नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
May 11, 2022
१९७१ मध्ये ‘मेरे अपने’चं शुटींग चालू असताना, दिग्दर्शकानं कॅमेरा, साऊंड व क्लॅपची ऑर्डर दिली.. मात्र क्लॅप देणाराच जागेवर नव्हता, तो कॅन्टीनमध्ये मैत्रीणीबरोबर गप्पा मारत बसला होता.. गुलजारजी जाम भडकले, त्यांनी त्या क्लॅपरबाॅयला हाकलून दिले.. व त्या जागेवर चंद्रशेखर नार्वेकर उर्फ एन. चंद्राची नेमणूक झाली.. याच एन. चंद्राने, त्यानंतर ‘परिचय’ पासून ‘आंधी’ पर्यंतचे गुलजार यांच्या सर्व चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले.. एका सशक्त दिग्दर्शकाच्या परिसस्पर्शाने एन. चंद्रा नावाचा मराठी, यशस्वी निर्माता-दिग्दर्शक घडला..
April 23, 2022
बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप गस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वतः अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा - मग तो कोणीही का असेना - बसावा, हीच त्याची इच्छा होती. त्या काळी देशाचे साम्राज्य वाढविण्यासाठी बऱ्याच लढाया होत. अशाच एका शत्रूराष्ट्राने कान्सवर हक्क चढविला. शत्रू बलाढ्य होता. त्यामुळे लढाईला तोंड फुटण्यापूर्वी राजा फिलीपने आपला राजमुकुट व पवित्र सिंहासन एका मैदानात आणण्याची सैनिकांना आज्ञा केली. सिंहासनावर त्याने राजमुकुट ठेवला व त्याखाली 'सर्वोत्कृष्ट पराक्रम गाजविणाऱ्या वीर पुरुषास' असा मजकूर असलेला फलक लिहून ठेवला व तेथे जमलेल्या सरदार व सैनिकांसमोर भाषण करताना तो म्हणाला, '' या सिंहासनावरील माझा हक्क मी या क्षणी सोडला आहे. या युद्धातके खय पराध्य करून विजयश्री खेचून आणील त्यालाच हे सिंहासन मिळेलच कोच यापुढचा राजा असेल.'' त्याचे ते वीरश्रीयुक्त भाषण ऐकून सैनिकांना चेव चढला व अत्यंत शर्थीने ते लढले. अशा सैनिकांच्या सहकार्यानेच स्वत: राजा फिलीपनेही या युद्धात अतिशय मोठा पराक्रम केला व शत्रूराष्ट्रावर विजय मिळविला. सायंकाळी जेव्हा त्याच मैदानात सर्व एकत्र जमले, त्या वेळी सर्व सरदार व सैनिकांनी एकमुखाने त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली व राजा फिलीपचा जयजयकार करून त्यालाच ते सिंहासन पुन्हा बहाल केले.
March 3, 2017

मला थोडेफार संत माहिती होते परंतु डॉ. मामा मोडक यांनी मला संतांचे 100 आयकार्ड साईज फोटो व त्यांची नावे माझ्या घरी आणून दिली होती. 92 वर्षांच्या डॉ. मामा मोडक यांचा हा उत्साह मला संतचित्रे काढण्याची प्रेरणा देवून गेला. तेंव्हा पासून किमान १०० संतांची तैलचित्रे काढण्याचा मी संकल्प केला
June 1, 2021
दिनूची ठिगळ लावलेली चड्डी आणि विरलेला शर्ट असला तरी त्याची भेगाळलेली पाटी स्वच्छ असायची. खिशात पेन्सिलचा एक इंचाचा एकच तुकडा.
April 6, 2023
१९४७ साली फाळणी झाली आणि एकसंध असलेल्या हिंदुस्तानाची शकलं झाली.त्यामुळे कित्येक लोक कायमचे पाकिस्तानात गेले व आपलं भाग्य थोर म्हणून सध्या पाकिस्तानात असलेल्या ठिकाणी जन्म घेऊन पण कित्येक कलाकार भारतात येऊन स्थाईक झाले.अशाच एका कलाकाराची ही हकीगत…..
January 21, 2019
…. असा संकल्प मी सांप्रत, नुकत्याच चालू झालेल्या, वर्षासाठी केला आहे.
January 2, 2017
पृथ्वीच्या पाठीवर प्रारंभापासूनच विविध प्रकारच्या प्राण्यांचा सजीवांचा जीवनकलह सुरू आहे. त्यातून जे वाचले ती आपली सृष्टी. या जीवनकलहाचा प्रवास आणि त्यामागील कारणे सांगणारे उत्तम पुस्तक. प्रा. विजय घुगे सजीवांचे जीवनकलह लेखक : गो. बा. सरदेसाई पाने : ९६, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
September 29, 2012
प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती.
September 8, 2023
राजधानी दिल्लीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाच्यावतीने वेगवेगळी पुस्तके नेहमीच प्रकाशित होत असतात. नेहमीच्या पुस्तिकांपेक्षा ‘बॅकग्राऊंडर’चे स्वरुप वेगळे आहे. निवडणुकीच्या धकाधकीच्या काळात बिनचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त संदर्भ आवश्यक असतात. पत्रकार व विश्लेषकांना त्यामुळे अचूक व मुद्देसुद मांडणी करता येते.
August 8, 2009
Copyright © 2025 | Marathisrushti