(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रात्र अजून भिजत होती !

    …… तशा हि परिस्थितीत शशांकचे लक्ष गादीजवळच्या लाईटच्या पोलवरील ‘पोल क्रमांक १७’ने खेचून घेतले. जणू ‘आहे ना लक्षात हा क्रमांक?’ हाच प्रश्न तो हि शशांकला विचारत होता! जन्मजात एक पाय विकसित न झालेलं, दोन्ही डोळ्याच्या पापण्या नसलेलं कुरूप मुलं शशांक(आणि शिखातरी) कस सांभाळणार होता? म्हणून त्याने शिखास ‘मृत मुलं’ जन्मले म्हणून सांगितले होते.

      March 11, 2019


  • कागदोपत्री माणूस (कथा)

    तसं पाहिली तर त्या कागदपत्रांत काय अर्थ होता? आजच्या हिशेबात तो माणूस, त्याच्या निष्ठा, त्याची कार्यपद्धती जशी काळाच्या ओघातनिष्प्रभ झालेली होती. तसंच त्या कागदपत्रांच. त्यांची कुणाला कधी गरज पडणार नव्हती.

      May 3, 2022


  • “जागते स्वप्न” … विक्रमादित्य सचिनचा सुंदर प्रवास

    इतिहास घडताना…..सचिन सर्वाधिक सामने खेळणारा कसोटीवीर

      August 3, 2010


  • कठोर शिक्षा – भाग १

    सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू) प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता. त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते आधी समजलं नाहीं. त्याने पाठ वळवली आणि त्याला ओळख पटली. इतर वकीलही माना वळवून पाहूं लागले. ।।

      February 9, 2018


  • भारतमातेच्या वीरांगना – ५२ – महाराणी जिंद कौर

    दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर. ११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले.

      August 11, 2022


  • सुगम संगीताला प्रारंभ

    आत्तापर्यंतच्या धाडसाचे आणि मेहनतीचे चांगलेच फळ मला मिळाले होते. टेलिव्हिजनवर पूर्वी मी युवदर्शनमध्ये गायलो होतो. आता मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम मिळाला. या कार्यक्रमात श्रीकांत ठाकरे यांची दोन नवी गाणी मी सादर केली. कार्यक्रम मिळत होते. आत्मविश्वास वाढत होता. आता एक संपूर्ण कॅसेट गाण्यासाठी प्रयत्न करायचे मी ठरवले.

      July 9, 2022


  • एकदा नदीकाठी !

    बसलो होतो एक दिवस

    नदीत पाय सोडून झाडा खाली,

    भन्नाट कल्पनांच्या राज्यात

    आठवणींचे गाठोडे सोडून !

      October 10, 2014


  • पुनर्भेट

    ही गोष्ट आहे चार जिवलग मित्रांची. जे एकाच शाळेत जुन्या एसएससी पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं आलिशान असं एकच हाॅटेल होतं, ते कॅम्पमध्ये.

      August 30, 2021


  • देवभूमीतील पंचबद्री  – भविष्यबद्री

    पंचबद्रीमधील शेवटचे स्थान म्हणजे भविष्यबद्री. जोशीमठापासून १७ कि.मी. अंतरावर मलारी रस्त्यावर 'सुबैन' या गावी भविष्यबद्रीचे मंदिर पर्वतराजीत दडले आहे. लोककथेनुसार जोशीमठाच्या नृसिंह मंदिरातील नृसिंह मूर्तीचा कृश होत जाणारा डावा हात गळून पडेल. त्यावेळी नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळतील व विशालबद्रीची वाट कायमची बंद होईल. तेव्हापासून भविष्यबद्रीलाच बद्रीनाथचे स्थान समजले जाईल.

    जोशीमठहून मलारी रस्त्यावर हे स्थान आहे. जोशीमठपासून भविष्यबद्रीसाठी जीप उपलब्ध होतात. जोशीमठपासून ८ कि.मी. अंतरावर तपोवन ही छोटीशी वस्ती आहे. या ठिकाणी काही वैशिष्ट्यपूर्ण सुरेख पुरातन मंदिरे आहेत. ही मंदिरे गुप्तकालात बांधली असावीत असा संशोधकांचा अंदाज आहे. हिमालयातील मंदिरांच्या धाटणीपेक्षा या मंदिरांची धाटणी वेगळी आहे.

    तपोवनपासून २-३ कि.मी. अंतरावर गरम पाण्याचे झरे आहेत. या पाण्याचे तापमान १२७° फॅरेनहाइट इतके आहे. या पाण्यात गंधकाचा अंश असल्याने परिसरात गंधकाचा वास पसरलेला असतो. पुढे २-३ कि.मी. अंतरावर मुख्य रस्ता सोडून डोंगरात साधारण २ कि.मी. अंतरावर भविष्यबद्रीचे स्थान आहे.

    भविष्यबद्रीचे हे मंदिर हे अतिशय लहान आहे. मंदिरावर शिल्पकला अशी काहीच नाही. मंदिरात श्रीविष्णूची चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली मूर्ती आहे. मूर्तीचे डावे मुख नृसिंहाचे तर उजवे मुख वराहाचे आहे. मूर्तीखाली शेषनाग व पृथ्वी प्रदर्शित केली आहे. या ठिकाणाहून नंदादेवी पर्वतराजीच्या परिसराचे फार विहंगम दर्शन होते.

    या मंदिरापासून साधारण २ कि.मी. अंतरावर चीड-पाईन वृक्षांच्या दाटीत एका शिलाखंडावर मूर्ती सारखा आकार दिसतो. स्थानिक लोक सांगतात की हा आकार नैसर्गिकरित्या आला आहे व यात बदलही होत आहे. हेच स्थान भविष्यात 'भविष्य-बद्री' म्हणून पूजले जाईल.

    अशी ही पंचबद्रीची कथा
    प्राचीन मंदिरे आपल्या वैभवशाली संस्कृतीचे शिल्पकलेचे पुरावे आहेत. काळाच्या प्रवाहात व आपल्या बेफिकिरीमुळे आज या मंदिरांना अवकळा प्राप्त झाली आहे. मंदिरांची पडझड होत आहे. मूर्तीची चोरी होत आहे. एके दिवशी आपल्या निष्काळजीपणामुळे हा अमूल्य ठेवा कायमचा नाहीसा होईल. या श्रद्धास्थानांचे जतन करणे व त्यांना वैभवशाली गौरवस्थाने बनवणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

    -प्रकाश लेले

      July 27, 2022


  • जिमी वेल्स ‘ विकिपिडियाचा जनक ‘

    जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती

      August 7, 2023