नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. तेथे कस लागतो प्रयत्नांचा, आधाराचा, कष्टांचा.
December 30, 2021
छे हो मला बालवाडी हे माहित नव्हते. पाच वर्षे पूर्ण झाली की थेट पहिल्या इयत्तेत. आणि पु. ल. यांच्या भाषेतील पालक केजी वगैरे काही नव्हते. चार मैत्रीणीसोबत शाळेत जायचे आणि यायचे. रडले नाही कधीच. पण नोकरी करत असताना मात्र बालवाडीत बसण्याची संधी मिळाली होती ती अशी. माझी नगर परिषदेची शाळा. त्यामुळे पहिल्या इयत्तेत मुलांना प्रवेश मिळणे सोयीचे व्हावे आणि शाळेची सवय व्हावी म्हणून बालवाडी सुरू करण्यात आली होती. ती ही बऱ्याच वर्षांनी. एकदा एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन शाळेत आले. बालवाडीत नांव घातले. आणि सांगितले की या मुलाची आई मानसिक दृष्ट्या बरोबर नाही म्हणून तो घाबरतो. मोकळ्या पणाने रहात नाही आणि हट्टी स्वभाव आहे त्याचा. हात जोडून विनंती करतो की कृपया त्याला समजून घ्या आणि रागवू नका. ते स्वतः निवृत्त शिक्षक होते. पहिल्याच दिवशी वर्गात गेला मी सोबत होते त्याच्या. आणि माझा मुलगाही त्याच बालवाडीत होता म्हणून मी त्याला मुलाकडे जा असे सांगितले. पण तो माझा पदराला घट्ट धरून उभा होता. पद्धतीप्रमाणे मुलांनी नवीन मित्र आला आहे म्हणून टाळ्या वाजवल्या तरीही तो ढिम्म जागचा हलला नाही. आणि कावराबावरा झाला घाबरून थरथर कापत डोळे भरून आलेले. मला समजले की याची काय अवस्था आहे. त्यामुळे मी त्याला घेऊन मुलांच्या रांगेत सतरंजीवर त्याला जवळ घेऊन बसले. तसा तो शांत झाला. आता शिक्षिकेची परिस्थिती बिकट झाली. कारण मुख्याध्यापिका खाली मुलात बसल्या आहेत. त्यामुळे त्याच गोंधळून गेल्या. मग मुलांच्या मधल्या सुट्टीत एकत्रित जेवण. गाणी. गोष्टी यात रमला आणि मी हळूच बाहेर पडले. शाळा सुटायची वेळ झाली होती म्हणून. त्याचे आजोबा आले तेही वेळेपूर्वीच. काळजीनं घामाघूम झाले होते म्हणून मी त्यांना घेऊन बाहेरुन नातवाला दाखवले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला होता.
नंतर त्यांनी वर्ग शिक्षिकेला विचारले होते की काय जादु केली तुम्ही आता तो रोज शाळेत जायला लवकरच तयार होतो. बाईंनी सांगितले की माझी नाही मु. अ. बाईंची जादू आहे ही आणि सगळे सविस्तर माहिती दिली. आजोबांना जे वाटले होते ते त्यांना बोलून दाखविता आले नाही पण त्यांच्या डोळ्यातील पाण्याची भाषा मला समजली. त्यामुळे मला बालवाडीत प्रवेश मिळाला याचा जास्त आनंद झाला. एका अंकुरणाऱ्या छोट्याश्या जीवासाठी मी काही तरी करु शकले. पण आता अंगणवाडी बालवाडीत मुलांना रमण्यासाठी खूप खेळणी असतात. प्रशिक्षण घेतलेल्या बाई टिचर. मदतनीस. रिक्षा. पालक यांची मदत असते. हे सगळे पाहून वाटत की आमच्या काळी का नव्हते हे. असो काही का होईना बालवाडीत मुलांच्या समवेत एक दिवस घालवला तिथे.
-- सौ. कुमुद ढवळेकर.
