नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.
October 30, 2021
एक होता राजा. त्याचं राज्य लहान होतं; पण मन मोठं होतं. त्यामुळं तो सुखी होता, आणि त्याची प्रजाही सुखी होती.
एकदा तो फिरत-फिरत एका जत्रेत जाऊन पोचला. तिथं त्याला एक तरुण दिसला. त्याच्या हातात सफरचंदाच्या झाडाची एक फांदी होती आणि त्या फांदीला सात सफरचंद लागली होती. राजाला मोठी गंमत वाटली. त्यानं त्या तरुणाला विचारलं, ‘काय रे भाऊ, ही सफरचंद विकायची आहेत कां?
October 5, 2025
आधी मुंबईमध्ये आणि नंतर नव्या मुंबईत जागांच्या किंमती कशा आणि किती पटींत वाढल्या याच्या गोष्टी आम्हाला कोणी ना कोणी ज्येष्ठ नेहमीच ऐकवत असतो. त्या अरेबियन नाईटस् मधल्या गोष्टीप्रमाणे सुरस आणि चमत्कारिक वाटतात. सीबीडीला आजच्या रद्दीच्या किलोच्या भावाने म्हणजे एक चौरस फुटाला दहा बारा रूपयेप्रमाणे लोकांनी जागा चाळीस वर्षांपूर्वी घेतल्या आणि आजच्या सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमतीत विकून पैसा केला. अशा त्या गोष्टी.
February 4, 2026

काल कित्येक वर्षानंतर विजयने पुन्हा हातात रंग आणि ब्रश घेतला. त्याच्या पुतणीला एक चित्र काढून हवं होतं. पण विजयचा हात आता पूर्वीसारखा वळण घेत नव्हता. पूर्वी तो चित्र काढताना त्याला खोडरबर क्वचितच वापरावा लागत असे.
February 18, 2022
राष्ट्रभक्तीची भावना प्रखर असली, की समोर मृत्यू जरी येऊन उभा राहिला तरी त्याची तमा नसते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्यूला कवटाकेल्या अनेक क्रांतिकारकांनी हे सिद्ध केले आहे. या राष्ट्रभक्तीला कशाचेच बंधन नसते. ना वयाचे, ना जातीचे, ना धर्माचे. खान्देशातील बाल शिरीषकुमारची कथा हेच सांगून जाते. इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाची लाट देशभर उसळली होती व हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारचेही जोरदार प्रयत्न चालू होते. नंदूरबारला एका शाळेत शिकणाऱ्या बारातेरा वर्षांच्या शिरीषकुमारचे मन इंग्रजांविरुद्ध बंड करून उठले. गोऱ्या राजवटीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी जेव्हा नंदूरबारला मिरवणूक निघाली, तेव्हा शिरीषकुमार तिरंगा झेंडा घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होता. इंग्रजी सैनिकांनी मिरवणूक हाणून पाडण्यासाठी प्रथम लाठीमार केला; तरीही मिरवणूक पांगली नाही' शेवटी बंदूकधारी इंग्रज सैनिक आले. त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली तरीही बहादूर शिरीषकुमार डगमगला नाही. तो आपला तिरंगी झेंडा घेऊन पुढे चालतच राहिला आणि कोठूनतरी एक गोळी सूऽऽ सूऽऽ करीत आली अन् शिरीषकुमारच्या छातीत घुसली आणि तो खाली कोसळला. मात्र हातातील झेंडा त्याने शेवटपर्यंत सोडला नाही. ' भारतमाता की जय' असे म्हणतच त्याने शेवटचा श्वास मोडला. शिरीषकुमारची ती प्रखर राष्ट्रभक्ती पाहून सारेच धन्य झाले. आजही नंदूरबार म्हटले की, सर्वप्रथम हुतात्मा शिरीषकुमारची आठवण येते.
February 9, 2017
ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता.
December 28, 2022
सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची.
August 24, 2017

त्या तिघांच्या जीवनातील रोजची सकाळ आजही नेहमी प्रमाणे उजाडली होती. मौशु नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती. बाबा बरोबर मजेत शाळेत गेली. संगीताने नेहमी प्रमाणे १० वाजता घर सोडले.
December 27, 2021
आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….
September 16, 2021
रत्नागिरीकर भाग्यवान, कारण स्वातंत्र्यदेवतेचा साक्षात अवतार या भूमीत राहून गेला . ज्याच्या कर्तृत्वाला , त्यागाला , विजिगीषू वृत्तीला देशभक्तीला , दूरदृष्टीला , विज्ञानवादी दृष्टिकोनाला , साहित्याच्या सर्व प्रांतात निष्ठेने दिलेल्या योगदानाला , जिद्दीला, साहसाला आणि अतुलनीय अशा त्यागमूर्तीच्या अविस्मरणीय कर्तृत्वाला प्रतिमा प्रतीकं आणि शब्दात साकारणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्याएवढं अवघड काम !
आपण सूर्याच्या दाहकतेला स्पर्श करू शकत नाही, पण क्रांतिसूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
कारातीर्थाचे
दर्शन घेऊन मनोमन कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना ?
२६ फेब्रुवारी ही क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी !
आपण सर्वांनी रत्नागिरीच्या तुरुंगात निर्माण झालेल्या कारातीर्थाला जायला हवं . दर्शन घ्यायला हवं . मनोबल जागवायला हवं . वाढवायला हवं .
सावरकर अभिवादन यात्रा आणि सावरकर विचार यांची एक चळवळ सुरू व्हायला हवी.
आपलं हे कर्तव्यच आहे, आपण आपल्या कुटुंबियांसह दर्शन घ्या.
स्मार्टफोन मध्ये गुंतलेल्या आपल्या तरुण पिढीला सांगा…
रत्नागिरी बाहेर असलेल्या सर्वाना, येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना, महाराष्ट्रातील सर्वाना सांगा…
रत्नागिरीत कारातीर्थ आहे,त्याचं दर्शन घ्या, तिथे असलेल्या बेड्या, साखळदंड यांना कृतज्ञतेने स्पर्श करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतेने अभिवादन करा.
January 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti