नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
(उत्तर अमेरिकेतील लोककथा)
जमीन तयार केल्यानंतर रेव्हनने माणूस निर्माण करायचे ठरवले. त्याने माती व समुद्राकाठची वाळू घेतली आणि पहिला माणूस तयार केला.
November 15, 2025
नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.
December 31, 2020
“बळींचा प्रवाहो चालला !” या नावाची कथा मी लिहिली होती – माझ्या वालचंदच्या मित्रावर ! सरकारी नोकरीच्या बरबटलेल्या व्यवस्थेने घुसमट झालेल्या माझ्या कविमित्रावर – जो कालांतराने शेवटी या व्यवस्थेचा भाग झाला . त्याच्याकडे पर्याय नव्हता.
June 4, 2021
कलासरगम ही ठाण्यातील सांस्कृतिक नाट्यचळवळ घडवणारी हौशी नाट्यसंस्था. या संस्थेने आम्हाला काय दिलं? सांगू...
‘शून्यातून विश्व कसं उभं करायचं’ ते या संस्थेने शिकवलं. झिरो balance असताना गणेशोत्सवात १० x १० च्या स्टेजवर श्याम फडके, बबन प्रभू, वसंत सबनीस इत्यादी विनोदी लेखकांची तीन अंकी नाटके बसवून दहा दिवस ट्रेन, एसटीने किंवा टेम्पोने (boxset) प्रवास करून ठिकठिकाणी साखर कारखाने, गल्लीबोळात प्रयोग करायचे आणि जमा झालेला पैसा राज्य नाट्यस्पर्धेत ओतायचा आणि परत शून्यावर यायचं. कुठलाही स्वार्थ नाही की चढाओढ नाही. नटांचे नखरे नाहीत, मिळेल आणि पडेल ते काम, हमाली सगळं निमूटपणे कुठलीही कुरकुर न करता आनंदानं करायचं.
त्यावेळी मॉबच्या नाटकांची लाट असायची. ग्रुप मोठ्ठा फोफावत असल्याने कमी अनुभव असणारे पण उपजत नट मी सुहास डोंगरे सारखे कमी रोल असल्याने दिग्दर्शकाला भंडावून सोडत. मग तालमीतून दिग्दर्शक विजय जोशीचा सभात्याग. मग त्याला समजावणारे आम्हीच. राज्यनाट्याच्या एका तालमीत गडकरीची पॉवर गेली. म्हटलं, चला तालीम सुटली. पण विजय जोशीची जिद्द. मंडईतून भाजीवाल्यांकडून पेट्रोमॅक्सच्या बत्त्या आणल्या. आमच्याकडूनच आणि पुढे तालीम चालू, प्रसंगावर मात कशी करायची ते शिकलो यातून. कठीण इंग्रजी नावं असणारी नाटकं आम्ही करायचो. मुळात त्यातले अर्थ समजून घ्यायची पोचच आमची नव्हती. पण विजय जोशी पूर्ण नाटकात एक वाक्य असलं तरी त्याचा अर्थ तो अर्धा तास समजावून सांगे. डोक्यात किती जायचा तो भाग वेगळा. पण त्याचं महत्त्व आज कळतंय. प्रत्येकाकडे काटेकोर लक्ष दिलं जायचं. दिलीप पातकर, नरेंद्र बेडेकर हे पण नंतरचे दिग्दर्शक म्हणून धुरा वहायचे. पण ते सौम्य वृत्तीचे. मी राहायला मुलुंडला, ठाण्यालाच पडलेला असायचो. दीड महिना ‘असायलम्’ नाटकाची तालीम. नाटकात एकच वाक्य. पॉझ घेतला आणि प्रफुल्ल आठवलेंनी संधी साधली. माझं वाक्य तो म्हणाला, मला संपूर्ण नाटकात काही नाही, नेमके वडील नाटकाला आलेले... असा झापला घरी! दीड महिना हेच करत होतास का? आयुष्यात मला परत बोलवायचं नाही असा हग्या-दम भरला. तोच मॉबचा म्होरक्या आज व्यवस्थापनातला मॉब लीड करतोय.
अचाट, अफाट कल्पना तसेच वेडेवाकडे पण अर्थपूर्ण नेपथ्य. ‘अश्वमुद्रा’साठी सायकलचे रिम मग फिरताहेत, सगळे सायकलीच्या दुकानावर, मरमर मरायचं. त्यावेळी सांगकाम्या सारखी काम करायचो. पण प्रयोगात सेट लागला की त्या मरमरीच सार्थक व्हायचं. दुसरं वसंत आबाजी डहाकेंचं ‘श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा अथवा कुणाचाही खून ः संदर्भ भाऊबंदकी’ असलं लांबलचक नाव असलेलं दुमजली नेपथ्य असणारं नाटक म्हणजे नाट्यवेडेपणाचं मूर्तिमंत उदाहरण. विजय जोशीच्या गच्चीवर याची तालीम. विश्वास कणेकरने नोसिल कंपनीतून आणलेले स्कँफोल्डिंग. हे नाव उच्चारायची वेगळी तालीम आम्ही आपसात करायचो. त्यात महाराज (अनंत गोखले) चे वेगळेच latin words आम्ही ‘कन्फुज.’ राजा कणेकर हा त्यावेळी अंबानीसारखा भासे. अशा नाटकाच्या प्रयोगाला झालेले गच्चीवर एकमजली सेटवर तालीम करताना वरून खाली पाहताना बऱ्याच जणांना व्हर्टिगोचा त्रास होई, तालमीपुरता. नौपाड्याचा ट्रॅफिक कंट्रोल आम्ही तालीम करत करत बघत असत. प्रत्यक्ष प्रयोगावेळी किस्से खूप घडले. उदय सबनीसची अनाऊन्समेंट मस्त व्हायची. आजच्या त्याच्या डबिंग कारकीर्दीचा तो पाया असावा बहुदा. चिंचोळ्या जिन्यातून तुळोजी (गारदी) झालेला, मी नारायणरावाचा खून करून त्याला उचलून एक मजली जिना चढून घेऊन जाताना झालेली दमछाक, त्यात तलवार म्यानात जात नव्हती. ही ‘भंबेरी, ब्रह्मांड आठवणे’ म्हणजे काय ते त्यावेळी कळले. बरं वर पोहोचल्यावर दाराला लाथ मारली, नारायणाला टाकायला तर पुढच्या सीनमधल्या सुवासिनी रंजना भडसावळे आणि इतर बायका ओवाळणी घेऊन उभ्या. रोल कमी. त्यात त्या सिनियर. त्यामुळे ओरडायची पण सोय नाही. निमूट नारायणाला फेकला आणि सुटलो. परीक्षणात लगेच माझा उल्लेख श्रीहरी जोशींनी केला. ‘भूषण तेलंग तुळोजी दिसले, वाटले मात्र नाहीत.’ या सगळ्याचं तेव्हढ्यापुरतं वाईट वाटायचं, नंतर चूक उमजून पुढची चूक करण्याच्या तयारीला लागायचो.
सुरुवातीचा पोरकटपणा नंतरच्या काळात कमी झाला. मग आपण आणि आपली संस्थाच ग्रेट. दुसऱ्याच्या तालमीला गेलो की संस्थेच्या दबदब्यामुळे इतर दिग्दर्शक आणि कलाकार कॉन्शस होत. मग ती टिमकी वाजवली जायची. पण तेवढेच कुमार सोहोनीच्या नाटकांना किंवा उज्ज्वला टकले म्हणजे आताची श्रद्धा सोहोनीच्या अभिनयाला आम्ही सलाम करायचो. ‘मा अस साबरीन’, ‘अथं मनुस जगन हं’ला संस्था विरोध विसरून आमच्यातलं कोणीतरी कुमारला म्हटलं होतं. प्राथमिक फेरी काय, फायनलला पण पहिलं येणार आणि तेच झालं. स्पर्धा, हमरीतुमरी, असुया असायची. पण निखळ स्पर्धा पण होती. अभिवादन कल्याणच्या रवी लाखेचं नाटक ‘कलासरगम’ करायची, अशोक बागवेच्या ‘कलासरगम’च्या नाटकात रवी लाखे अभिनय करायचा. मित्रसहयोगचे अशोक साठे, नंदू नाईक, प्रबोध कुलकर्णी, विनायक दिवेकर, शशी जोशी, आदर्शचे केशवराव मोरे. सगळ्या संस्थांना नाटक पुरवणारे श्रीहरी जोशी, पुष्पाताई जोशी, भालचंद्र रणदिवे, डोंबिवलीचे नेपथ्य, प्रकाशयोजनाकार सुरेश मगरकर या सगळ्यांची नाटकाबद्दल असणारी आस्था यामुळे थोडेफार असणारे वैचारिक मतभेद वगळता सगळे ‘कलासरगम’ जोडलेलेच होते.
‘कलासरगम’ने नंतर पी. सावळारामांच्या गाण्यांचा ‘अक्षय गाणी’ हा कार्यक्रम नरेंद्र बेडेकरच्या संकल्पनेतून भाऊ डोके, प्रफुल्ल आठवले, नेपथ्यकार प्रसन्न ढगे यांच्या परिश्रमातून साकार केला आणि जुन्या भावगीतांच्या या कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. ‘कलासरगम’ने नाटकाप्रमाणेच संगीताचे नवीन दालन उघडलं, ज्यात नरेंद्र बेडेकरचं अभ्यासपूर्ण निवेदन. उदय सबनीस सारख्या नटातल्या गायकाला पण ‘अक्षय गाणी’मुळे संधी मिळाली.
आम्ही ‘कलासरगम’मध्ये यायच्या आधी स्वतबद्दलच्या अचाट आणि अफाट कल्पनेत, हवेत वावरायचो. विजय जोशी यांनी केलेले संस्कार, माणूस म्हणून घडवण्याचे मोल मोठे आहे. आज जमिनीवरून चालतो आहोत तेही मानाने, नावानिशी, अभिमानाने ते केवळ ‘कलासरगम’मुळे. असे घडलो, घडवले गेलो. ‘कलासरगम’मुळे!
--भूषण तेलंग
September 5, 2022
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून "लहान" असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले.
मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय आहे ते माती बाजूला सारून पाहीले. तीला कळले की ज्ञानेश्वराचा आपल्यावर विश्वासा नाही.
ती शांतपणे म्हणाली की "ज्ञानदेवा, संन्याशाला सोने आणि माती समान असताना, तू या कृतीतून "मातीवर मातीच" नाही का टाकलीस? का सोन्यात आणि मातीत तुला फरक करता येत नाही?".
-- दीपक गायकवाड
March 16, 2017
थोडे औपचारिक बोलणे झाल्यावर कर्नलसाहेबांनी आपल्या अडचणींचा पाढा वाचला व “सिस्टीम” कशी नाडत्येय ते सांगितले.
प्रभाकर गंभीर होत म्हणाले, “कर्नल साहेब, देशासाठी तळहातावर शिर घेणाऱ्याची ही स्थिती आहे तर गरीबाच्या दैनंदिन जगण्यात किती कांटे पसरत असतील त्याचा विचार करा. असं असू नये असं वाटणारे तुमच्या माझ्यासारखे अनेक आहेत आणि मी तुम्हाला म्हणून सांगतो की तें सर्व पक्षांत, सर्वत्र, खाजगी कंपन्यातही आहेत. ह्या व्यवस्थेलाच बळ देणारेही सर्व पक्षांत आहेत. ते असो. सद्य परिस्थितीत मी तुम्हाला एक मार्ग सुचवतो. माझे एक वकील मित्र आहेत. ते सगळी कामं तुम्हांला करून देतील. तें ह्या सर्व कामांच्या मोबदल्यात फी म्हणून सत्तर-पंचाहत्तर हजार रूपये फी म्हणून घेतात. त्यांत सिस्टीमला द्यायला लागणारे सर्व पैसे व त्यांची खरी फी आली, बाकी खर्च वेगळा. तुमच्यासाठी मी त्यांना त्यांची ही फी तीस हजार करायला लावीन. तुम्हांला सर्व घरबसल्या मिळेल. चालेल?”
December 19, 2023

लीसन कांचेतून दिसणाऱ्या ताऱ्याला सहज “बिली जॅक्सन” हे नांव देते आणि अखेर त्याच नांवाचा डॉक्टर रूग्णवाहिकेंतून तिला वाचवायला येतो. चेटकीणीचे पाव मधे प्रेमिकेच्या आशेचे अचानक निराशेत परिवर्तन झाले तर ह्या कथेत संपूर्ण दु:खद गोष्टी घडत अखेरचे वळण आशादायी करते.
तरूण कर्तव्यदक्ष डॉक्टर चार चार पायऱ्या ओलांडत जिना चढून जातो रूग्णवाहिकेत तिला खाली ठेवत नाही आणि तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करून उपचार करत असतो.
July 6, 2022
ज्या इंग्रजीच्या आक्रमणाची आपल्याला एवढी धास्ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्द इतर भाषांमधून मुक्तपणे घेतले आहेत आणि त्यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे
March 12, 2019
मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे.
June 17, 2014
गरीब घरातून आलेल्या मुलीला तिच्या श्रीमंत सासरकडचे तिच्या माहेरच्या गरिबीची पदोपदी जाणीव करुन देत असतात, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते.
January 24, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti