(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ८

    त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला.

      April 8, 2020


  • बातमीतली कोंबडी

    कोंबड्या काय? मरतातच! खरंय. कोंबड्या तर रोजच मरतात. परवाच पुण्या-मुंबईत किती कोंबड्या ‘डिश’ हऊन येतात, याची

    आकडेवारी प्रसिद्ध झालीय. एरवी ती होतही नाही; पण नवापूरच्या कोंबड्यांना वृत्तपत्राच्या रकान्यात जागा मिळाली… अर्थात

    माणसासाठीच! बातमीच्या, वृत्तमूल्याच्या व्याख्येत कोंबड्या नेहमी बसत नाहीत, तर त्यासाठी काही निमित्त असावं लागतं.

    मनात आलं, असे अनेक विषय, घटना, माणसंही असतीलच की जे मरतात कोंबड्यांसारखे; पण त्यांची बातमी होत नाही!

      February 23, 2006


  • दार

    एक होती “ही” आणि एक होती “ती”. दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता.

      February 4, 2026


  • वेगळे ते उत्तम लक्षण (सुमंत उवाच – भाग ८२)

    सुमंत जयंत परचुरे. 

    जे पटत नाही, जमत नाही किंवा जी जागा आपल्या साठी नाही तेथून निघून जाणे सर्वात चांगले. त्यालाच अध्यात्मिक भाषेत वैराग्य म्हणतात पण ते शरीरात आणणे फार कठीण आहे कारण ते आणण्यासाठी सर्वात पहिले मारावा लागतो अहंकार, मग लोभ, द्वेष, वासना, प्रेम, सुखं, दुःखं, सोयी- सुविधा हे सगळं सोडावं लागतं.

      November 29, 2021


  • एक लक्ष वाचक – एक प्रवास

    एकदा आमच्या चिरंजीवाने बाबा तुम्ही स्वत:चा ब्लॉग लिहा, हा सल्ला दिला. कॉम्पुटर बसून ब्लॉग ही बनवून दिला, त्या वेळी ब्लॉगचे काय नाव द्यायचे हे सुचले नाही म्हणून स्वतचेच नाव ब्लॉगला दिले आणि लिहायला सुरुवात गेली……

      November 3, 2014


  • सेनापतीची हुशारी

    एका राजाच्या कोषागार विभागात दोन सेवक होते. एकाचे नाव होते धनीराम, तर दुसऱ्याचे मस्तीराम. मस्तीराम नावाप्रमाणेच मस्तवाल होता. कोषागार विभागात काम करताना अनेकदा राजाच्या खजिन्याचे दर्शन त्याला घडे. त्यामुळे त्याचा खजिन्यावर डोळा होता. खजिन्याचा किती दिवस नुसता पहाराच करायचा? संधी मिळाली तर खजिन्यातील मौल्यवान वस्तू चोरून दूर कोठेतरी पळून जाण्याचा व आरामात राहण्याचा त्याचा विचार होता. आपला हा विचार त्याने धनीरामलाही बोलून दाखविला. धनीराम सरळ स्वभावाचा व प्रामाणिक असल्यामुळे त्याने त्याला विरोध केला; परंतु एक दिवस धनीराम पहाऱ्यावर असतानाच मस्तीरामने संधी साधली व खजिन्यावर डल्ला मारला.

    राजवाड्यात चोरी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सेनापतीने पहाऱ्यावरील सेवकाला पकडून आणण्याचे आदेश दिले व सैनिकांनी धनीरामलाच पकडले. मात्र धनीरामने चोरीचा इन्कार करताना मस्तीरामचे नाव सांगितले. त्यामुळे मस्तीरामलाही पकडण्यात आले. त्याने धनीरामनेच चोरी केल्याचे सांगितले. दोघेही एकमेकांचे नाव घेत होते. त्यामुळे खरा चोर कोण, असा सेनापतीला प्रश्र पडला. सेनापती हुशार होता. त्याने त्या दोघांनाही सोडून दिले, मात्र जाताना त्यांच्याजवळ राजवाड्यातील बागेतील दोन-दोन हिरवे आंबे दिले व त्यांना सांगितले की, ज्याने चोरी केली नाही त्याच्याजवळील एका आंब्याचा रंग रात्रीतून पिवळा होईल.

    धनीराम व मस्तीराम दोघेही आपल्या घरी गेले. धनीरामने चोरी केलीच नव्हती, त्यामुळे तो घरी निवांत झोपला. मात्र मस्तीरामला झोप येईना. आंब्याचा रंग पिवळा (म्हणजे पिकलेला) झाला नाही तर आपली चोरी उघडकीस येईल या भीतीने त्याने मध्यरात्री दोनपैकी एका आंब्याला पिवळा रंग लावला व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सैनिक त्या दोघांच्या घरी गेले व त्यांच्याजवळील आंब्यासह त्या दोघांना सेनापतीपुढे उभे केले.

    धनीरामजवळील दोन्ही आंबे हिरवे होते, मात्र मस्तीरामजवळील एक आंबा हिरवा तर दुसरा पिवळा दिसत होता. सेनापतीने सैनिकांना मस्तीरामच्या मुसक्या बांधण्यास सांगितले. शेवटी मस्तीरामने चोरी केल्याची कबुली दिली.

    सेनापतीच्या धूर्तपणामुळे धनीरामसारख्या प्रामाणिक सेवकावरील चोरीचा आळ दूर झाला होता. त्यामुळे धनीरामने सेनापतीचे आभार मानले.

      December 9, 2017


  • विश्वास

    सुनीताच्या चेहऱ्यावर मनातली खुशी तरळून गेली. विश्वास आत आला. पाठीवरची सॅक हातात घेतली. कुठे बसावे हे न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला. सुनीता त्याचे निरीक्षण करीत होती. सहा फूट उंची, कुरळे केस, पिंपल्सनी भरलेला उभट चेहरा, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळी पँट व इन केलेला पांढरा शर्ट. डोळे थोडे मोठे असते तर आपल्या अजयसारखा बराचसा दिसला असता. तिला परदेशात असलेल्या तिच्या मुलाची तीव्रतेने आठवण आली. ती म्हणाली, ‘अरे, बस ना खूर्चीवर, सामान आणलं नाहीस का तुझं? इथं राहायला आलास ना तू?’

      June 22, 2026


  • बोनस

    मधल्या सुटीची घंटा वाजली तसं चौघे म्हणजे रोहन, मनोज, अजित आणि दीपक म्हणजेच दिपू… वर्गातून पळत सुटले ते सायकल स्टँड कडे …. त्या पैकी रोहन ला दोन दिवसा पूर्वीच त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून नवीन सायकल मिळाली होती…आणि ती सायकल पाहण्यासाठी हे बाकीचे तिघे उत्सुक होते… आणि खरोखरच भानामती झाल्या प्रमाणे हे तिघे रोहनची नवीन सायकल पहात होते.. एटलास कंपनीची ….लाल चुटुक रंगाची सायकल, ” च्यायला काय भारी आहे रे सायकल? ” …. ” कितीला पडली? ” …आणि ” हे वायरचे ब्रेक आहेत का? ? ” अश्या उद्गारांसहित तिघे सायकल न्याहाळू लागले. ..सायकल ही फक्त काळया रंगाचीच असते … लोखंडी …अवजड !! अशी समजूत असल्याने .. ही नवीन सायकल म्हणजे या तीघां च्या दृष्टीने ” अद्भुत ” होती ..आणि सायकलचं कौतुक ऐकुन रोहन च्या अंगावर मात्र मुठभर मास चढत होतं… ” साडे सातशे ची आहे सायकल, नवीनच मॉडेल आलंय हे …” रोहन ने छाती बाहेर काढत उत्तर दिलं..

      November 24, 2024


  • नूतनीकरण

    आठ-दहा दिवसांनंतरची गोष्ट. रविवारचा दिवस होता. मी दासबोधाचा क्लास संपवून घरी आले. दार उघडले तर समोरच एक मुलगा बसलेला होता. निळे जीन्स पँट आणि पिवळ्या-निळ्या चौकडीचा शर्ट त्याने घातलेला होता. पंख्याच्या वाऱ्याच्या झोताने हलके हलके उडणारे त्याचे सिल्की केस मस्त दिसत होते.

      May 7, 2022


  • टॅक्सी !

    शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा वेगळाच दिवस होता .

      April 1, 2018