नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आता शाळेला सुट्टी लागली की मला. खूप बोअर होत. काय करणार अशी भुणभुण लावली होती नातवाने. अरे आम्ही अशा दिवसात खूप मज्जा करायचो. तू असे कर बुडबुडे कर. त्याला समजले नाही म्हणून तो म्हणाला की म्हणजे वॉटर बबल्स का. पण ते आता मिळत नाही. बाहेर गेल्यावर असेल तर विकत घ्यावे लागते. हो ना पण आम्ही घरीच करायचो. त्यामुळे तो उत्सुक होऊन ऐकत होता. आम्ही फुलपात्रात पाव ते अर्धे असे पाणी घेऊन त्यात थोडेसे साबणाचा चुरा टाकायचो. मग कागदाची नळी पुंगळी वळून त्याने त्या पाण्यात फूंकर मारली की बुडबुडे छोटे छोटे तयार होऊन फुलपात्राच्या वर यायचे. आम्ही चाळीत वरच्या मजल्यावर जाऊन त्या नळीनेच फुंकर मारुन लहान मोठे फुगे सोडायचो. कधी कधी ते खूप मोठे तर कधी लहान तर कधी फुसके पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पाणी तोंडात गेले नाही पाहिजे...
मग आम्ही कठड्यावरुन ते पाण्याचे फुगे सोडून द्यायचो. आकाशाकडे तोंड करून फुंकर मारली तरी फुगे खालीच जातात. तेव्हा खालील बाजूस उभे असलेले आमची बच्चे कंपनी ते फुगे हातात घेण्यासाठी उड्या मारत. कधी कधी तर इंद्रधनुष्या सारखे रंग दिसतात.
हे ऐकून त्याला मजा वाटली. पण मी विचार करत होते की माणसाचे आयुष्य म्हणजे एक बुडबुडाच आहे ना. कितीही आकाशात गरुड झेप घेऊन खूप काही मिळवले तरीही शेवटी जमीनीवर मातीतच शेवट आहे. काही शेवटपर्यंत जातात. तर काही आकालीच.....असो मी तरी कुठल्या कुठे विचारात भरकटत गेले आहे. पण त्या बुडबुड्यांची मजा काही औरच होती. पैसा खर्च नको. बोअर होत नाही. जिद्द निर्माण होते आणि बरेच काही.पण तो म्हणाला तसे बाजारात मिळतात तर मग कशाला उगाच धडपड करायची. बरोबर आहे ना त्याचे आजकाल सगळे काही मिळते. फक्त पैसा फेको तमाशा देखो. सगळे काही मिळत मात्र आंनद व समाधान विकत मिळत नाही म्हणून..
धन्यवाद
–सौ. कुमुद ढवळेकर.
September 4, 2022
पुढील कार्यक्रम आयोजक अशोक शेवडे यांच्यासाठी दिवाळी पाडव्याला डोंबिवली येथे झाला. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्याबरोबर मी गायलो कार्यक्रमाचे निवेदन प्राची देवस्थळी आणि अशोक शेवडे यांनी केले. रोटरी क्लब आयोजित अंध विद्यार्थ्यांसाठीच्या शिबिरात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या सोबत माझी प्रकट मुलाखत घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनी गाण्यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. त्यांचा गाण्याबद्दलचा इतका अभ्यास पाहून मला आश्चर्य वाटले. परमेश्वर जेव्हा एका शक्तीपासून वंचित ठेवतो, तेव्हा दुसऱ्या क्षमता वाढवून देतो. ही मंडळी अतिशय बारकाईने गाणे ऐकतात हे माझ्या ध्यानात आले. त्या दिवसापासून मी डोळे बंद करून गाणे ऐकायला लागलो.
