नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
“आहो ताई,आमच्या समद्या झोपडपट्टीत हेच हाय, येथे आम्ही घरोघरी रोजच्या वीसतीस रुपयांसाठी भांडी घासतो,कामं करतो ते काही उगीच नाही.सर्वांचे नवरे खूप कमाई करत्यात दिवसभर, आणि रात्री पुरी दारूत घालवत्या. पुन्हा काही बी बोलायचे नाही आम्ही.बोललो तर भांडण, शिव्या आणि मारामारी. जरा जास्त काही बोलायला गेलो तर हे, आज घडले तसे चालू असते चार आठ दिवसांला”.
“नवरे कशे हे असे? हे तर बुजगावणे आहेत आपले. यांचा एकही पैसा लागत नाही कधी संसारासाठी, घरासाठी. पण आमची कमाई मात्र सलते यांच्या डोल्यात. संसार हाकायला एकाची तरी कमाई नको का?”
November 23, 2018
दुपारचे भगभगीत उन… वैशाख महिना… जणू सारा आसमंतच पेटला आहे अस जाणवणारी धग, सर्वांगाला होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या झळा, अंगातून झिरपणाऱ्या घामाच्या धारा, त्यातून ज्या कामासाठी निघाले होते ते काम तर झालेच नव्हते. त्यामुळे उद्या परत ह्या रखरखीत उन्हात तडफडत यावे लागणार ह्या विचाराने रस्त्यावर भराभर चालत रिक्षा पकडण्याची माझी धडपड चालू होती.
November 25, 2025
चारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची.
August 1, 2019
कधी कधी उतरत्या कठीण सांजेला मनात ओलसर धुकं दाटून येत.
कधी वाटतं की , मनाची नाजूक कोवळी हळुवार पालवी या धुक्यात कोमेजते की काय ? तरिही सांज होतेच . इवल्याश्या पंखांनी दूर दूर जाणा-या पाखरांचा निरोप अशा सायंकाळी घेतांना आत कुठेतरी खोल व्याकुळता दाटून येते.
वृदांवनातली सांजवात काळीज तुटत तुटत विझतांना मन वातीसारखंच विझत जातं.
प्रसन्न दिसणारा प्रभाकर गरगरत लालबुंद सोनेरी भगवा होत क्षितीजापलीकड़े एकटाच जातांना उगाचच तो ही शापीत वाटायला लागतो.
झगमगती दीपमाळ नजरेला अस्पष्ट आणि विरळ भासू लागते. निशब्द सळसळणा-या अंधारल्या झाड़ांकड़े पाहून त्यांचेच नव्हे तर स्वतःचेही श्वास पोरके वाटायला लागतात.
ओसाड माळरानावरची क्षणभरासाठी जमलेली पाखरं आता उरलेली नसतात . या निष्पर्ण माळरानाचे एकटेपण अशा संध्याकाळी कसे असेल याचा विचार अगदी नाहीच करवत .
तू का नाही येत रे फुलून बहरुन ? मग पाखरंही रेंगाळतील .. सूर्य तुझ्याआडच मावळेल .. तू असा फुललेला .. पक्षी जायचे नाहीत दूर मग .. तुझ्याच आश्रयाला राहतील.. किती छान दिसशील तिथं तू .. बहरलेला , चिमण्या पाखरांनी लगडलेला ..मी सांगते म्हणून ऐक ..माझ्यासाठी काहिही जमेल तुला .. बघ !
नाहितरी मी तुला "विश्रब्ध " उगाच म्हणते का रे !
बघ उजळतंय इथं .. नुसत्या कल्पनेनंही ...
©वर्षा पतके -थोटे
5-01-2019
February 7, 2019

कुणीतरी विचारलं, कहां जाना है? वाचता येत असतं तर तुला कशाला विचारलं असतं? असा म्हातारीचा रोखठोक प्रश्न ऐकून प्रश्नकर्ता मागच्या मागे सटकलेला होता
April 24, 2022
घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …
December 8, 2024
ज्याला मी “निळ्या डोळ्यांचा जादूगार ” म्हणतो त्या राज कपूरला सतत भव्यतेचे उत्कट वेड होते. त्याअर्थाने त्याने ७० एम एम पेक्षाही भव्य दिव्य स्वप्नप्रसंग चित्रित केले. केव्हढा आवाका असलेला हा कलावंत – निर्मितीत कोठेही तडजोड न करणारा.
April 25, 2021
आपल्या देशाच्या सिमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य दल तर अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल काम करीत आहे. अंतर्गत सुरक्षितते बरोबरच लहान-सहान घटना असतील किंवा २६/११ सारखा देशावरील अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो अगर कोणतेही मोठे संकट येवो, त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले न झाले तरी केवळ अशा घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलिसच तेथे धावून जात असतो.
June 13, 2024
संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते.
May 1, 2022

सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहेच आणी आपणा सर्व मित्रांचाही कृतज्ञ आहे. माणसं ही योगायोगाने भेटतात . माणसांचा संग्रह आणी त्यांचा सहवास हेच माझे या जन्मिचे संचित आहे असे मी मानतो.
June 13, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti