नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला.
December 20, 2023
सर विमानात बसले. दिवस बराच हेक्टिक होता. उद्यापासून दिल्लीचे त्याहीपेक्षा हेक्टिक वेळापत्रक सुरु होणार होते. नव्यानेच सुरु झालेल्या बी -स्कूल ते संचालक म्हणून नुक्तेच रुजू झाले होते. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचे आव्हान त्यांच्या नजरेसमोर होते. त्यावरच पुढील वर्षाचे प्रवेश आणि बी स्कूलची पायाभरणी होणार होती.
February 4, 2026
एका गावात एक पाथरवट ( दगड फोड्या) राहत होता. तो रोज भल्या पहाटे आपला डोंगरावर जाई आणि मोठ्या शिळा फोडून, त्यांचे तुकडे गावातील शिल्पकारांना विकत असे.
एकदा असाच तो शिळा फोडत होता. दुपारची वेळ… वरुन सूर्य आग ओकत होता. दगड फोड्याने थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याने वरुन बघितल तर राजाचा एक मोठा अधिकारी रस्त्यावरून पालखीतून मोठ्या मजेत चालला होता. आजूबाजूला सेवक वर्ग त्याची सेवा करत होते. त्याला ना उंहाची पर्वा होती ना पाण्याची! दगड फोड्या स्तिमित झाला. म्हणाला “अहाहा!! काय सुंदर जीवन आहे. काही त्रास नाही, काही कष्ट नाहीत !! हा माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. मी जर हा अधिकारी असतो तर काय मजा आली असती.” काय आश्चर्य!! तो दगड फोड्या पुढच्याक्षणी तो अधिकारी झाला.
September 16, 2017

इतक्यात मला ती दिसली.. गावाकडे पहिली होतो.. आता ओळखू येत नव्हती.. कोणत्या साहेबाची , कृपा ‘ झाली कोण जाणे. मी तिच्या समोरच होतो… तिनेही रोखून बघीतले आणि मला ओळखले..
July 5, 2021
पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.
February 2, 2026
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा.
January 20, 2026
पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी तो निवांत बाल्कनीतल्या खुर्चीत बसला होता.. पाऊसही सगळ्या परिसीमा ओलांडून बरसत होता.. अगदी त्या रात्री सारखाच !!…त्यामुळे तो जुना प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहणं सहाजिकंच होतं …
February 4, 2026

घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो…
November 2, 2019

June 1, 2022
एक गरीब विणकर होता. त्याची त्याच्या कामावर अतिशय श्रद्धा होती. अतिशय मन लावून तो त्याच्या मागावर वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे तयार करायचा. थंडीचे दिवस आले म्हणून त्या विणकराने अतिशय परिश्रम घेऊन दोन कांबळ्या ( धोंगडीचा प्रकार) तयार केल्या. त्याच गावात एक अतिशय लबाड सावकार राहत होता. तो एकदा विणकराच्या घरावरून जात असताना त्याला त्या दोन कांबळ्या दिसल्या. त्याला त्या आवडल्या म्हणून त्याने विणकराकडून त्या खरेदी केल्या. मात्र ' आता माझ्याजवळ पैसे नाहीत उद्या घरी येऊन पैसे घेऊन जा' असे त्याला सांगून तो त्या कांबळ्या घेऊन गेला.दुसरे दिवशी विणकर पैसे मागण्यासाठी सावकाराच्या घरी गेला. मात्र सावकाराला त्याचे पैसे बुडवायचे होते म्हणून सावकाराने त्याला खोटेच सांगितले. ' अरे काय सांगू, कांबळ्या ज्या खोलीत ठेवल्या होत्या तेथे अचानक आग लागली व त्या आगीत कांबळ्या जळून गेल्या ' मात्र विणकराचा त्याच्यावर विश्वास बसला नाही तो म्हणाला, ' आगीत कांबळ्या जळून जाणे शक्यच नाही. '
त्यावर लबाड सावकार म्हणाला, ' अरे त्या कांबळ्यावर रॉकेलचा डबा सांडला होता. त्यामुळे त्या जळाल्या. ' त्यांचा हा वादविवाद चालू असताना व्यापाऱ्याच्या समर झेक जमले. विणकर जातानाच आणखी एक कांबळे खांद्यावर घेऊन आला होता तो व्यापाऱ्याला म्हणाला, 'रॉकेल सांडले असते तरी माझ्या कांबळ्या जळणे शक्य नाही. तुमचा विश्वास नसेल तर माझ्या या नव्या कांबळ्यावर रॉकेल टाकून त्याला आग लावा. ' लोकांनीही व्यापाऱ्यालाच आग्रह केला त्यामुळे व्यापाऱ्याने रॉकेल आणून त्या कांबळ्यावर टाकले व काडी पेटविली. क्षणार्धात आग लागली मात्र थोड्यावेळाने आग विझली. कारण कांबळ्यावरील केरूच फक्त जळाले होते. कांबळे शाबूत राहिले होते. ते पाहून लोकांनी विणकराची बाजू घेतली व त्या लबाड सावकाराला त्या दोन कांबळ्यांचे पैसे द्यायला लावले. सावकाराने खजिल होऊन विणकराला पैसे दिले. विणकराच्या प्रामाणिकपणाचा व सत्याचा विजय झाला होता.
February 13, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti