नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मी सासवड येथे भरणार असलेल्या ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे हे आपणास विदित असेलच. त्यामागील भूमिका आपणाप्रत पोहोचवावी या हेतुने हे पत्र आपणास लिहित आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी मनाचा खरा उद्गार बनायला हवे. ते साहित्य-संस्कृतीच्या मुलगामी चिंतनाचे, दिशादर्शक आणि जाणीवा प्रगल्भ करणारे आशयघन उद्गार बनावे ही माझी भावना आहे.
September 24, 2013
चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें नामाभिधान करतांना , त्या कवीच्या होता की काय, नकळे.
June 15, 2017
कार्यक्रमांसाठी मी थोड्या वेगळ्या वाटेने जायचे ठरवले आणि तशी संधीही मला लवकरच मिळाली. सरकारतर्फे एक निवेदन टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते. हे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ कल्चरतर्फे छापले होते. नॅशनल इंटिग्रेशन थ्रू म्युझिक अॅन्ड डान्स या विभागात समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता अशी शिकवण देणारे संगीत व नृत्याचे प्रोजेक्टस् मागवले होते. त्यांचे कार्यक्रम छोट्या शहरातून व गावातून सरकारतर्फे केले जाणार होते.
July 17, 2022
एके दिवशी सुरम्य संध्याकाळी, सर्वाथानेच मुग्ध गंधाळणाऱ्या अप्रतीम सुंदर अशा कार्यक्रमात निमंत्रीतांच्याच रांगेत मी बसलो होतो. माझ्याच पुढील रांगेत अगदी माझ्याच समोरील खुर्चीत एक विलक्षण स्वर्ग सुंदरी बसली होती. तिच्या त्या लावण्य सुंदर कमनीय पाठमोऱ्या पण अप्रतीम सौन्दर्याने तीला पाहण्याची तीव्र इच्छया मला झाली होती. खरं तर असं कधीच झालं नव्हतं! तिच्या त्या सुकुमार गौरांगी सोज्वळ कांती वरुन तिच्या काळ्याभोर क़ुरळ्या केशसांभारातून पाठीवर रुळणारा बकुळ फूलांचा माळलेला गजरा त्या गंधाळलेल्या वातावरणाला अजुनच गंधाळून टाकत होता.
बकुळगंध तसा दुर्मिळच ! तीला समोरून पाहण्याची माझी उत्सुकता ही मात्र शिगेला पोहोचली होती. एवढयात व्यासपीठावरुन. कृपया " कवयित्री यामिनी काजळे" यांनी व्यासपीठावर यावे अशी संयोजकांनी विनंती केली होती. आणी क्षणार्धातच त्याच माझ्याच समोर बसलेल्या विदुषीला तिच्याच बरोबर आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीने सर्वार्थाने सावरुन तीला हाताला धरूनच व्यासपीठावर नेले. मी पहात राहिलो! व्यासपीठावर लगेचच तिचा एक कवयित्री म्हणून यथायोग्य साजेसा सत्कारही करण्यात आला. मी सारे आश्चर्याने पहात होतो.
संयोजकांनी तीला दोन शब्द बोलावेत अशी विनंती केली.तिच्या हातामध्ये व्यवस्थित माईकही दिला.मी आता भानावर आलो होतो. ती सुंदर विदुषी आपल्या अत्यंत लाघवी मंजूळ अशा आवाजात बोलत होती. नमस्कार! मी "यामिनी काजळे. आपणा सर्वांचीच ऋणी आहे. आपल्या प्रेमाने मी अंतरातून भारावून गेले आहे! माझ्या या दैवजात अशा अंध:काराच्या रंगमहालातून तुम्हा सर्व सहॄदांना न्याहळत आहे. कितिकिती सुंदर आहे सारे हे जग! आणी तुम्हीही सर्वजण! माझ्या या बंद अंधार पापण्यातून तुम्हा सर्वांच्याच निर्मळ, अतूट आणी असीम प्रेम बंधनातून माझ्या अंतरात्म्यात सातत्याने झूळझूळणाऱ्या साऱ्या संवेदना मला सर्वार्थानं तृप्त आनंदाने जगवित आहेत. त्या संवेदनांची भावशब्द फुले होतात. त्या फुलांची अक्षरे होतात. अक्षरांच्या ओळी होतात. ओळीरचना कवीतांच्या स्वरुपात प्रसवतात.अन ते प्रसवणे एक " काव्यापत्य असते.आणी ते तुम्ही सारे अलवार स्वतःच्या ओंजळीत हॄदयाशी घट्ट कुरवाळून गंधता! हेच माझे भाग्य! यामुळेच मी या माझ्या अंधाराच्या सुरम्य रंगमहालात खुप सुखानंदात जगते आहे.
धन्यवाद! धन्यवाद!
त्या अतिसुंदर अशा अवर्णनिय अंधारलेल्या रंगमहालातील सुंदरतेची वेदनां देखील सुंदर भावपूर्ण तृप्तानंदी असते याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.मी आत्ममुख झालो.
ठेविले अनंते तैसेची रहावे ।
चित्ती असु द्यावे समाधान ।।
याची प्रचिती या स्वर्गसुन्दरी यामिनीला पाहुन आली.तिचे सारे शब्द अंतराला निःशब्द करून गेले! दुःख वेदनांही प्रांजळ पवित्र असते याची अनुभूती देवून गेले!
नमस्कार.
-- वि.ग.सातपुते.
March 14, 2022
हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. तेथे कस लागतो प्रयत्नांचा, आधाराचा, कष्टांचा.
December 30, 2021
ऑल इंडिया रेडिओसाठी माझी रेकॉर्डिंग सुरू होतीच. २२ डिसेंबर २००२ रोजी रेडिओसाठी माझे २००वे गाणे रेकॉर्ड झाले. माझ्या गाण्याच्या करिअरच्या सुरवातीपासून रेडिओ माझ्या पाठिशी उभा राहिला. या २०० गाण्यांनी मला प्रचंड आत्मविश्वास दिला. माननीय प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगन या रेडिओच्या संगीतकारांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही.
ठाण्याच्या सरस्वती मराठी हायस्कूलच्या सुवर्णजयंतीननिमित्त आयोजित गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सुरेश बापट आणि मुकुंद मराठे यांच्याबरोबर गायलो.
२००३ च्या कार्यक्रमांची सुरुवात ११ जानेवारी रोजी झाली. 'गोल्डन स्वान कन्ट्री क्लब'साठी मी गझलचा कार्यक्रम सादर केला. २००३ सालचा हा पहिला कार्यक्रम होता पण माझा हा ६००वा जाहीर कार्यक्रम होता. एक पुढचा मोठा मैलाचा दगड मी पार केला होता. पण अजून बरीच वाटचाल करायची होती. ही वाटचाल आधीपेक्षा सोपी वाटत होती. कारण गायनाच्या क्षेत्रात थोडे नाव झाल्यामुळे कार्यक्रम समोरून येत होते. कार्यक्रम मिळवण्यासाठीचे कष्ट आता कमी झाले होते.
आर.सी.एफ. आयोजित नाट्यसंगीत आणि गझल यांची मैफल मी प्रल्हाद अडफळकर यांच्याबरोबर गायलो. युनायटेड जैन या संस्थेसाठी संदीप कर्नावट यांनी माझा कार्यक्रम क्रूझवर आयोजित केला. पाण्यावर तरंगत गाण्याची माझी पहिलीच वेळ होती. माझी मुलगी शर्वरी माझ्याकडे गाणे शिकत होतीच. या कार्यक्रमात तीही माझ्याबरोबर गायली. माझ्यापेक्षा शर्वरीने हा कार्यक्रम एन्जॉय केला. आता कार्यक्रमांची भौगोलिक कक्षा रुंदावली होती. दिल्ली, कलकत्ता, इंदौर अशा अनेक ठिकाणी प्रवास होत होता. सुप्रसिद्ध विको लॅबोरेटरीजच्या सुवर्ण जयंतीनिमित्त गोव्याच्या सिदादे दे गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत मी गाणे सादर केले. ख्यातनाम गझलकार सुरेश भट यांना आदरांजली वाहणारा गझलचा कार्यक्रम संगीतकार अनिल मोहिले यांच्या समवेत ठाणे येथे आणि गोरेगाव पत्रकार संघासाठी मी गायलो. मुंबईच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. ते सुरेश भटांचे जवळचे मित्र आणि गझलचे चाहते असल्याने सुरेश भटांच्या अनेक गझल त्यांनी तोंडपाठ पेश केल्या. मित्रावर आणि गझलवर प्रेम करणारी एक व्यक्ती म्हणून विलासरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू पहायला मिळाला.
‘शेजारी-शेजारी' चित्रपटाचे माझे आवडते संगीतकार विश्वासजी पाटणकर यांनी 'रामगाथा' हा रामायणावरील संपूर्ण नवीन गीतांचा कार्यक्रम बसवला. ही गीते अरविंद आगाशे यांची होती. या कार्यक्रमात माझ्याबरोबर दाढे-जोशी, श्रुतकिर्ती मराठे-बने, राजेश पंड्या हे गायक कलाकार होते. या मृदुला कार्यक्रमाचे प्रयोग आम्ही मुंबई, पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाणी केले.
-अनिरुद्ध जोशी
July 26, 2022

जीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते. या लेख मालिकेत मी फक्त मला लाभलेला साहित्यिक सहवास या बद्दलच्या आठवणी लिहीत आहे. माझ्या अगदी वयाच्या 10 व्या वर्षांपासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्षांच्या आठवणी मनात घर करून आहेत. अगदी बालपणी प्रवचनकार , कीर्तनकार , अनेक सांस्कृतिक , धार्मिक कार्यक्रमातून ऐकलेले , प्रत्यक्षात भेटलेले सर्वच दिगग्ज , मान्यवर आठवतात.. किती आणि कुणाकुणाची नावे लिहावीत याच संभ्रमात मी आहे. पण या सर्वच विविध क्षेत्रातील मंडळींचा सहवास जीवनात काहीतरी शिकवून गेला , जगण्याची उमेद देवून गेला हे मात्र खरे.
June 4, 2021
बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना.
इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता.
उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली होती.
सगळीकडे फुललेल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या.
सर्वप्रथम ज्येष्ठ वयोवृद्ध काकासाहेब आणि काकींनी उभयतांचं स्वागत केलं.
त्यानंतर आश्रम व्यवस्थापकांचं स्वागतपर परंतू सकारात्मक भाषण झालं.अनुभव कथन,मौज मजा मस्ती ह्यावर प्रत्येकानी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला.
सजीव चित्ररथातून जगण्याचा मुलमंत्र दाखवण्यात आला.आणि शेवटी मिष्टान भोजनाचा आस्वाद,मुखशुद्धी होताच नविन समाविष्ट झालेल्या दाम्पत्याला पायघड्या घालून त्यांंच्या खोलीत रितसर पोचवण्यात आलं.
एक एक करून सगळेच ज्येष्ठ आपापल्या खोल्यांमधे परतले.
संध्याताई,सुधाकरराव आज एकवर्षापुर्वी आयुष्याच्या सांजवेळी बरोबर तिन्हीसांजेला या आश्रमात आले होते.
निराश मनाला,हताश जगण्याला नवसंजिवनी मिळाली ,ती ह्याच आश्रमात .
आज मात्र दोघेही या आश्रमाचे सुत्रधार होते. सांजवेळेला प्रभातवेळेत बदलवण्याचं कसब ते शिकवण्यात तरबेज झाले होते.स्वत:चे दु:ख कवटाळण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रु पुसावे ह्याचं साधं सरळ सोपं सुत्र ते साऔजवेळी सगळ्यांना शिकवत होते.
ही "मंतरलेली सांजवेळ" आज सगळ्यांनाच हवी हवीशी होती.
सौ.माणिक शुरजोशी.
नाशिक
January 10, 2020
….. पण, ‘ठाकरे’ सिनेमाबाबत गेले काही दिवस नेमकं उलट पाहतो आहे. एकाही कार्यक्रमात, मुलाखतीत, बातमीत दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसेंसाठी काहीच जागा ठेवण्यात आली नाही. बातमीतली जागा तर सोडाच ….नुकताच, ठाकरे सिनेमाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्या शोमध्ये त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच योग्य जागा बसण्यासाठी दिली गेली नाही, असं बातम्यांवरून समजलं.
January 30, 2019
१९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली.
August 29, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti