(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माणुसकी जपणाऱ्या एका गुरूची पुनर्भेट

    दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचा मी बालवर्गापासूनचा विद्यार्थी. शाळेचा प्रचंड आभिमान बाळगणारा. 1971 मध्ये (म्हणजे सहावी इयत्ता पास झाल्यावर) दादर सारखं मध्यवर्ती ठिकाण सोडून ठाण्याला राहायला आल्यावर सर्वप्रथम वडिलांनी माझ्या शाळा प्रवेशाचं काम पूर्ण केलं, आणि ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मला प्रवेश मिळाला.

      December 18, 2021


  • बोल कैसें ते स्तुतीचे (सुमंत उवाच – ७५)

    सुमंत जयंत परचुरे. 

    स्तुती करताना मनापासून केली की त्याला कोणत्याही बंधनात आणता येत नाही तसेच शब्दांना भावनिक जोड मिळाली की सुरांना सुद्धा शरण यावं लागतं.

      November 18, 2021


  • ओळख नर्मदेची – भाग तीन

    नर्मदेला कोणी कथाबध्द तर कोणी कादंबरी बध्द पण केले आहे असे म्हणतात.माझ्या वाचनात तर आले नाही पण तिला मान्यतेप्रमाणे,एक कुमारिका समज़ुन तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे .मी पण जे अनुभवले ते पण हुबेहुब तसेच, त्यामुळे वेगळे असे शब्दांकन काय करणार ?

      September 29, 2020


  • मास्क

    आॅक्सिजनचा ‘मास्क’ लावण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर हा कापडी ‘मास्क’ कायमस्वरूपी वापरत रहा.. मग कोरोनाच काय त्याचा ‘आजोबा’ही तुमच्या वाटेला जाणार नाही…

      October 29, 2021


  • मीरा – उपेक्षित नाममुद्रेची उपेक्षा !

    मीरा अजूनही वेशीबाहेर उपेक्षित आहे- मग ते वसंत कानेटकरांचे “मीरा-मधुरा ” हे नाटक असो वा गुलजारचा “मीरा”असो. हायसे इतकेच वाटते की “मीरेवर ” या गोष्टींचा परिणाम होत नाही. ती विरक्तीच्या पल्याड गेली आहे आणि कृष्णात विरून गेली आहे.

      November 20, 2022


  • तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

    नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.

    जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. सारा परिसर सुवर्णमिश्रित दगडांच्या खाणीनी भरलेला. जगातील सर्वांत जास्त खनिज सोन्याचे उत्पादन देणारा हा प्रांत समजला जातो. अतिशय कलात्मक आणि नाविण्यपुर्णतेने वसलेले हे शहर आहे. केवळ शे - दोनशे वर्षाचा इतिहास त्यांच्या वसाहतीचा आहे. थोर जागतिक किर्तीचे नेते नेल्सन मंडेला यांचे वास्तव्य असलेले शहर. त्यानीच द. आफ्रिकेचे प्रथम अध्यक्षपद भूषविलेले होते. जोहानेसबर्ग येथेच भारताचे महान नेते महात्मा गांधीजी यांचे वास्तव्य २१ वर्षे होते. त्यानी गरीब, वर्णभेदामुळे अत्याचार होत असलेल्या जनतेला जाणले. एक लढा दिला. त्यांत ते अशस्वी झाले. पुढे भारतामधील कार्य तर त्याना जागतीक स्थरावर घेऊन गेले. जोहान्सबर्गने गांधीजींची य़ोग्यता, थोरवी जाणली. त्याना अजरामर अशी श्रधांजली अर्पिली.

    प्रसंगः- एक प्रसंग घडला. दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वर्णभेद, उचनीचता अतिशय प्रखरतेने मानली जात असे. एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते. गांधीजी प्रथम वर्गाच्या बोगीमध्ये रीतसर तिकीट काढून बसले होते. गाडीचा तिकीट तपासनीस तेथे आला. त्याने गांधीजीना त्या डब्यामध्ये बसण्यास हरकत घेतली. गांधीजीनी आपल्या जवळचे नियमाप्रमाणे घेतलेले प्रथम वर्गाचे तिकीट दाखविले. तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो वर्णद्वेष्टा इंग्रज होता. तो तरुण गांधीजीवर खेकसला.

    . " Black passengers are not allowed to sit in this compartment with white persons ''

    असे गांधीजीना ब्ल्याक म्हणत, इंडीयन म्हणत, फॉरीनर्स म्हणत आरोप केले. गांधीजी गोऱ्या लोकांच्या सहवासाठी अयोग्य असल्याचे व्यक्त केले. गांधीजीना हे अत्यंत अपमानकारक वाटले. त्यानी त्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. ही वर्ण भेदाची बाब उच्यायुक्ताकडे व त्यावेळच्या सकरारी दरबारांत निदर्शनास आणून देण्याचे सुचविले. त्या उर्मट उद्धट आणि मग्रुर अशा इंग्रज अधिकाऱ्याना जनाची वा मनाची लाज राखली नाही. त्याने गांधीजीना चक्क हात धरुन प्रथम वर्गाच्या डब्यातून खाली उतरुन दिले.

    गाधीजीनी Bar-At Law ची पदवी घेतलेली होती. ते साऊथ आफ्रिकेमध्ये २१ वर्षे राहीले. प्रखर देशाभिमान आणि कायद्याचे ज्ञान ह्यामुळे एक वेगळेच व्यक्तीमत्व त्याना प्राप्त झाले होते.

    कालाय तस्मै नमः काळाचा महीमा अगाध असतो. ते सत्य आहे. भारतातील अन्याय, वर्णभेद, उच्य-निचता, असत्य, हिंसक वृती, यांच्या विरोधांत गांधीजीनी प्रचंड झगडा दिला. जगभर शक्तीच्या जोरावर राज्य करणाऱ्या इंग्रजाना अहिंसा व सत्य ह्याच्या महामंत्राने भस्मसांत केले. इंग्रजांची जागतिक स्थरावर माघार होत गेली. हाती कोणतेही शस्त्र न घेतांच त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. गांधीजी महान बनले. त्यांची योग्यता दक्षिण आफ्रिकेतील जनतेने, सरकारने तिव्रतेने जाणली. महात्माजींचा एके काळी त्यांच्याच भूमिवर करण्यांत आलेल्या अपमानाची पश्चातापपूर्ण भरपाई करण्यांत आली. ज्या वयांत गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेंत वर्णभेद व उच्यनीचतेला आवाहन दिले, त्याच वयातील ( तिशीतील ) त्यांचा पुतळा जोहान्सबर्ग आणि दरबन ह्या दोन प्रमुख शहरांत उभारला जाऊन त्या चौकांना गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुन सन्मानित केले.

    त्यांचा तारुण्यातील , तिशीच्या जवळपासचा पुतळा, तेजःपुंज चेहरा, उंचपुरा मात्र सडसडीत बांधेसुद अंगकाठी व्यक्त होत होता. वकीली पेहेराव घातलेला, दिसत होता. काळा मोठा कोट परिधान केलेला होता. अंगात सुटबुट टाय शर्ट चमकत होते.

    आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तारुण्यातील भव्य ब्रांझचा पुतळा बघून भाराऊन गेलो. आमचे डोळे आनंदाने, प्रेमाने, अभिमानाने, आणि आदराने भरुन आले. अश्रु स्वयंस्फूर्तीनेच आपली वाट काढीत होते. मन गहीवरुन आले होते.

    आम्ही भारतामध्यें महात्मा गांधीजींचे अनेक ठिकाणी, अनेक जागी भव्य दिव्य असे पुतळे बघीतले आहेत. त्यांच्या महान कर्तृत्वाचा, सत्य आणि अहिंसा यांचा मंत्र देत हे सारे पुतळे अजरामर झाल्याचा भास होत असतो. ज्येष्ठत्व-श्रेष्ठत्व यांचे भव्य दर्शन देत, वाकून गेलेले शरीर, हाती काठी, चष्मा, तुरळक केस आणि केवळ पंचा व धोतर हा पेहेराव, मनांत इतका बसला आहे की त्यांची महान भव्यता आणि वेगळेपणा केवळ भारतीयांनांच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मा्यता पावलेले ते एक महान मानव समजले जातात.

    जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथील शासनाने गांधीजींचा भव्य ब्रॉन्झचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागांत स्थापन केला.

    चौकाला गांधी चौक (Gandhi Square.) हे नामकरण करुण करुन पुतळ्या खालती एक स्तंभ ( शिलालेख ) कोरला होता. तो असा.

    M. K. Gandhi Attorney at law

    Mohandas K. Gandhi was a famous figure at Johannesburg’s first law courts located on Government Square, now renamed Gandhi Square. He kept offices near the law courts from 1903 to 1910, at the corner of Rissik and Anderson Streets, and challenged racially discriminatory enactments, both inside and outside of the courts. Gandhi’s legal work soon merged with his

    Satyagraha ( ‘Soul Force ‘ ) movement of passive resistance, putting his legal career behind him. Gandhi dedicated himself to a lifetime of public service.

    Gandhi returned to India in 1914 after 21 full and fruitful years in South Africa.

    Continuing the search for truth which he had begun in South Africa, he plunged in to India’s struggle for freedom and came to be hailed by his people as Mahatma, ‘ Great Soul ‘

    Sculptor : Tinka Christopher

    Unveiled by His Worship the Executive Mayor Councillor Amos Masondo,

    2 October 2003

    त्याच पुतळ्याच्या दुसऱ्या बाजूला स्थंभ ( शिलालेख ) कोरलेला असून त्यावरती त्यावेळचे गांधीजींचे विचार व्यक्त केलेले आहेत.

    I learn during all those years to love Johannesburg even though ir was a mining camp. It was in Johannesburg that I found my most precious friends. It was in Johannesburg that the foundation for the great struggle of Passive Resistance was

    Laid in the September of 1906…

    Johannesburg, therefore, had the holiest of all the holy associations that Mrs. Gandhi and I will carry back to India.

    M. K. Gandhi, 1914

    जगातींल सर्वांत श्रीमंत व बलशाली असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा हे महात्मा गांधीजीना खूप आदरणीय स्थानावर मानतात. त्यांचे तैलचित्र हे आजही त्यांच्या भव्य कार्यालयांत दिमाखाने जगासमोर आहे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      July 17, 2017


  • मनाचा Appendix

    मानवी शरीर शास्त्रानुसार एक निरुपयोगी असा अवयव … किंवा “निरुपद्रवी” म्हणू हवं तर …. कारण त्याचं निसर्ग नियमानुसार शरीरात असणं कदाचित आवश्यक असेल पण त्याचं शरीरातल्या दैनंदिन कारभारात एरवी काहीच योगदान नसतं . ते शांतपणे आपल्या पोटात स्वतःच्या डोळ्यावर “आतडं” पांघरून निपचित पडलेलं असतं . पण कुठल्याही कारणास्तव त्याच्या नैसर्गिक अवस्थेत काही बदल, काही बिघाड झाला , त्याचा नैसर्गिक आकार वाढला की मग मात्र तो आपल्याला त्रास देऊ लागतो .

      August 21, 2021


  • अपूर्वाई चा पूर्वरंग – 2 (माझी लंडनवारी – 5)

    समोर भल्या मोठ्ठ्या काचेच्या भिंती. पलिकडे अवाढव्य विमाने, टॅक्सी वेज्, कुठे प्लेन उड्डान घेण्याच्या तयारीत तर एखादे प्लेन आपले प्रवाश्याना ईप्सित स्थळी पोचवण्याचे कर्तव्य पार पाडून विश्रांती घेण्याच्या तयारीत. माझ्या डाव्या हाताला रेस्टारंटस्, दुकाने होती – अतिशय शोभिवंत आणि देखणी!

      January 3, 2022


  • ब्रह्मांड – एक आठवणे !

    तसं पाहिलं तर ब्रम्हांड आठवणे, तोंडचे पाणी पळणे, पायात गोळे येणे, मटकन बसणे, जीव भांड्यात पडणे वगैरे शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकतो, कधीमधी त्यातल्या एखाद्याचा आपल्याला अनुभवही येतो. पण या सगळ्याच्या सगळ्या अवस्थांचा अनुभव पंधरा वीस मिनिटात येणे हे तसे दुर्मिळच. आम्हा उभयतांना मात्र हा अनुभव आला. त्याचं झालं असं –

      November 8, 2020


  • हेच खरे प्रेम! हाच खरा विश्वास (कथा)

    संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते.

      May 1, 2022