September 12, 2022
डोगरी ही जम्मूभागातील भाषा आहे. या भाषेतील, पद्मा सचदेव या एक श्रेष्ठ कवयित्री आहेत ; व त्या डोगरीरोबरच हिंदीतही लेखन करतात. त्याच्या एका काव्यांशाचें भाषांतर पाहूं या
August 3, 2017
एक शेतकरी होता. त्याने दरवर्षीप्रमाणे आपल्या शेतात भाताचे पीक लावले होते, कारण त्या भागात चांगला पाऊस पडायचा. त्या वर्षीही चांगलाच पाऊस पडला व हळहळू भाताचे पीक चांगले आले. त्या भाताच्या पिकातील एक मोकळी जागा पाहून एका पक्षिणीने आपल्या पिलांसाठी घरटे केले. ती पक्षीण आणि तिची चार-पाच पिले तेथे मजेने रहात होती, कारण शेतकर्याला त्या घरट्याची कल्पनाच नव्हती. भाताचे पीक चांगलेच वर आल्यानंतर त्या शेतकर्याने कापणी करायचे ठरविले व एकेदिवशी आपल्या मुलाला त्याने सांगितले की, उद्या आपल्या सर्व नातेवाइकांना कापणीसाठी बोलव. त्याप्रमाणे त्या मुलाने सर्व नातेवाइकांना कापणीसाठी निरोप दिला. शेतकर्याने त्याच्या मुलाला काय सांगितले हे त्या पक्षिणीच्या पिल्लांनी ऐकले होते. त्यामुळे सायंकाळी पक्षीण येताच त्यांनी तिला शेतकर्याचे बोलणे सांगितले व आपल्याला आता आपले घरटे सोडावे लागणार याचे त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्या तरी कोणीही कापणी करायला येणार नाही त्यामुळे लगेच आपल्याला घरटे हलवावे लागणार नाही. दुसऱ्या दिवशी शेतकरी कापणीसाठी नातेवाइकांची वाट पाहत बसला मात्र कोणीही आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा मुलाला म्हणाला, ' 'नातेवाइकांचे काही खरे नाही, तू उद्या आपल्या आजुबाजूच्या शेतकर्यांना निशेप दे म्हणजे आपणच कापणी करू. ' ' मुलगा हो म्हणाला व निरोप द्यायला गेला. शेतकरी व मुलाचे हे संभाषणही पिलांनी ऐकले व सायंकाळी पक्षीण आली की तिला ते सांगितले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्याही कोणी येणार नाही. त्यामुळे उद्याचा दिवस तरी घरटे आपले शाबूत राहील. दुसर्या दिवशीही कापणीसाठी कोणीच आले नाही त्यामुळे शेतकरी वैतागला व आपल्या मुलाला म्हणाला, आता आपणच उद्या घरातील सर्व जण भाताची कापणी करून टाकू. हेही पिल्लांनी ऐकले व आपल्या आईला ते सांगितले. तेव्हा मात्र पक्षीण त्यांना म्हणाली, आता मात्र आपल्याला दुसरीकडे घरटे करावेच लागेल. त्याप्रमाणे सायंकाळीच तिने आपल्या सर्व पिल्लांना दुसरीकडे तात्पुरत्या घरड्यात हलविले. इकडे दुसर्या दिवशी सकाळीच शेतकरी आपल्या कुटुंबासह आला व त्याने भाताची कापणी सुरू केली.
July 12, 2016
दिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला.
December 27, 2021
निरभ्र आकाशातील असंख्य चांदण्यांचे द्रुष्य अतिशय मनोहारी वाटते. या लुकलुकणार्या चांदण्यांबद्दल सर्वांच्याच मनात मोठे कुतुहल असते. उंच आकाशात चमकणारे हे हिरे असल्याचे बालकांना वाटते, तर कधीही नष्ट न होणारी ही नक्षत्रे असल्याचे मोठ्या माणसांची कल्पना असते. शीर्षक : नक्षत्र मैत्री लेखक : डॉ.पु.वि.खांडेकर डॉ. मधुकर आपटे पाने : 61, किंमत : 60/- रू प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर
September 29, 2012
सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता.
March 24, 2018
तेव्हां आपण स्वतःवर, आपल्या संस्कृतीवर आणि पर्यायानें आपल्या मातृभाषेवर विश्वास ठेवूं या. आपण अभिमानानं म्हणूं या आणि कृतीनेंही दाखवून देऊं या, की –
हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडूं | वसे आमुच्या मात्र हृद्मंदिरी || जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे | हिला बसवू वैभवाच्या शिरीं ।।
March 26, 2019
पाणी हे जीवनावश्यक, या पृथ्वी वरचे अमृतचं जणू काही, पण आज त्याचा उपयोग आपण करून घेतोय पण त्याची साठवण? 100% होत्ये का? तर अजिबात नाही.
October 25, 2021
जंगलातील एक रस्ता कोटमसार गुहे कडे जातो. या गुहा हे एक नैसर्गिक गूढ आहे. १९०० सालात ह्या गूढ गुहेचा प्रथम शोध लागल्याची नोंद आहे. ह्या गुहेच्या अंतर्भागातील माहितीची नोंद कुठेही नसल्याने ही गुहा अज्ञानातच राहिली. १९५१ साली निसर्ग संशोधक डॉ.शंकर तिवारी यांनी ह्या गूढ गुहेच्या खाली उतरून त्याचा सखोल अभ्यास केला. ही गुहा जमिनीखाली ३०० मीटर असून तळाला रुंदी २० ते ७२ मीटर इतकी विशाल आहे.
March 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti