(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महर्षी भृगू – मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर

    मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा परिचय प्रथमच मराठीत एकत्रितपणे करून दिला आहे.

      June 13, 2014


  • वेगळा (कथा) भाग २

    अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच – साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती,

      June 25, 2022


  • अफलातून योजना

    रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी  गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच  आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो,  विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती.  लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते.

      November 13, 2018


  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ९

    बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले.  आता ते उताराच्या रस्त्याला लागले.  हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं.  तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं  आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. …….

      April 9, 2020


  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ११

    संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले.

      January 1, 2022


  • टूर लिडर गोमु – भाग २ (गोमुच्या गोष्टी – भाग १०)

    दोन दिवसांत कांही मला नांव पाठ झाली नव्हती. पण कोणी चुकू नये म्हणून सर्वांना कंपनीने दिलेली टोपी सतत डोक्यावर घालायची मी ताकीद दिली होती. माझ्या नशीबाने तिथे कोणी चुकले नाही. आम्ही आल्प्सच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन आलो. उतरल्यावर पुन्हा बसमधून ल्युसेर्नला गेलो. तिथे मोठाले तलाव पाहिले. सर्व कसं ठरल्यासारखं होत होतं. मला जास्त कांही करायला लागत नव्हतं. सर्व सदस्यही युरोपचं काश्मीर पाहिल्याच्या समाधानांत होते.

      March 17, 2022


  • ।। मानसपूजा ।।

    ।। मानसपूजा ।।

    शुभंकर शिवशंकरच्या शुभाशीर्वादासाठी शब्दांच्या माध्यमातून साकारलेली ही मानसपूजा सादर करताना खूप आनंद होत आहे !

      March 1, 2022


  • ह्रदयातील ईश्वर

    महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला.

    द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभान होऊन त्यानी जींकण्याच्या अपेक्षेने पत्नी द्रौपदी हीलाही पणाला लावले. कौरवानी द्रौपदीची विटंबना सुरु केली. हारलेले पांडव मुकपणे सारा भयावह प्रकार बघत बसले.

    द्रौपदी असाहय्य झालेली होती. तीला कुणीही मदत करण्यास सरसावत नव्हते. शेवटी तीने मानलेला भाऊ श्रीकृष्णाचा धावा केला. तो धाऊन आला. त्याने तीला त्या वस्रहरण प्रसंगातून सोडवले. सारे वातावरण शांत होऊ लागले होते.

    द्रौपदी मात्र मानसिक निराशेने ग्रस्त झाली होती. ती कृष्णावर देखील रागावली. तीला एक आधीकार व प्रेम प्राप्त झाले होते.

    " कृष्णा हे सारे विक्षीप्त घडत असताना, मी तुझा धावा केला. तू आलास, परंतु तू येण्यास उशीर कां केलास ? " प्रेमाने परंतु निराशेच्या स्वरांत द्रौपदीने कृष्णाजवळ तक्रार करीत विचारणा केली. श्री कृष्णानी हासून उत्तर दिले.

    " तू माझा धावा केलास. मदतीची अपेक्षा केली. "

    तू त्या क्षणी काय म्हणालीस ते आठव. तू म्हणाली होतीस " हे द्वारकेच्या कृष्णा मी संकटात आहे. तू त्वरीत येऊन माझी सोडवणूक कर. "

    तू जेव्हां मला हांक दिली की " हे द्वारकेच्या कृष्णा, तेंव्हा त्याक्षणी मी तर तुझ्याच ह्रदयांत बसलो होतो. "

    जर तू मला " माझ्या ह्रदयातील कृष्णा संबोधून हाक दिली असतीस, तर मी तुझ्याजवळच होतो. त्याचक्षणी मला येता आल असत. परंतु तु मला द्वारकेच्या कृष्णा संबोधल्यामुळे मला प्रथम द्वारकेस जावे लागले व तेथून तुजसाठी आलो. त्यामुळे वेळ लागला. "

    आपण देखील जीवनांत ह्याच रीतीने आपली वाटचाल करतो. अशी समज आहे की तो ईश्वर हा तुमच्या आमच्यामध्येच असतो. अहं ब्रह्मास्मि अर्थात मीच ब्रह्म वा परमेश्वर आहे म्हणतात. मात्र आपण त्याला जाणत नसतो. समजत नसतो. "मी " ला ओळखत नसतो. त्याला आम्ही बाह्य जगांत शोधण्याचा सतत प्रयत्न करतो. देवस्थळे, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, मशिदी, इत्यादी मध्ये त्याच्या अस्तित्वाचा शोध बोध घेण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण आयुष्य खर्च करतो. आम्ही ईश्वराला आमच्यातच म्हणजे "मी " चा शोध घेण्यात कमी पडतो. त्यात वेळ खर्ची होते. ह्रदयातील त्या ईश्वराला श्री कृष्णाला जर द्वारकेत न्याल तर आयुष्याची वेळ वाया जाईल.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      March 9, 2015


  • आजोबा तुम्ही पुअर आहात का?

    झी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात, तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते……

      April 27, 2014


  • नवरात्र .. माळ चौथी

    पहाटे जाग आली की कधी कधी दिवसाची सुंदर सुरवात होते तुमच्या देखण्या , दैवी सुरांच्या सोबतीने !
    आणि मग आपण जे प्रत्येक काम करतोय त्यात आनंद वाटू लागतो …. तुमच्या शाश्वत सुरांचे बोट धरून मन लांबवर डोंगरदऱ्यात खळाळणाऱ्या झऱ्याकाठी फिरूनही येतं .. ताजंतवानं होतं .!

    पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकणारी ही अद्भूत कला अवगत करण्यासाठी लहानपणापासूनच तुमची खडतर तपश्चर्या सुरू झाली … शब्दाशब्दांच्या गाभ्यापर्यंत तुमच्या सुराचा जादुई स्पर्श पोहोचला आणि ते शब्द मग सुरांची आभा लेवून आले … तेजल ,तेजस्वी प्रभेने निथळत … सारा आसमंत भारून टाकायला … सदैव … काळाच्या अंतापर्यंत !

      October 2, 2019