नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
९८ च्या मार्चमधील चौदा तारखेला आम्हाला ‘दादा गेले’ असा फोन आला. दादा गेले हे मानायला मन तयार नव्हतं. दादांच्या सहवासात राहून अजून खूप काम करायचं बाकी होतं. त्यांना नवीन चित्रपट निर्मिती करायची होती. सगळंच अर्धवट सोडून दादा निघून गेले.
February 16, 2022
जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन, त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.
April 10, 2020
21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे.
August 8, 2022
जसजसे दिवस जाऊ लागले,तसतसा वेदमध्ये एक नवा जोश दिसू लागला. आता त्याची नजर होती वर्क्स मॅनेजर या पदावर! त्यादृष्टीने फॅक्टरीत त्याची पाऊले पडू लागली. ग्वॉलियरवाल्यांनी जॉब वर्क दिल्याने एक नवा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता.
April 8, 2022
दिल्लीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्राचा चित्ररथ करण्याची अनेक वर्षे संधी मिळाली. त्यात अकरा वेळा सर्वोत्कृष्ट चित्ररथाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली.
October 25, 2021
चिखलातले कमळ जव्हार ( ठाणे ) ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात Medical Superintendent म्हणून कार्यारात होतो. रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली की दोन दिवसापूर्वी ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता, ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती.
July 2, 2012
काळ हा घड्याळ काढून ठेवले तरी चालतच असतो आणि तो पडद्याआड गेलेल्या गोष्टी विसरत नाही त्यामुळे काळानुसार फळ हे मिळतेच.
January 15, 2022
आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई.
November 17, 2018
दिवसभर चा संपूर्ण वेळ नोकरीत जातो. सायंकाळी घरी आलो की फ्रेश होऊन टी पॉंय वर जमा असलेले पेपर, वाचायचे बाकी आहेत म्हणून काढून ठेवलेल्या पुरवण्या, मासिके,साप्ताहिके वाचावयास घ्यावी; तर तेवढ्यात घरातून गृहलक्ष्मीचा आदेश, “अहो, बंड्याची ची परीक्षा जवळ आलीय, त्याचा अभ्यास घ्या. काय पेपर मध्ये डोकं घालून बसले आहेत!
कारण कथांतली नायिकाच शब्दबद्ध होत नव्हती.काही केल्या तिचं रूप मी चित्रित करू शकत नव्हतो.
June 27, 2026
अशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. लहान मुले आणि गाडीच्या पाठीमागून धावत येणारा कुत्रा ही सारी आठवण येते. लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतातून समाजात वावरणाऱ्या अनेक लोकांचे वर्णन चांगल्या पद्धतीने लिहिले आहे. पूर्वी लोक संगीतामध्ये अनेक जुनी गाणी संगीतात कंपोज करून समाजाला ऐकवली आहेत. पूर्वी कर्मणुकीची साधने अतिशय कमी प्रमाणात होती ग्रामीण भागामध्ये भजन सोंगी भजन ठराविक गावांमध्ये नाट्य संस्था. तमाशा आणि तमाशामध्ये सादर होणारे पौराणिक किंवा सामाजिक वग नाट्य. त्याकाळी भेदिक सुद्धा होते परंतु पूर्वी लोकसंगीत लिहिणारे लोककवी यांनी अनेक चांगली गाणी समाजाला ऐकवली आहेत. ती लिहिलेली गाणी पुन्हा पुन्हा कानावरून गेली म्हणजे एक प्रकारचं नवल वाटते. त्या गाण्यांमध्ये निसर्ग वर्णन बैलगाडी व बैलाचे वर्णन नात्यातील माणसांची गाणी ही राहून राहून आठवतात उदाहरणार्थ सखुबाई सखुबाईगं, तुझा नवरा बोलाव तुयागं, तंबाखू बिंबाखू खात असलं, डब्बी त्याला घावत नसंल, जा जा येत नाही म्हणून सांग. किंवा नाही खेळणार मुंबई मटका, वामनदादा कर्डक यांनी विविध विषयावर लेखन केले आहे हे प्रामुख्यात जाणवते. भिमाई रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश पडणारी कितीतरी गाणी ऐकावयास मिळतात….।
September 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti