(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • झुंज – अंधाराच्या राक्षसांशी

    डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य दमलेला, ओजहीन दिसत होता. सूर्य अस्त होताच, थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय. हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य. काही दया-माया न बागळता हे राक्षस आपल्या शरीरातील सर्व उर्जा, तेज, शक्ती शोषून घेतात. किती ही गरम कपडे घातले तरी ही बचाव होत नाही. रात्री बिछान्यावर पडल्यावर वाटू लागले शरीरातील जुन्या जखमा अंग वर काढू लागल्या आहे, नवीन जखमा ही भरभरून वाहू लागल्या आहे. असह्य वेदनांमुळे डोळा लागत नाही. हे अंधाराचे राक्षस व्याधीग्रस्त मानवांवर हिंस्त्र प्राण्याप्रमाणे तुटून पडतात. व्याधीग्रस्त माणसांना तडपवून मारण्यात राक्षसाना आसुरी आनंद मिळतो. किती ही डोक्यावर पांघरूण घेऊन त्यात दडले तरीही राक्षसांच्या भेसूर हास्य आणि डरकाळ्या सतत रात्रभर ऐकू येतात. बिछान्यावर कड बदलता -बदलता सारी रात्र निघून जाते. तेंव्हा कुठे जाऊन ब्राह्म मुहूर्तावर डोळा लागतो. सकाळी घड्याळाच्या गजरा बरोबर जाग येतेच (सवयच आहे ती). आधी शरीरला चिमटा घेऊन जिवंत असल्याची खात्री करतो, भिंतीवर लटकलेल्या घड्याळा कडे पाहतो, सकाळचे साडेपाच वाजलेले असतात. उठण्याची इच्छा नसते तरी ही देवाचे नाव घेऊन कसा-बसा उठतो. आता पुढचे दीड महिना तरी असेच हाल होणार. जनवरी महिन्यात संक्राती येईलच. सूर्याचे तेज पुन्हा वाढू लागेल. सूर्याच्या उर्जेने शरीरात नवचैतन्य येईल. तो पर्यंत तरी रोज जगण्यासाठी संघर्ष करावाच लागणार. ...शरीरात साठविलेल्या शक्तीने अंधाराच्या राक्षसांशी झुंज देत देत....आयुष्याची गाडी पुढे रेटावी लागणार.

    -- विवेक पटाईत

      December 6, 2014


  • अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग १

    मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो.

      June 2, 2018


  • साबुदाण्याची खिचडी

    असा कोणी आहे का की ज्याला साबुदाण्याची खिचडी माहिती नाही ?माहिती तर सगळ्यांनाच असते पण हं, प्रश्न आवडीचा असतो. काहीजणांना खूप आवडत असते तर काहीजण आवडत नाही असं नाक मुरडून सांगतात. खरे तर साबुदाण्याची खिचडी आवडत नाही असे होत नाही, पण माझी खात्री आहे की ज्यांना ती आवडत नसते त्याचे मूळ कारण दातातल्या फटी असतात. त्या फटींमध्ये साबुदाणा किंवा शेंगदाणा अडकला की असह्य वेदना होतात आणि खिचडी न आवडण्याचे ते मुख्य कारण असू शकते. आपल्याकडे एक म्हण आहे ना कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसला हा प्रकार. असो.
    साबुदाण्याची खिचडी म्हटले की "उपास"आलाच. हा उपास पण कधी जबरदस्तीने तर कधी आवडीने तर कधी वजन उतरविण्यासाठी,व अलीकडे तर detox साठी सुद्धा केला जातो. काहीजण तर खिचडी हक्काने खाता यावी म्हणूनही उपास करतात. आमच्या लहानपणी तर खिचडीच्या लालसेनेच आम्ही उपास करत असू. पण कसे आहे ना वय वाढत जाते तसा उपास होत नाही. मग डायबिटीस चे कारण असो की दातांच्या फटीचे.

    उपासाची आणखीन एक गंमत असते बर कां मित्रांनो, सहलीसाठी चार दिवस गेलो तरी एक उपास तर येतोच. व सवयीप्रमाणे आपण तो करतोच. बहुतेक ठिकाणी उपासाची खिचडी खायला मिळतेच नाहीतर वेफर्स तरी मिळतात त्यामुळे फारसा विचार करण्याची वेळ येत नाही.

    खिचडीचा एक मजेदार प्रसंग आठवतोय. 1977 मध्ये आम्ही भावनगरला होतो. आम्हा काही कुटुंबीयांची बरोबर बरोबरच बदली झाली होती. आमच्या एका मैत्रिणीला ताबडतोब स्वयंपाक वाल्या बाई मिळाल्या होत्या. ती बाई स्वयंपाकपाणी चवीक करत असे. एकदा आम्ही काही मंडळी दुपारच्या वेळेस मैत्रिणीकडे रमी खेळायला गेलो. शनिवार होता. मॅडमने अस्सल मराठ मोळा साबुदाणा खिचडीचा बेत केला. आम्हा सर्वांना गरम मिळावी म्हणून बाईला 5 च्या सुमारास फोडणी घालायला बोलावले. बाई येण्यापूर्वी तिने सगळी जय्यत तयारी करून ठेवली अगदी मिरची बटाटे कोथींबीर चिरण्यापासून ते नारळ खवण्यापर्यंत सगळे. बरोबर पावणे पाचला बाई आली. खेळण्यात गर्क असलेल्या मैत्रिणीने बसल्या जागून ऑर्डर सोडली "कमला बेन सगळी तयारी करून ठेवली आहे खिचडी फोडणीला घाला ". रमीचा डाव व सोबत गप्पांनी रंग पकडला होता. काही वेळाने कुकरची शिट्टी ऐकू आली... एक... दोन... तीन.. मैत्रीण गोंधळली. कुकरची शिट्टी ?.. तिने हातातले पत्ते टाकले व किचन कडे धाव घेतली.. तिच्या सोबत आम्हीही. स्वयंपाक खोलीतला प्रकार पाहून अक्षरशः कपाळाला हात लावला. बाईने भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, तूप, जिरे व चिरलेल्या सगळ्या जिनसा व चवीला गूळ आणि पाणी घालून मस्त मऊ मऊ साबुदाण्याची खिचडी, हं, खिचडी नाही तिखट गोड लापशी बनवली होती. ह्यात बाईंची काही चूक नव्हती तिच्याकडे खिचडी म्हटले की अशीच करतात. पण आम्ही ही कधीही न विसरणारी लापशी कम खिचडी खाल्ली. आहे की नाही गंमत ?

    काश्मीरची तर अजून मजेशीर खिचडी. ह्या काश्मिरी लोकांना आपल्या केसरी ट्रॅव्हल्स वाल्या मंडळींनी साबुदाणा खिचडी करायला शिकवली आहे. तिथल्या लोकांनी त्यामध्ये आपल्या पद्धतीने सुधारणा केली आहे. शेंगदाणा कुटा ऐवजी अक्रोड बदामाचा मिक्स कूट, शुद्ध केसर, वेलची पावडर, व लवंगीवर फोडणी घातलेली "special kashmiri sabudana khichdi "अतिशय प्रेमाने आम्हाला खाऊ घातली आहे.

    वैष्णव देवीची हळद, बडीशोप घातलेली उपास special साबुदाणा खिचडी तर आपल्यापैकी बहुतेकांनी खाल्ली असेल.
    आणखी एक प्रसंग. .. एकदा बालीला जाण्याचा योग आला. आठवडाभराच्या वास्तव्यात चतुर्थी येणार हे नक्की होते. बालीची संस्कृती खूपशी हिंदू संस्कृतीच्या जवळची आहे असे ऐकले होते. त्यामुळे तिथे उपासाचे काही ना काही नक्कीच खायला मिळेल ही खात्री होती. आमच्या एका फॅमिली friend ची कर्मा क्लब ची मेम्बरशिप होती. त्यांना भलामोठा 3 बेडरूम, स्विमिंग पूल, पॅन्टरी असलेला व्हीला दहा दिवसांसाठी मिळाला होता. आम्ही तीन कुटुंबे गेलो होतो. ही राहण्याची जागा गावापासून बरीच लांब होती त्यामुळे तिथेच खात होतो. अक्षरशः तिप्पट किंमत मोजावी लागत होती. जितके पदार्थ खात होतो त्यातल्या कुठल्याच पदार्थाची चव आपल्या पदार्थाच्या जराही जवळची नव्हती infact त्या चवीचा व आपल्या चवीचा दूर दूर पर्यंत काही संबंध नव्हता. इतकेच काय फोडणीचे तेल सुद्धा माशाचे. त्यामुळे चतुर्थी कडक करावी लागणार हे लक्षात यायला वेळ लागला नाही.

    आमच्या समोर गहन प्रश्न उभा राहिला. त्यातून आम्ही सगळे सिनियर सिटीझन, काही न खाता राहणे शक्यच नाही. दुपारी restaturant मध्ये बसून ह्या गहन प्रश्नावर आमची जोरदार चर्चा सुरु होती. उत्तर काही सापडत नव्हतं. शेवटी बाप्पालाच साकडं घातलं नाहीतर उपास सोडावा लागेल अशी त्याला warning पण देऊन टाकली.

    अचानक मागच्या टेबलावर बसलेले दांपत्य उठून आमच्या जवळ समोरच्या खुर्चीवर विराजमान झाले. ते भारतीय असल्याचे आमच्या पटकन लक्षात आले. ते म्हणाले "नमस्कार मंडळी. मी करंदीकर व ह्या माझ्या सौ. मीना करंदीकर. आम्ही पुण्यावरून आलो आहोत "आम्ही नमस्कार करून आमचीही औपचारिक ओळख करून दिली.करंदीकर म्हणाले, "खरे तर आम्ही अजून चार दिवस राहणार होतो. पण घरी काही emergency आल्यामुळे आम्हाला आज रात्री जावे लागणार आहे. मुद्धा तो नाही. विषय तुमच्या पेक्षा थोडा वेगळा आहे. आमचाही चतुर्थीचा उपास असतो. आमच्या सौ. ने घरून येताना साबुदाण्याच्या खिचडीची सर्व कोरडी तयारी सोबत आणली आहे अगदी साजूक तुपापासून ते खोबर्यापर्यंत सगळे. आमच्या पुढे असा प्रश्न आहे की हे सामान परत माघारी न्यावे की काय ?इथल्या लोकांना तर देण्यात अर्थच नाही त्यांना तर हे काय ते समजणार सुद्धा नाही. व फेकून देणे मनाला पटत नाही. त्यामुळे आम्ही सकाळपासून बाप्पाला आळवत होतो "त्यांना मध्येच थांबवत सौ मीना ताई म्हणाल्या, तुमची हरकत नसेल तर ते सामान तुमच्या व्हीला वर पोहचवतो. तसे थोडे जास्तच सामान आहे. तुम्हाला पुरेसे होईल "त्याच क्षणी आमची त्यांच्या सोबत दाट मैत्री झाली. म्हटले "अहो चालेल काय पळेल. बाप्पाने इतके मोठे solution आपल्या सगळ्यांना दिले आहे. त्याचा मान तर ठेवावाच लागेल. हो की नाही "ह्यावर आम्ही सगळे मोठ्याने हसलो.

    पुढील अर्ध्या तासाच्या आतखिचडीचे साहित्य व्हिला वर पोहचले. मग काय, दुसऱ्या दिवशी आनंदी आनंद. जोरदार खिचडी करून त्यावर ताव मारला. मनोमनी करंदीकरांचे आभार मानले. आम्ही तर खूषच पण कदाचित बाप्पा ही खुश झाला असेल. त्याने काय जोरदार डील घडवून आणले होते.

    त्या दिवशी घरापासून हजारो किलोमीटर दूर खालेल्या त्या खिचडीचा आस्वाद लहानपणी हट्ट करून खालेल्या खिचडी पेक्षा फारच सुंदर आणि निराळा होता.

    अशा ह्या साबुदाण्याच्या खिचडीच्या गमती जमती........

    --सौ वैजयंती गुप्ते

    गांधीनगर गुजरात

      September 20, 2022


  • रुई हुनही हलके (सुमंत उवाच – १३)

    सुमंत जयंत परचुरे. 

    जगात सर्वात हलकं काय असेल तर तो कापूस नाही तर माणसाचे कान असतात.

      September 4, 2021


  • नाट्य तपस्वी मामा पेंडसे

    १९२९ ते १९६९ अशी सलग ४० वर्षे मामांची रंगयात्रा व्यावसायिक रंगभूमीवर अव्याहत सुरू होती. या यात्रेमध्ये ‘आग्र्याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘तोतयाचे बंड’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘खडाष्टक’, ‘एक होता म्हातारा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘स्वामिनी’, ‘सन्यस्त खङ्ग’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वर जुळता गीत तुटे’, ‘आंधळ्यांची शाळा’, ‘लोकांचा राजा’, ‘कुलवधू’, ‘महापूर’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ इत्यादी पन्नासएक नाटकांमधून मामांनी आपल्या लक्षवेधी अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडवले.

      January 26, 2022


  • ध्वनी’ – एक ईश्वरी उर्जा

    सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. त्याचा सुरतालांत गाणे बद्ध करण्याचा, संगीताच्या आनंदात रममान होण्याचा प्रयत्न. माझा प्रयत्न जाणिवेतून होता. त्याचा कदाचित् अजाणतेने. मार्ग मात्र जात होते ते त्या अनंतातील कोणत्यातरी दालनांत.

    "ध्वनी " एक ईश्वरी उर्जा ह्यामध्ये.

    नामस्मरणाची प्रक्रीय व उद्देश कोणता. परमेश्वर संकल्पनेशी एक रुप होणे. शब्दांत दडला आहे स्वरुप आणि ध्वनी. स्वरुप असेल विचारांचे - कल्पनांचे आकार. जे खोटा आभास निर्माण करतील. उलट ध्वनीत एकरुप होण्याचा अनुभव आनंद व ईश्वरी असेल.

    नामस्मरणाच महत्व चांगलच लक्षांत आले होते. प्रथम त्या परमेश्वरला जाणणे, त्याच्यामध्ये एकरुप होण्याचा प्रयत्न हेच जीवनाचे अंतीम ध्येय असावे हे समजलो. कारण तसे आपण सर्व शुन्यातून आलो व शून्यातच एकाग्र होणार. संसार, ग्रहस्थाश्रम इत्यादी सारे मार्ग फक्त देहाच्या वाढीसाठी व अंतीम ध्येयाकडे नेण्याकरीता.

    नामस्मरण कुणाचे. तो परमेश्वर तर सर्व व्यापी, सर्व श्रेष्ठ, निर्गुण निराकार. हे जगाने मान्य केले. त्याचे नामकरण हे केवळ मन केंद्रीत करण्यासाठी. मात्र तो एक मार्ग समजुन. ध्येय व साधना यांची स्पष्ट जाणीव सतत असावी. नसता साधनेलाच ध्येयाचे रुप समजून अनेक फक्त मार्गातच रेंगाळतात. इष्ठ देवतेचे नाम व तेही लयबद्धते मध्ये शांत मनाने घेत त्या परमेश्वराची आराधना समाधान देते. तरी खरी शांतता अद्यापी बरीच दूर राहते.

    कुठे व कसा आहे तो परमेश्वर. सत् चित् व आनंद किंवा सत्यम् शिवम् सुंदरम् ह्यातच त्या परमेश्वराचे योग्य व निश्चीत असे वर्णन ऋषीमुनीनी केलेले आहे. फक्त " आनंद " हाच ईश्वर असतो. मात्र त्यामध्ये विचार वा भावना ह्यांचा किंचीतसा देखील स्पर्ष नसावा. केवळ आनंद आनंद आणि आनंद. आनंद व्यक्त होत नसतो. व्यक्त आनंद खरा आनंद रहात नाही. समाधान व्यक्त होते. शांतताही व्यक्त वा शरीर मनावर प्रकट होते. जे जे व्यक्त केले जाते, कुठेतरी कृत्रिमता त्यावर अच्छादलेली असते. फक्त आनंद ह्रदयामधून शरीरभर पसरुन जातो. विचार शुन्य, भावना शुन्य तरीही एका वेगळ्याच अनुभवाची प्रचीती. क्षणिक तरीही अनंत काळ व्यतीत झाल्याप्रमाणे.

    मानव हा निसर्गातील एक घटक. मात्र त्यानेच स्वतः आपण सर्व श्रेष्ठ नैसर्गिक कलाकृती असल्याचे चित्र जगासमोर रंगविलेले आहे. त्याला प्राप्त बुद्धीच्या देणगीच्या जोरावर तो हे सारे रंगवितो. ईश्वराने त्याच्या अगणित साधन सामुग्रीमधून फक्त पांचच तत्वांची जाण त्याला दिलेली आहे. आणि ती तत्वे जाणण्यासाठी, समजण्यासाठी पांचेंद्रिये देऊ केली आहेत. फक्त पांच इंद्रीयांच्या साधनांचा हा खेळ. त्याचा आधार घेत मानव प्रगतीच्या अर्थात उत्कर्शाच्या वाटा शोधीत चालला आहे.

    २ एक समज मानवाला आलेली आहे. आणि ती म्हणजे ही जी पांच तत्वे त्याला प्राप्त झाली आहेत. त्याच्याच आधाराने त्याला हा निसर्ग वा ईश्वर याला जाणावयाचे आहे. साधन limited परंतु साध्य मात्र अनंत. म्हणूनच मानव सत्यापेक्षा कल्पना जगतात जास्त भराऱ्या घेतो. विशेषकरुन त्याच्या परमेश्वराबद्दलचे विचार.

    ध्वनी ही एक ईश्वर निर्मीत उर्जा –शक्तीचे रुप. ध्वनी हे ईश्वरी अस्तित्वाचे रुप. अक्षर, शब्द, ओम् कार ( ॐ ), लय, लहरी, नाद, इत्यादी, वर्णनामधून व्यक्त होतो, तो ध्वनी. ह्या ध्वनीला सर्व अंगानी जाणणे हेच त्या परमेश्वराला जाणण्याचे एक साधन. ध्वनीला निरनीराळ्या रुपांत प्रकट करण्याचा मानवाने प्रयत्न केला. ध्वनीशी एकरुप होत, आनंदात विलीन होणे, हेच तर ईश्वर सान्निध्य होय.

    नामस्मरण हा एक प्रकार. नामस्मरणांत आम्ही कोणत्यातरी दिव्य शक्तीची आठवण काढीत, त्याच चक्रांत फिरत राहतो. मुळ हेतू विसरतो. तो असतो त्या ध्वनीचा शोध. नामस्मरण करताना शुद्ध हरपली पाहीजे, स्वतःला विसरले पाहीजे. नामस्मरण गळून पडले पाहीजे. कोणत्यातरी अज्ञात तंद्रीत गेले पाहीजे. भान हरपले पाहीजे. ती स्थिती क्षणीकच असेल. परंतु त्या हरपलेल्या भानाचे वेळेत मोजमाप होऊ शकणार नाही. नामस्मरणाचा तो अत्युच्च क्षण असेल. " आनंद " ज्याच्या अवती भवती असेल शांतता.

    त्याच प्रमाणे ध्वनी लहरी, धुंदी आणणाऱ्या सभोवताल-जगाला विसरावयास लावणाऱ्या- दोघांचा अर्थ एकच नव्हे काय ? अस्तित्व विसरुन एकरुप होण्याचे साध्य.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 26, 2017


  • हुशार प्रधान

    एक राजा होता. आपल्या राज्यातील जनतेबाबत त्याला अतिशय काळजी होती. त्यामुळे जनतेच्या हितासाठी त्याचे सदैव प्रयत्न चालू असायचे. शिवाय हा राजा शब्दाला जागणारा होता. त्याच्या तोंडून कोणाला शब्द दिला गेला तर तो आपला शब्द खरा करून दाखविल्याशिवाय मुळीच राहायचा नाही. त्याचा प्रधानही अतिशय हुशार होता. त्यामुळे राजाचा राज्य कारभार सुरळीत चालू होता. एकदा राज्यात मोठा दुष्काळ पडला. त्यावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून राजाने राजधानीतील सर्व प्रमुख नागरिकांची एक बैठक बोलावली. बैठक सुरू होताच राजाने सुरुवातीलाच सांगितले की, तुम्ही सर्व माझ्या भावासारखे आहात. आपल्या राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. त्याहून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला जे उपाय सुचतील ते तुम्ही सांगू शकता. त्या बैठकीला नगरातील एक लबाड सावकारही उपस्थित होता. त्याने राजाचे भाषण लक्षपूर्वक ऐकले होते. राजा शब्दाला जागणारा आहे, हेही त्याला माहीत होते. त्याचा फायदा घेण्याचे त्याने या वेळी ठरविले. त्यामुळे त्याची पाळी येताच तो सावकार म्हणाला. राजेसाहेब तुम्ही आताच आम्हा सर्वाना भावासारखे मानले आहे. त्यामुळे मी आता तुमचा भाऊ झालो आहे. त्यामुळे तुमच्या संपत्तीत माझाही वाटा आहे. त्यामुळे तो वाटा मला आत्ता तुम्ही द्यावा. सावकाराची मागणी ऐकून बैठकीतील सारेचजण अचंबित झाले. आता राजा कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले. तेवढ्यात बैठकीला उपस्थित असलेले प्रधान म्हणाले की, आपले राजेसाहेब शब्दाला जागणारे आहेत. त्यामुळे ते आपल्या संपत्तीचा वाटा सावकाराला देतीलच, परंतु ' भाऊ' म्हणून सावकाराचेही काही कर्तव्य आहे. राज्यावर दुष्काळाचे संकट आले आहे, त्यामुळे ते निवारण्यासाठी सावकार आधी आपली सारी संपत्ती राजाला दान करतील, अशी आशा आहे. बैठकीतील लोकांनी टाळ्या वाजवून प्रधानांच्या वक्तव्याला संमती दिली. लबाड सावकार मात्र चरफडत राहिला. राजाची अर्धी संपत्ती मिळविण्याच्या हव्यासापोटी त्याला स्वतःची संपत्ती गमावण्याची पाळी आली होती बैठकीनंतर सर्व गेल्यानंतर राजाने आपल्या हुशार प्रधानाला शाबासकी दिली.

      February 10, 2017


  • शाळा, शिक्षक, मुलं आणि सकाळ…

    पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं हळूच पसरतात जमिनीवर . नकळत बागेतली , दारातली , कुंडीतील फुलं बघतात डोकावून.आज तोडण्यासाठी कुणाचा नंबर आहे ते ?

    दिवस सरकत जातो.रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढते.. लालपरी मुक्कामाच्या गावावरून निघते. प्रवाशांची धांदल उडते.भाजीवाले,दुधवाले , खारी, पाववाले ओरडून विकतात.आपला माल... शिक्षक करतात प्रवास गाडीने . जेवणाचे डब्बे असतात सोबतीला.मुलंही पळतात शाळेच्या ओढीने . दप्तरात आपले भविष्य घेऊन . वडाच्या, पिंपळाच्या झाडावर भरते पाखरांची शाळा. गाव, नदी, डोंगर, रस्ता , चौक होतात जागे सेवेसाठी. मुलं शाळेत गोळा झाली की गजबज होतो सुरू. परिपाठाने घुमतो परिसर. सडा रांगोळीने सजते घर. शेतातील कामाची असते लगबग. खुरपणी , कोळपणी, नांगरणी, पाळी, पेरणी, राखणी, गुरांची सोडबांध , वेचणी , तोडणी यांचा असतो समावेश . शाळेत पहिला तास सुरू होतो. प्रसन्न मुद्रेने असतात सर्वचजण. हजेरी होते. वेळापत्रक असते.तासिकेनुसार शिक्षक बदलतात. भाषा, गणित, विज्ञान, कला, इतिहास , भूगोल हे असतात विषय . जे शिकवतात. जे घडवतात उद्याचा भारत. प्राथमिक शाळेतच घडत असते भविष्य .. शाळेत नसतो निर्जिव दगडांच्या सांगाडा .भींत बोलत असते मुलांशी . संवाद होतात फळ्यावरच्या अक्षरांशी. संवाद होतात रंगवलेल्या भिंतीशी.निसर्गातील प्रत्येक घटकांशी.. सकाळ सरून जाते पटकन.दुपारची चाहूल लागते. अंगाला ऊन स्पर्श करून जाते.जाणिव करून देते.पोटात ओरडतात कावळे. न्याहारीचा वखत टळून गेलेला. मुलं बघतात . किचनशेडकडे . भात , वरण , खिचडी की अजुन काही. हात धुवून तयार असतात.गाडीला अडकवलेला डबा पटकन येतो हातात. मनसोक्त होते पंगत . रानात सुटतात मजूर . दुपारच्या भाकरीसाठी. लसणाची चटणी आणि पाट्यावर रगडलेला ठेचा असतो . तोंडी लावण्यापुरता. कामाचा पडतो विसर . कारण कोणते तरी एक गाणं असत सोबतीला.असेच दिवस पडतात मागे एकेक ....प्रत्येक दिवसाची सकाळ असते नविन काही देणारी .. शिकवणारी ...

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    मो.9421442995
    vitthalj5@gmail.com

      May 17, 2017


  • भुयारी रेल्वे

    खरं पहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही? उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही.

      June 28, 2022


  • खोल किती आहे?

    मारुती नावाचा एक सालदार होता. खूप कष्टाळू होता. सगळ्या गावातील लोक म्हणत, मारुती कामाला जसा वाघ आहे, तसा खायला बकासूर आहे.

      October 5, 2025