(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी

    अपवाद सोडले तर जगात सगळ्यांना ईझीमनी हवा असतो . कष्ट न करता , किंवा अगदी कमीतकमी कष्टात जास्त पैसे मिळवणं हे अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं . त्यासाठी जगन्मान्य असा मार्ग म्हणजे शेअर बाजार.

      October 3, 2021


  • छायाचित्रे – भूतकाळाची स्मारके !

    हातातून निसटणारे क्षण जिवाच्या आकांताने, किमान छायाचित्रांच्या मदतीने धरून ठेवणारे आपण सारेजण ! मग अशा “युनिक” स्मृती येणारच ना मनात !

      November 22, 2022


  • आयुष्याच्या एका वळणावर …

    एका बागेमध्ये एक साठीचा पुरुष ( प्रणय ) जॉगिंग करत असतो, जॉगींग करता करता घामाघुम झालेला तो घाम पुसण्यासाठी बागेतील एका बाकावर बसतो बाकावर बसल्यावर समोरून जॉगिंग करत जाणार्‍या सुंदर तरूणीकडे तो एक टक पाहात असतो इतक्यात त्याच्याच वयाचे दोन पुरुष त्याच्या दिशेने त्याच्याकडे पाहात जॉगिंग करत येत असतात ते त्याच्या जवळ येताच आपला वेग कमी करतात आणि त्याच्या मागे हळूच येऊन उभे राहतात आणि त्यातील…

      January 24, 2024


  • मेघ राजा

    एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.

      October 5, 2025


  • राम गणेश गडकरी यांचे वाङमय

    मराठी भाषेचे शेक्सपिअर, प्रेमाचें शाहीर, विनोदी साहित्यातील बिरबल, अवघे ३३ वर्षे ७ महिने व २८ दिवस आयुष्य जगलेल्या परंतु सरस्वतीच्या दरबारातील एक प्रतिभा सम्राट म्हणून प्रसिध्दीस आलेले राम गणेश गडकरी यांचा जन्म गुजरातमधील नवसारी ह्या गावी २६ मे १८८५ रोजी झाला.

      May 16, 2024


  • स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती

    ** मादी व नर ह्यांत फक्त मादीचीच खऱ्या अर्थाने योजना केलेली. तीला जीवन चक्रासाठी मातृत्व दिले. नराची संकल्पना नंतरची. एक सहाय्यक, मदतनीस, रक्षक, ह्या भूमिकेंमध्ये
    ** मातृत्वाला अनुसरुन वात्सल्य, जीव्हाळा, प्रेम, माया, करुणा, त्याग वृत्ती, संसारीक कौटूंबीक ओढ दिली
    ** जगदंबा सर्व श्रेष्ठ देवता. तीची तीन रुपे. शक्ती, धन, ज्ञान. हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, ह्यांच्या प्रतीकात्मक रुपाने दिसते. जीवनाची त्रीकोणात्मक रचना व्यक्त करणारी.
    ** जन्मताच स्त्रीची सर्वांगीन ताकत जास्त असते. जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर हे सिद्ध झालेले आहे की तीच्यात प्रचंड क्षमता व उरक शक्ती असते. बौद्धीक, शारीरिक, मानसिक शक्तीमध्ये तीचा वरचढपणा स्पष्ट झालेला आहे.ज्या वेळी संधी मिळाली, तीने आपली योग्यता सिद्ध केली आहे.
    ** स्त्रीचे मात्रत्व ह्याचा पुरुषांनी गैर फायदा घेतला. तीला दुय्यम स्थान दिले. तीला अबला केले अशक्त ठरविले. गरजेच्या चक्रांत अडकलेल्या स्त्रीला गुलाम बनविले. आत्याचार झाले. भोग वस्तू म्हणून तीची संभावना झाली. तीला सौंदर्याचे प्रतिक बनवून शोभेची वस्तू समजले गेले.
    ** स्त्री आपले सौंदर्य हेच हत्यार समजू लागली. त्यांत ती फसली. पुरुषाना आकृर्षित करणे ह्यातच तीला मोठेपणा वाटू लागला. सौंदर्य, मादकता ह्या गैरसमजात ती राहीली. ह्याच कारणाने ताला सतत दुय्यम स्थान मिळत गेले. आपल्या अंगच्या गुणाना ती विसरु लागली.
    मत्सर, राग इर्षा ह्या गुणाना ती जवळ करु लागली.
    ** ज्या ज्या वेळी व्यासपिठ मिळत गेले त्या त्या वेळी तीने आपल्या कर्तव्याची, महानतेची झलक दाखविलीच. महान स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात चमकल्या. जसे राजकारण, विज्ञान, शिक्षण, अर्थक्षेत्र, अध्यात्म, तत्वज्ञान, गिर्यारोहन, सैनिकी, अशा अनेक क्षेत्रांत त्यानी आपले कर्तव्य सिद्ध केलेले आहे.
    ** समानतेच्या विचारांत ती आजकाल प्रत्येक क्षणी कौटूंबीक आधार न मान्य करता राजश्रय अर्थात कायदे , कानून, ह्यांत गुंतली आहे. कायद्यानी तीला खूपच संरक्षण दिले असले तरी प्रत्येक वेळा ती ते शस्त्र विनाकारण पारजीत आहे. त्यामुळे एक प्रकारचा कौटूंबीक कलह निर्माण होत असल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.
    ** अनेक वर्षांची सहन केलेली दुय्यम जागा दुर्दैवी होती. परंतु ती तो बदल इतका शिघ्र करु इच्छीते , जे घातक ठरेल. तीच्यात सुडबुद्धीची भावना येत असल्याची जाणीव होणे हे योग्य नाही. सारे चित्र मैत्रीपूर्ण बदलने जरुरीचे आहे. त्यासाठी घैर्य व धिरता असावी हे वाटते.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    9004079850
    e-mail - bknagapurkar@ gmail.com

