ते दोन शब्द आहेत. चा आणि लू. म्हणजे ब्रूस ली, यांग लू, लू सांग तसे चा लू !

    अच्छा म्हणजे हे कोणीतरी चिनी किंवा जपानी वास्तुतज्ञ दिसतात. या चिन्यांची पण कमाल आहे बरं का. आता या धंद्यातही घुसले का ते ?

    छे छे ! चिनीबिनी कोणी नाही. आपले मराठीच आहेत. का म्हणजे चारुहास आणि लू म्हणजे लुकतुके ! चा लू ! स्वतःला फेंगशुई तज्ज्ञ म्हणवतात !

    असू दे, असू दे. बरं आता लागा कामाला !

    जाहिरातींचा मजकूर संपादकांच्या हवाली करून काकांनी गळ्यात धोकटी अडकवली आणि थेट शंखमणींचे ऑफिस गाठले !त्यांचे ऑफिस वरळीला आकाशभरारी या चाळीस मजली भव्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. शंखमणी शंखाच्या आकाराच्या एक ऐैसपैस खुर्चीवर बसले होते. त्यांचे टेबल ही 4 शंखाकृती पायांवर उभी होते. त्यांचा अवतार शंखातून तोंड बाहेर काढणाऱ्या गोगलगाई सारखा दिसत होता.

    काकांनी क्षणभरही वेळ न दवडता मुलाखत सुरू केली. कमीत कमी प्रश्न विचारून, कमीत कमी वेळात महत्त्वाची माहिती काढून घ्यायची आणि मग इतर भरमसाठ मजकुराने मुलाखत सजवायची यात काकांचा हातखंडा होता. एका दिवसात चार चार, पाच पाच मुलाखती ते अगदी चुटकीसरशी संपवायचे. असो. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला.

    शंखमणी साहेब आपले नाव नाविन्यपूर्ण वाटते. ते आपले खरे नाव का व्यवसायानिमित्त घेतले ?

    चांगला प्रश्न. आम्ही प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या शंखाचे वंशज म्हणून हे नाव धारण करतो.

    वा छान ! पण त्याचा वास्तूशी काय संबंध ?

    आहे तर, आपल्या पुरातन वास्तुशास्त्राची सुरुवातच मुळी शंखनादाने झाली !

    शंखनादाने ? काय सांगता काय ? ती कशी झाली ?

    शंखनादाने ज्या लहरी उत्पन्न झाल्या त्यातूनच तर हे शास्त्र संपन्न झाले ! आमचे पूर्वज स्वामी शंखनाद यांनी ते ज्ञान शंखपद. शंखरत्न, शंखमणी आणि शंखसंभव या ग्रंथातून शब्दबद्ध करून ठेवले. त्यात वास्तूच्या विविध अंगांचा सांगोपांग विचार केला आहे. तोच वारसा आम्ही चालवतो म्हणून आम्ही शंखमणी !

    वा फारच अद्भुत ! या शास्त्राची काय वैशिष्ट्ये ? ती आजच्या काळात कशी लागू होतात ?

    काका, पंचमहाभूते आजही आहेत, पूर्वीही होती आणि भविष्यातही राहणार आहेत. ती अखिल विश्वाला घेरुन आहेत. त्यांना सांभाळून राहावे लागते. त्यांच्याशी जराही दंगामस्ती चालत नाही. त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवावे लागते. त्यासाठी स्वामी शंखमणी यांनी शंख पद्धती म्हणजे शंख थिअरी शोधून काढली.

    तिचे आपण थोडक्यात स्वरूप सांगाल का ? आणि आधुनिक काळात ती कशी उपयुक्त आहे ?

    काका, मुळात प्राचीन काळ, आधुनिक काळ हे जे आपण म्हणतो ना, ते खरे नाही. काळ हा कधीच पुरातन व आधुनिक नसतो. ज्याला आपण शंभर वर्षे म्हणतो तो ब्रह्मदेवाचा एक क्षणही नसतो. असो. आपण नेहमी ऐकतो की अमुक तमुक एकाने असे चुकीचे केले आणि आता बसलाय संकरित. तसेच लोक या पुरातन वास्तुशास्त्राला विसरून तथाकथित आधुनिक वास्तु शास्त्रज्ञांच्या, ज्यांना आपण आर्किटेक्ट म्हणतो, यांचे ज्ञान पाश्चात्त्य विद्येच्या उथळ पायावर आधारित असते, त्यांच्या सल्ल्याने इमारती, घरे बांधतात आणि मग पस्तावले की येतात आमच्याकडे शंख करीत !

    त्याचे एखादे उदाहरण देऊ शकाल का ?

    एकच का ? शेकडो देता येतील. या अफाट शहरात माझ्या सल्ल्याने इमारती बांधणारे शेकडो कंत्राटदार आहेत. आम्ही शंखमणींच्या सल्ल्याने आमची संकुले बांधतो,असा ते नुसता उल्लेख करतात त्यांच्या जाहिरातीत, तर हातोहात त्यांचे बुकिंग हाउसफुल होऊन जाते ! आणखी काय पुरावा हवा ?

    साहेब आपले मूळचे शिक्षण काय आणि वास्तूमध्ये आपण कुठून पदवी, पदविका घेतली ?

    मी वकील आहे. फावल्या वेळात वकिली करणे पण मुख्य व्यवसाय वास्तु ! हा माझा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. त्याचे कुठेही शिक्षण मिळत नाही. पूर्वसुरींचे ज्ञान हेच काय ते खरे शिक्षण. हा महान ठेवा जपणे हे मी माझे आद्य कर्तव्य मानतो.

    मग कायद्यानुसार नसतो वाटत आपला सल्ला ?

    कायदा ? कसला कायदा ? ते कोर्टाचे कायदे वेगळे. इथे मी सांगेन तोच कायदा ! विश्वास असेल तर या नाहीतर बसा शंख करीत !

    आपल्या सल्याचा एखादा नमुना सांगाल का ?

    हो सांगतो की अल्पविराम परवाच प्रसिद्ध बिल्डर शेठ चांदीमल यांच्या 100 इमारतींच्या भव्य संकुलासाठी शंख यज्ञ संपन्न केला.

    शंखयज्ञ ? ते काय असते ?

    शंख यज्ञ म्हणजे शंखध्वनी करून इमारतीच्या जागेवर चहूबाजूंनी ध्वनिलहरींचा अदृश्य भक्कम पडदा निर्माण करायचा !

    वा हे फारच अद्भुत वाटते. ते आपण कसे करता ?

    इमारतींचा जागेवर चारी बाजूंना काही विशिष्ट अंतरावर आमचे शंख तज्ञ उभे राहतात. एक आठवडाभर त्या जागेवरून अखंड शंखनाद करून शंखनाद लहरींचा अखंड नाद पडदा उभा करतात. एकदा का हा पडदा उभा राहिला की कोणतीही अभद्र शक्ती इमारतीला स्पर्श करू शकत नाही. यज्ञ पाहायला शेकडो लोक आले. यज्ञाचा प्रसाद खाल्ला. तोही साधासुधा नाही, पंचतारांकित ! आणि जाता जाता बुकिंगही करून गेले. यज्ञ संपला तेव्हा सर्व संकुलाचे बुकिंग पूर्ण झाले. कित्येकांना निराश होऊन परतावे लागले. ज्यांनी बुकिंग केले त्यांना एक एक मंतरलेला शंख फुकट दिला. शिवाय तो फुंकायची विशिष्ट पद्धत शिकवली. शंख फुंकणे आणि शंख करणे यातला फरक त्यांना समजावून दिला.

    वावा शंख मणी साहेब, आपल्या सल्ल्याने शेठ चांदी मल यांची चांगलीच चांदी झाली म्हणावयाचे ?

    होय तर, त्यांनीच खुश होऊन ही आलिशान जागा दिली मला. एवढ्यात संकटसमयी वाचतो तसा सायरन वाजू लागला. काकांच्या टकला वरचे दोन केस ताठ उभे झाले.

    शंखमणींनी शंखहास्य केले. काका, घाबरू नका. हा आमच्या स्वागतिकेने केलेला शंख इशारा आहे. त्याचा अर्थ आपली वेळ संपली. माझे दुसरे अशील वाट पाहत आहे. या आपण, नमस्ते !

    त्यांचे आभार मानून काकांनी तिथून पाय काढला.

    टॅक्सी केली आणि अंधेरीला शंकर रुद्राक्ष यांच्या ऑफिसमध्ये बरोबर एक वाजता जाऊन पोहोचले.

    त्यांच्या केबिन बाहेर एक रुद्राक्ष माला मंडित बुवा बसले होते. तो हसून म्हणाला अल्पविराम वत्सा कोण हवंय तुला ?

    मी काका सरधोपट. शंकर रुद्राक्षांची मुलाखत घ्यायला आलोय.

    हो का ? जा आत ते आपलीच वाट पाहत आहेत.

    काकांनी चेंबरमध्ये प्रवेश केला. शंकर रुद्राक्ष अगदी अपटूडेट पोशाखात, सूट,बूट, टायघालून बसले होते. फक्त एकच वेगळे होते ते म्हणजे एखाद्या पर्यंत रुळणारे लांब केस ! त्या केसांच्या त्यांनी छोट्या छोट्या वेण्या घातल्या होत्या. त्यात जटांसारख्या लोंबत होत्या. त्या प्रत्येक वेळी च्या टोकाला एक रुद्राक्ष लावला होता. बोलताना मान हलली की शंकराच्या लोलकाप्रमाणे त्या वेण्या हलत होत्या.

    काकांनी पहिला प्रश्न विचारला.

    शंकर रुद्राक्ष आपण कोणते वास्तुशास्त्र शिकलात ? या शास्त्राचे शिक्षण कोठे मिळते ? किती वर्षाचे असते ?

    काका, हे ज्ञान विद्यापीठात मिळत नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जंगलात हिंडून, निसर्ग निरीक्षण करून , थंडीवाऱ्यात प्रचंड तपश्चर्या करून स्वल्पविराम हिमालयात भगवान शंकरांची आराधना करून हे रुद्र वास्तू ज्ञान संपादन केले.अखिल मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी ते रुद्र मंडलम या बृहत ग्रंथात ग्रंथित केले. त्या थोर वारशाचे आम्ही पुनरुज्जीवन केले.

    ते ठीक आहे. त्यासाठी आपण काही संशोधन करून काही नवीन अभ्यासक्रम बनविला आहे का ? त्याला शासनाची मान्यता घेतली असेलच ?

    छे छे ! त्याला कशाला हवी आहे मान्यता ? अहो तो आपला स्वयंभू पुरातन वारसा आहे एवढे पुरेसे नाही का ? आपण आपल्या वर्तमानपत्रात रोज भविष्य छापता. ते लिहिणारे कोणत्या विद्यापीठाचे पदवीधर असतात ? नाही ना ? तसेच आहे हे, विश्वासाचा मामला आहे.

    बरे असो. या रुद्र मंडला नुसार आपण काय सल्ला देता ?

    रुद्र मंडळात मुख्यत्वे पाच तत्त्वे सांगितली आहेत. ती म्हणजे माती, दगड , दिशा, वारा-जल, वृक्ष आणि अग्नी. याचा विचार करून आम्ही सल्ले देतो .

    तो कसा ?

    मातीची चव घेऊन आम्ही घरातल्या फरश्या कशा असाव्यात हे सांगतो. दिशा, वारा, पाऊस,जल या तत्त्वानुसार घराची दारे, खिडक्या कुठे, केवढ्या असाव्यात ते सांगतो. पाण्याचे माठ, लोट्या, पेले, पिंप यांच्या जागा ठरवतो. गच्चीत, बाल्कनीत आजूबाजूला वड, पिंपळ, आंबा वगैरे मोठमोठे वृक्ष कुठे लावायचे ते सांगतो. अग्नी पेटवून त्याच्या धुराच्या दिशेवरून गॅस शेगड्या, हिटर, गिझर, इस्त्री,फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी अग्निजन्य उपकरणे कुठे असावीत याचे मार्गदर्शन करतो.

    अग्नी कसा पेटवता ?

    काडी ओढून ! काडी ओढून ती भोकाच्या रुद्राक्ष समोर धरून त्या भोकातून धुराची दिशा पाहतो.

    वा ! फारच सूक्ष्म विचार करता आपण !

    होय तर, शिवाय त्यातूनही समाधान नाही झाले तर आम्ही एक अत्यंत खात्रीशीर सल्ला देतो.

    असं ? तो कोणता ?

    प्रत्येकाला एक रुद्राक्ष माला देतो. सर्व उपाय थकल्यावर ती मला हातात घेऊन पहाटे आणि रात्री झोपण्यापूर्वी स्नान करून रुद्राक्ष नमः हा जप दहा हजार वेळा करायचा. सर्व बाधा हमखास दूर होतात. अहो काका, या आमच्या सल्ल्याने काही जणांना तर या संसाराचीच उपरती होऊन त्यांनी कायमची कैलासाची वाट धरली. एकदम मोक्षप्राप्तीच.

    काय सांगता काय? मग घरच्या लोकांचे काय?

    काका, जो चोच देतो तो चारापण देतोच. शेवटी तर सगळेच भस्मीभूत व्हायचे असते ना? तो योग त्यांना आमच्या सल्ल्याने आयताच येतो. केवढे भाग्य.

    होय, होय, खरेच. थोर भाग्यच म्हणायचे त्यांचे. आपले भाग्य फार उज्वल दिसते रुद्राक्ष साहेब. शुभेच्छा.

    काका मुलाखत संपवून निघाले तसे शंकर रुद्राक्षांनी त्यांना एक रुद्राक्ष माळ देऊन सल्ला (फुकटचा) दिला. रोज कमीत कमी हजार जप करा. तुमचे कल्याण होईल. बरे या आता. नमस्कार.

    बाहेर पडल्यावर काकांनी ती रुद्राक्ष माला काऊंटरवरच्या बुवांना घातली आणि ते थेट वास्तुतज्ञ लहरी नाथांकडे पोहोचले.

    लहरी नाथ ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची आणि समोरचे टेबल आणि त्या टेबलसमोरच्याखुर्च्या हे सगळे एका मोठ्या झोपाळ्यासारख्या पाटावर ठेवले होते. पाट जमिनीपासून सुमारे सहा इंच वर होता आणि अगदी हळूहळू पुढे मागे हालत होता. काकांनी हळूच एक पाय वर ठेवला आणि एक खुर्ची पकडून ते खुर्चीवर बसले. लगेचच त्यांनी मुलाखत सुरू केली.

    लहरी नाथ ही झोपाळ्याची कल्पना फारच अभिनव दिसते. याचा वास्तूशी काय संबंध?

    काका, वास्तूवर सर्व बाजूंनी सर्व काळी सुष्ट आणि दुष्ट लहरींचा मारा होत असतो. या झोपाळ्यामुळे सतत हलत्या लहरी निर्माण होऊन त्या रोखल्या जातात.

    वा. हे फारच अजब तंत्र दिसते आहे. पण मला सांगा, हे सर्वसामान्यांना कसे परवडायचे?

    त्यांच्यासाठी फार सोपे उपाय असतात.

    ते कोणते?

    या लहरींच्या नियंत्रणासाठी दरवाजे, खिडक्या, भिंती यांना योग्य ठिकाणी आडव्या, तिडव्या फटी पाडाव्या लागतात. ते मी तपासून सल्ला देतो.

    ते कसे तपासता?

    त्यासाठी घराची कुंडली, घरातील माणसांच्या कुंडल्या, पशु पक्षांच्या कुंडल्या, उदाहरणार्थ. कुत्रा, मांजर, पोपट वगैरे, तपासाव्या लागतात. काही अमानवी शक्तीचा संचार आहे का हे त्यावरून समजते.

    हे फारच अजब वाटते. एखादे उदाहरण देता का?

    हो देतो ना.परवाच शेठ माणिकचंदनी आले होते. त्यांच्या चाळीस मजली इमारती वरचा पेंट हाउस फ्लॅट त्यांचे गिऱ्हाईक शेठ घिसूमल चांदीमलयांच्या बायकोला पसंत नाही म्हणून शेठ घिसूमल परत करत होते. माझ्या सल्ल्याप्रमाणे काम चालू असूनही असे का झाले म्हणून मला जाब विचारत होते.

    मग आपण काय मार्ग काढलात?

    मी त्यांची माहिती तपासली. तेव्हा लक्षात आलं की माणिकचंदानी शेटजींची आणि त्यांच्या बायकोची जन्मतारीख चुकीची दिली होती. शेटजींनी दिली होती तीन आणि शेठाणींचीही तीन.पण मुळात शेठाणींची होती सहा. म्हणजे 36 चा आकडा. मग भांडण नाही होणार तर काय मुके घेणार?

    मग? कसा सोडवलात आपण हा तिढा?
    मी सल्ला दिला की बायकोच बदला म्हणून.
    काय सांगता? मग बदलली बायको?
    हो बदलली. म्हणजे दुसरा फ्लॅट घेऊन दिला आणि ठेवलेल्या बायकोला दिले पेंट हाउस. दोघीही खुश. माणिकचंदानीचा ही दुप्पट फायदा झाला.

    वा, वा. लहरी नाथ आपण महान आहात. त्यांना शुभेच्छा देऊन काका चार वाजता पेडर रोडवर, चा लू यांच्या मुलाखतीला त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा चा लू यांची चहाची वेळ झाली होती. काकांनाही चहाची गरज होती. मग एका चहाच्या कपावर म्हणजे ओव्हर अ कप ऑफ टी, त्यांनी मुलाखत सुरू केली.

    चा लू , हे फेंगशुई काय प्रकरण आहे?

    हे चिनी शास्त्र आहे असे म्हणतात, पण खरे तर ते प्राचीन भारतीय शास्त्रच आहे.

    काय सांगता?

    हो ना, फार पूर्वी बौद्ध भिक्षूंनी ते चीनला नेले. या पद्धतीने गृहसजावट केली म्हणजे घरात जंगलांची शांतता निर्माण होऊन मन विपश्यना तपश्चर्येसाठी तयार होते आणि अंतिम मोक्षाकडे जायची आत्म्याची तयारी होते. या शास्त्राला त्याचे मूळ स्वरूप आणि पावित्र्य प्राप्त व्हावे म्हणून मी लवकरच अजिंठ्याला फेंग शुई विपश्यना समाधी संस्था स्थापन करत आहे.

    वा वा ! चा लू आपण हे फारच महान कार्य हाती घेत आहात. आपणास शुभेच्छा. आपल्या सल्ल्याने घरोघरी अजंठा गुहा निर्माण होवोत ही प्रार्थना. धन्यवाद. काकांनी मुलाखत आटोपली.

    वास्तु विशेषांकाची विक्रमी विक्री झाली. पाश्चिमात्य ज्ञानाने शेफारलेल्या आर्किटेक्ट लोकांचे पुरतेच कंबरडे मोडले. त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळावी म्हणून विशेषांक सम्राट, सूर्याजी रवीसांडे यांनी आता वास्तुशास्त्र आणि आधुनिक आर्किटेक्चर आणि आर्किटेक्ट या विषयावर एक पाचशे पानी दणदणीत विशेषांक काढायची घोषणा केली आहे.

    काका सरधोपट मुलाखतींसाठी आणि जाहिरातींसाठी प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि ठेकेदार यांची नावे गोळा करत आहेत. इच्छुकांनी त्वरीत नावे नोंदवावीत. संधीचा फायदा घ्यावा.

    पत्ता - संपादक, रोजची पहाट, वरळी, मुंबई - ४२०४२०

    - वि. रा. अत्रे

      October 22, 2018


  • वेडा मगर आणि हुशार कोल्हा

    समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.

      October 22, 2025


  • वृक्षारोपण

    … एवढच नाहितर आॅक्सिजनचा मास्क ही सहज उपलब्ध होत होता पैशाने. आणि जर तुम्हाला जगायच असेल तर इतर वस्तूंच माहित नाही पण हा आॅक्सिजनचा मास्क विकत घ्यावाच लागायचा.

      February 28, 2020


  • एका शेवटाची सुरुवात

    वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी

      January 20, 2026


  • व्यवस्थेचे गुलाम

    कर्नल सावंत निवृत्त होणार होते. आतापर्यंत त्यांनी कधी निवृत्तीचा व विशेषत: निवृत्तीनंतर कुठे रहायचं, याचा विचारच केला नव्हता.
    सीमेवर देशाची सेवा करतांना प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाला निवृत्तीचे बेत आंखायला वेळ नसतो. सीमेवर तीक्ष्ण नजरेने पहाणारा सैनिक आपल्या भविष्याकडे कधीच नजर लावून बसत नाही. कर्नल सावंत याला अपवाद नव्हते. अतुलनीय पराक्रमाबद्दल मिळालेली पदके छातीवर अभिमानाने लावायची, मान ताठ ठेवायची व देशरक्षणासाठी सज्ज रहायचे एवढेच त्यांना ठाऊक होते. त्यांच्या बदल्या झाल्या व ते कुटुंबासह एका शहरांतून दुसऱ्या शहरांत चार वेळा गेले पण त्यांना नवीन ठीकाणी रहाण्यांत विशेष अडचणी आल्या नाहीत कारण आर्मी पाठीशी असे. रहायला चांगले घर व इतर सर्व सोयीही बघितल्या जात.

      February 2, 2026


  • गणपती

    आम्ही दरवर्षी गणपतीचा उत्सव कोकणातल्या आमच्या न्हैचिआड गावी साजरा करतो. गणपतीच्या साधारणतः दोनतीन महिने आधी आमच्या घरी गणपतीची गडबड सुरु होते. ह्यावर्षी गणपती अमुक अमुक तारखेला आहेत, तेव्हा गावी जाण्यासाठी कोण कधी निघणार, कुठल्या गाडीने निघणार वगैरे चर्चा आमच्या घरी सुरु होते. घरी म्हणजे आमच्या चुलत नातेवाईकांमध्ये- रेग्यांमध्ये आम्ही सर्व चुलत बंधू एकत्ररित्या घरचा गणपती गावी साजरा करतो. यानिमित्ताने सर्व रेगे कुटुंबिय एकत्र जमतो, देवाची यथासांग पूजा पार पडते, हास्यविनोद घडतो, चार दिवस मजेत घालवून आम्ही मुंबईला परततो. देवाची पूजा झाल्याने मन शांत होतं, प्रसन्न होतं. मुंबईचे ताणतणावाचे दिवस सहन करण्यासाठी आम्ही पुन्हा सिद्ध होतो.

    गावी पोहोचल्यानंतर प्रथम गणपतीची तयारी सुरु होते. पहिलं काम देवखोली साफ करण्याचं. विहिरीवरुन पाणी काढून संपूर्ण देवखोली धुतली जाते, स्वच्छ केली जाते. त्यानंतर बाजारहाट. गणपतीसाठी घरात असंख्य गोष्टी लागतात. त्याची यादी करुन त्या बाजारातून आणव्या लागतात. आमचं गाव तसं छोटसं खेडच आहे. मुख्य बाजार भरतो तो शिरोडयाला अथवा वेंगुर्ल्याला. गणपतीच्या दोनतीन दिवस आधी या दोन्ही बाजारांमध्ये आजूबाजूच्या गावांतले हजारो लोक जमतात. गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं माटवीचं सामान, स्वयंपाकाच्या भाज्या, फळं, बुंदीचे लाडू, खाजं, फुलं, फुलांचे हार, वेण्या, उमा महेशाच्या पूजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, नाडापूडी अशा असंख्य गोष्टींची यादी सोबत असते. त्या वस्तू खरेदी करत बाजार पालथा घातला जातो. त्यानंतर थकवा घालविण्यासाठी भजी आणि चहाचा खुराक घेऊन आम्ही घरी परततो.

    घरी परतल्यावर प्रथम देवखोली सजविण्याचं काम सुरु होतं. गणपतीच्या मूर्तीच्या वर काठयांची चौकट लटकत असते. तिला माटवी म्हणतात. आंब्याचे टाळ आणि विविध रंगांची फळं व भाज्या अडकवून ही माटवी सजवली जाते. त्यानंतर चमचमत्या छोटया दिव्यांची आरास. देवखोलीच्या दारावर कागदांच्या फुलांची आणि रंगीत दिव्यांची तोरणं चढतात. सजावटीची तयारी पूर्ण होते. आत स्वयंपाकघरात बायकांची धांदल उडालेली असते. हरतालीकेपासून तीन दिवस सोवळ्याचा स्वयंपाक असतो. हरतालीकेला गुळाच्या पातोळ्यांचा नैवेद्य असतो. चतुर्थीला २१ मोदकांचा नैवेद्य, पंचमीला साखर भात असा ठरलेला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यादिवशी पंचखाद्यपण करायचं असतं. आरतीनंतर प्रसाद काय वाटायचा याबाबत सगळ्यांची मतं घेतली जातात. हरतालीकेच्या आदल्या दिवशी कडधान्य भिजत घालणं, नंतर भाज्या चिरण्याचं काम अशी कामं सुरुच असतात.

    सर्व तयारी सिद्ध झाल्यावर गणपतीच्या आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचं घरात आगमन होतं. देवखोलीत चौरंगावर गणपती विराजमान होतो. चतुर्थीचा उत्सव सुरु होतो!

    चतुर्थीच्या दिवशी सकाळी भटजी बुवा घरी येतात. घरातल्या पुरुषांपैकी कुणीतरी एक सोवळं नेसून तयार बसलेला असतो. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रांच्या घणघणीत उच्चारांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर एकादष्ण्या. अथर्वशिर्ष अकरा वेळा म्हंटल्याने एक एकादष्णी पूर्ण होते. घरातल्या मंडळींनी अशा एकादण्या आंगवलेल्या असतात. याशिवाय ठरलेल्या वार्षिक एकादष्ण्या. आम्ही लहान असताना जवळजवळ तासभर हा एकादष्ण्यांचा कार्यक्रम रंगत असे. आता भटजींची पूजा सांगतानाच घाई उडालेली असते. एका घरची पूजा आटोपून त्यांना दुसऱ्या दहा घरी धावायचं असतं. सहाजिकच एकादण्या हा प्रकार मागे पडला. रीत म्हणून आमच्या आम्हीच एखाददुसरी एकादष्णी म्हणतो आणि गणपतीची पूजा सिद्ध होते. त्यानंतर एका ताम्हणामध्ये पाण्यावर लालकुंकू टाकून त्यात सजलेल्या गणपतीचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे. फुलांनी सजलेलं, दिव्यांच्या आरासांनी उजळलेलं श्रीगणपतीचं हे प्रसन्न दर्शन मनाला अतीव समाधान देऊन जातं.

    गावातल्या अन्य रेगे कुटुंबियांच्या पूजा उरकल्या की एकत्रित आरत्यांचा जल्लोष सुरु होतो. कोकणातल्या आरत्यांच्या चाली मुंबईतील प्रचलित चालींहून वेगळ्या आहेत. एकाने एक आरती म्हटली की दुसऱ्याने दुसरी आरती म्हणायची अशी ही स्पर्धा मग रंगात येते. एकजात सर्वांच्या सर्व आरत्या पाठ. एकूण पाच घरात अशा आरत्या रंगतात. आरत्यानंतर मंत्रपुष्पांजली. 'तन्नोदंती प्रचोदयाऽऽत' च्या गजराने या आरत्यांची सांगता होते. त्यानंतर नैवेद्यांची पाने मांडली जातात. पंचपक्वानांचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. नैवेद्य प्राशन केल्यावर थोडा विसावा मिळतो. तृप्तीचे ढेकर देत सर्वांची वामकुक्षी सुरु होते.

    सायंकाळी पाचच्या दरम्यान गावकऱ्यांच्या भजनाची गडबड सुरु होते. संपूर्ण गावातले गावकरी एकत्ररित्या सर्वांच्या घरी जाऊन भजनं म्हणतात भजनाला तबलापेटीची साथ असते. टाळ आणि झांजाच्या गजरात भजन सुरु होतं. गावकऱ्यांचा एकत्रित आवाज भजनात तल्लीन होऊन जातो. उत्तरोत्तर लय वाढत जाते. भजनी ठेक्यावर सर्वांचे पायही ताल धरतात. एका सूरात नाचत, गात भजनं सादर केली जातात. भान हरपून मी या भजनांचा आस्वाद घेत कडेला उभा असतो. भजनं सादर करताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव मी टिपतो. छोटी छोटी मुलं आणि थकलेले वृद्ध यांच्या अंगात संचारलेला जोष मला वेगळीच अनुभूती देऊन जातो. मी उत्स्फूर्तपणे गांवकऱ्यांच्या भजनात सामील होतो.

    पंचमीच्या दिवशी सकाळी पूजेची, आरत्यांची आणि नैवेद्याची पुनरावृत्ती होते. संध्याकाळच्या आरतीनंतर देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. सर्वांच्या ख्याली खुशालीची आणि क्षेमकल्याणाची याचना झाल्यावर चौरंग हलवला जातो. गणपती आपल्या गावाला जायला निघतो व सर्वांचे डोळे पाणावतात. जगातलं विज्ञान काहीही सांगो, पण यावेळी मूर्तीच्या चेहऱ्यावरही खरोखरच नाराजी उमटते. 'पुनरागमनायचं' च्या अक्षता टाकून देवाच्या हातावर दही ठेवलं जातं. देवखोलीतला चौरंग खळ्यात येतो. बाहेर गावातले सर्वांच्याच घरातले गणपती विसर्जनाला निघतात. 'मोरयाऽऽऽ मोरयाऽऽऽ'च्या ललकाऱ्या गावभर उमटत असतात. रांगेने गावातले सर्व गणपती तळ्याच्या वाटेने निघतात. शेतातल्या बांधातून मार्ग काढत गणपतींची रांग पुढे पुढे सरकते. सूर्य मावळतीला निघालेला असतो. आकाशात सांजरंग उमटत असतात. दूरवर हिरव्याकंच डोंगरांच्या रांगा तटस्थ उभ्या असतात. शेतातल्या पिकांतून वाट काढत गावातले शंभरएक गणपती तळ्यावर पोहोचतात. तिथे संपूर्ण गावाची एकत्रित आरती होते. संपूर्ण गावाच्या वतीने गाऱ्हाणं घातलं जातं. खाली उतरलेल्या अंधारात गणपतींच्या मूर्तीसमोरील कापराच्या वाती सौम्य प्रकाश देत उजळत असतात.

    'नवल होत आहेऽऽ आरतीऽऽ देवाधिदेवा ऽऽ ऽऽ' भजनाने विसर्जनाचा सोहळा संपन्न होतो. गावातले तरणेताठे गडी भराभर मूर्ती पाण्यात शेळवतात. गणपतीचा उत्सव संपतो. अंधारात वाट चाचपडत आम्ही घरी परततो.

    - सुनील रेगे

      June 30, 2022


  • एक परीस स्पर्श (भाग – ५८)

    आज विजय एका कारखान्यात त्या कारखान्याच्या मालकाला भेटायला गेला होता. त्या मालकाने हा कारखाना नव्यानेच सुरु केला होता. त्या कारखान्याचा मालक उत्तरभारतीय होता. त्याची बायको गर्भारपणात वारली त्यामुळे त्याला बरेच दिवस गावी थांबायला लागल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे त्याने दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा नोकरी सोडल्यामुळे आलेल्या पैशातून दोन लेथ मशीन विकत घेऊन छोटासा कारखाना सुरु केला. तो कामाच्या शोधात असतानाच एकदा विजय आणि त्याची भेट झाली होती. विजयला एकाच भेटीत माणसे ओळखता येतात त्यामुळे विजयने त्याचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. विजयचा पाय बऱ्यापैकी बरा झल्यावर विजयने त्याला एक जॉब करायला दिला होता पण नंतर विजय गावी गेल्यामुळे आणि तो कारखान्याचा मालक आजारी पडल्यामुळे तो जॉब लटकला. त्यासंदर्भात विजय त्याच्या कारखान्यावर त्याला जाता -येता भेटायला चार – पाच वेळा गेला, प्रत्येक वेळी विजयने त्याला कामाच्या बाबतीत काही सूचना आणि काही उपाय सुचविले त्यामुळे विजय त्याच्या कारखान्यात पाय ठेवण्यापूर्वी तोट्यात चालणार त्याचा कारखाना नफ्यात चालू लागला. आज जेंव्हा विजय त्याच्या कारखान्यात गेला तेव्हा त्याला पैशाची चिंता होती. एक पार्टी त्याला पैसे द्यायला येणार होती.

      September 5, 2022


  • वाटेचा सोबती

    तुम्हाला कितीही मित्र असले तरी प्रत्येक क्षणी त्यांची सोबत असतेच असे नाही. विशेषतः तुम्ही एकटे असल्यावर आणि त्याच वेळेला एखादे अवघड काम तुम्हाला करावयाचे असेल किंवा एखादी अवघड जबाबदारी पार पाडायची असेल तर अशा वेळी तुम्हाला सोबतीची गरज नक्कीच भासते. अशा स्थितीत तुम्ही कोणालाही 'सोबती' करू शकता ज्याच्यामुळे तुमचे काम निर्विघ्नपणे पार पडू शकते. शहरात राहणार्‍या सदानंदला आई खूप आजारी असल्याचा निरोप आला. त्यामुळे तो लगेच गावी निघाला. कशीबशी एसटी मिळवून तो गावाजवळच्या फाट्यावर उतरला. तोवर सायंकाळ उलटून चांगलाच अंधार पडला होता. त्याचे गाव चार-पाच किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे फाट्यावर थांबून गावाकडे जायला कोणते वाहन मिळते का, याचा त्याने अंदाज घेतला. मात्र त्याला कोणतेही वाहन मिळाले नाही. आई आजारी असल्यामुळे घराची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने पायीच जाण्याचा निर्णय घेतला. लवकर पोहचावे म्हणून सुरुवातीपासूनच त्याने वेग वाढविला होता. मात्र रस्ता खराब होता. वेडीवाकडी वळणे आणि खाचखळग्यांनी भरलेला रस्ता पाहून त्याला प्रारंभी राग आला. आपण कधी सुधारणार, असा प्रश्र त्याच्या मनात आला. आता तर तो रड्यालाच दोष देत पुढे निघाला. त्यामुळे साहजिकच त्याची चाल मंदावली. एकटाच असल्यामुळे रस्ता त्याला खायला उठला होता. सवयीचा असूनही तो कधी एकदा संपतो असे त्याला झाले होते. मात्र रस्ता संपता संपत नव्हता. थोड्या वेळाने त्याच्या मनातील विचार बदलले. लहानपणचे दिवस त्याला आठवले. शेजारच्या गावी शाळेत जाताना याच रस्त्यावरून आपण जायचो. त्यावेळी मित्रांबरोबर केलेल्या गमतीजमती त्याला आठवल्या. तो रस्ता त्याला एकदम जवळचा वाटू लागला. त्या रड्याशी आधी असणार्‍या मैत्रीचा साक्षात्कार त्याला झाला होता. त्यामुळे त्याने आता त्या रस्त्यालाच 'सोबती' केले होते. आता तो आनंदाने गावाकडे जात होता. त्यामुळे त्याचा चालण्याचा वेगही वाढला होता. रस्ताची ' सोबत' करीत करीत सदानंद केव्हा गावात आला हे त्याचे त्यालाच कळले नाही आणि घरी आल्यानंतर तर त्याला पाहून त्याच्या आईचा आजार कधी बरा झाला हेही अनेकांना कळले नाही.

      March 7, 2017


  • पिंपळ

    १) कुलकर्ण्यांचा प्रशस्त वाडा. पंधरा वर्षांची कुमुद आजीला शोधत बागेत आली . आजी नेहमीप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली शांत बसली होती. कुमुदला माहीत होतं. आजी औदुंबराच्या झाडाकडेच असणार. आजोबा गेल्याचं दुःख ती पचवू शकत नव्हती. हा औदुंबर आजोबांना प्रिय होता. कुमुदला आजीची अवस्था पहावत नव्हती. तिला पूर्वीसारखी हसीमजाक करणारी हरहुन्नरी आजी हवी होती. कुमुद आजीला म्हणाली, “ आजी ग घरांत चल. आजोबा म्हणायचे, दिवेलागणीला असं घराबाहेर राहू नये. ” आजी म्हणाली, ” तेच तर .. आता काही म्हणायला ते आहेत कुठे ? हसत खेळत हार्टॲटॅकने निघून गेले.

      January 15, 2024