(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जुलमी राजाची किंमत

    तैमूरलंग हा इतिहासातील एकप्रसिद्ध सरदार. तो पराक्रमी होता परंतु तेवढाच अत्याचारी. हल्ले करून जिंकलेल्या प्रदेशातील लोकांवर तो अत्याचार करायला मागेपुढे पहायचा नाही. अशा लोकांना गुलाम करण्यासाठी तो जबरदस्ती करायचा. एकदा त्याने असेच खूप गुलाम पकडले. त्या गुलामांना विकण्यासाठी तो स्वतः सौदेबाजी करायचा व त्याने ठरविलेल्या भावात सौदा झाला की त्या गुलामांना विकायचा. एकदा त्याने पकडलेल्या गुलामामध्ये तुर्कस्तानामधील एक अध्यात्मिक संत अहमदी देखील होते. तैमूरलंगाला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती समजली होती. सर्व गुलामांना एकत्र केल्यानंतर तैमूरलंगाने त्यातील दोन गुलामांना बाहेर काढले व अहमदीजवळ येऊन तो त्यांना म्हणाला, सांगा या दोन गुलामांची किंमत किती असेल.

    अहमदीने त्या दोन गुलामांकडे निरखून पाहिले व ते म्हणाले, हे गुलाम समंजस वाटतात त्यामुळे त्यांची किंमत पाच हजार मोहराहून कमी असू शकत नाही. त्यांचे उत्तर ऐकून तैमूर लंगाला अहमदी यांची थट्टा करण्याची इच्छा झाली. तो त्यांना म्हणाला बरं, आता सांगा की, माझी किंमत किती असेल? त्यावर अहमदी चटकन म्हणाले, फक्त दोन मोहरा. त्याचे उत्तर ऐकून तेमूरलंग खूप संतापला. तो अहमदी यांच्या अंगावर धावून ओरडत म्हणाला, तू माझा अपमान करतोस? माझ्याजवळ असलेल्या दस्तीचीच (रुमाल) किंमत दोन मोहरा आहे. त्यावर अहमदी म्हणाले, मी त्या दस्तीचीच किंमत सांगितली. तुझ्यासारख्या अत्याचारी सरदाराची किंमत तर केवडीचीही नाही. त्यानंतर अहमदी यांनी तैमूरलंगाने केलेल्या अत्याचारांची सर्व गुलामांसमोर जंत्रीच सादर केली. सर्व गुलामांना वाटले आता अहमदी यांना तैमूरलंग ठार मारणार.

    मात्र अहमदी यांच्या सत्य वाणीने तेमूरलंगाची विवेकबुद्धी जागी झाली व त्याने अहमदी यांची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता केली.

      January 1, 2018


  • खारी आंबील

    ग्रामीण भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये म्हसोबाच्या मांसाहारी जत्रा चालू होतात. तर दुसरीकडे तीन वर्षातून एकदा ताई आईची यात्रा सुद्धा आषाढ महिन्यात होत असते. एकीकडे मुके चार पायाचे जनावर देवाच्या पुढे कापायचे. म्हणजे भाऊ किती लोकांना त्रास होत नाही अंगाला फोड्या येत नाहीत किंवा काळे भोंगे उठत नाहीत. अशी एक अफवा पारंपारिक पद्धतीने ऐकावयास मिळते

      August 11, 2023


  • एक परीस स्पर्श ( भाग – ४८ )

    विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही… सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही…  म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे.

      August 26, 2022


  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ८

    त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

      April 8, 2020


  • एक परीस स्पर्श (भाग – ३९)

    दोन दिवसावर विजयच्या मामाच्या मुलाचे लग्न आल्यामुळे आणि विजयचा मामा विजयच्याच इमारतीत राहात असल्यामुळे लग्नाला येणारे सर्वच नातेवाईक विजयच्या आईलाही भेटायलाही येणारच ! त्यामुळे निदान त्यांच्यासमोर तरी विजय बरा दिसावा म्हणून विजयच्या आईने विजयला केस काळे करून यायला सांगितले ! आईने सांगितले नसते तरी त्याने ते केलेच असते कारण सार्वजनिक कार्यक्रमात अथवा लग्नासारख्या कार्यक्रमात वागण्या बोलण्याचे नव्हे तर दिसण्याचेही विजयचे एक तंत्र आहे..

      August 3, 2022


  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १४

    थिंपूत मौशु आईची आठवण काढीत मुसमुसत जोगना बरोबर न संपणारी रात्र पुढे ढकलत होती. नियतीने मांडलेला हा क्रूर खेळ कधीच संपणार नव्हता का?

      January 4, 2022


  • खरा भक्त आणि भोंदूबाबा

    अंधश्रध्देवर प्रहार करून जळजळीत सत्य उलगडणारी लघुकथा

      April 1, 2017


  • प्युली

    जंगली भागात, पहाड-पर्वतामध्ये एक छोटेसे पिवळ्या रंगाचे फूल दिसून येते. टेहरी, गढवाल मधील लोक त्या फुलाला ‘प्ली’ म्हणून ओळखतात. तिकडील लोकांमध्ये या फुलासंबंधी एक लोककथा आहे

      November 15, 2025


  • नूतनीकरण

    आठ-दहा दिवसांनंतरची गोष्ट. रविवारचा दिवस होता. मी दासबोधाचा क्लास संपवून घरी आले. दार उघडले तर समोरच एक मुलगा बसलेला होता. निळे जीन्स पँट आणि पिवळ्या-निळ्या चौकडीचा शर्ट त्याने घातलेला होता. पंख्याच्या वाऱ्याच्या झोताने हलके हलके उडणारे त्याचे सिल्की केस मस्त दिसत होते.

      May 7, 2022


  • संन्याशी आणि उंदीर!

    सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली.

      November 29, 2016