नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे.
July 14, 2022

अशीच होरपळ झाली तर शहराची शिस्त किती दिवस टिकेल? साठणारा संताप मग रेल्वेच्या मालमत्तेपुरता सिमित राहणार नाही. त्या संतापाचा वणवा इतका वाढेल, की त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. रेल्वेची मालमत्ता नष्ट करण्यामुळे प्रवाशांचेच अधिक हाल होतात, हे शहाणपण पुढारी मंडळी शिकवू शकतात
July 12, 2022
संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. एकदा आषाढीच्या वारीसाठी पैठणहून दिंडी निघाली. त्या दिंडीत एकनाथ महाराज ही होते. वाटेत एका गावी दिडींचा रात्रीचा मुक्काम होता. त्या गावातील एका गावकर्याला संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. मात्र दिंडीत एवढे असंख्य लोक होते, की आपल्याला त्यांचे दर्शन कसे मिळणार व आपण त्यांना ओळखणार कसे? हाच प्रश्र्न त्याच्यापुढे पडला. शेवटी त्याने एक युक्ती केली. गावात असेलल्या आंब्याच्या झाडाची दोन-तीन पाने तोडली व तो दिंडीच्या ठिकाणी गेला. तेथे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत त्याने काही लोकांना ती आंब्याची पाने दाखविली व म्हणाला, '' पाहा, आमच्या गावातील चिंचेच्या झाडाची ही पाने किती मोठी आहेत.' ' त्यावर लोकांनी त्यालाही चिंचेची पाने नसून आंब्याची पाने आहेत असे सांगून त्याला वेड्यात काढले. मात्र तो गावकरी ज्याला त्याला ही चिंचेचीच पाने आहेत असे ठामपणे सांगू लागला. त्यामुळे त्याच्याभोवती प्रचंड गर्दी जमली व लोक त्याच्याशी हुज्जत घालू लागले. संत एकनाथ महाराजांनाही ही गोष्ट कळली व ते स्वतःच तेथे आले व त्या गावकर्याशी वाद घालणार्या लोकांना म्हणाले, ' 'ईश्वराने वृक्षवीची निर्मिती करताना काही त्यांना नावे दिली नव्हती. आपल्या सोयीसाठी आपण झाडांना तशी नावे दिली आहेत. त्याच्या गावात जर चिंचेला आंबा म्हणत असतील, तर म्हणून द्या. तुम्ही त्याच्याशी निरर्थक वाद घालून तुमचा वेळ निष्कारण वाया घालवू नका. तोच वेळ तुम्ही नामस्मरणात किंवा संतांचे चांगले विचार ऐकण्यात घालवा. '' त्या गावकर्याला त्याचक्षणी संत एकनाथ महाराजांची ओळख पटली व हाच खरा धर्मात्मा हे ओळखून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले.
March 4, 2017
तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान.
November 17, 2023

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात…
November 1, 2019
आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….
September 16, 2021

मूळ कथा-मॉडेल मिलियोनेर. लेखक – ॲास्कर वाईल्ड (१८५४-१९००). या कथेचे संक्षिप्त भाषांतर केले आहे श्री अरविंद खानोलकर यांनी. इंग्रजीतील अनेक उत्कृष्ट कथांना मराठीत भाषांतरित करुन त्या संक्षिप्त स्वरुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम.
March 9, 2022
गाडीने चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.मीनल खिडकीशी बसून बाहेरच्या काळोखात बघत होती. रेल्वेच्या डब्याची सावली डब्यातल्या प्रकाशामुळे बाहेर जमिनीवर पडली होती व ती पण गाडीबरोबर धावत होती. मीनल आज फार खुश होती. ती चक्क हिमाचल प्रदेशात चालली होती. सिमला मनालीचे तिचे फार वर्षांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. सोबतीला होती तिची मैत्रिणी सारखीच असलेली वहिनी, सीमा. त्यामुळे पूर्ण प्रवास खूपच आनंदात होणार यात काही शंकाच नव्हती. हसतखेळत दोघींनी नुकतच डब्यातले जेवण घेतले होते. आता झोपायची तयारी करायची होती.
June 6, 2026
शहरामध्ये बँकांचे आपसातील व्यवहार जेथे चालतात, त्याला समाशोधनगृह (Clearing House) म्हणतात. बँकेचे ग्राहक विविध बँकाचे चेक, डिव्हिडंड वारंट (Dividend Warrant), ड्राफ्ट वगैरे त्यांच्या खात्यात जमा करावयास देतात. ते चेक, डिव्हिडंड वारंट वगैरे त्या त्या बँकेला देण्यात येतात. ती बँक ते चेक, डिव्हिडंड वारंट ज्यांचे आहेत, त्यांच्या खाते नावे टाकतात. आणि ती रक्कम ते देणाऱ्या बँकेच्या खात्यात जमा करतात.
February 27, 2023
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा.
January 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti