नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
त्यांची आणि माझी प्रथम भेट नक्की कुठे झाली आठवत नाही. बहुधा पुण्यातील एखाद्या HR कार्यक्रमात झाली असावी. visiting cards ची देवाण -घेवाण झाली. माझ्या सवयीनुसार त्यांच्या कार्डमागे तारीख /वेळ /प्रसंग वगैरे मी लिहिले. स्मृती लख्ख राहाव्यात आणि भविष्यकालीन संदर्भासाठी नोंद असावी म्हणून माझा मित्र रविशंकरने मला ही सवय लावली आहे.
January 2, 2022
तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती. ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.
January 26, 2020

रविवारी गोमु बावाजीला खुर्चीवरून बागेंत म्हणजे सीबीडीच्या मॅंगो गार्डनमध्ये घेऊन गेला होता. तो अगदी काळजीपूर्वक खुर्ची ढकलत होता. अचानक बागेंत त्याला शकु दिसली. ती “अभ्यंकरांची शकु” अशी ओळख गोमुने मला दिली पण त्याआधीच मला ती आठवली होती. आधी आमच्या शाळेत आणि मग माझ्या कॉलेजमध्ये ब्यूटी क्वीन होती. मी आणि गोमु बालपणापासून तिला ओळखायचो. ती दिसल्यावर गोमुचं भान हरपणं साहाजिक होतं. तिच्याशी बोलतां बोलतां तो बावाजीलाच काय पण खुर्चीलाही विसरला.
February 25, 2022
कल्पनाला चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.. तशी संधी तिला, बलराज साहनी यांच्यामुळे मिळाली. ती मुंबईत आली..
September 23, 2021
चमत्कार रहस्य यांची सरमिसळ असले या असलेल्या या संदीप दांडेकर यांच्या कथा आहेत एकूण तेरा कथांचा हा संग्रह अतर्क्य मांडून वाचकांची भयकथा नची भूक भागवतो मात्र या कथा लिहिताना लेखकाने विज्ञान मानसशास्त्र इतिहासाचा अभ्यास केला आहे.
February 27, 2024
आपल्या भारतावर दिडशे वर्षे राज्य केलेले, भारतासारख्या दुभत्या गाईच्या दुधाची संपूर्ण मलयी आपल्या देशात घेऊन जाणारे हे इंग्रज. त्यांचा देश आहे तरी कसा? याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.
October 9, 2018
(मॉरिशसची लोककथा)
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक होते माकड आणि एक होते कासव. या कासवाला सात मुले होती. माकड मात्र आळसात वेळ घालवीत असे. कासव खूप कष्ट करीत असे. एकदा कष्टाचे काम केल्यावर त्याला त्याची मजुरी मिळाली, तर त्या मजूरीच्या पैशातून त्याने तांदुळाचे एक पोते खरेदी केले. ते पोते घेऊन कासव घरी येत असता वाटेतच मध्यावर थांबले. त्याने आपल्या पाठीवरचे पोते रस्त्यावर काढून ठेवले.
October 22, 2025

निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस. मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me”
April 15, 2020
प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या येऊ घातलेल्या कथासंग्रहातून साभार ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ पार पब्लिकेशन्स
August 30, 2017
एकेकाळी पुण्यामध्ये बहुतांश कोळशाच्या ज्या वखारी होत्या त्या शीखांच्याच होत्या. आता वखार क्वचितच दिसते. जेव्हा कधी मी एखादी अशी वखार पाहतो, तेव्हा मला शेठजींची आठवण येते.. एका पंजाबी माणसाने माझ्या वडिलांना मोठ्या भावाचं प्रेम दिलं, आपुलकी दाखवली… काळानुरूप आता अशी शेजारधर्म जोपासणारी माणसं समाजातून कमी होत गेली…
May 20, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti