(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एका असामान्य जिद्दीची कहाणी

    मार्ग जितका काटेरी, यश तेवढेच उत्तुंग’ असा यशाचा मूलमंत्र सांगणार्‍या धीरुभाई अंबानी यांच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. पण, या प्रतिकूलतेवर त्यांनी कशी मात केली, हे सांगणारं ‘प्रतिकूलतेवर मात’ हे पुस्तक मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केलं आहे.

      August 8, 2009


  • उगाच काहीतरी – ४ (आमच्या आधीच्या पिढीचे दुःख)

    आमच्या ओळखीचे एक मावशी आणि काका आहेत. दोघं ही रिटायर्ड शिक्षक. दोघंही उत्तम तब्येत राखून आहेत. मुलं माझ्याच वयाच्या आसपास. मोठा उमेश नोर्वे ला स्थायिक आहे आणि धाकटा राजेश हैदराबादला असतो. मुलं आमची लहानपणापासून मित्र.

    मावशी फेसबुक आणि व्हॉटसअप वर फुल्टू ॲ‍क्टिव. काका आपलं काहीतरी थातुर मातुर टाकत असतात जास्त करून या ना त्या पोस्टवर कॉमेंट करत असतात. मावशी मात्र फेसबुक वर सारख्या आपल्या- ' पिल्लं घरटं सोडून उडून गेली, पाखरं एकटी राहिली ' छाप कविता किंवा ' आई वडील मरून 3 दिवस झाले तरी विदेशातल्या मुलांना कळलं नाही.' अशा बातम्या किंवा मग 'म्हाताऱ्या पालकांना सोडून दुसऱ्या शहरात गेलेली मुलं ' अशा काही पोस्ट फॉरवर्ड करत असतात. त्याला त्यांच्या जेनेरेशन चे बरेच लोकं प्रतिसाद देत असतात.

    परवा सहज त्यांच्याकडे गेलो होतो. अशाच गप्पा सुरू झाल्या..
    " कसे आहात मावशी - काका ?"
    " कसे असणार बाबा, बरेच आहोत" - इति. मावशी
    " उमेश , राजेश काय म्हणताहेत? येणार आहेत का इकडे?"
    " त्यांचं काय विचारतोस, त्यांना जर एवढी आई वडिलांची पडली असती तर गेले असते का सोडून? इथे एवढं सगळं चांगलं होतं. नोकरी पण मिळाली असती पण नाही यांना दूरच जायचं होतं. राजा राणीचा संसार करायला."
    " हं. मावशी किती वर्ष झाली हो तुम्हाला मुंबईत येऊन?"
    " अं....म्हणजे बघ आमचं लग्न झालं आणि लगेच मला वाटतं एक महिन्याने आम्ही मुंबईला आलो. तरी ४०- ४२ वर्ष झाली असतील. का रे?"
    " काही नाही. असंच विचारलं. मुंबईला कसं येणं झालं होतं तुमचं?"
    " अरे, कसं म्हणजे तिथे गावात काय केलं असतं. एवढं शिकून यांनी शेती नसती केली आणि पुन्हा चांगलं आयुष्य, मुलांना चांगलं शिक्षण, त्यांचं भवितव्य गावात राहून कुठे चांगलं झालं असतं. आता बघितलं ना कसे चांगले सेटल झालेत दोघं. तिथे राहून हे शक्य होतं का?"
    " खरं आहे तुमचं. माणसाने प्रगती होईल तिथे गेलं पाहिजे."
    " आता कसं बोललास. तसे मुलं सुट्टीमध्ये जायचे गावी. पण जास्त थांबायचे नाहीत. थोड्या दिवसात कंटाळून जायचे."
    " मग सासू सासरे हे नाही आले का मुंबईला? "
    " अरे आमचंच नाकी नऊ यायचे सगळं मॅनेज करत करत. आणि तसं ही त्यांना इथे येण्यात इंटरेस्ट नव्हता. पण हे न चुकता पैसे पाठवायचे. आणि आम्ही जायचो कधीतरी सुट्ट्यांमध्ये त्यांना भेटायला. अरे, दरवेळेस निघतांना सासूबाई खूप काही बांधून द्यायच्या पण डोळ्यातून पाणी काढायच्या. शेवटी सांगावं लागलं की दरवेळेस असं रडून नाट नका लावत जाऊ . ....थांब चहा ठेवते"
    असं म्हणून मावशी आत चहा उकळायला ठेऊन आल्या. काका आपले गुपचूप पेपर वाचत बसलेले होते.
    " बरं जाऊ द्या ते सगळं. उमेश, राजेश बोलावतात की नाही तुम्हाला? "
    " ते बोलावतात रे पण आमची काही इच्छा नाही तिथे जायची. मोठा काहीतरी पाठवत असतो नॉर्वे वरून. पण २ - ३ वर्षातून एकदा येतो. राजेश येत असतो अधून मधून. पण तूच सांग त्याला काही अर्थ आहे का? आमच्या जवळ राहिले तर काही वाईट आहे का?"
    " मावशी एक बोलू का? "
    " काय रे?"
    " तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही तुमच्या वेळेस तुमच्या आणि मुलांच्या बेटर लाईफ साठी जे काही निर्णय घेतले तेच तुमच्या मुलांनी त्यांच्या बाबतीत घेतले. तुम्हीं गाव सोडून मुंबईत आलात. तुमची मुलं मुंबई सोडून दुसरीकडे गेली. फरक एवढाच की तुम्हाला तुमचं दुःख मांडायला सोशल मीडिया मिळालंय आणि तुमच्या सासू सासऱ्याना त्यांचं दुःख दाबून टाकावं लागलं. नाट लागेल म्हणून ती आई नंतर रडू पण शकली नसेल. खरं सांगू का तुम्हीच नाही पण आमच्या आधीच्या म्हणजे तुमच्या पिढीच्या बहुतेक लोकांनी चांगल्या जीवनमानासाठी जे काही केलं तेच तुमच्या मुलांनी केलं तर तुम्ही आता सोशल मीडियावर त्याबद्दल तक्रार करताय. "

    मावशींच्या चेहरा एकदम कठोर झाला. मावशी चिडल्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांना कशा दिसत असतील त्याचं दर्शन मला झालं. त्या तणतणत उठल्या आणि किचन मध्ये गेल्या.

    आतून जोरात आवाज आला,

    " आहो, तुम्हाला दूध आणायला सांगितलं होतं ना? आणलं नाहीच वाटतं".

    काकांनी फक्त माझ्या कडे पाहून स्माईल दिलं आणि घसा खाकरत पेपर चे पान पलटले. मला यापुढे चहा मिळणार नाही याची मला खात्री झाली.

    सध्या मावशींनी मला गुपचूप फेसबुक वर ब्लॉक केलं आहे आणि मी जाताना कधी दिसलो तर त्यांच्या बरोबरीच्या त्यांच्या मंडळातल्या मावश्या मला पाहून नाकं मुरडताहेत. काका मात्र अजून.

    -- अमोल पाटील.

      August 11, 2022


  • पूर्णविराम (कथा)

    एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत.

      January 30, 2023


  • मला देव दिसला – भाग ३

    परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होते.

      March 18, 2021


  • कोंडी

    इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे.

      July 14, 2022


  • मोबाईल

    आता तर एक वर्षाच्या मुलालाही आई म्हणण्या आधी मोबाईल म्हणता यायला लागलय! अगदी खरं, पण याबाबतीत काही नव्याने विचार करावा असं वाटलं, आणि आपली आई – आजी यांनाही मोबाईल सहजगत्या वापरता यावा म्हणून हा लेखन प्रपंच !

      December 16, 2021


  • वेगळा (कथा) भाग १

    आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.

      June 24, 2022


  • आकाशी खाईक्यो ब्रिज

    जगातल्या ५ महत्त्वाच्या सस्पेंशन ब्रिज मधील सर्वोत्तम! जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पेक्षा लांब व मोठा असलेला इंजीनियरिंगचा चमत्कार! माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं हे आपण बऱ्याचवेळा ऐकतो आणि लोकांना समजावतो सुद्धा! ह्याची पुरे पुर प्रचिती देणारी एक जागा म्हणजे जपान मधला सस्पेंशन ब्रिज! आकाशी खाईक्यो ..

      August 23, 2020


  • माझंच खरं

    माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो मोठा होऊन कर्ता पुरुष होईपर्यंत, त्याचं कुटुंबातील सर्वजण ऐकत असतात. त्यावेळी तो म्हणेल ते ऐकणाऱ्यांचं प्रमाण, हे १००% असतं. त्यात कुणाचीही भागीदारी नसते. त्याला घरात मानाचं स्थान असतं. आई-वडिल, भाऊ-बहीण त्यांच्या म्हणण्याला मान देत असतात.

      June 14, 2022


  • फोटो

    असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! ” ” तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन

      February 5, 2026