नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
असे म्हणतात की स्वतः दत्तगुरूंनीदेखील २४ गुरू केले होते. त्यांनी निसर्गातील पक्षी प्राण्यांकडून आपले ज्ञान प्राप्त करून घेतले, त्याचप्रमाणे मलादेखील शाळेत जाण्यापूर्वी आणि आयुष्यात एक गुरू लाभला तो गुरू म्हणजे माझी ” आई “.
November 11, 2021
भगवान युद्ध सत्य, अहिंसा आणि मोक्षमुक्तीचा मार्ग कसा मिळवायचा याची लोकांना शिकवण देत देत एका गावात आले. त्यांना भेटण्यासाठी एक माणूस आला. बुद्धांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या धर्माद्वारे सत्य, अहिंसा आणि मोक्षप्राप्तीचामार्ग सांगत आहात. परंतु मला सांगा, तुमची शिकवण ऐकून किती लोकांना मोक्षप्राप्ती झाली किंवा मुक्ती मिळाली. गौतम बुद्धांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ते स्मितहास्य करून त्याला म्हणाले की, तुझा प्रश्र अगदी योग्य आहे. मात्र त्या प्रश्र्नाचे उत्तर मिळण्यासाठी तूच एक काम कर. या गावातील अनेक लोकांना तू भेट व त्यापैकी किती लोकांना शांती हवी अहे, किती लोकांना सत्याचा मार्ग हवा आहे व किती लोकांना मोक्ष हवा आहे याची तू यादी तयार कर वती घेऊन माझ्याकडे ये म्हणजे मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन.गौतम बुद्धानी सांगितल्याप्रमाणे तो माणूस त्या गावातील लोकांना भेटला च त्याने अनेकांना याबाबत तुम्हाला नेमके काय हवे आहे, असा प्रश्र विचारला. कोणी म्हणाले, आम्हाला भरपूर पैसा हवा आहे. त्याच्यामुळेच सुख-शांती मिळू शकेल. कोणी म्हणाले, आम्हाला सुपीक जमीन हवी आहे, तरक्केणी म्हणाले, आम्हाला सत्ता हवी आहे, - कोणाला राजवाडा हवा होता, तर कोणाला चांगली नोकरी हवी होती. एकानेही मला मोक्ष हवा आहे, असे पटकन संगितले नव्हते. काही दिवसांनी तो माणूस गौतम बुद्धांना भेटला व त्याने तयार केलेली यादी बुद्धांना सादर केली व बुद्धांना तो म्हणाला, लोकांना सत्य, शांती आणि मोक्ष सोडून बाकीचे सर्व काही हवे आहे. त्यावर बुद्ध त्याला म्हणाले, तुझ्या प्रश्राचे उत्तर तुला आता मिळालेच आहे. लोकांना जे काही हवे आहे त्यामुळे त्यांना सुख-शांती किंवा मोक्ष मिळणार नाही.उलट सुखाच्या प्राप्तीसाठी ते दुःखाच्या मार्गाने चालले आहेत. गौतम बुद्धांच्या या उत्तराने स्वा माणसाचे समाधान झाले व तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून निघून गेला.
February 12, 2017
भूतकाळ हे असे फक्त “स्वतःचे “असतात -फक्त स्वतःचे ! आसपासच्यांना कधी ते दुरून दिसतात, कधी हलकेच स्पर्शून जातात , पण एखादा “रुहानी ” आवाज वाला किशोर त्यांना छेदून जातो , एखादा गुलज़ार त्यावरची खपली काढतो.
April 19, 2022
आधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें,
August 6, 2017
निसर्गाच्या विविध चमत्काराबरोबरच कॅनडातील मानव निर्मित कलाकौशल्ये पाहून आम्ही भाराऊन गेलो. विज्ञानाची कास धरत मानवाने केलेले अदभुत चमत्कार थक्क करून सोडणारेच होते. कॅपिलानो ब्रीज हे त्यापैकीच एक ! कॅपिलानो ब्रीज म्हणजे मानवी कौशल्याचा अद्भुत चमत्कार असल्याची अनुभूती आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर झाली. मती गुंग करणारीच ही स्थापत्य कला आहे. तिथले दृश्य पाहून निसर्गाच्या किमयेचे नि त्यात भर घातलेल्या कृत्रिम कल्पकतेचे कौतुक वाटले. कॅपिलानो सस्पेंशन ब्रिज, ट्रीटॉप्स अँडव्हेंचर आणि रोमांचक नवीन क्लिफवॉक अशा तीन चित्तथरारक सौंदर्याने मन भारावून गेले.
April 8, 2021
आयटी क्षेत्रातील गतीमान घडामोडींवर ताज्या दमाचे लेखक चेतन भगत यांनी ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ‘वन नाईट ऽ द कॉल सेंटर’ या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. आयटी क्षेत्रातील युवकांच्या मानसिकतेचा मागोवा घेताना मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिबिब त्यात आढळते. शिवाय ‘पितृऋण’ या कादंबरीतून पारंपरिक संस्कृतीतील नातेसंबंध उलगडत जातात. दुयर्या महायुद्धानंतर ज्यूंवर झालेल्या अन्यायाची कहाणी ‘शिडलर्स लिस्ट’ या कादंबरीतून समोर येते.
March 24, 2010
वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे. मुलगी, स्वाती (जर्मनीत), मुलगा, शेखर आय.आय.टी. (फायनलला ), पुण्यात कोथरूड सारख्या भागात स्वतंत्र बांगला. एकंदर ते एक ‘आदर्श जेष्ठ नागरिक ‘ होण्याच्या बेतांतले, उच्च माध्यम वर्गीय गृहस्थ.
April 7, 2019
किती साधे तिचे बोल होते. अगदी सहज ती ते व्यक्त करीत होती. त्या छोट्या मुलीजवळ केवळ प्रासंगिक अनुभवलेल्या घटनांची शिदोरी होती. ती ते मज जवळ उघडे करीत होती. आपण काय व्यक्त करतो ह्याची कदाचीत तिला कल्पनाही नसेल. परंतु जीवनाचे एक प्रचंड तत्त्वज्ञान ती माझ्यावर, एक आजोबा झालेल्या वयावर फेकीत होती.
October 8, 2018
मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता .
वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती .
December 15, 2022
गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय ! चार मुडदे पडलेत ! हो या रेल्वेस्टेशनच्या परिसरात ! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय ! का ? माहित नाही. पोलीस पण चक्रावलेत .
December 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti