(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आठवणी चहाच्या- (चहा दिवसा निमित्ताने)

    कितीही वेगळ्या तर्‍हा असल्या तरी चहा तो चहाच..सकाळी तरतरी आणणारा, स्फूर्ती पैदा कणारा..परीक्षेच्या वेळी रात्री जागण्यास मदत करणारा ..लग्न ठरताना” चहा पोहे ” खासच असणारा..थंडीत आलं घालून केलेल्या चहाची वेगळीच मजा असणारा…..असा हा चहा..

      December 15, 2021


  • माझ्या मातीचे गायन !

    १९९६ साली माझ्या पत्नीचा दुसरा काव्यसंग्रह ” वाटेवरच्या कविता ” प्रकाशित करण्याचा विचार पुण्यातील नीहारा प्रकाशनाच्या सौ. स्नेहसुधा कुळकर्णी यांनी बोलून दाखविला. मुखपृष्ठाची संकल्पना आमच्या गणपतीपुळे ट्रीपच्या बागेतील एका छायाचित्रावरून सुचली. प्रस्तावनेसाठी सुधीर मोघेंशी संपर्क साधला आणि काहीशा झटापटीनंतर ती मिळाली. (वो कहानी फिर कभी !) प्रश्न उरला – आशीर्वादाचा! यासाठी साहित्य सृष्टीतील आजोबा ” कुसुमाग्रज ” यांच्यापेक्षा अधिक समर्थ व्यक्ती कोण असू शकेल?

      June 5, 2021


  • ए फुलों की रानी

    लव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला.

      September 29, 2021


  • मी मदत करू ? (लघुकथा)

    कवटी फुटल्याचा आवाज झाला. रात्र गारठत होती. सगळी मंडळी आपापली बूड झटकत त्या मसणवट्यातून उठून घराकडे निघाली. त्याला झाडाआडून दिसत होते. चितेच्या लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता. सर्वत्र सामसूम झाल्याची खात्री करून, तो अंधारातून बाहेर आला. चितेजवळ जाऊन बसला. त्या लाल ज्वाळांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर उष्ण हवेचे झोत मारत होता. क्षणभर त्याला त्या उष्ण लहरी काहीतरी सांगताहेत असे भासले.

      November 22, 2020


  • छायाचित्रे – भूतकाळाची स्मारके !

    हातातून निसटणारे क्षण जिवाच्या आकांताने, किमान छायाचित्रांच्या मदतीने धरून ठेवणारे आपण सारेजण ! मग अशा “युनिक” स्मृती येणारच ना मनात !

      November 22, 2022


  • चिऊताई, चिऊताई

    गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चिऊताईच्या घरट्यासमोर कोरोना नावाचा परदेशी कावळा येऊन उभा राहिला. आपल्या बाळांच्या जीवाला आता धोका आहे, हे समजून चिऊताई घाबरुन गेली. कावळा बाहेरुन चिऊताईला सारखा ‘दार उघड, दार उघड’ म्हणून सतावत राहिला. त्याचा असा समज झाला की, मागील गोप्टीप्रमाणे चिऊताई बाळांना आंघोळ घालेल, पावडर, काजळ लावेल आणि नंतर दार उघडेल…पण तसं घडलं नाही…

      June 7, 2021


  • गणेशोत्सव २०२३ – गणपती बाप्पा मोरया!

    नारायणाच्या अंगात जसं लग्न संचारत ना तसं माझ्या अंगात गणेशोत्सव संचारतो. एरवी सण- सनावळीच्या बाबतीत निष्क्रीय किंवा अजगरासारखी सुस्तावलेली मी, गणेश चतुर्थी तोंडावर आली की कुठून हरिणाची चपळता आणि उत्साह येतो अंगात हे त्या गणोबालाच माहीत! प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हा उत्साह संचारतो.

      September 16, 2023


  • माझे आवडते कथा लेखक – व. पु. काळे

    कथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक ‘कथा’ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही. 

      August 20, 2018


  • एका वृध्दाची आत्महत्त्या

    यशवंत आणि चंदू ह्यांच्यासमोर एक चाळीशीचा तरूण बसला होता.
    कपड्यांवरून तो परदेशांतून आला असावा, असे वाटत होते.
    यशवंतांची त्याने रितसर फोनवर वेळ घेतली होती आणि तो आला होता.
    एवढ्या उमद्या सुस्थितींतील तरूणाची समस्या काय असावी, ह्याचा यशवंत अंदाज घेत होते.
    अशोक मनोहर हें नांव त्यांनी अलिकडेच पेपरमध्ये वाचलं होतं.
    तो म्हणाला, “मी आपल्याला माझे नांव फोनवर सांगितलेच आहे.

      February 2, 2026


  • अजब न्याय नियतीचा – भाग २४

    तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’

      October 11, 2019