नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

ह्या विश्वात खरी मजा असते राव…. कोणीही कितीही नाव ठेवो.. कारण हे विश्व ‘शरीरापलीकडे आणि मनाच्या अल्याड’ असते…
June 21, 2021

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात…
November 1, 2019

जॕक लंडन हा प्रसिध्द अमेरिकन कादंबरीकार, कथाकार व सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक नियतकालिकांमधून कथा/कादंबऱ्या मालिका स्वरूपांत लिहिणं व लोकप्रिय करणं ह्याचं श्रेय त्याला जातं. त्याने सेलर (खलाशी) म्हणून कांही वर्षे काम केलं. त्याकाळचा अमेरिकेतला “व्हायोलन्स” अनुभवला. तो आणि जगण्याचा झगडा त्याच्या लिखाणामधे दिसून येतो. त्याने पंधरा सोळा कादंबऱ्या, सुमारे तीनशे कथा व अनेक लेख लिहिले. व्यावसायिक दृष्ट्या लिखाणावर पैसे कमवून श्रीमंत होणारा तो पहिलाच लेखक. दुर्दैवाने तो केवळ चाळीसाव्या वर्षीच मरण पावला. प्रस्तुत गोष्ट त्याच्या इतर लिखाणाहून थोडी वेगळ्या धर्तीची आहे. परंतु तितकीच प्रसिध्द आहे. आपणांस आवडेल अशी अपेक्षा आहे. अभिप्राय जरूर कळवावा.
April 20, 2022

आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते.
October 6, 2019
मी व्यवसायात उतरण्यात किंवा बेकरी सुरू करण्यात त्याचा अप्रत्यक्ष “सिंहाचा वाटा” असला तरी गेल्या दहा वर्षात या कंपनीची जी भरभराट झाली आहे त्यात मात्र माझ्या मित्राचा “प्रत्यक्षपणे” आणि अगदी “शब्दशः”.. .. “खारीचा वाटा“ आहे .. हाहा ss .. !! ….पौराणिक काळापासून चालत आलेला “खारीचा वाटा“ हा शब्दप्रयोग सगळ्यांनी पूर्वी अनेकदा ऐकलाय .. पण आमच्या सुरेशचा ; आजच्या आधुनिक युगातला हा “खारीचा वाटा“ नक्कीच वेगळा आणि तितकाच समर्पक आहे ना मंडळी ??
February 4, 2026
रत्नागिरीकर भाग्यवान, कारण स्वातंत्र्यदेवतेचा साक्षात अवतार या भूमीत राहून गेला . ज्याच्या कर्तृत्वाला , त्यागाला , विजिगीषू वृत्तीला देशभक्तीला , दूरदृष्टीला , विज्ञानवादी दृष्टिकोनाला , साहित्याच्या सर्व प्रांतात निष्ठेने दिलेल्या योगदानाला , जिद्दीला, साहसाला आणि अतुलनीय अशा त्यागमूर्तीच्या अविस्मरणीय कर्तृत्वाला प्रतिमा प्रतीकं आणि शब्दात साकारणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्याएवढं अवघड काम !
आपण सूर्याच्या दाहकतेला स्पर्श करू शकत नाही, पण क्रांतिसूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
कारातीर्थाचे
दर्शन घेऊन मनोमन कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना ?
२६ फेब्रुवारी ही क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी !
आपण सर्वांनी रत्नागिरीच्या तुरुंगात निर्माण झालेल्या कारातीर्थाला जायला हवं . दर्शन घ्यायला हवं . मनोबल जागवायला हवं . वाढवायला हवं .
सावरकर अभिवादन यात्रा आणि सावरकर विचार यांची एक चळवळ सुरू व्हायला हवी.
आपलं हे कर्तव्यच आहे, आपण आपल्या कुटुंबियांसह दर्शन घ्या.
स्मार्टफोन मध्ये गुंतलेल्या आपल्या तरुण पिढीला सांगा…
रत्नागिरी बाहेर असलेल्या सर्वाना, येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना, महाराष्ट्रातील सर्वाना सांगा…
रत्नागिरीत कारातीर्थ आहे,त्याचं दर्शन घ्या, तिथे असलेल्या बेड्या, साखळदंड यांना कृतज्ञतेने स्पर्श करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतेने अभिवादन करा.
January 20, 2026
दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?
February 2, 2026

हॉर्स डीलर्स डॉटर ही जरी लघुकथा असली तरी ती ६५५० शब्दांची आहे. (मी रूपांतर २२४५ शब्दांत केलं आहे). औद्योगीकरणाच्या लाटेत अनेकांचे व्यापार बसले. तसा ह्या कुटुंबप्रमुखाचाही धंदा बसला. नंतर तो मरण पावला. धडधाकट पण कुचकामी तीन मुलगे आणि हिंमत न हरतां कृतीशील रहाणारी मुलगी शेवटी दारिद्र्यांत एकटी पडते, तेव्हां आत्महत्त्येचा निर्णय घेते. योगायोगाने एक तरूण तिला वाचवतो आणि ती त्यालाच जबरदस्तीने प्रेमिक करून त्याचा आधार घेते. तिचे त्याच्यावर प्रेम आहे/होते असा उल्लेखही नाही. स्त्रीची अपरिहार्यता त्यांत अधोरेखित केली आहे. इंटरनेटवर ह्या गोष्टीची अनेक परीक्षणे वाचायला मिळतील. त्यांत “रद्दी” पासून “अत्त्युत्तम” पर्यंतचे सर्व प्रकारचे मूल्यमापन आहे. ही कथा समजायला कठीण आहे. घोडे व्यापा-याशी संबंधित म्हणून अनेक ठीकाणी घोड्यांचा, घोड्यांच्या शरीराचा, हालचालींचे अनेक उल्लेख आणि माणसाचे पशुच्या स्तरावर जगणे ह्याचे उल्लेख आले आहेत. औद्योगीकरणामुळे कुटुंबातील व्यक्तींतला जिव्हाळा संपला आहे, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो आहे, हे प्राणीसदृश वर्तन दर्शवले आहे. माझ्या रूपांतरीत कथेच्या व्याप्तीत (तरी ती १५००ची मर्यादा सोडून दीडपट झाली आहे) ह्या सर्व गोष्टी तितक्या समर्थपणे दाखवणे कठीण होते. पण मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व कथा तुम्हांला सादर करत आहे.
April 3, 2022
‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
“सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.
July 14, 2026
राधिकाला या नवीन जागेत येऊन आता तीन महिने झाले होते. राधिकाचा नवरा राजीव बँकेत नोकरीला होता. बँकेचे कर्ज थकवणाऱ्या एका कर्जदाराचे हे घर बँकेने ताब्यात घेऊन लिलाव केला होता त्यातून ते राजीवला मिळाले होते. पनवेल शहरात अगदी मोक्याच्या जागी ते दुमजली घर होते.
June 12, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti