(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोमुचे-प्रेम-सेवा-शरण (गोमुच्या गोष्टी – भाग ४)

    परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते.

      February 4, 2026


  • आदिमानवाची चंद्रावर स्वारी

    (ब्रह्मदेशातली लोककथा )

    आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.

      November 15, 2025


  • मेडल सर

    १९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला

      February 4, 2026


  • गोष्ट गुणवंत कुमाराची

    राजा पे-चौ व त्याचा प्रधान, दोघेही राजमहालात बसले होते. त्यांचे सारे लक्ष सिंहासनाला दोन साखळ्या (लहान लहान घंटाघुंगरे लावलेल्या) जोडलेल्या होत्या तिकडे होते. त्यातली एक साखळी सोन्याची होती, तर दुसरी होती चांदीची. त्यांना बोलायलाही सुचत नव्हते. बरोबर राणी यावेळी प्रसूतिगृहात होती, बाळ होणार होते. मुलगा झाला तर सोन्याची साखळी ओढली जाणार ! मुलगी झाली तर चांदीची ! त्यांचे डोळे साखळ्यांवर गुंतलेले होते.

      October 5, 2025


  • संधिप्रकाशातील सावल्या…. एक नवी कोरी कथामाला…

    आम्ही वृद्ध झालोत , पण टाकाऊ नाही झालोत . हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे . सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना ,त्याला संधिप्रकाश म्हणतात . आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते . ती अनुभवानं समृद्ध असते . त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल . जीवन कसं जगायचं हे आम्हाला , आमच्या सावलीला विचारा . सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला . आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही . बघ , तूच ठरव , म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? “

      July 3, 2021


  • नारायण भंडारीचं काय झालं ? – भाग २

    जरी त्या राज्यातील निवडणूक असली तरी अखेर जगातील मोठ्या लोकशाहीचा महायज्ञ होता तो. त्यामुळे त्या इतमामात तो साजरा होण्याची काळजी घ्यायलाच हवी होती. पण नारायण भंडारी बावचळला होता. अस्वस्थ झाला होता .

      February 5, 2026


  • अजब न्याय नियतीचा – भाग ११

    १० तारखेला दिवसभराच्या गडबडीत आरू तिचा वाढदिवस आहे हे विसरूनच गेली होती. गम्मत म्हणजे दीने, नीलने किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीही तिला दिवसभरात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मेसेज करून दिल्या नव्हत्या. संध्याकाळी नील एका Surprise Party साठी दोघींना घेऊन बाहेर पडला.

      September 26, 2019


  • चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)

    तरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता. मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही. त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती. आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता. त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता. त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता. समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती. त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला.

      July 22, 2022


  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ५

    कलकत्याहून येताना बिपीन साहेबांची स्वारी एकदमच खुशीत होती, कंपनीला मोठाली बरीच कामे मिळाल्याने भरभराटीचे दिवस उगवले होते. येताना संगीताला बंगाली साड्या, गाऊन, गळ्यात घालायच्या मण्यांच्या माळा, मौशूला ड्रेसेस, खेळणी, विवीध प्रकारच्या बंगाली मिठाया, खैरातच केली होती.

      December 26, 2021


  • तीन चिंतन कथा !

    डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या लेखणितून आलेल्या या तीन चिंतन कथा…

      February 5, 2026