      May 10, 2013


  • मला भावलेला युरोप – भाग ४

    लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक.

    येथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने छोटी छोटी आहेतच. शिवाय अंतराने ही जवळजवळ. दिवसभरात भरपूर प्रवास केला तरीही आपल्याला अजिबात थकायला होत नाही.आल्हाददायक हवामान, भरपूर ताजी हवा,सुबक रस्ते, सुबक म्हणजे खड्डेमुक्त, स्पीडब्रेकर मुक्त, गुळगुळीत, खूपच रुंद रुंद शिवाय गर्दी नाही गोंगाट नाही. हॉर्नचे आवाज तर नगण्यच .मग कशाला माणूस थकून जाईल?

    तेथे बसच्या ड्रायव्हरला 'कोच कॅप्टन'असे संबोधले जाते. हा सुद्धा अगदी चकाचक असतो. त्यांना दिवसभराच्या ड्रायव्हींगचे प्रत्येक देशातील नियमानुसार तास ठरवून दिलेले असतात. शिवाय सहा दिवस ड्रायव्हिंग झाल्यानंतर दोन दिवसाची सुट्टी अपरिहार्य असते.ड्रायव्हरच्या आरोग्याचा विचार आपल्या देशातही याचप्रमाणे झाला, तर दररोज भारंभार अपघाताच्या बातम्या वाचण्या पासून आपली सुटका होऊ शकेल असे वाटते.

    जीपीएस च्या सहाय्याने प्रवासाचे सेटिंग करणाऱ्या कोच कॅप्टन सोबत,डाव्या बाजूला असणाऱ्या स्टिअरिंग व्हील बरोबर प्रवासाची सुरुवात होते. आपल्या देशातील रस्ते वाहतुकीच्या अगदी विरोधाभासी, अर्थात सर्वच दृष्टीकोणातून प्रवास करताना मजेशीर तर वाटते. किंबहूणा आपणही प्रवासाचा आनंद भरभरून उपभोगू शकतो हे विशेष.

    नेदरलॅंड ला जाता जाता वाटेत बेल्जियम देश लागतो म्हणून ब्रुसेल्स ला भेट देणे.असा प्रकार होता.पण तरीही येथील जगप्रसिद्ध असणाऱ्या तीन ठिकाणी भेट देऊन आम्ही ती डोळ्यात साठवून ठेवणार होतो.

    त्यांपैकीच पहिले म्हणजे एक जागतिक कीर्तीचे मोन्यूमेंट,मॅनकिंग पीस स्टॅच्यू. हे बघण्यासाठीची ताणलेली उत्सुकता हा पुतळा बघून पटकन आनंदात बदलली.आणि 'अरे हे तर शू करणारे छोटे खोडकर बाळ आहे' हे वाक्य लगेच तोंडातून बाहेर पडले.त्या बालकाच्या खोडकरपणाचे कौतुकही आपल्याच चेहऱ्यावर ओसंडताना जाणवले.आहे की नाही मग जगावेगळा हा पुतळा !

    महायुद्धाच्या धुमसत्या निखाऱ्यांमध्ये बेल्जियम राष्ट्र होरपळत असताना या छोट्या बाळाने धुमसणाऱ्या त्या निखाऱ्यांवर शू केली आणि हे निखारे शांत केले.मोठे संकट/ गंडांतर टळले आपल्या राष्ट्रावरचे, या बाळामुळे अशी येथील लोकांची भावना वाढीस लागली. त्याविषयी कृतज्ञता म्हणून हा गोड पुतळा उभा करण्यात आला.

    सद्यस्थितीत अगदी गावातच एका बाजूला असणारे हे बालक आज जागतिक कीर्तीचे बनले आहे.पूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत असणाऱ्या या मूळ पुतळ्याला नंतर लोकांनी कित्येक प्रकारच्या वेशभूषा या लाडक्या बाळासाठी प्रेमाने बनवलेल्या आहेत.त्याला दररोज या कपड्यांनी सजवले जाते.

    शहराच्या मुख्य भागातून फेरफटका मारत मारत आपण हे बघत असतो. थोडे पुढे गेले की सेरक्लेस नावाचे एक संत होऊन गेले आहेत. या व्यक्तीचा आडवा झोपलेला एक पुतळा आहे.त्या पुतळ्यावरून डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवल्यास, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते .अशी एक श्रद्धा तेथील लोकांची आहे.भारतात असणार्‍या अशा श्रद्धा यरोपियन राष्ट्रातही आहेत हे ऐकून आश्चर्य वाटले.माझा मात्र अशा अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे स्पर्श न करता दुरुन बघण्यातच मी धन्यता मानली.

    युरोपियन राष्ट्रांच्या काही शहरांमध्ये चौकांना खूप महत्त्व आहे. असे चौक सौंदर्यर्पूर्ण पद्धतीने सुशोभीत केलेले दिसून येतात. शहरातील कुठलेही राजकीय सामाजिक स्वरूपातील मुख्य कार्यक्रम चौकातआयोजित करण्याची प्रथा येथे आहे. त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक तेथे जमतात आणि एकत्रितपणे आनंदाच्या, दुःखाच्या किंवा इतर स्वरूपाच्या क्षणांचे जवळून साक्षीदार होतात.आणखी थोडे चालत गेल्यास आपण अशाच एका सुंदर चौकात प्रवेश करतो.ज्याचे नामकरण ग्रॅंड प्लेस' असे झालेले आहे.

    टाऊन हॉल, गिल्ड हाऊसेस अशा टोलेजंग इमारतींनी वेढलेल्या समोरच्या प्रांगणात तयार झालेला चौक खूपच ऐसपैस आहे.इमारती तर वेगवेगळ्या शिल्पांनी पुतळ्यांनी आणि रंगसंगतीने खुपच देखण्या बनवलेल्या आहेत. आपली मान आकाशाला समांतर करत वर बघितले तर आकाशाशी हातमिळवणी करत आहेत त्या, असा भास व्हावा.असा हा सुशोभित चौक,रंगीबेरंगी फुलांनी सजलेला तर असतोच पण प्रसंगानुरूप या चौकात फुलांची सतरंजी बनवली जाते.केवळ कल्पनेनेसुद्धा हे दृश्य डोळ्यांसमोर आणले तरीही आनंद मिळावा असे आहे हे सारे. चालून चालून थकलेल्या शरीराने बेल्जियममधील चॉकलेट्स खरेदी करून त्यावर ताव मारला. त्या दिवशीचा मुक्काम ब्रुसेल्स मध्येच घेत ताजेतवाने होऊन दुसऱ्या दिवशी नेदरलँडच्या दिशेने कूच केली.

    युरोपातील वसंत ऋतूमध्ये निघणाऱ्या निसर्गाचे साथी बनत, आम्ही हळूहळू त्या निसर्गाचे विविध आविष्कार बघत त्याच्याशी जास्त जवळीक निर्माण करण्याच्या मार्गावरून चालण्यास एव्हाना सुरुवात केली होती.

    बेल्जियम मधून नेदरलँड देशाकडे सुरू झालेला हा प्रवास नजरेला सतत बाहेरच खिळवून ठेवत होता. गव्हामोहरीची शेतं,फिकट निळाईने व्यापून राहिलेल आकाश. मध्येच कुठेतरी पांढरेशुभ्र कापसासारखे ढगांचे पुंजके. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे,नेमक्याच‌ तोडलेल्या ट्यूलिपच्या फुलांची शेती.फारच सुंदर होते हे.

    दोन देशांमधील प्रवास असला तरीही दर दोन तासांनी एक पंधरा मिनिटांचा आणि दुसरा चाळीस मिनिटांचा ब्रेक घेणं हा कोच कॅप्टन साठी असणारा नियम प्रवाशांनाही आवश्यकच असायचा.

    दोन देशांतील हद्द पार करताना तेथील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोचकॅप्टन एकटाच खाली उतरून दहा मिनिटांत परत यायचा. मला वाटतं गाडीचे कागदपत्र वगैरे दाखवून तो कर भरुन येत असावा.असो.

    ‌‌आमच्या रस्त्यावर आम्ही एक फोटो स्टॉप घेतला.अॉटोनियम हे त्याचे नाव.

    बेल्जियम मध्येच असणारं ऑटोनियम म्हणजे,बेल्जियमची आयकॉनिक बिल्डिंग.काय आकर्षक दिसत होती! ही 120 मीटर उंच असणारी इमारत! पण हिला इमारत का म्हणावे असा संभ्रम पडला मनाला. कुठेही दगड,विटा,सिमेंट यांचा उपयोग नाही.तर स्टेनलेस स्टीलची नऊ अर्धगोलांची एवढी सुंदर रचना बनवली आहे ही. शिवाय आतल्या आत एकमेकांना जोडलेली. एखाद्या मोठ्या आयर्न क्रिस्टल सारखी वाटावी अशी सौंदर्यपूर्ण होती ती!अँड्रू वॉटरकेन या अभियंत्याने '५८ एक्सपो'या जागतिक प्रदर्शनासाठी ही इमारत बांधण्याचे डिझाईन तयार केलेले आहे .अशी माहिती मिळाली. आम्ही बाहेरूनच बघितली असली तरीही, आतुन सुध्दा खूप मोठी आणि आकर्षक आहे ही असे समजले.पुन्हा एकदा युरोपियन माणसाच्या तंत्रज्ञानाला सलाम करावासा वाटला. या ठिकाणी भरपूर फोटो काढत कॅमेरात कैद करत आम्ही निघालो रॉटरडॅम नेदरलँड्च्या क्रमांक २ वर असणाऱ्या सर्वात मोठ्या शहराकडे. अर्थातच जगातल्या सर्वात मोठ्या बंदराच्या दिशेने.जेथे विशाल असे ट्यूलिप गार्डन आम्हाला खुणावत होते.

    केऊकेनॉफ हे जगातले सर्वात मोठे स्प्रिंग गार्डन.८० एकराच्या मोठ्या जमिनीवर अच्छादलेले.ज्याने ट्यूलिप च्या सात लक्ष जाती व इतर बऱ्याच फुलझाडांना सामावून घेतले आहे. त्यांच्या सोबतीला आकर्षक अशा कृत्रिम निर्झरांची रचना म्हणजे जणू काही,धरित्रीने रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या घालत निर्झराची सुरेख शहनाई या निसर्गराजा च्या स्वागतासाठी ठेवली असावी. वेगवेगळ्या थीम नुसार रचना केलेल्या या सुंदर फुलांच्या सानिध्यात अक्षरशः मन हरखून गेल्यास नवल ते काय! आपण मनाने आणि शरीराने सुध्दा स्वैर अशी रपेट मारुन येतो.या नितांत सुंदर बागेत आपले वय विसरुन.

    ट्यूलिपचे नानाविध रंग,आकार फुलांची जमिनीपासून असणारी ठराविक उंची आणि तेथे घेतली जाणारी त्याची निगा या सर्व बाबी आपले भान हरपून टाकतात.निसर्गातील वैविध्याची कमाल वाटावी अशी ही गोष्ट. आपल्याला फुलांच्या प्रत्येक रंग व आकार यां बरोबर फोटोमध्ये सोबत करण्याविषयी लुभावते. एवढी अप्रतिम आहे !

    अमिताभ रेखा यांच्या सिलसिला मधलं गाणं आठवल्या शिवाय राहील का अशावेळी?पण त्याचं शूटिंग या बागे मध्येे नव्हे तर, ट्यूलिपच्या शेतांमध्ये झाले होते असे समजले. किंबहुना आम्हाला आपल्या काश्मिरमध्ये बघितलेल्या ट्यूलिप गार्डन ची आठवण आवर्जून झाली याठिकाणी.

    २२ मार्च ते१३मे या ठराविक काळातच असणाऱ्या या फुलांचा आम्हीही अतिशय हसतमुखाने निरोप घेऊन कृतकृत्यता व्यक्त केली.

    नेदरलँड, समुद्राला अक्षरशः बाजूला सारून तयार झालेल्या या राष्ट्राला मागे सारत आम्ही जर्मनीतील कोलोन शहराकडे निघालो. क्रुझमधुन फेरफटका मारत असताना ॲमस्टरड्यमचा इतिहास ऐकायला मजा आली. अथक प्रयत्नांनी तयार केलेला हा देश कृषीप्रधान आहे याचा फार अभिमान वाटला. दुधाचे पदार्थ उत्तम व मुबलक प्रमाणात मिळणारा असा हा देश,आपल्या नागरिकांना देखील भरपूर उंचीचे वरदान देत आहे असे वाटले. कारण येथील नागरिकांची उंची सरासरी सहा फुटांपेक्षा जास्त आहे. हे लक्षात आले होते.

    जाता जाता डोकाऊन जावे अशा माफक हेतूने आम्ही जर्मनीच्या कोलोन मध्ये प्रवेश केला.तेथील सर्वात मोठ्या चर्चला भेट दिली.उंचच उंच कॅथॅड्रल समोर आपोआप मान झुकवाविशी वाटते.ख्रिश्चन धर्मातील महत्वाच्या व्यक्तींचे, धर्मगुरूंचे पुर्णाकृती रेखीव शिल्प बघताना आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.

    हे चर्च म्हणजे शहराचे आयकॉनिक सिम्बॉलआहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जळत्या सत्तर बॉम्बचा मारा सहन करणाऱ्या या शहराच्या इमारतींवर आजही त्यावेळच्या धुराचे काळे डाग दिसतात. दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेला हाच तो जर्मनी देश,ही आठवण करून देतात.

    भाग ४ समाप्त.

    क्रमश:

    - नंदिनी म.देशपांडे

      October 27, 2018


  • नवरात्र .. माळ चौथी

    पहाटे जाग आली की कधी कधी दिवसाची सुंदर सुरवात होते तुमच्या देखण्या , दैवी सुरांच्या सोबतीने !
    आणि मग आपण जे प्रत्येक काम करतोय त्यात आनंद वाटू लागतो …. तुमच्या शाश्वत सुरांचे बोट धरून मन लांबवर डोंगरदऱ्यात खळाळणाऱ्या झऱ्याकाठी फिरूनही येतं .. ताजंतवानं होतं .!

    पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकणारी ही अद्भूत कला अवगत करण्यासाठी लहानपणापासूनच तुमची खडतर तपश्चर्या सुरू झाली … शब्दाशब्दांच्या गाभ्यापर्यंत तुमच्या सुराचा जादुई स्पर्श पोहोचला आणि ते शब्द मग सुरांची आभा लेवून आले … तेजल ,तेजस्वी प्रभेने निथळत … सारा आसमंत भारून टाकायला … सदैव … काळाच्या अंतापर्यंत !

      October 2, 2019


  • कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणजे एक आनंदयात्री !

    अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.

      April 25, 2017


  • ठाण्याचे अभिनेते

    सहा दशकांची नाट्यपरंपरा लाभलेल्या ठाणे शहरात होऊन गेलेल्या आणि सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱया सर्व अभिनेत्यांची दखल घ्यायची तर त्यासाठी स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल. नाट्यसंमेलनाच्या स्मरणिकेच्या माध्यमातून ठाण्यातील काही निवडक, प्रातिनिधीक अभिनेत्यांचा घेतलेला हा ओझरता आढावा.

      August 1, 2022