२०१३ या वर्षाची सुरुवात एका सुगम संगीत स्पर्धेने झाली. जोशी-बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे मी परीक्षण आणि गायन केले. या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग या स्वतः उत्तम गायिका असल्याने त्यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी मी अहमदाबाद, औरंगाबाद, इंदूर आणि बडोदे येथे जाऊन आलो. ठाण्याला परतल्यावर एका मोठ्या कार्यक्रमाची तयारी आम्ही सुरू केली. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी माघी गणेश चतुर्थीनिमित्त कळवा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माझी विद्यार्थिनी नेहा नामजोशी या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायली. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर पाच हजार लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माझ्यासाठीही हा कार्यक्रम फारच विशेष होता. कार्यक्रमानंतर सर्व वादकांनी माझे अभिनंदन केले. आयोजकांतर्फेही माझा सत्कार करण्यात आला. कारण माघी गणेश चतुर्थीच्या रात्री त्या वक्रतुंड महाकाय श्रीगजाननाच्या कृपेमुळे मी ९५०वा जाहीर कार्यक्रम पूर्ण केला होता.
घरी प्रियांका, मुली आणि आई माझी वाटच पहात होत्या. आईने माझी दृष्ट काढली. गाणे माझ्याकडे आईकडूनच आले होते. माझी पहिली गुरुदेखील आईच होती. प्रत्येक कठीण प्रयोगाच्या वेळी आई भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. प्रियांका आणि मुलींनी माझे अभिनंदन केले. “अरे हो हो! इतके माझे कौतुक का करताय? मी अजूनही माझ्या ध्येयाच्या ५० कार्यक्रम मागे आहे." मी म्हणालो.
“असा विचार करू नका. इतके कार्यक्रम करणेदेखील खूप कठीण गोष्ट आहे.” प्रियांकाने पत्नीच्या अधिकारात मला समजावले. एक हजार कार्यक्रमाचे माझे ध्येय गाठण्याच्या नादात मी ९५० कार्यक्रम पूर्ण केल्याच्या या क्षणाचा आनंद घेऊ शकत नव्हतो. आत्तापर्यंत कधी असे घडले नव्हते. मग आत्ताच असे काय होत होते? मला एकदम जाणवले की आता मी माझ्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. एक हजार कार्यक्रम पूर्ण करण्याची मला घाई झाली होती. मी मोठी चूक करत होतो. मी धीराने घ्यायचे ठरवले. असेही ठरवले की, आता समोरून येणारे सगळेच कार्यक्रम करायचे नाही, तर काही निवडक कार्यक्रमच हाती घ्यायचे. आता मी दुसरी मोठी चूक करत होतो. माझ्या या निर्णयामुळे माझ्याच कार्यक्रमांचा वेग मंदावणार होता. पण त्यावेळी मला हे समजत नव्हते. पन्नास कार्यक्रम करणे हे देखील किती कठीण काम असू शकते याचा प्रत्यय मला पुढील काळात आला.
-अनिरुद्ध जोशी
August 18, 2022
दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर. ११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले.
August 11, 2022

नदीच्या काठी राळा पेरला
बाई राळा पेरला
एके दिवशी काऊ आला
बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेल
बाई तोडून नेल
सईच्या अंगणात टाकून दिल
बाई टाकून दिल
सईन उचलून घरात नेल
बाई घरात नेल
कांडून कुंडून राळा केला
बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली
बाई बाजारात गेली
चार पैशाची घागर आणली
बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली
बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला
बाई विंचू चावला
November 8, 2016
बरीच गाणी अशी असतात जी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंताशी जोडली जातात. अंदाज मधील “जिंदगी एक सफर है सुहाना….यहाँ कल क्या हो किसने जाना…” असे हसरत लिहून गेले( या गाण्याने हसरत यानां दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला) आणि संगीतकार जयकिशन आपली शेवटची चाल बांधून निघून गेले. “जाने कहाँ गए वो दिन….’’ हे त्यांचे गाणे आजही अंगावर काटा उभे करते व राज कपूरचा प्रचंड केविलवाणा चेहरा डोळ्या समोर तरळू लागतो. “झनक झनक तोरी बाजे पायलिया” चे सूर कानी पडताच राजकुमारचा दु:खमग्न चेहरा आठवतो. या गाण्यासाठी हसरत यानां डॉ. आंबेडकर पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड युनिव्हरसिटी राऊंडने त्यानां डॉक्टरेट बहाल केली होती.
September 21, 2018

तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान.
सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर .
तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट.
…आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद नाही , उत्तमपणे साडी नेसलेली..थोड्याशा उंच हिल च्या चपला .
खूपच सुंदर होती, नजर सतत खाली , जास्त बोलणे नाही ….
April 29, 2021
जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात.
November 22, 2019
कोविडने ज्या अनेक जीवनक्षेत्रांवर परिणाम केला त्यापैकी काहींचा ‘अनघा दिवाळी 2021‘ मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखमालिकेत परामर्ष घेतलेला आहे. पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक, लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत.
December 23, 2021
१९३७ मध्ये सावरकर पुण्याला आले होते.तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक निघाली. श्री शं. ग. चापेकर त्यावेळी वर्ग चालवत. त्यावेळी त्यांनी सावरकरांना हार घातला.व वंदन केले. सावरकरांनी त्यांना विचारले “आपण कोण ?” ते म्हणाले “मी चापेकर” सावरकर म्हणाले “ चापेकरांनी सावरकरांना हार नाही घालायचा. मीच चापेकराना हार घालायचा कारण मी चापेकर बंधुंपासून स्फूर्ती घेतली. असे म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील हार श्री शं. ग. चापेकर यांना घातला. १९३८ मध्ये सावरकर पनवेल येथे गेले होते. तेथे त्यांना वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतण्याने त्यांना हार घातला. व सांगितले कि फडक्यांची पत्नी जवळच शिरढोण येथे राहतात. व्याखान झाल्यावर सावरकर शिरढोण येथे गेले, त्यांना लवून नमस्कार केला. व पायावर हार घातला. १९३९ मध्ये सावरकर कलकत्याला गेले होते. त्यांच्या सत्कारावेळी त्यांना हार घातले गेले. त्यावर ते म्हणाले “याच पावन भूमीत क्रांतिकारक झाले. तेव्हा मला त्यांची आठवण येते आहे.” त्यानंतर त्यांच्यासोबत अंदमान मध्ये हृषीकेश, भूपेश गुप्ता, आशुतोष लाहिरी यांनी शिक्षा भोगली होती. त्यांचाही सन्मान व्हायला हवा म्हणून आपल्या गळ्यातील हार काढून त्यांना घालून मिठी मारली.
मादाम कामा सावरकरांची दुसरी आई होत्या. त्यांच्या बद्दल सावरकरांना अत्यंत आदर होता. त्यांनीसुद्धा सावरकरांवर पोटच्या मुलाप्रमाणे माया केली. १५- १२ १९१४ ला भावाला लीहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात “कामांना भेटायची उत्कंठा मला किती आहे मी सांगू शकत नाही. त्या तुला नियमित पत्र पाठवतात. हे वाचून आनंद झाला. त्यांच्या उदात्त चरित्र याबद्दल अत्यंत आदर आहे. मी त्यांना समक्ष भेटू शकत नाही याचा मला खेद आहे तेव्हा आपल्या आप्ता आधी मादाम कामांना माझा प्रणाम सांग.” १९२५ मध्ये सावरकरांचे अत्यंत जवळचे स्नेही अय्यर निधन पावले. त्यावेळी लिहिलेल्या मृत्युलेखात ते लिहितात “अति दु:खामुळे माझे जीवन असह्य झाले होते. अनेकदा जीवनही नकोसे वाटे. तुझ्या निधानानी माझ्यावर ताण पडला आहे, ज्यांच्यासाठी तू सोसलेस त्यांनी तुझ्याशी सबंध ठेवले नाहीत. तू जी गुप्त कामे केलीस ती लिहावीशी वाटतात पण लिहू शकत नाही. तुला जिवंतपणी कधीच शांतता लाभली नाही ती आता तुला लाभो.“
-- रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई).
September 24, 2022
जळी स्थळी एकच नारा. मुखपट्टी. (मास्क) अंतर आणि हात धुणे. कोरोनाने याचा खूपच उदोउदो केला आहे. माहिती नाही हे सगळे अजून किती दिवस चालणार आहे पण या त्रिसूत्री जबाबदारीने आणखीन काही गोष्टी शिकवल्या आहेत.
December 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti